Skip to main content

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

लेखक ओम शतानन्द यांनी शनिवार, 18/11/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87716
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by Duishen

आणि हिन्दु धर्मातल्या प्रत्येकाला हवा तो व्यवसाय करता यावा. भारताची लोकसंख्या आटोक्यात राहावी. प्रत्येक स्त्री व पुरुषाला मानाने व मनासारखे जगता यावे. विन विन situation यावी. म्हणजे जात जपण्याचा प्रयत्न न होता प्रादेशिक वैशिष्ट्ये जपली जावीत, पण भारत एक रहावा.

In reply to by सुखीमाणूस

ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे.
ज्या ब्राह्मनेतर हिंदूंना ब्राह्मणांची वाट लावायची आहे त्यांचा भविष्यात जोगेंद्रनाथ मंडल होणे अपरिहार्य आहे. हिंदू धर्माचं ब्राह्मणांनी टेंशन घेऊ नये. गेला तर गेला उडत. शेवटी काश्मिरात आज फुटिरांचं नेतृत्व करणारे सगळे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहेत, दुसरे हिंदू नाहीत. मंजे अगदी धर्मांतर, देशांतर, निष्ठांतर करूनही त्यांच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित आहे. ----------------------------- उलट ब्राह्मणांनी फटकन धर्मांतर होऊ द्यावं. सत्ता राहिलच, आणि ब्राह्मण म्हणून शिव्या बसणार नाहीत. हा गेम इतिहासात अनेक ब्राह्मणांनी खेळलाय. आताचे आरेसेसवाले उगाच ताणून धरताहेत.

In reply to by जेम्स वांड

आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का?
लोक एकीकडे आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का? असं म्हणतात आणि दुसरीकडे इतिहासात ब्राह्मणांनी लै अन्याय केले, पापाचरण केले मंतात. च्यायला, अवघडै.

In reply to by पगला गजोधर

तुमचे नाव पगला गजोधर आहे त्यामुळे बहुधा तुम्ही असले पागलपणाचे प्रश्न विचारात आहात , तुम्हाला वरील विषय का मांडला आहे तेच समजलेले नाही हिंदू मुलीना पटवून त्यांच्याशी लग्न करून त्यांच्याकडून आपली संतती पैदा करणे व आपल्या संख्याबळात वाढ करणे ज्या योगे काही वर्षाने लोकसंख्येत बदल होऊन मुस्लिमबहुल क्षेत्र निर्माण होतील, एकेक प्रांत इस्लाममय करण्याचा हा एक मार्ग आहे. हिंदू समाज हा लिबरल असल्यामुळे इतर धर्मीयांबाबत सहसा सहयोगाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. हिंदू आपल्या मुलांवर संस्कार करण्यात ,धर्माबद्धल आत्मीयता निर्माण करण्यात , इस्लामचे सत्य स्वरूप व त्यापासून हिंदुना असलेलेला धोका याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या बाबतीत कमी पडतो . हिंदू मुली आणि मुस्लीम मुलगा यांचे लग्न होण्याचे प्रमाण आणि मुस्लीम मुलगी व हिंदू मुलगा यांचे लग्न होण्याचे प्रमाण हे थोड्या फार फरकाने समसमान असते तर हा विषय गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नव्हती पण चित्र नेमके उलट आहे , आणि ह्या मागे काही strategy निश्चित आहे , पगल्या माणसांनी या विषयात नसते फाटे फोडण्याचे कारण नाही , हिंदू मुस्लीम आणि सवर्ण दलित हे विषय एकसारखे नाहीत

In reply to by ओम शतानन्द

मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींसोबत विवाह करून आपली संतती वाढवून एक एक प्रांत इस्लाममय करणे हा प्लॅन मुस्लिमांचा असावा असे आपले म्हणणे आहे असे समजले. एक धर्मप्रेमी मनुष्य म्हणून तुमची कळकळ नीट पोचली, पण काही तांत्रिक प्रश्न पडलेत, १. एक हिंदू मुलगी, ती मुस्लिम झाल्यावर एकंदरीत किती (अपर लिमिट मुले) निरोगी आणि पुढे 'युद्ध करण्यालायक' जन्माला घालू शकतील? २. मुले जन्मण्याची वृत्ती पूर्णपणे धर्मावर अवलंबून असते? २०११ च्या जनगणना आकड्यांनुसार भारतात स्त्रीयांचा जननदर (वूमन फर्टिलिटी रेट ) बऱ्यापैकी म्हणजे दिसून येण्याइतपत कमी झालाय, तो आकडा भारतीय जनगणना कार्यक्रमासारख्या एका विशाल प्रकल्पांतर्गत जमा करून अतिशय काटेकोर छाननी केलेला असतो, हे बहुतेक आपण सुद्धा जाणतो दोघं. ह्यात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील स्त्रियांचा जननदर कमी झाला आहे, अश्या बातम्या त्याचवेळी आल्या होत्या, हा डेटा ग्राह्य धरला तर त्याला जमेस धरून बोलले तर मुस्लिम लोकसंख्या आडमाप वाढेल हे भावनिक दृष्टीने बरोबर वाटले तरी आकडेवारीनुसार तसे होईल असे वाटत नाही, मग काही मुर्खमुली फशी पडल्या तर काय होणार आहे खास? लोकसंख्या वाढीवर धार्मिक छाप किती हे पाहायला मी इंडोनेशिया ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम राष्ट्राचा पॉप्युलेशन डेटा पाहिला , गंमत म्हणजे तिथे २०१०- २०१२ पर्यंत म्हणजे दोनच वर्षात स्त्री जननदरात दिसून येण्यालायक गटांगळी दिसली, पार कॉन्ट्रसेप्टिव पेनिट्रेशन पण ६१% आलं, बहुसंख्य मुसलमान असलेल्या देशात हे कसे साधले असेल? मला वाटते, धर्म धर्म किंवा nationalism कितीही नाकारले तरी इस्लामने तरीही, भूगोलपरत्वे मानवी शारीरिक, मानसिक जडणघडणीत फरक हा पडतोच, इस्लाम ख्रिस्ती धर्म ते जमेस धरत नाहीत म्हणून ते अवैज्ञानिक धर्म होत, हिंदुत्व तितकं लिबरल (बदनाम शब्द आहे खरं दुसरा सुचलं नाही) आहे, आहे म्हणून वैज्ञानिक धर्म आहे. असं एकंदरीत माझं मत, तुमच्याकडे काही आकडेवारी असली तर द्या, सांख्यिकी माझा विषय नाही, त्यामुळे मी चुकू शकतो, थोडं संभाळून दुरुस्त करून द्याल ही विनंती.

