Skip to main content

क्रिकेट - २

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 05/01/2017 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

वाचने 113032
प्रतिक्रिया 435

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

जर अंतिम फेरीत पाकडे व बांगला आले तर तो सामना बघण्याची गरजच नाही.
असं का बरं?

In reply to by श्रीगुरुजी

आवड आपली आपली. मला तरी पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज फार आवडतात. १९९२ साली विश्वचषकाच्या वेळी जेव्हा टी.व्ही. घेतला तेव्हा इम्रान खानला पहिला. इम्रान खान असू दे वा वासिम अक्रम, वकार युनूस, आकिब जावेद असू दे किंवा हल्लीच्या पिढीतले शोएब, सामी किंवा आत्ताचा आमिर. जलदगती गोलंदाजी किती सुंदर आणि भेदक असू शकते हे पाकिस्तानच्या गोलंदाजांना पाहून कळले. वेस्ट इंडिजचा पण दबदबा होता म्हणा पण वॉल्श आणि अँब्रोज निवृत्त झाले आणि आणि तो तोफखाना साध्या लवंगी फटाकडीमध्ये कधी बदलला कळले पण नाही. नाहीतर आमचे आयुष्य कुरुविला, दोड्डा गणेश, हरविंदर सिंग, सलील अंकोला, टिनू योहानन सारखे गोलंदाज बघण्यातच गेले असते. त्यातल्या त्यात आमचा जवागल श्रीनाथ आणि प्रसाद बरे होते म्हणा. पण आपल्या वेगाने समोरच्या फलंदाजाच्या मनात धडकी बसवावी असा एकतरी बॉलर आपल्याकडे व्हायला हवा होता.

पाकड्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून इंग्लंडला फक्त २११ धावांत रोखले. इंग्लंडची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल.

इंग्लंडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करून सुरवातीलाच २-३ बळी मिळवून पाकड्यांवर दडपण आणतील असे वाटले होते. परंतु पाकड्यांनी चांगली फलंदाजी करून आतापर्यंत प्रतिषटक जवळपास ६ च्या गतीने धावा करून १५ षटकात ८८ धावा केल्या आहेत. एकंदरीत पाकडे विजयाच्या मार्गावर आहेत. या स्पर्धेत बहुतेक सर्व सामन्यांचे निकाल मनाविरूद्ध लागले आहेत. जे देश जिंकू नयेत अशी तीव्र इच्छा होती तेच देश जिंकताना दिसतात आणि जे देश जिंकावेत असे तीव्रतेने वाटत होते ते हरताना दिसताहेत. आजच्या सामन्यावरून अशी भीति वातत आहे की रविवारी कदाचित पाकडे वि. बांगला असा अंतिम सामना नशिबी येईल.

In reply to by श्रीगुरुजी

आपल्या नशीबाच्या भागाची फळे........कुठे, कशी आणि कधी भोगायला लागतील, काही सांगता येत नाही. पण बहूदा "भारत-पाकिस्तान" अशीच फायनल मॅच होईल. बरीच आर्थिक गणिते "भारत-पाकिस्तान" ह्या मॅच मध्ये होतात.

In reply to by मुक्त विहारि

बरीच आर्थिक गणिते "भारत-पाकिस्तान" ह्या मॅच मध्ये होतात. +१ ज्या पद्धतीने श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध हरला त्यावरून "कर्ता करविता तो आहे " बाकी सगळे निमित्तमात्र !

काल पाकड्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. विशेषतः पाकड्यांच्या मध्यमगती गोलंदाजांनी सातत्याने लेगस्टंपच्या दिशेने यॉर्करचा मारा करून इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला चेंडू उचलून मारायला संधीच दिली नाही. बेन स्टोक्स सारख्या फटकेबाजाला ६४ चेंडू खेळून एकही चौकार/षटकार न मारता जेमतेम ३२ धावाच करता आल्या यावरून गोलंदाजांच्या अचूकतेची कल्पना येते. आज बांगलाविरूद्ध भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघच बहुसंख्य सामन्यात जिंकला आहे. परंतु स्पर्धेतील १३ पैकी १० सामन्यात माझ्या मनाविरूद्ध निकाल लागल्याने आजच्या सामन्याविषयी मी कोणतेही भाकित करू इच्छित नाही.

पाऊस येत असल्याने नाणेफेक होऊन सुद्धा सामना वेळेवर सुरू होण्याची शक्यता नाही. जर सामना पावसामुळे रद्द झाला किंवा अनिर्णित अवस्थेत संपला तर प्राथमिक फेरीत भारताची निव्वळ धावगती व गुण बांगलापेक्षा जास्त असल्याने भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

आयसीसी प्रमुख, स्टार प्रमुख, पेप्सी प्रमुख सर्व जण एकत्र बसून अंतिम सामना बघताहेत. That explains...

भंगारेस्ट सामना ऑफ इन माय होल लाईफ ! हार्दिकने खरे तर जाडेजाला बॅटने हाणला पाहिजे होता ! हार्दिक आणि भुवनेश्वर च्या जिद्दिची तारीफ केली पाहिजे. सगळे हाराकिरी करत असताना यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद दिला.

