Skip to main content

श्री जयंत कुलकर्णी यांच्या देरसू उझाला पुस्तकासाठी राजहंस प्रकाशनाला प्रथम पारितोषिक

लेखक पैसा यांनी शनिवार, 26/08/2017 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire Simple, Free Image and File Hosting at MediaFire नमस्कार मंडळी! आपल्याला सर्वांना माहित आहे की आपले आवडते उत्साही आणि अभ्यासू मिपाकर आणि अनेक विषयात चौफेर लिखाण करणारे सिद्धहस्त लेखक श्री. जयंत कुलकर्णी यांचे देरसू उझाला हे भाषांतरित पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी ते वाचलेही असेल. ज्यांनी वाचले नसेल त्यांनी जरूर मिळवून वाचा. खिळवून ठेवणारे पुस्तक आहे. कळवण्यास आनंद वाटतो आहे की फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे २०१७ च्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांमधे भाषांतरित पुस्तकांच्या विभागात 'देरसू उझाला' या जयंत कुलकर्णींच्या पुस्तकाला प्रथम पुरस्कार मिळाला आहे. श्रीगणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी ही बातमी आहे. जयंत कुलकर्णींसारखे लेखक आपल्या मिपा परिवारात आहेत याबद्दल अभिमान वाटत आहे. जयंत कुलकर्णी यांचे तसेच राजहंस प्रकाशनाचे माझ्यातर्फे आणि मिपा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! ****** ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19688
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

In reply to by जयंत कुलकर्णी

अर्थात तो पुरस्कार राजहंसला माझ्या पुस्तकासाठी मिळाला आहे... हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पण मला वाटते तुम्हाला तेच म्हणायचे असेल.

अरे वाहहह, जबरदस्त बातमी. जयंतकाकांचे मनापासून अभिनंदन. इतक्या ऋजु स्वभावाच्या अन प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या मिपाकर जयंतकाकांचा अभिमान आहे. ह्या सर्वांगसुंदर पुस्तकावर काकांची लयबद्ध स्वाक्षरी असलेली प्रत माझ्याकडे आलेली याचा जास्तच अभिमान आहे. शतशः धन्यवाद आणि शुभेच्छा जयंतकाका.

जयंत काका आणि राजहंस प्रकाशन दोघांचे मनापासून अभिनंदन. तुमच्या ईतर लेखमालिकेचीही खुप चांगली पुस्तके होउ शकतात.

आपण सर्वांनी केलेल्या कौतुकाने मी तर भारावून गेलो आहे. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद ! या निमित्ताने परत एकदा सांगायला आवडेल की मला लिहिता येते हा व वाचकांना मी लिहिलेले वाचायला आवडते याचा शोध मला प्रथम मिपावरच लागला. आणि पैसाचे आभार.

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंतराव, मला हरीण मारून खाता येते असा शोध जंगलात लागला म्हणून सिंहाने गीरच्या अभयारण्याचे आभार मानावेत काय? ;-) असो. सध्या आम्ही तुमच्या यशामुळे निर्माण झालेल्या आनंदाचा आस्वाद घेण्यात मश्गुल आहोत. आ.न., -गा.पै.

पुस्तका बद्दल चार ओळी जोडल्या असत्या तर चांगले झाले असते. नावावरून काहीच बोध होत नाही. आमच्या सारखे काही आर्थिक दृष्ट्या मागासले लोक त्वरित पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत !

In reply to by सामान्यनागरिक

असो. मी चार ओळीत लिहिण्यापेक्षा ही घ्या या पुस्तकाची छान ओळख. http://sahityasuchi.erasik.com/articles/DERSU_UJALA

In reply to by पैसा


In reply to by सामान्यनागरिक

आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...

In reply to by सामान्यनागरिक

आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...

In reply to by सामान्यनागरिक

आवडेल. येथील मित्रांनो कोणी तरी ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांनी तरी कोणी मनावर घेतले तर बरे होईल...

ताजा कलम: महाराष्ट्र राज्य शासन, मराठी विभागातर्फे २०१६ च्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अनुवादित पुस्तकासाठीचा पुरस्कार जयंत कुलकर्णी यांच्या 'देरसू उझाला' या पुस्तकाला घोषित झाला आहे. जयंत कुलकर्णी यांचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!

मनःपूर्वक अभिनंदन !!! तुमच्या अभ्यासू लेखनाचा, सुंदर फोटोंचा आणि झक्कास सहीचा मी चाहता आहे. पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन काका .

जयंत कुलकर्णी आणि राजहंस प्रकाशनाचे मनःपूर्वक अभिनंदन! स्वाती