In reply to by जेम्स वांड

अभ्यासू आकडेवारीशी शतानंदसारख्या मुस्लिमफोबिया झालेल्यांना काही घेणे देणे नसते. आकडेवारी अभ्यास वगैरे आलं की त्यांचं डोकं हँग होतं. त्यांना त्यांच्या आवडत्या गॄहितकाशी संबंधित चमचमीत सनसनाटी सांगा, गावभर लोकांचे कान फुंकत फिरतील. पण थोडा अभ्यास करायला सांगा, पाय लावून पळून जातील. इतकेच काय तर आकडेवारी मांडली तरी मुस्लिमांची खरी आकडेवारीच नसते, ते खोटे बोलतात, मुलं बायका लपवून ठेवतात वगैरे पर्यंत इथल्या अभ्यासु-ज्ञानी सदस्यांचे मत वाचले आहे. तेव्हा मुस्लिमांविरुद्ध वातावरण तापवण्याच्या लाइफटाइम मोहिमेवर असलेल्या लोकांना घेरी आणणारे प्रश्न टाकू नका वांडसाहेब.

In reply to by तर्राट जोकर

ओम शतानंद साहेबांचा काय प्रतिसाद येतो ते अनुभवून पाहावे म्हणतो. तुमच्या निरीक्षणाचा आणि अनुभवाचा आदर आहेच, फक्त मला ओमजी ह्यांच्या सुसंगत प्रतिसादाची वाट पाहावी वाटते आहे, कारण ते तसा प्रतिसाद देतील असा आशावाद आहे मला थोडा :)

In reply to by जेम्स वांड

खरे अहे.. १. परंतु सध्या भारत दार उल हब अहे.. आणि भारतात कडवे मुसलमान अनेक आहेत हे देखील वेळोवेळी दिसून येत आहे. २. कोणतेही युद्ध हे नैतिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अश्या सगळ्या पातळ्यांवर लढले जाते. त्यामुळे लव्ह जिहाद नावाची संकल्पना अस्तित्वातच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कदाचित त्याचा परिणाम आकडेवारीवर प्रभाव टाकण्याइतका मोठा नसेल, पण जर बहुसंख्य समाजाने दुर्लक्श केले तर भविष्यकाळात ही एक मोठी समस्या बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर अजून तो रोग डोळ्यांना दिसण्याइतका मोठा झालेला नाही, म्हणून इलाज करायची गरज नाहे असे म्हण्ण्यासारखे आहे हे.

In reply to by ओम शतानन्द

सर, खाली काही उदाहरणे - केंद्र सरकारच्या अहवालानुसार (एन. सी. आर. बी.) दर सव्वा तासाला एका हिंदू महिलेचा हुंडा बळी जातो हे हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? सन २०१५ मधे एस.सी. एस.टी यांच्यावरील अत्याचाराच्या एकूण ५५९१७ घटना पोलीसदरबारी नोंद झाल्या. दबावामुळे नोंद न झालेल्या घटना यापेक्षा अधिक आहेत. ५५९१७ एका वर्षात म्हणजे दिवसाला साधारण १५३ घटना म्हणजे तासाला ६ घटना याचाच अर्थ दर ३० मिनिटाला ३ अत्याचाराच्या घटना म्हणजे दर १० मिनिटाला १ एससी किंवा एस.टी कुठेतरी बळी पडत आहे. हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? वरील विधान लिहितांनाच भारतात कुठल्यातरी एससी किंवा एस.टीचा बळी जात असणार.... माहितीची लिंक http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/FILES/Figures%20at%20a%…

In reply to by Duishen

त्यातही, धर्म अधिष्ठित 'मॉब लिबरलिझम' हे अबसोल्युट असते किंवा मी तसे सुचवतोय, असा आपला गैरसमज झाला आहे बहुतेक, धर्म जात आधारित लिबरल विचार म्हणजे एखाद्याच्या टिकेकडे कीती कानाडोळा केला जाऊ शकतो ते, असे माझे वैयक्तिक मत आहे. अबसोल्युट लिबरल कोणीच नसतं, अगदी व्होल्टेयर , रुसो, वॉशिंग्टन कोणीच लिबरल नव्हते अन आजचे तथाकथित लिबरल सुद्धा लिबरल नसतात, त्यामुळे हिंदुधर्म सुद्धा अबसोल्युट लिबरल नाही, पण एकंदर जागतिक पातळीवर जे काही 'धार्मिक आघाडीवर' सुरू आहे त्या अँगल मध्ये पाहता हिंदुत्व (राजकीय नाही धर्म म्हणून) बरंच लिबरल आहे, तुम्ही मायक्रो विचार करताय मी मॅक्रो इतकेच अंतर होय, मी ५०% असहिष्णु आहे म्हणजे ९९% असहिष्णु असणाऱ्यापेक्षा लिबरलच आहे नाही का? आता जर त्या ५०% ला पर्सेन्टाईल मध्ये कन्व्हर्ट केले अन मायक्रो विचार केला तर मी शंभर टक्के असहिष्णु आहे!

In reply to by जेम्स वांड

जेम्स जी, प्रतिसादाबाबत धन्यवाद! माझा प्रश्न ओम जी यांच्या "हिंदू समाज हा लिबरल असल्यामुळे ..." या विधानाला आहे.

In reply to by Duishen

@ Duishen केंद्र सरकारच्या अहवालानुसार (एन. सी. आर. बी.) दर सव्वा तासाला एका हिंदू महिलेचा हुंडा बळी जातो हे हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? For example, the oft-cited claim (including by Kapil Sibal on 26 May 2017 in this article) that 68% of all divorced women are Hindus while only 23.3% are Muslims, is flimsy and meaningless. Hindu women outnumber Muslims by five times, so it is only logical that the share of Hindu women in the divorced women population will be higher. http://www.livemint.com/Opinion/ydCWT2mGxmg4d9NXrMaxEI/Hindus-and-Musli… Out of all divorced women, 65.9 per cent were divorced orally. http://indiatoday.intoday.in/story/triple-talaq-muslim-women-supreme-co… हि आकडेवारी काय दाखवते?