रविवारी १८ जून रोजी ओव्हल मैदानावर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून दारूण पराभव झाला. १७ जून पासून कालपर्यंत बराच वेळ मिपा बंद असल्याने किंवा नीट चालत नसल्याने सामन्याआधी किंवा सामन्यानंतर सामन्याविषयी काहीच लिहिता आले नाही. आता इतक्या उशीरा ३ दिवसानंतर सामन्याविषयी काहीही लिहिण्यात अर्थ नाही. असो. कालच कुंबळेने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहली व इतर काही खेळाडूंचे व कुंबळेचे पटत नव्हते असे मागील महिन्यापासून वृत्त येत होतेच. कुंबळेला प्रशिक्षक पदाची मुदतवाढ देण्याऐवजी प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागविले गेले तेव्हाच कुंबळेला घालविण्याची तयारी अधिकृतरित्या सुरू झाली होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारताचा प्रशिक्षक होण्याची रवी शास्त्रीला तीव्र इच्छा होती. कोहलीला देखील तोच हवा होता कारण पोलिटिकली करेक्ट वागून कोणाशी वाकड्यात न जाता आपला मतलब साधून घेण्यात शास्त्री वाकबगार आहे. तो कधी समालोचक असतो तर कधी संघाचा व्यवस्थापक असतो. आता कदाचित तो प्रशिक्षकही होईल. तो कायमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नीलाक्षपुत्र राहिलेला आहे कारण तो मंडळाच्या विरूद्ध कधीही जात नाही. कुंबळेच्या तुलनेत शास्त्रीची कारकीर्द अतिसामान्य आहे. कुंबळे हा अत्यंत प्रामाणिक व मेहनती खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो कोणत्याही वादात कधीही अडकलेला नाही. सभ्य खेळाडूंची कर्नाटकची परंपरा आहे. कुंबळेच्या पूर्वी गुंडाप्पा विश्वनाथ, चंद्रशेखर भागवत, इरापल्ली प्रसन्ना इ. कर्नाटकचे खेळाडू नको इतके सभ्य होते. कुंबळेसुद्धा त्याच परंपरेतला आहे. आपल्या कडक कार्यपद्धतीवर कोहली व इतर काही खेळाडू नाराज आहेत हे लक्षात आल्यानंतर तो सभ्यपणे स्वत:हूनच बाहेर पडला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कुंबळेला अशा वाईट पद्धतीने बाहेर जावे लागल्याबद्दल गावसकरने तीव्र शब्दात टीका केली आहे. http://www.loksatta.com/krida-news/anil-kumble-resigned-sunil-gavaskar-…

कोहलीचे म्हणणे ऐकून न घेताच कुंबळेची पाठराखण करण्यासाठी मीडिया अशा प्रकारे भरमिस्ट बातम्या कशा काय देऊ शकतात? वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वर तर बोलायलाच नको. मागच्या वर्षी भारतीय संघाचा उंच होत चाललेला आलेखाचे बरेचशे श्रेय विराट कोहली आणि त्याच्या टीम मेट्स ला जाते. कुंबळेचा त्यातील योगदान माध्यमात चर्चिलेला दिसलं नव्हता. मग आताच माध्यमांना कुंबळे विषयी एवढा पुळका का आला असावा. मला मान्य आहे की कोहली थोडा आक्रमक आणि फटकाळ आहे. हा त्याचा व्यक्ती दोष असू शकतो पण त्याचा फायदा पण झाला आहे. कुंबळे शिस्त आणि अनुशासन च्या नावाखाली क्रिकेट संघ चालवण्या ऐवजी शाळा चालवत असावा असं माझे मत आहे. http://www.loksatta.com/krida-news/indian-caption-virat-kohli-change-th…

काल वेस्ट इंडिजने भारताला एकदिवसीय सामन्यात हरविले. मागील एक महिन्यात भारताला तळाच्या तीन संघांकडून पराभव पत्करावा लागला आहे (७ व्या क्रमांकावरीर श्रीलंका, ८ व्या क्रमांकावरील पाकडे व ९ व्या क्रमांकावरील विंडिज). या तीनही सामन्यात कोहली पूर्ण अपयशी ठरला होता.

विशुमित व श्रीगुरुजी, माझ्या मते भारत पाक सामन्यात भारताने जाणूनबुजून हार पत्करली आहे. पाकी क्रिकेटास संजीवनी देण्यासाठी पाकने एखादी स्पर्धा जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा प्रतिस्पर्धी भारत असेल तर दुधांत साखरंच जणू. यावरून लक्ष हटवण्यासाठी कोहली विरुद्ध कुंबळे हा वाद नाहक रंगवण्यात येत आहे. कुंबळेसारखा माणूस निकालनिश्चितीसाठी सोयीस्कर नाही. भारत खरोखरीच कमजोर खेळला हे दाखवण्यासाठी जणू परवाचा सामना अवघ्या १९० चं लक्ष्य असूनही हरण्यात आला. धोनीची महामंद खेळी (=सुपरस्लो इनिंग) याचसाठी होती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

कोणती ही अधिकृत आणि खात्रीलायक माहिती नसताना एखाद्याच्या निष्ठेवर शंका व्यक्त करणे कसे काय जमते बुवा लोकांना. कालच्या सामन्यानंतर धोनीच्या डोळ्यात तरळले पाणी त्याच्या निष्ठे बाबत बरेच काही सांगून गेले. कुंबळेची तळी उचलण्यासाठी ह्या नवीन दमाच्या खेळाडूंचे खच्चीकरण करणे नाही आवडले.

In reply to by विशुमित

तो सामना अजिबात फिक्स नव्हता. अर्थात कुंबळेची तळी उचलण्याचा व सामना फिक्स आहे असे आरोप करण्याचा काहीही संबंध नाही.

