श्री जयंत कुलकर्णी यांच्या देरसू उझाला पुस्तकासाठी राजहंस प्रकाशनाला प्रथम पारितोषिक
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार मंडळी! आपल्याला सर्वांना माहित आहे की आपले आवडते उत्साही आणि अभ्यासू मिपाकर आणि अनेक विषयात चौफेर लिखाण करणारे सिद्धहस्त लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांचे देरसू उझाला हे भाषांतरित पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेही असेल. ज्यांनी वाचले नसेल त्यांनी जरूर मिळवून वाचा. खिळवून ठेवणारे पुस्तक आहे.
कळवण्यास आनंद वाटतो आहे की फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे २०१७ च्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांमधे भाषांतरित पुस्तकांच्या विभागात 'देरसू उझाला' या जयंत कुलकर्णींच्या पुस्तकाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
श्रीगणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी ही बातमी आहे. जयंत कुलकर्णींसारखे लेखक आपल्या मिपा परिवारात आहेत याबद्दल अभिमान वाटत आहे. जयंत कुलकर्णी यांचे तसेच राजहंस प्रकाशनाचे माझ्यातर्फे आणि मिपा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!
******
ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
प्रतिक्रिया
छान
अभिनंदन व कौतुक!
जयंत काकांचे हार्दिक अभिनंदन
अभिन॑दन.
मनःपूर्वक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन
पुन्हा एकदा अभिनंदन!
अरे वा...
और आन दो
मनःपूर्वक अभिनंदन !!!
हार्दिक अभिनंदन!
अरे वा!
अभिनंदन काका
जकुसाहेब, राजहंस प्रकाशन अन
Pagination