In reply to by सुबोध खरे

सुबोधजी. माझे उदाहरण हुंडाबळी प्रथेबाबत आहे. आपण घटस्फोटाच्या उदाहरणाशी तुलना करीत आहात. कृपया मुस्लीम धर्मातील हुंडाबळीचे (!) उदाहरण देऊन मला समजावून सांगा. मला जाणीव होती की कुणीतरी वाचक मुस्लिमांशी तुलना करणारे प्रतिसाद देतील. म्हणून मी खास हिंदूधर्माचे लक्षण असणारे उदाहरण दिले. सुबोधजी, पण जरी आपण ही तुलना केली तरी त्यातून मी काय बोध घ्यावा? गुन्हा तो गुन्हाच. त्रास तो त्रासाच! "मुस्लिमांमध्ये घटस्फोटाचा दर ३.७ आणि हिंदूमध्ये तो २ आहे म्हणून हिंदू लिबरल आहेत.". हे तर्कशास्त्र अगम्य आहे. असा तुलनात्मक अभ्यास व्हावा पण तो श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी वापरू नये पेक्षा एखाद्या सामाजिक प्रश्नाचा ट्रेंड समजून त्यावर उपायासाठी असावा. इस्लामला आपण तुलना करण्याचे मानक मनात असणार. पण माझी दृष्टीने (वरील उदाहरणात) समता हे मूल्य तुलनेचे मानक आहे.

In reply to by पगला गजोधर

सेक्युलर पब्लिकच माहिती नाय, पण आपण मात्र निव्वळ ह्याच कारणामुळे अश्या टाईपच्या प्रेम प्रकरणात पडलो नाय! 497 ए सोबत अट्रोसिटी दोन्ही नाय परवडायची बाबा :D

In reply to by पगला गजोधर

जर ती उलगी धादांत खोटे विधान करत असेल तर नक्कीच मी त्याचा विरोध करेन. अर्थात तिचे विधान खोटे पाडणे फारच सोप्पे असेल कारण तथाकथोत उच्च्वर्णीय जातीतील मुलाने स्वतःच्या मनाने एका तथाकथित निम्नजातीय मुलीशी लग्न केले तेथेच त्याचा काही गैर उद्देश नव्हता असे सिद्ध होइल. तुमच्या उदाहरणात मुलगी ब्राह्मण असेल आणि मुलगा दलित असेल तर मात्र खोटे सिद्ध करणे "थोडे " अवघड जाइल. असो. या प्रश्नाचा सदर धाग्याशी काय संबंध आहे ते कळाले नाही. सदर घटनेतील हिंदु मुलगी धादांत खोटे बोलते आहे असे काही तुम्हाला म्हणायचे असल्यास तसे पुरावे कृपया सादर करावेत अन्यथा मनमानी उदाहरणे देउन आपण लोकांची दिशाभूल करत आहात असा एखाद्याचा स्समज होउ शकतो. उद्या अश्याच आशयची उदाहरणे दाउद इब्राहिम, टायगर मेमन, अफझल गुरु, मोहम्मद अफरोज, मुकेश सिंग, रमण राघव यांचा बचाव करतानाही देता येतील (शेवटची २ नावे मुद्दाम शोधुन काढली नाहितर माझ्यावर मुस्लिम्द्वेष्टा भक्त असल्याचा आरोप व्हायचा). पण जर त्या उदाहरणांचा आणि वरील व्यक्तींचा संबंध नसेल तर एकाच मीटर मध्ये ती उदाहरणे देणे हे अतिशय अयोग्य, असंवेदनशील आणि असहिष्णु आहे याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by पगला गजोधर

तर तुम्ही वरील पार्श्वभूमीवर, मुलाचा पक्ष कसा मांडणार ? त्याचा बचाव कसा करणार ???
त्याचा बचाव करण्याचा प्रश्नच येत नाही. मुलीने धर्मांतर करायचे पहिले मान्य केले नसताना तिला वैदिक पद्धती शिकवणं गुन्हा आहे. असली वकीली मी घेणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

दर सव्वा तासाला जी हिंदू स्त्री हुंडाबळी जाते तेही पूर्वपुण्याईमुळेच का?... आणि हुंडाबळी घेणे म्हणजे पाप नसेल ना..पेक्षा पुण्यकर्म आहे का?

आज रात्री १२ वाजता सुरू होणारा 'ताऱ्यांचा'पाऊस इतक्या लवकर कसा सुरू झाला कोणास ठावूक?

मी मुम्बैत वाढल्याने जाती पाती आणि धर्म यात भेदभाव करत नाही. पुण्यात नोकरी साठी आले तेव्हा कोथरूड ते विमाननगर कंपनी बसने प्रवास करत असे. बस चालक मुसलमान होता. मी कोथरूडमध्ये शेवटी उतरायचे. कारण नसतांना त्याने एक दिवस आमचा एक अल्ला आणि तुमच्या धर्मात ३३ कोटी देव. अस कधि असत का वगैरे सुरू केले. ते 1999 साल होते. आधीचे मुम्बई दंगली व बॉम्ब स्फोट खूप जवळून अनुभवले होते. तेव्हा मी गप्प बसणे योग्य समजले. पण डोक्यात तिडीक गेलीच. आज मी जे स्वातन्त्र्य उपभोगत आहे आणि माणसासारखे व मनासारखे जगत आहे ते केवळ हिन्दु धर्मात जन्म घेतला म्हणुन. हा धर्म सहिष्णू आहे म्हणुन... तेव्हा माझा कायम प्रयत्न राहील की माझ्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना मानाने व मनासारखे जगायला मिळावे. मुसलमान मुलाशी लग्न करून असे आयुष्य मिळणे कठीण वाटते.