In reply to by गामा पैलवान

माझ्या मते भारत पाक सामन्यात भारताने जाणूनबुजून हार पत्करली आहे. हे कोणी सांगितलं? पाकी क्रिकेटास संजीवनी देण्यासाठी पाकने एखादी स्पर्धा जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा प्रतिस्पर्धी भारत असेल तर दुधांत साखरंच जणू. पाकी क्रिकेटला संजीवनी हवी आहे हे कोणी सांगितलं? कशासाठी पाकी क्रिकेटला संजीवनी हवी आहे? पाकिस्तानमध्ये जानेवारी २००९ पासून (झिंबाब्वेच्या ३ एकदिवसीय सामन्यांचा अपवाद वगळता) कोणत्याही देशाच्या संघाने पाऊल ठेवलेले नाही. जरी या विजयामुळे पाकी क्रिकेटला संजीवनी मिळाली असे क्षणभर गृहित धरले तरी पाकिस्तानमध्ये कोणताही संघ पाऊल ठेवत नसल्याने या संजीवनीचा शष्प फायदा नाही. यावरून लक्ष हटवण्यासाठी कोहली विरुद्ध कुंबळे हा वाद नाहक रंगवण्यात येत आहे. कुंबळेसारखा माणूस निकालनिश्चितीसाठी सोयीस्कर नाही. भारत खरोखरीच कमजोर खेळला हे दाखवण्यासाठी जणू परवाचा सामना अवघ्या १९० चं लक्ष्य असूनही हरण्यात आला. धोनीची महामंद खेळी (=सुपरस्लो इनिंग) याचसाठी होती. कोहली-कुंबळे हा वाद पूर्ण वेगळा आहे. कोहली डोक्याने भडकू व उर्मट आहे. कुंबळे जुन्या पिढीतला सभ्य खेळाडू आहे. कुंबळे व कोहली ही दोन टोके आहेत. अशा माणसांचे एकमेकांशी जमणे अवघड आहे. कुंबळे कर्नाटकचा खेळाडू होता. भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर कर्नाटकचे बरेचसे खेळाडू अत्यंत सभ्य व शांत होते (उदा. गुंडाप्पा विश्वनाथ, द्रविड, चंद्रशेखर, प्रसन्ना, कुंबळे इ.). अशा स्वभावाचे खेळाडू वागणुकीत आक्रमकता दाखवित नाहीत. त्यामुळेच कर्नाटकचा कोणताही खेळाडू दीर्घकाळ भारताचा कर्णधार होऊ शकला नाही. गुंडाप्पा विश्वनाथ फक्त २ कसोटी सामन्यात कर्णधार होता. कुंबळे जेमतेम १ वर्ष कर्णधार होता. द्रविड जेमतेम ५-६ महिने कर्णधारपदावर टिकला. कोहलीसारख्या आक्रमक खेळाडूसमोर कुंबळेचे फारसे चालू शकले नाही. कोहलीला कुंबळेची शिस्त नको आहे. त्यामुळे त्याने आपल्या पूर्वसुरींप्रमाणे स्वतःहून बाजूला व्हायचा निर्णय घेतला. रवी शास्त्री हा एकदम वेगळा आहे. तो कायम पोलिटिकली करेक्ट भूमिका घेतो. तो भारतीय संघात असताना सुद्धा संघाला विजयी करण्याऐवजी कूर्मगतीने फलंदाजी करून स्वतः बाद न होता स्वतःच्या धावा कशा वाढतील यासाठी प्रयत्नशील असायचा. वेगवेगळ्या लोकांशी कसे जमवून घ्यायचे ही कला त्याच्याकडे आहे. म्हणूनच तो गेली अनेक वर्षे समालोचक, संघ व्यवस्थापक इ. भूमिकेतून संघाशी संबंधित आहे. भारताच्या प्रशिक्षक पदासाठी तो पूर्वीपासूनच प्रयत्न करीत आहे. त्याने कोहली व संघातील इतरांशी जमवून घेतले आहे. स्वतः फारसा थोर खेळाडू नसला तरी सर्वांशी जमवून घ्यायचे चातुर्य त्याच्याकडे असल्याने कोहलीला तो हवा आहे. मुळात चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना फिक्स वगैरे नव्हताच. कोहलीच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती ज्यात भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. आपल्या नेतृत्वाखालील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोहली जाणूनबुजून हरणे शक्य नाही. त्या सामन्यात पूर्ण नवीन खेळपट्टी वापरण्यात आली होती व ती एकदम सपाट होती. त्यावर भरपूर धावा होणे अपेक्षित होते. त्यामुळे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करावयास हवी होती. परंतु त्या स्पर्धेतील १४ पैकी १० सामने धावांचा पाठलाग करणार्‍या संघाने जिंकले होते. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करणे हा तसा चुकीचा निर्णय नव्हता. परंतु सपाट खेळपट्टीचा पुरेपूर फायदा पाकड्यांनी उठवून धावांचा डोंगर रचला. बुमराची गोलंदाजी पूर्ण फसली होती. नशीबही बुमराच्या विरूद्ध होते. भारतीय गोलंदाज सपाट खेळपट्टीवर पूर्ण अपयशी ठरले. जेव्हा भारताची फलंदाजी सुरू झाली तेव्हा धावांचे प्रचंड दडपण त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. पाकड्यांनी गोलंदाजी चांगली केली. शेवटी भारत हरला. तो सामना फिक्स वगैरे नसून पाकिस्तान खूप चांगला खेळल्यामुळे भारत हरला. तो सामना फिक्स होता असे निष्कर्ष काढणार्‍यांचे हसू येते. २०११ मधील पाकड्यांविरूद्धचा उपांत्य फेरीतला सामना भारताने जिंकल्यावर तो फिक्स होता असे निष्कर्ष काही जणांनी काढले होते तर २०१७ मध्ये सामना हरल्यावर तसेच निष्कर्ष काढले जात आहेत. म्हणजे सामना जिंकला तरी फिक्स आणि हरला तरी फिक्स! परवाचा विंडीजविरूद्धचा सामना तसाच होता. ती खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप अवघड होती. त्यामुळेच दोन्ही संघांचे फलंदाज धावांसाठी झगडत होते. आवश्यक धावगती फक्त ३.८ असल्याने रहाणे (९१ चेंडूत ६० धावा) व धोनी (११४ चेंडूत ५४ धावा) हे खूप संथ खेळले असे मला वाटत नाही. चेंडू फार उसळत नसल्याने व टप्पा पडल्यावर संथ गतीने येत असल्याने भारतीय फलंदाजांचे फटके चुकून झेल उडत होते. सामना फिक्स वगैरे अजिबात नव्हता.


In reply to by गामा पैलवान

चेन्नई सुपरकिंग्जचा मालकच सामने फिक्स करीत होता. धोनीचा फिक्सिंगशी संबंध नव्हता. परंतु त्याला फिक्सिंगची माहिती असण्याची दाट शक्यता आहे. परंतु मनमोहन सिंगांप्रमाणे तो गप्प राहिला. मुळात आयपीएल हा एक व्यावसायिक तमाशा आहे. ते अधिकृत क्रिकेट नाही. व्यावसायिक तमाशामध्ये कोणत्याही मार्गाने नफा कमाविणे हा एकच हेतू असतो व त्यासाठी कोणतेही मार्ग क्षम्य असतात.

सध्या पुरूष संघाच्या तुलनेत भारतीय महिलांचा संघ चांगलाच भरात आहे. महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने इंग्लंड, वेस्ट इंडीज व पाकिस्तानच्या महिला संघाला हरविले आहे. आज श्रीलंकेबरोबर सामना आहे.

कुंबळे विना वेस्ट इंडिज जातोयस तर सर्व जवाबदारी तुझी असे सांगणाऱ्यांची कोहलीने तोंडे बंद केली आहेत. कोहली आणि टीम ने वेस्ट इंडिजला संपूर्ण व्हाईट वॉशच दिला असता पण थोडक्यात हुकला. त्या तिसऱ्या सामन्याचे श्रेय वेस्ट इंडिजला दिले नाही तर त्यांच्या वर अन्याय होईल. http://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-west-indies-5th-odi-fi…

In reply to by विशुमित

विंडीजचा संघ भारताच्या तुलनेत अत्यंत दुर्बल आहे. त्यामुळे या विजयामुळे हुरळून जाण्यासारखे काहीही नाही. या मालिकेसाठी भारताने दुय्यम संघ पाठवायला पाहिजे होता.

In reply to by श्रीगुरुजी

विंडीज दुर्बल असला तरी आपला संघ कुंबळे विना गेलेला होता आणि त्याने निर्विवाद मालिका विजय मिळवला. मला फक्त एवढंच नमूद करायचं होता. दुय्यम संघ का पाठवायला पाहिजे होता हे नाही समजलं.

In reply to by विशुमित

कुंबळे तर लांबच राहिला, दस्तुरखुद्द कोहली, धोनी इ. नसते तरी भारत जिंकलाच असता. इतक्या दुय्यम संघाबरोबर तगडा संघ पाठविणे योग्य नव्हते. भारत आता २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करीत आहे. सध्याच्या भारतीय संघात युवराज व धोनी हे दोन ३६ वर्षीय खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. केदार जाधव सुद्धा ३२ वर्षांचा आहे. त्यामुळे २०१९ व पुढील काळासाठी या दौर्‍यावर कोहली, युवराज, धवन, धोनी इ. वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन त्यांच्या ऐवजी नवोदित राहुल त्रिपाठी, जलदगती गोलंदाज थंपी, श्रेयस अय्यर, करूण नायर इ. ना संधी द्यायला हवी होती. रुषभ पंत संघात असूनसुद्धा त्याला एकही सामना खेळविला नाही. निदान १-२ सामन्यात तरी धोनीला विश्रांती देऊन त्याला खेळवायला हवे होते. नवोदितांना एकदम तगड्या संघासमोर आणण्याऐवजी तुलनेने दुर्बल संघाविरूद्ध समोर आणले तर ते यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते.

सध्या झिंबाब्वेचा संघ श्रीलंकेच्या दौर्‍यावर आहे. ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत झिंबाब्वेने अनपेक्षितपणे २ सामने जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे. अजून १ सामना शिल्लक आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेला द. आफ्रिका वि. इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४५८ धावांना आफ्रिकेने ३६१ धावा करून बर्‍यापैकी उत्तर दिले. आफ्रिकन गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे आज ४ थ्या दिवशी इंग्लंडच्या दुसरा डाव २३३ धावांत संपला. आता विजयासाठी आफ्रिकेला जवळपास ९ तासात ३३१ धावा करायच्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

दाफ्रिकेचा अवघ्या ३७ षटकांत ११९ धावांत खुर्दा! मोईन अलीचे डावांत ६ व सामन्यात १० बळी. -गा.पै.

झिंबाब्वे श्रीलंकेत ऐतिहासिक विजयाच्या मार्गावर आहे. ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी असताना आजच्या ५ व्या सामन्यात लंकेला ५० षटकांत फक्त २०३ धावांत रोखल्यानंतर झिंबाब्वेने आतापर्यंत १५ षटकांत १ बाद ९८ धावा केल्या आहेत.

भारताने नुकतेच श्रीलंकेला त्यांच्यात भूमीवर ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी धूळ चारली. भारताने प्रथमच परदेशात ३ सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने जिंकले. परदेशातील मालिकेत ३ सामने जिंकण्याची ही फक्त दुसरी वेळ. यापूर्वी १९६८ मध्ये भारताने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ असे हरविले होते. श्रीलंकेचा संघ सध्या लिंबूटिंबू अवस्थेत आहे. २०१५ पासून जयवर्धने, संगकारा व दिलशान हे ३ सुपरस्टार निवृत्त झाल्यानंतर लंकेला त्यांच्या जवळपास जाणारेसुद्धा खेळाडू मिळालेले नाहीत. अष्टपैलू मॅथ्यूज दुखापतीमुळे फक्त फलंदाजी करतो. थिसारा परेरा व कुलसेकरा जवळपास संपलेले आहेत. रंगना हेराथ निवृत्तीच्या मार्गावर आहे. त्यांच्याजागी आलेले नवीन खेळाडू साधारण आहेत. त्यामुळे श्रीलंका संघाची दारूण अवस्था आहे. उद्यापासून भारत श्रीलंकेविरूद्ध ५ एकदिवसीय सामने व १ त-२० सामना खेळणार आहे. भारत हे सर्व ६ सामने जिंकेल असा अंदाज आहे. २-३ महिन्यांपूर्वी झिंबाब्वेने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-२ अशी मात दिली होती. सध्या वेस्ट इंडीज व श्रीलंकेचे संघ अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. २०१९ मधील विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांना थेट प्रवेश न मिळता पात्रता फेरीतून प्रवेश मिळवावा लागेल असं दिसतंय.

इंग्लंड-विंडीज टेस्ट मॅच मधे तिसर्‍या दिवशी वेस्ट इंडिज पहिल्या डावात ४४/१ वरून पुढे दोनदा ऑल आउट होउन मॅच हरली. म्हणजे त्यांचे ९ लोक एकाच दिवसांत दोन आउट झाले असे होउ शकले असते - पण पहिल्या आणि दुसर्‍या डावात नाबाद राहिलेले बॅट्समेन वेगळे आहेत. म्हणजे एकूण ८ खेळाडू या एकाच दिवसांत दोनदा आउट झाले. मी हे सुद्धा चेक करत होतो की कोणी असा नग आहे का की जो त्याच बोलर कडून परत आउट झाला - पण तसा एकही दिसला नाही Happy एकेकाळी इंग्लंड सिरीज म्हणजे राखीव कुरण होते विंडिज वाल्यांचे - लॉइड-रिचर्ड्सच्या कप्तानपदाच्या काळात.