तजो, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले.
आहेच मुळी आमची आम्हाला काळजी. काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. गेले ६५ वर्षं कसलंही आरक्षण वा संरक्षण नसतांना परत आज ब्राह्मणांच्या नावानेच बोंबाबोंब? नक्की प्रकार काय आहे? २.
१०० कोटी हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची चामडी वाचवायचा प्रयत्न चालू आहे तुम्हा लोकांचा.
नावाप्रमाणे तर्राट विधान आहे. कसली बंदूक? आणि कसली चामडी? पाकिस्तानात हिंदू औषधाला तरी उरलेत काय? बंगाल मध्ये घुसखोर मुस्लिम कसे शिरजोर झालेत ते दिसंत नाही काय? डोळे फुटले नाहीत आमचे. ३.
अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?
ब्राह्मण जर स्वयंघोषित मार्गदर्शक असले तर मग विरोध कशाला? सरळ दुर्लक्ष करा ना ब्राह्मणांकडे. लक्ष द्यायची जबरदस्ती आजिबात नाही. त्याचं काये की दलित, शोषित आणि वंचितांच्या नावाखाली गेले ६५ वर्षं जोमात चाललेली दुकानं आता कोमात जाऊ लागलीयेत. म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात थयथयाट. आम्हाला कळतं हो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मनुस्मृती भाग १ ब्राह्मण्याचा उदोउदो 23 Oct 2017 - 12:53 am | गामा पैलवान मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल. - मनुस्मृती भाग १ मधे आपले हे विधान होते. मनुस्मृती भाग १ मारवा यांना प्रतिसाद 20 Oct 2017 - 8:59 pm | गामा पैलवान यामधील आपली महिलांविषयीची मते मुद्दा क्र. ४ वरील आपले मत - यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत. मुद्दा क्र. ५ वरील आपले मत - निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. आता त.जो.जीना वरील प्रतिसाद देतांना आपण केलेली विधाने - १. आहेच मुळी आमची आम्हाला काळजी. काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. २.ब्राह्मण जर स्वयंघोषित मार्गदर्शक असले तर मग विरोध कशाला? सरळ दुर्लक्ष करा ना ब्राह्मणांकडे. लक्ष द्यायची जबरदस्ती आजिबात नाही. ३. त्याचं काये की दलित, शोषित आणि वंचितांच्या नावाखाली गेले ६५ वर्षं जोमात चाललेली दुकानं आता कोमात जाऊ लागलीयेत. म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात थयथयाट. आम्हाला कळतं हो. मनुस्मृती भाग १ मधे आपण असे धाडसी विधान केले होते की "१०० कोटी" हिंदूनाही रुचेल.. पण स्त्रिया समान असत नाही असेही विधान केले. म्हणजे ५०% लोकसंख्येला (स्त्रियांना) तुम्ही सामाजिक सन्मान देत नाही. शिवाय "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही." असे सरसकटीकरण करणारे विधान केले आपण त.जोजीना प्रतिसाद देतांना दलित, शोषित आणि वंचितांबाबत पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले. आणि विधानात सरसकटीकरण जाणवते. शेवटी तर म्हणत आहात की "आहेच मुळी आमची आम्हाला काळजी." जर केवळ ब्राह्मण जात आणि त्यातही पुरुष एव्हडेच जर मर्यादित आपण विचार करीत असणार तर १०० कोटी हिंदू एकत्र तरी कसे राहणार? या संकुचित विचारसरांनीमुळेच एक-एक जात धर्मांतरित होऊन जात आहे धर्मांतर करून सरळ दुर्लक्षच करत आहे.. आणि हिंदूचे नुकसान करण्यास इस्लाम कशासाठी हवा?... मनुस्मृतीप्रणीत विचार करणारे हिंदूच हिंदू धर्माला अवघड परिस्थितीत आणून ठेवणार...

In reply to by गामा पैलवान

काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. जसे हैद्राबाद संस्थानात मुस्लीम राजा पण अधिकांश हिंदू प्रजा होती त्याच्या अगदी विरुद्ध काश्मीर मधे.. हिंदू राजा आणि मुस्लीम प्रजा.. दोन्ही राजे सरंजामशाहीचे पुरस्कर्ते आणि आणि जनतेला छळणारे! सरदार पटेलांमुळे त्यांना भारतात शामिल होणे भाग पडले. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराविषयी दोन्ही मते आहेत - एक मुस्लीम भय किंवा तत्कालीन सरकारी धोरणे (तेथील मुस्लिमांना शह देतांना पंडितांचा बळी जाऊ नये म्हणून त्यांचे संपूर्ण स्थलांतर करण्याचे धोरण). पण ते विस्थापित झाले आणि विस्थापानेचा त्रासही भोगत आहेत हे सत्य. शासन आणि असरकारी पातळीवर प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी पंडितांना २% पासून ५% पर्यंत शिक्षण आणि नौकऱ्यामधे आरक्षण आहे. खुद्द महाराष्ट्र शासन त्यांना २% आरक्षण देत. शिवाय ते ओपन मधूनही अर्ज करू शकतात. http://www.milligazette.com/news/4750-job-quota-for-kashmiri-pandits http://indianexpress.com/article/india/india-news-india/kashmiri-migran… माझे या आरक्षणाला पूर्णत: समर्थन आहे. पाकिस्तानात हिंदू औषधाला तरी उरलेत काय? बंगाल मध्ये घुसखोर मुस्लिम कसे शिरजोर झालेत ते दिसंत नाही काय? डोळे फुटले नाहीत आमचे. जर पाकिस्तानी लोकांनी इथल्या मुस्लिमांची काळजी केली तर आपल्याला चालेल काय! माझा एक प्रश्न आहे, गामाजी! १९८५ च्या आसपास स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांना अवघ्या काही काळातच आरक्षण मिळते आणि त्याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित होते पण ओबीसी समाजाला १९५० ते १९८९ अशी चाळीस वर्षे वाट का पहावी लागली. किंवा ज्या दलित, वंचित, पिडीत लोकांबाबत आपण पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले त्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकार एव्हडा ढिसाळपणा का दाखवते? शिवाय काश्मीरमधे ७.६% एस.सी. आहेत त्यापैकी कुणीच स्थलांतरित झाले / केले नाहीत का? त्यांच्या बाबत तर एकही अवाक्षर आजपर्यंत ऐकले नाही.