In reply to by फारएन्ड

विंडीजचा कसोटी संघ भारतातील एखाद्या क्लब लेव्हलचा संघ झाला आहे. १९८४-८५ मध्ये विंडीजने इंग्लंडविरुद्ध ५ कसोटींच्या लागोपाठ ३ मालिकेतील १५ पैकी १४ सामने जिंकले होते. तोच देश आता अत्यंत दयनीय अवस्थेत आहे.

पहिला एकदिवसीय सामना भारताने अगदी सहज जिंकला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरूवात केली होती. सुरवातीला २४.२ षटकात १ बाद १३९ इतक्या चांगल्या अवस्थेत ते होते. परंतु नंतर डाव कोसळून सर्वबाद २१६ इतक्या कमी धावसंख्येवर त्यांना समाधान मानावे लागले. भारताने आपले लक्ष्य केवळ १ गडी गमावून जेमतेम २८.५ षटकात पूर्ण केले. भारताने इतक्या दुर्बल संघाबरोबर खेळताना प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन दुय्यम संघ खेळवायला हवा होता. ऋषभ पंत, राहुल त्रिपाठी, बेसिल थंपी अशा खेळाडूंना संधी द्यायला हवी होती.

लिंबूटिंबू श्रीलंकेविरूद्धचा कालचा सामना अचानक रंगतदार झाला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात फक्त २३६ धावा केल्या त्यावेळी भारत हा सामना पहिल्या सामन्याप्रमाणे अगदी सहज जिंकेल असा अंदाज होता. श्रीलंकेविरूद्ध भारताचे सामने एकतर्फी होतात. त्यामुळे श्रीलंकेची फलंदाजी पाहिलीच नाही. मध्यंतराच्या काळात पावसाने थोडासा वेळ वाया गेल्याने भारताचे लक्ष्य ४७ षटकात २३१ असे करण्यात आले. भारताने फलंदाजी सुरू केल्यानंतर धवन व रोहीतने सलामीसाठी शतकी भागीदारी केली. नाबाद १०९ धावा असताना दनंजयाचा एक चेंडू धवनने स्वीप करायचा प्रयत्न केला. चेंडू जमिनीलगत न राहता हवेत उंच उडाला. फाईनलेगवर क्षेत्ररक्षण करीत असलेल्या अँजेलो मॅथ्यूजने चेंडूच्या दिशेने धाव घेतली व शेवटी हवेत सरळ सूर मारून एक अशक्यप्राय अप्रतिम झेल पकडला. दुखापतींनी ग्रस्त असलेल्या मॅथ्यूजने असा झेल पकडणे हे केवळ अविश्वसनीय होते. मी भारताचा डावही सुरवातीला पहात नव्हतो. मी जेव्हा बघायला लागलो तेव्हा केदार जाधव दनंजयाच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद होऊन परतत होता. तो त्याच्या षटकाचा पहिलाच चेंडू होता. रिप्ले पाहताना असे दिसले की केदार जाधव चेंडूला दिलेल्या फसव्या उंचीमुळे पूर्ण फसला व उंचीचा अजिबात अंदाज न येऊन त्रिफळा बाद झाला. नंतर आलेल्या कोहलीने पहिल्याच चेंडूवर मिडविकेटमधून चौकार मारून चांगली सुरूवात केली. पुढच्याच चेंडूवर केदार जाधवप्रमाणे कोहलीला देखील चेंडूच्या उंचीचा अंदाज आला नाही व त्याची मधली यष्टी उध्वस्त झाली. चौथ्या चेंडूवर नवीन आलेल्या पंड्याने एक धाव घेतली. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा जाधव व कोहलीप्रमाणे राहुल देखील फसला व त्रिफळा बाद झाला. फक्त ५ चेंडूत ३ बळी आणि तिघेही त्रिफळाबाद! भारतीय फलंदाजी अचानक केविलवाणी वाटायला लागली. आता ५ बाद झाले होते. आता धोनी आला होता व दुसरीकडे पंड्या होता. दनंजयाच्या पुढच्याच षटकात पुन्हा एकदा त्याने ऑफस्टंपच्या बाहेर चांगली उंची दिलेला चेंडू टाकला. पंड्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी पुढे सरसावला. परंतु चेंडू व बॅटचा संपर्क झालाच नाही. यष्टीरक्षक डिकवेलाने कोणतीही चूक न करता पंड्याला यष्टिचित केले. नंतर आलेला अक्षर पटेल थोडावेळ टिकला. परंतु तोसुद्धा दनंजयाच्या गोलंदाजीवर पायचित झाला. भारत ७ बाद १३१ व त्यात दनंजयाचे ६ बळी. २००८ मध्ये आशिय चषक स्पर्धेत श्रीलंकेच्या अजंता मेंडिसने आपल्या कॅरम बॉलने भारतीय फलंदाजांना फसवून तब्बल ६ बळी घेऊन सामना जिंकला होता. त्याचीच पुनरावृत्ती काल होताना दिसत होती. दुसरीकडे धोनी गंभीर चेहर्‍याने पडझड पाहत होता. त्याच्या जोडीला आता भुवनेश्वर कुमार आला. भारताला जिंकण्यासाठी अजून १०० धावा हव्या होता, परंतु ७ गडी बाद झाले होते. अजून २५ षटके हातात होती. त्यामुळ धावगतीची कोणतीही चिंता नव्हती. भुवनेश्वर व धोनीने कोणतेही दडपण न घेता अतिशय शांतपणे फलंदाजी करायला सुरूवात केली. अतिशय जपून खेळत शांतपणे १-२ धावा घेत लंकेच्या गोलंदाजांना निष्प्रभ करायला सुरूवात केली. जशा धावा वाढायला लागल्या तसे लंकेचे खेळाडू निराश व्हायला सुरूवात केली. शेवटी या दोघांनी नाबात १०० धावांची भागीदारी करून सामना जिंकला. धोनी ४५ धावांवर नाबाद राहिला. त्यात त्याने फक्त १ चौकार मारला. भुवनेश्वरने १ षटकार व ३ चौकार मारताना नाबाद ५३ धावा केल्या. अचानक रंगतदार झालेला सामना बघताना मजा आली.

In reply to by श्रीगुरुजी

इतका दीर्घकाळ चालूनही शेवट पर्यंत “कधीही काहीही होऊ शकतं” असं वाटत राहिलं ह्याकरीता फक्त “दनंजय” ह्याला श्रेय ! त्यासाठीच तर तो सामन्याचा मानकरी ठरला !

विंडीजचा इंग्लंडविरुद्ध कसोटीत ऐतिहासिक विजय झाला. प्रदीर्घ कालखंडानंतर विंडीजने देशाबाहेर सामना जिंकला. विंडीजच्या ब्रेथवेटने पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात ९५ धावा केल्या, तर शे होपने दोन्ही डावात शतक केले.

In reply to by श्रीगुरुजी

या सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी अत्यंत सुमार होती, असं त्यांचा कर्णधार जो रूटने कबूल केलं. या प्रामाणिक व परखडपणाबद्दल त्याला पूर्ण गुण. या अगोदरच्या सामन्यात इंग्लंडने वेस्टिंडिजचे १९ गडी एकाच दिवशी बाद करून डावाने विजय मिळवला होता. या पार्श्वभूमीवर ही कसोटी दिमाखाने जिंकण्याबद्दल वेस्टिंडिजचं खरंच कौतुक आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ब्रेथवेट व होप ने दाखविलेल्या निश्चायाबद्दल त्यांचं अभिनंदन. चला ; विंडीज आता कसोटीतही रुळू लागेल आणि आपल्याला ७० च्या दशकातली टीम लवकरच बघायला मिळेल अशी आशा !

आज दोन कसोटी सामन्यांच्या शेवटचा दिवस होता. आफ्रिकेच्या दौर्‍यावर असलेल्या बांगलाच्या संघाकडून फार आशा नव्हत्याच. चौथ्या डावात विजयासाठी ४२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलाचा दुसरा डाव फक्त ९० धावात संपला. सध्या श्रीलंका वि. पाकिस्तान कसोटी मालिका अबूधाबी येथे सुरू आहे. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर इतर देश पाकिस्तानमध्ये जात नाहीत. त्यामुळे सध्या अबूधाबी, शारजा, दुबई हेच पाकिस्तानी संघाचे घर बनले आहे. आखातातील खेळपट्ट्या भारतीय उपखंडातील बहुसंख्य खेळपट्ट्यांप्रमाणेच संथ व फिरकीला साथ देणार्‍या आहेत. त्यामुळे आजतगायत पाकिस्तानी संघ इथे कोणत्याही संघाकडून कसोटी सामना हरलेला नाही. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ४१९ धावा केल्या. त्यात चंडिमलच्या नाबाद १५५ धावा होत्या. पाकिस्ताननेही चांगली फलंदाजी करून ४२२ धावा करून ३ धावांची आघाडी घेतली. पाकिस्तानकडून ४ अर्धशतके झाली. परंतु कोणालाही शतक करता आले नाही. श्रीलंकेकडून रंगना हेराथने ५ बळी घेतले. चौथ्या दिवशी पाकिस्तानचा पहिला डाव संपल्यानंतर श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू झाला. परंतु दुसर्‍या डावात श्रीलंकेची खूप पडझड झाली. चौथा दिवस संपताना श्रीलंकेचे ४ फलंदाज बाद झाले होते व धावसंख्या फक्त ६९ होती. आजच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेचा उर्वरीत डाव फक्त १३८ धावांवर संपला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात ३ बळी घेणार्‍या यासिर शाहने दुसर्‍या डावात ५ बळी घेतले. पाकिस्तानला विजयासाठी १३६ धावा हव्या होत्या. परंतु रंगना हेराथच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानची अवस्था ५ बाद ३६ अशी दारूण झाली. ६ वा गडी ७८ वर बाद झाल्यानंतर एकवेळ पाकिस्तान ६ बाद ९८ अशा बर्‍या अवस्थेत होते. विजयासाठी फक्त ३८ धावा हव्या होत्या. परंतु उर्वरीत ४ खेळाडूंना फक्त १६ धावांची भर घालता आली व पाकिस्तानचा डाव ११४ धावात संपून लंकेने २१ धावांनी विजय मिळविला. या डावात सुद्धा हेराथने ६ बळी मिळवून सामन्यात एकूण ११ बळी घेऊन आपल्या बळींची संख्या ४०० वर नेली. पाकिस्तान आखातात प्रथमच कसोटी सामना हरले. २०१५ मध्ये भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्‍यावर ३ कसोटी सामन्यांसाठी गेला होता. श्रीलंकेचा पहिला डाव २०० च्या आत संपल्यावर भारताने चांगली फलंदाजी करून जवळपास २०० धावांची आघाडी घेतली. श्रीलंकेचा दुसरा डावही कोसळला होता. परंतु चंडिमलने दिडशतक झळकावून संघाला पावणेचारशे पर्यंत नेऊन विजयासाठी भारताला १७७ धावांचे लक्ष्य दिले होते. दुर्दैवाने हेराथच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे काहीही चालले नाही व भारताचा डाव १४० वरच संपून श्रीलंकेने सामना जिंकला. त्या डावात हेराथने ७ बळी घेतले होते. आजच्या सामन्यातही हेराथ (सामन्यात ११ बळी) व चंडिमल पहिल्या (डावात नाबाद १५५ धावा) यांनी विजयात मोलाचा हातभार लावला. मागील महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौर्‍यावर होता. त्या दौर्‍यात भारताने सर्व ३ कसोटी सामने, सर्व ५ एकदिवसीय सामने व एकमेव ट-२० सामना जिंकून निर्विवाद यश मिळविले होते. त्या पार्श्वभूमीवर लंकेने देशाबाहेर आखातात पाकिस्तानला धूळ चारली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