In reply to by Duishen

काँग्रेस चे सरकार असताना का बरे इतर मागास वर्गीय आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिला?आणि आरक्षण मिळालेले २/३ पिढ्या नंतर स्वतहून आरक्षण का सोडत नाहीत?

In reply to by सुखीमाणूस

तुमच्य का पोटात दुखतंय? तुमच्याकडे तर गुणवत्ता बौद्धिक पातळी कौशल्या धमक वगैरे आहे ना?

In reply to by तर्राट जोकर

म्हणजे माझे अगदी स्पष्ट मत आहे की कोणीही दानधर्म घेत पिढ्यानपिढ्या जगू नये. मग ते धार्मिक असो, सामाजिक असो की राजकीय. कारण दोन ते तीन पिढ्यांनंतर जर तुम्ही प्रगती केली नसेल तर आरक्षणाचा हेतू साध्य झाला असे होत नाही...

In reply to by सुखीमाणूस

हा हा हा, दान धर्म? कोण करतंय दानधर्म? तुम्ही? आरक्षणाच्या बेसिकबद्दलच तुमच्याकडे ज्ञानाचा उजेड आहे... अभ्यास वाढवा..... तुमच्या जळजळीचे कारण तिथेच दडलेले आहे. जोवर ही जळजळ आहे तोवर आरक्षणाची गरज राहणार. हे एकदाचे लक्षात घ्या.

In reply to by तर्राट जोकर

जळ्जळ नाहि. ग्लोबलायझेशन मुळे बर चाललय. नोकरी केली व्यवस्थित. जळजळ आहे म्हणुन आरक्शणाची गरज आहे असे का बरे? विचार स्वातन्त्र्य सर्वाना आहे. त्यातुन भरपुर कर भरतो मग सजग पण असावे नाही का?

In reply to by सुखीमाणूस

आरक्षण = दानधर्म = कर भरतो अशी लाइन ऑफ थॉट आहे की काय? कर भरता म्हणजे उपकार नाही करत कोणी देशावर. कर भरणे दानधरमासारखा काही ऐच्छिक नाही.

In reply to by सुखीमाणूस

काँग्रेस चे सरकार असताना का बरे इतर मागास वर्गीय आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिला? ...माझ्या दृष्टीने पक्ष महत्त्वाचा नाही पण पक्ष चालविणाऱ्यांची मानसिकता तितकीच संकुचित का? हिंदू स्त्रियांच्या माणूस म्हणून असणाऱ्या हक्कासाठी हिंदूकोड बिलाला विरोध करणारे कॉंग्रेसजनही होतेच. जर पक्ष घेऊन विचार करावयाचा झाल्यास १९९६ च्या सरकारने आरक्षणाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली असे आपले म्हणणे आहे का? आणि आरक्षण मिळालेले २/३ पिढ्या नंतर स्वतहून आरक्षण का सोडत नाहीत? आरक्षणाचा मूलाधार सामाजिकभेद / जातीव्यवस्था आहे. ज्या दिवशी जातीव्यवस्था बंद होईल त्यादिवशी आरक्षण बंद व्हावे. जातीव्यवस्थेचे मूळ उखडून पडले की आरक्षणाच्या फांद्या आपोआपच गळून पडतील.

In reply to by Duishen

जाती व्यवस्था दूर? उलट आता तर लोक जातींच्या नावाने जास्त जवळ येतानाही दिसत आहेत. हा एकप्रकारे आरक्षणाचा साइड इफेक्ट नाही का?

In reply to by सुखीमाणूस

जाती आधारित संघटनांमध्ये जिथे जिथे जाऊन चर्चा केली - दलित, आदिवासी, मराठा, ओबीसी, ब्राह्मण, भटके विमुक्त तिथे एक वेगळा दृष्टीकोन मिळाला. आपला देश जवळपास ३००० जातींमध्ये आणि २०-२५००० उपजातीमध्ये विखुरला आहे. दलितांमधील ५९ जाती आणि त्यांचा अनेक उपजाती "दलित" या संज्ञेखाली एकत्र येत आहे. मराठा समाजातही उपजाती एकत्र येऊन "मराठा" या जाती खाली एकत्र येत आहेत. ओबीसीमधील साधारणत: ५००० जाती "ओबीसी" या संज्ञेखाली एकत्र येत आहेत. ब्राह्मण देखील उपजाती सोडून (चित्पावन, देशस्थ, इ.) "ब्राह्मण" या जातीखाली एकत्र येत आहेत. मोठ्याप्रमाणावर जात म्हणून एकत्र येण असलं तरीही उपजाती हळूहळू संपत आहेत. त्या लवकर संपतील अश्यातला भाग नाही पण ही अभिसरणाची सुरवात नक्की आहे. दुसरा भाग जो निरीक्षणास आला आहे तो शोषित, पिडीत आहोत ही जाणीव झाली की संघटन तयार होतच. कामगारांचे संघटन तयार झाले तर ते भांडवलदारांच्या विरोधात असत की भांडवलशाहीच्या? शेतकऱ्याचे संघटन झाले की ते बिगर शेतकऱ्यांच्या विरोधातील की शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी? स्त्री संघटना निर्माण झाल्या की त्या पुरुषांच्या विरोधात असतात की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या/ मूल्यांच्या? त्यामुळे आरक्षणामुळे निर्माण झालेले जाती-निर्मुलनातील टप्पा म्हणून जातिगत संघटनाकडे पाहावे, असे मला वाटते. तिसरा महत्त्वाचा भाग - जातीव्यवस्थेचा पाया हा सहजीवन (सहभोजन) बंदी आणि स्व-जातीत विवाह (जातीव्यवस्थेतही स्री त्या त्या जातीची खाजगी मालमत्ता म्हणूनच पहिल्या गेली आहे.त्यामुळे जाती-व्यवस्था घट्ट ठेवण्यात त्यांचा वापर केल्या जातो. त्यामुळे मला वाटते स्त्रियांनी हे जोखड झुगारले तर जाती अंताची लढाई सोपी जाईल.). त्यातील सहभोजन हे किमान महाराष्ट्रात बऱ्यापैकी साधारण झाले आहे. आंतरजातीय विवाह आणि त्यातून निर्माण होणारी संतती ही जातीव्यवस्थेला अनुकूल भूमिका कधीही घेणार नाहीत. त्यांच्या लेखी जात अनावश्यक ठरेल...आणि हे सर्व जाती हे एकमेकांच्या उणेदुणे काढत असतात तेही प्रमाण कमी होईल. चौथा महत्त्वाचा भाग - मानववंशशास्त्रानुसार एकही जात "शुद्ध" नाही. रक्तसंकर झालेला आहे. ज्यांना तर्काचे अधिष्ठान आहे ते किमान जातीव्यवस्थेचा पोकळपणा स्वत:च्या जीवनात तरी नाकारू शकतात आणि असे नाकारणारे भरपूर जण आहेत. आरक्षण देण्याचे मुळ कारण जातिव्यवस्थेच्या विषवल्लीत जो समानतेचा, अधिकाराचा अंश नाकारल्या गेला होता तो समानतेचा, अधिकाराचा अंश मिळवून देणे आहे. स्त्रियांना आरक्षण यासाठी नाही की ती अबला आहे किंवा तिच्याकडे बुद्धिमत्ता नाही; तिला आरक्षण यासाठी आहे की तिच्या आसपासची पुरुषसत्ताक व्यवस्था तिला समान मानत नाही आणि तिला समान संधी उपलब्ध करून देत नाही. ज्यादिवशी पुरुष स्त्रीला समान मानतील, त्यादिवशी स्त्रीला वेगळ्या आरक्षणाची गरज नाही. त्यामुळे मानसिकता प्रामुख्याने बदलायची असेल तर पुरुषसत्ताक व्यवस्था मानणाऱ्या पुरुषांची बदलायला हवी. तसेच विवेचन जातीगत आरक्षणासाठी आहे. यामुळे मला डॉ. अभिराम दीक्षित जवळचे वाटतात. त्यामुळे जातिगत संघटन होण हे साईड इफेक्ट असा नकरात्मक नसून चांगला आहे. ...फक्त पुढच्या पिढ्यांनी याला चांगले वळण द्यावे आणि जे कुणी जाती व्यवस्था मनात असतील ते तर याकडे नकारात्मक दृष्टीने बघून अपप्रचार करणारच.

In reply to by Duishen

त्यामुळे जातिगत संघटन होण हे साईड इफेक्ट असा नकरात्मक नसून चांगला आहे. ...फक्त पुढच्या पिढ्यांनी याला चांगले वळण द्यावे आणि जे कुणी जाती व्यवस्था मनात असतील ते तर याकडे नकारात्मक दृष्टीने बघून अपप्रचार करणारच.>>> ==>> माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. आमच्या समाजाची देखील एक अखिल भारतीय संघटना आहे. मी सहसा त्यांच्या कार्यक्रमाला जाणायचे अनेकवेळा टाळायचो. पण २०१६ च्या डिसेंबर मध्ये समाजाचे राज्यस्तरीय स्नेह मेळावा होता ज्या मध्ये माझ्या भाचीचा डान्स होता म्हणून गेलो होतो. तर संघटनेच्या सचिवांनी त्यांच्या भाषणामध्ये अंतरजातीय विवाहासाठी समाज बांधवाना प्रेरित केले. प्रोहत्सानपर बक्षिसे देखील जाहीर केली. विशेष म्हणजे समाजाच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत असामी ने कार्यक्रमाच्या शेवटी आपला मुलगा आंतरजातीय विवाह करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर केले. संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षांच्या सख्या भावाने देखील आंतरजातीय विवाह केला आहे. माझ्यासाठी ह्या प्रगत विचाराची खूप मोठी नांदी होती. आमचा समाजाने या दृष्टीने पाऊले उचलली आहेत याबद्दल मला अभिमान आहे.

In reply to by विशुमित

तर संघटनेच्या सचिवांनी त्यांच्या भाषणामध्ये अंतरजातीय विवाहासाठी समाज बांधवाना प्रेरित केले. प्रोहत्सानपर बक्षिसे देखील जाहीर केली. विशेष म्हणजे समाजाच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत असामी ने कार्यक्रमाच्या शेवटी आपला मुलगा आंतरजातीय विवाह करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर केले. संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षांच्या सख्या भावाने देखील आंतरजातीय विवाह केला आहे. ही बाब निश्चितच प्रचंड आनंदाची, अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. आपण नमूद केलेल्या संघटनेला अतिशय प्रगतीशील विचारांचे सचिव आणि अध्यक्ष मिळाले आहेत. एकदा ही बाब समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी स्वीकारली तर समाजही ते अनुकरून करून भावी वाटचालीची दिशा ठरवतो. कृपया माझ्याकडून त्यांचे अभिनंदन कळवा! अशी प्रगती निरंतर राहो हीच शुभेच्छा!!!

In reply to by Duishen

कारण यामधे कोणत्यातरी जाती ठ्ळक होत आहेतच. त्यापेक्शा सरकारी कागद्पत्रामधला जातीन्चा उल्लेख जाइल आणि जात प्रमाणपत्र घ्यायची गरज पडणार नाही तो खरा सुदीन. मग यासाठी मला वाटत जातीआधारीत आरक्शणापेक्शा आर्थिक मागासलेपणावर आधारीत आरक्शण जास्त मदतीचे ठरेल.

In reply to by सुखीमाणूस

जातीय आरक्षण व आर्थिक आरक्षण या दोन भिन्न गोष्टी आहेत , जातीय आरक्षणाला आर्थिक आरक्षण हे रिप्लेसमेंट होउ शकत नाही , हे सर्वाना समजेल तोही एक सुदिनच. ... आरक्षणाला विरोध करणारे लोकही गंमतच करतात .. फक्त जातीय आरक्षणाला विरोध करतात .. कारणे नेहमीचीच , मार्क ५५ % असतात म्हणे , गुणवत्ता नसते म्हणे ! पण आजवर या लोकानी कधी पेमेंट सीट नावाच्या श्रीमंती आरक्षणाला विरोध केल्याचे ऐकिवात नाही. तिथे ५५ % वाला समाजाला चालतो ! त्याला गुणवत्ता नसली तर चालते !