बर्‍याच दिवसांनंतर क्रिकेटवर लिहित आहे. जुलैपासून भारत प्रामुख्याने श्रीलंकेबरोबरच सामने खेळत आहे. मागील ५ महिन्यात श्रीलंका-भारत यांच्यात ६ कसोटी सामने, ८ एकदिवसीय सामने व २ ट-२० सामने खेळले गेले. अजून २ ट-२० सामने शिल्लक आहेत. एकाच देशाबरोबर वारंवार खेळल्याने सामने बघायचा कंटाळा येतो. त्यातून सध्याचा श्रीलंका संघ भारताच्या तुलनेत अत्यंत दुर्बल असल्याने सामने बघण्यास मजा येत नाही. भारताने या ६ पैकी ४ कसोटी सामने, ८ पैकी ७ एकदिवसीय सामने व आतापर्यंत झालेले दोन्ही ट-२० सामने जिंकले. २ कसोटी सामने अनिर्णित राहिले. श्रीलंकेला केवळ १ एकदिवसीय सामना जिंकता आले. अत्यंत एकतर्फी सामने होत असल्याने क्रिकेटमधील रस तात्पुरता कमी झाला आहे. परंतु ही स्थिती आता बदलणार आहे. जानेवारीत भारत द. आफ्रिकेच्या दौर्‍यावर जाणार असून नंतर जुलैमध्ये भारत इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार असून वर्षाच्या शेवटी भारत ऑस्ट्रेलियात जाणार आहे. पुढील वर्षभर भारताचे सामने परदेशात असून तुल्यबळ संघांबरोबर भारत खेळणार आहे. रणजी करंडक स्पर्धेत आज विदर्भाने बलाढ्य कर्नाटकचा केवळ ५ धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना फक्त १८५ धावा केल्या होत्या. परंतु कर्नाटकला पहिल्या डावात फक्त ३०१ धावांवरच रोखण्यात विदर्भाला यश आले होते. दुसर्‍या डावात बर्‍यापैकी फलंदाजी करून विदर्भाने ३१३ धावा करून कर्नाटकला विजयासाठी १९८ धावांचे लक्ष्य ठेवले. कर्नाटकची सुरवातीला दुसर्‍या डावात पडझड झाली व ४० धावात ३ गडी बाद झाले. परंतु एकवेळ ३ बाद ८१ अशी बरी स्थिती असताना विदर्भाच्या गुरबानीने एकापाठोपाठ धक्के देऊन कर्नाटकची अवस्था ७ बाद १०४ अशी केली. परंतु कर्नाटकच्या तळाच्या फलंदाजांनी बर्‍यापैकी फलंदाजी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले होते. ८ बाद १८९ अशी धावसंख्या असताना कर्नाटकचा विजय नक्की वाटत होता. परंतु पुन्हा एकदा गुरबानीने उत्कृष्ट गोलंदाजी करून उर्वरीत दोन फलंदाजांना बाद करून कर्नाटकचा डाव १९२ धावात संपवून जेमतेम ५ धावांनी सामना जिंकून दिला. गुरबानीने दुसर्‍या डावात एकूण ७ बळी घेतले. कर्नाटकचा रणजी संघ अत्यंत बलवान आहे. २०१४ व २०१५ मध्ये विनयकुमारच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने रणजी करंडक जिंकला होता. २०१६ मध्ये मुंबई व २०१७ मध्ये गुजरातने रणजी करंडकावर नाव कोरले. परंतु कर्नाटक संघाची ताकद अजिबात कमी झालेली नव्हती. कर्नाटककडे मयंक अगरवाल, करूण नायर, विनयकुमार, अभिमन्यू मिथुन, स्टुअर्ट बिन्नी, श्रीनाथ अरविंद असे तगडे खेळाडू आहे. त्या तुलनेत विदर्भ संघात फारसे परिचित खेळाडू नाहीत. थकलेला वासीम जाफर आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव हेच त्यातल्या त्यात परिचित चेहरे. परंतु सांघिक खेळाच्या जोरावर जबरदस्त कामगिरी करून विदर्भाने रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. अंतिम फेरीत विदर्भ दिल्लीविरूद्ध खेळेल. दिल्लीकडे गौतम गंभीर, इशांत शर्मा यासारखे अनुभवी कसोटीवीर आहेत. परंतु विदर्भाच्या जिगरी खेळामुळे विदर्भ दिल्लीला चांगली झुंज देईल हे नक्की.

विदर्भाने चौथ्या दिवशी दिल्लीवर निर्णायक विजय मिळवून प्रथमच रणजी करंडक जिंकला.

In reply to by श्रीगुरुजी

कोणी त्या रजनीश गुर्बानी च्या हॅटट्रिक ची क्लिप टाकली नाही का अजून? https://www.youtube.com/watch?v=IjwduIo7niA जबरदस्त विकेट्स आहेत! तीन्ही बोल्ड. पहिला स्विंग झालाय आणि पुढे कदाचित कट सुद्धा. दुसरा पूर्ण कट वाटतो, तर तिसरा बहुधा सरळ होता पण खूप खाली राहिला. नवीन चेंडू वर फलंदाज सहसा बॉल इतका आत येइल अशी अपेक्षा करत नाहीत. (खरे म्हणजे भारतात तो सरळ लाइन सोडून इतर कोठेही जाइल याची अपेक्षा करत नाहीत :) ). कारण नवीन बॉल वर उजव्या हाताने बोलिंग करणार्‍याचा नॅचरल स्विंग व बोलिंग प्लॅन सुद्धा आउटस्विंगर साठी असतो. इतक्या स्लिप्स वगैरे सुरूवातीला त्याकरताच असतात. त्यात इथे आश्चर्य म्हणजे हा स्टंप च्या अगदी जवळून बोलिंग करतोय. तुम्ही इम्रान, कपिल वगैरेंचे आत येणारे बॉल्स पाहिलेत तर ते सहसा वाइड क्रीज वरून टाकत. मी काही एक्स्पर्ट नाही पण बहुधा बॉल ला स्विंग व्हायला जागा देण्याकरता थोडे बाहेरून टाकत असावेत. इथे हा आउटस्विंगर टाकणार असल्यासारखा स्टंपच्या शेजारून टाकतोय. त्यामुळेही फलंदाज गंडले असावेत. एकूण मस्त वाटले ही बोलिंग पाहताना. रिप्ले फारसे नाहीत यात, असायला हवे होते.

In reply to by फारएन्ड

+ १ गुरबानीच्या रूपात भारताला नवीन वेगवान गोलंदाज मिळायला हवा. त्याने बाद फेरीच्या तीनही सामन्यात भरपूर बळी घेऊन संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता.

आजपासून भारत वि. द. आफ्रिका मालिका सुरू होत आहे. भारत या दौर्‍यात ३ कसोटी सामने, ६ एकदिवसीय सामने व १ ट-२० सामना खेळणार आहे. आजपासून केपटाऊन येथे पहिला कसोटी सामना सुरू झाला. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्वरकुमारला पहिल्या षटकापासून अचूक टप्पा सापडला आहे. प्रभावी आऊटस्विंग गोलंदाजी करीत त्याने पहिल्या ३ षटकात एकेक बळी मिळवून केवळ ५ व्या षटकात आफ्रिकेची ३ बाद १२ अशी वाईट अवस्था करून टाकली. सलामीचे एल्गर व मार्करॅम आणि नंतर आमला असे तिघेही भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर बाद झाले. या वेगवान खेळपट्टीवर नाणेफेक जिंकूनही आफ्रिकेने फलंदाजीचा काहीसा आश्चर्यकारक निर्णय घेतला. आफ्रिकेने संघात मॉर्नी मॉर्केल, रबाडा, फिलँडर आणि डेल स्टेन असे ४ वेगवान गोलंदाज घेतले आहेत. आफ्रिकेच्या मागील दौर्‍यात रहाणेने एका कसोटीत दोन्ही डावात शतक केले होते. रहाणे बहुतेकवेळा परदेशात चांगला खेळतो. परंतु या सामन्यात त्याचा समावेश केलेला नाही. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत रहाणे संपूर्ण अपयशी ठरला होता. परंतु त्याची परदेशातील कामगिरी चांगली आहे. रहाणेप्रमाणे इशांत शर्मा सुद्धा भारतापेक्षा परदेशात बर्‍यापैकी कामगिरी करतो. परंतु त्याचासुद्धा संघात समावेश नाही. पहिल्याच सामन्याची सुरूवात सुखद झालेली आहे.

कोहलीची विकेट अजून पाहिली नाही पण पहिल्य दोघांनी काही गरज नसताना आपल्या विकेट्स बहाल केल्या. चिक्कार वेळ आहे या सामन्यात आणि पहिल्या काही ओव्हर्स नंतर खेळपट्टी कदाचित जास्त सोपी होईल, आफ्रिकेला झाली तशी. पण विजय व धवन दोघांनी उगाचच देउन टाकल्या विकेट्स आणि कोहलीलाही प्रेशर मधे आणले. विजय ला तीन स्लिप्स आणि गली लावली होती, बॉल आउटस्विंग होत होता. त्यात असे काही नव्हते की १२ बॉल्स मधे १२ करायचेच आहेत. तीन चार ओव्हर्स खेळून काढल्या असत्या तरी काही फरक पडला नसता. चांगला फूट भर बाहेर असलेल्या बॉल ला हात लावायला गेला. धवन तर आयपीएल खेळत होता बहुधा. त्याला कोणीतरी सांगायला हवे की वीरू सुद्धा इतक्या लौकर पुल मारायला जात नसे.

In reply to by फारएन्ड

कोहलीनेही फुकट विकेट फेकली. मॉर्नी मॉर्केलचा ऑफस्टंपच्या बराच बाहेर पडलेला आणि जवळपास बरगड्यांपर्यंत उडालेला चेंडू कोहलीने विनाकारण खेळण्याचा प्रयत्न केला व त्या प्रयत्नात यष्टीरक्षकाकडे झेल दिला. धवन तर आयपीएल खेळत होता बहुधा. त्याला कोणीतरी सांगायला हवे की वीरू सुद्धा इतक्या लौकर पुल मारायला जात नसे. दादाप्रमाणे वीरू सुद्धा ऑफचाच खेळाडू. हे दोघेही पुल, हूक क्वचितच मारायचे. एकदा वीरूला पुल मारताना पाहिले होते. हा त्याचा नेहमीचा फटका नसल्याने चेंडू स्क्वेअरलेगला उंच उडून झेल गेला होता. दादा तर पुल मारताना एका पायावर गोल फिरायचा.

सामन्याचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. सामना वाचविण्याच्या भारताच्या आशा वाढल्या आहेत.

सध्या सुरू असलेल्या सिड्नी टेस्ट मधे ऑस्ट्रेलियाच्या मार्श बंधूंनी शतकी भागीदारी व स्वतःची शतके केली. वॉ बंधूंनंतर अनेक वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकरता अशी दोन भावांची भागीदारी झाली. मिशेल आणि शॉन मार्श - हे जेफ मार्श ची मुले. ८० च्या दशकात क्रिकेट पाहणार्‍यांना मार्श व बून ही जोडी लक्षात असेल, त्यातला मार्श. मध्यंतरी एकदा न्यू झीलंड कडून एक जोडी (बहुधा जुळे होते) आणि विंडीज कडून एक असे खेळत होते. विंडीज वाले अजूनही खेळतात बहुधा. आपल्याकडे एकदा युसूफ व इरफान पठाण यांची वन डे मधे भागीदारी झाली होती हे लक्षात आहे.

In reply to by फारएन्ड

>>> आपल्याकडे एकदा युसूफ व इरफान पठाण यांची वन डे मधे भागीदारी झाली होती हे लक्षात आहे. लंकेविरूद्ध एका ट-२० सामन्यात त्यांची भागीदारी झाली होती.

In reply to by फारएन्ड

फारएन्ड, एक निरीक्षण म्हणजे या मालिकेत इंग्लंडची गोलंदाजी भयंकर सुमार दर्जाची होती. वॉर्नर वा स्मिथने तुडवलं तर समजण्यासारखं आहे. पण मार्श बंधू व ख्वाजा यांनी शतकं ठोकून घेतली यावरून गोलंदाजी किती केविलवाणी आहे ते दिसतं. आ.न., -गा.पै. जाताजाता : फारएण्डचा फारएन्ड झालेला दिसतोय. काही खास कारण?

वृद्धिमान साहाने सामन्यात एकूण १० झेल घेतले. डेल स्टेन बहुतेक गोलंदाजी करू शकणार नाही. तरीसुद्धा २०८ धावांचं आव्हान सोपं नाही.