In reply to by सुखीमाणूस

कारण यामधे कोणत्यातरी जाती ठ्ळक होत आहेतच. तुम्ही म्हणता ही शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाने आदेश दिला आहे की आंतरजातीय विवाहातून झालेली संतती आई किंवा वडील कुणाचीही जात वापरू शकते. पण त्यांनी वापरली पाहिजेच असे बंधनही नाही. त्यामुळे त्या संततीला निर्णय घ्यावयाचा असेल की मुळात जात लावायची का नाही. आमच्याच एका मित्राच्या वडिलांनी मुलांच्या शाळेत कधीही जातीचा रकाना भरला नाही. त्यावेळेस शालेय संस्थेसोबत भरपूर वाद झाले पण ते शेवटी त्यांनी तो रकाना रिकामाच ठेवला. तो कित्ता त्यांचा मुलगाही गिरवतो आहे. मग यासाठी मला वाटत जातीआधारीत आरक्शणापेक्शा आर्थिक मागासलेपणावर आधारीत आरक्शण जास्त मदतीचे ठरेल. अनुसूचित जाती ह्या काहीही संसाधन नसणाऱ्या तर आहेतच पण अस्पृश्य म्हणून गणल्या गेल्या आहेत. त्यांच्याशी भेदभाव हा त्यांच्या जातीमुळे आहे. अनेकांना तो आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतरही भोगावा लागतो. कालचीच बातमी आहे की कडेगाव - जिल्हा सांगली येथे भजन करणाऱ्या दलित व्यक्तीस केवळ जातीमुळे मंदिर प्रवेश नाकारला. तो भक्त, आस्तिक, आणि भजन कीर्तन करणारा माणूस. कदाचित आर्थिक स्थितीही बऱ्यापैकी असेल पण केवळ जातीमुळे प्रवेश नाकारला जातो. हा झाला ग्रामीण अनुभव. नागरी आणि शासकीय पातळीवर आरक्षित जागाच रिकाम्या ठेवून एकप्रकारे भेदभाव केल्या जातो. विस्तार भयास्तव इथे फार उदाहरणे देणार नाही. याउलट आदिवासी समाज संसाधन संपन्न होता पण ब्रिटीशांच्या १९ व्या शतकातील जंगल कायद्यामुळे त्याचे हक्क संपले. त्या कायद्यात मागच्या १०-१५ वर्षात सुधारणा होऊन जंगलाच्या सह-व्यवस्थापानेबाबत (आदिवासी+शासन) कायदा झाला पण अंमलबजावणी खूपच असमाधानकारक आहे. शिक्षणाचे प्रमाण कमी म्हणून फसवले जाण्याची शक्यता. शिवाय शासनाबाबत आदिवासींची अनेक प्रकारामुळे अनास्था किंवा अविश्वास. उदा: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी पोलिसांना आदेश देऊन आदिवासींसोबत 'जालियानवाला बाग' हत्याकांड घडवून आणले. त्यांचा राजा आणि पुरोहित हा एकाच व्यक्ती असे. त्यांच्या कुटुंबाला तर संपविले पण अनेक आदिवासींना उभे करून गोळया घालून ठार मारले. ती जखम अजूनही त्यांना शासनव्यवस्थेवर विश्वास ठेवू देत नाही. तर दुसरीकडे गडचिरोलीतील अनेक गावे (आंध्र प्रदेश सीमा) पावसाळ्यात भारतात असूनही भारतापासून तुटलेली असतात. जाण्यासाठी रस्ता नाही. जो रस्ता आहे तो एका मोठ्या ओढ्यातून जातो आणि पाण्याच्या फोर्समुळे कुणीही जाऊ शकत नाही. तसेच ते आंध्रातही जाऊ शकत नाहीत. जर शासनाशी संबंधच नाही तर प्रगती कशी होणार? खाणसंपन्न विभाग असल्यामुळे कंपनींचा डोळा तेथील संसाधनावर. ओरिसात पोस्को कं.ने एक प्रकारे त्यांचे हक्क हिरावून घेतले. एक तर आर्थिक व्यवस्था नाहीच शिवाय जमात म्हणून असलेले मागासलेपण. तेंव्हा त्यांना सामाजिक आणि आर्थिक असे दोन्ही संदर्भ आरक्षणाच्या मागे आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण रोचक आहे. प्रथम काका कालेलकर आयोग आणि नंतर मंडल आयोग. मंडल आयोगाने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अश्या तीन कसोट्यातील ११ निर्देशक तयार करून आरक्षण दिले आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण नाही हा धादांत अपप्रचार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आरक्षण देतांना निर्देशाकात "जाती / वर्ग" असा शब्द आहे. केवळ जाती असा नाही. एक गैरसमज असा आहे की ओबीसीमधे केवळ 'शुद्र' असणाऱ्या जातींचा समावेश आहे. तो समाज निखालस खोटा आहे. खालील राज्यात ब्राह्मण समाज हा ओबीसीमधे आहे - राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली राज्यातील दाकोट किंवा जोशी ब्राह्मण कर्नाटकात राज्यातील दैवज्ञ ब्राह्मण; केरळ आणि कर्नाटकात राजपूर सारस्वत ब्राह्मण; केरळमधेच मराठी ब्राह्मण; आसाममधे मणिपुरी ब्राह्मण; सिक्कीममधे बाहुन ब्राह्मण (राज्य सूची); कर्नाटकात ब्राह्मण ख्रिश्चन (राज्य सूची) पण हे ख्रिश्चन म्हणून गृहीत धरले आहेत. खालील क्षत्रिय जातींचा समावेश ओबीसी यादीत (केंद्र सूची)आहे. कालापव्ययते मुळे राज्य सूची मी इथे नमूद करीत नाही. क्षत्रिय, आर्य क्षत्रिय, कोट क्षत्रिय, राम क्षत्रिय, रामाकृष्ण क्षत्रिय, नायांजा क्षत्रिय,सोमवंश आर्य क्षत्रिय,शम्भूुकुल क्षत्रिय, अग्नीकुल क्षत्रिय, देशातील १५ राज्यातील मुस्लिमातील अनेक जाती / वर्ग ओबीसी आरक्षणात येतात. कर्नाटक आणि केरळामधे अनेक ख्रिश्चन जाती / वर्ग ओबीसी यादीत आहेत. याशिवाय आर्थिक मागास वर्गाची यादी आहेच. ज्या जाती किंवा वर्ग एस.सी., एस.टी. किंवा ओबीसी मधे येत नाहीत पण ज्यांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे (महाराष्ट्रात ६ लाखापेक्षा कमी आहे) त्या जाती आणि वर्ग आर्थिक मागास वर्गात समाविष्ट आहेत. त्यामुळे खालील गैरसमजुती / अपप्रचार भारतीय सर्व समाज समूहाने समजून घेऊन मनातून काढून टाकणे आवश्यक आहे. १ आम्हाला आरक्षण नाही. २. आम्ही गुणवत्ता मानणारे त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही. ३. आरक्षण मिळणारे समाज समूह यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे. ४. आरक्षण घेणारे 'सरकारचे जावई' आहेत. ५. आरक्षण न घेणारे बुद्धिमान असतात. ६. आरक्षण ही विषमता आहे. ७. आरक्षण ह्या कुबड्या आहेत. ८. केवळ आर्थिक आरक्षण असेल तर समाज गुण्यागोविंदाने राहील / सोने की चिडिया होईल. ९. आरक्षणाने जातीभेद वाढतो इ.इ. भारतात कुठल्याही जाती / जमाती / समूह आरक्षणाशिवाय राहिला नाही. आरक्षणाचा फायदा घ्यायचा की नाही हे व्यक्तीपरत्वे ठरेल.

In reply to by Duishen

की सगळे समाज जर आरक्श्ण मिळवत आहेत तर हा सगळा मुर्खपणा आहे. एवढ्या पो टजाती आहेत हे माहीतच नव्हते. आरक्शण मिळवण्यासाठी जाती पाळल्या जात आहेत/जाणार आहेत. त्यापेक्शा सरकारी कागद्पत्रान्वर, शाळेत आडनावे (कारण त्यातुन जात समजते) लावणे बन्द केले पाहिजे. मुलाचे/मुलीचे नाव मधे आइचे नाव व शेवटी वडिलान्चे नाव. आडनाव व त्यामुळे जाती समजणे बन्द झाले की बरीच सुधारणा होइल. आणि माझ्यामते घरातील अपत्यान्ची सन्ख्या कमी झाली तरी अर्थिक स्तर उन्चावणे, मुलाना शिक्शणासाठी पाठवणे इत्यदी होइल. हे देखिल एक दुष्त्ट्चक्र आहे. कारण गरीब घरात जितकी मुले जास्त तितकी कमावती डोकी जास्त असे असते.

In reply to by सुखीमाणूस

सुखीमाणुसजी, हा आपल्या आणि माझ्या दृष्टिकोनाचा फरक आहे - आरक्शण मिळवण्यासाठी जाती पाळल्या जात आहेत/जाणार आहेत. माझा दृष्टीकोन असा आहे की जातव्यवस्था आहे म्हणून आरक्षण आले. मुळात जात व्यवस्थाच नसती तर आज आरक्षण सारखा प्रश्नही निर्माण नसता झाला. शिवाय सर्व जाती स्वत:च्या "अहं" पाळण्यासाठी जातव्यवस्था पाळतात (अपवाद ज्यांना ज्यांना या व्यवस्थेला नाकारायचे आहे). त्यामुळे उद्या कोणी आरक्षण बंद करतो म्हणाले तरीही जात शिल्लक राहणारच! कारण जात हा फॅक्टर मनात आहे. आडनाव व त्यामुळे जाती समजणे बन्द झाले की बरीच सुधारणा होइल. भारतीय समाज स्व-जातीत विवाह (endogamous ) मानणारा. आडनाव लावले नाही म्हणून आपल्या नातेवाईकांना किंवा जात बांधवांना ओळखणे थोडीच बंद होणार आहे. अगदी मुंबई, पुणे सारख्या महानगरातही जातींच्या (आणि स्वत:च्या प्रदेशातील / राज्यातील) कळपाने वसाहती पण आहेत पण. त्यामुळे आडनाव लावणे बंद झाले म्हणून जात जाणार नाही. दक्षिण भारतात अनेक जागी आडनाव लावत नाही पण तिथेही दलित अत्याचाराचे प्रमाण भरपूर आहे. शिवाय विवाहविषयक जाहिराती बघितल्या तर असे आढळून येईल की "एस.सी. एस.टी." क्षमस्व" अथवा ९०% जाहिराती स्वजातीय वर किंवा वधू शोधत असतात. आणि माझ्यामते घरातील अपत्यान्ची सन्ख्या कमी झाली तरी अर्थिक स्तर उन्चावणे, मुलाना शिक्शणासाठी पाठवणे इत्यदी होइल. याबाबत पूर्णत:सहमत!

गापै, गळपाटलेला प्रतिसाद. कशाला हरलेली लढाई लढताय? तुमच्याकडे काहीच मुद्दे नाहीत, पण उसनं अवसान आणून षड्डू ठोकताय आपले. (संपादित)

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

प्रतिसाद कसे लिहावे याचे शहाणपण देत पुन्हा हेच तर्राटपणे फिरतात. कसे आहे, दोष यांचा नाही. यांना त्यांचा प्रिय इस्लाम शांततेचा धर्म आहे हे बाँबस्फोट करून सांगावे लागते.. मग अशी थोडीफार तर्राट विसंगती आपण खपवून घ्यायची. मजेशीर प्रकरण आहे. :D

माझ्या जवळच्या सर्व मित्र-मैत्रिणीनी आंतरजातीय आणि आणि आंतरधर्मीय विवाह केले आहेत. पण मुळात जे विवाह प्रेम विवाह आहे त्यांना आंतरजातीय किंवा अंतरधर्मीय या श्रेणीत बसवावे असे वाटत नाही. इथे सगळ्या प्रकारच्या विवाहाचे कॉम्बिनेशन आहे. उदा: हिंदू मुलगा / मुस्लीम मुलगी; किंवा मुस्लीम मुलगा / हिंदू मुलगी; ब्राह्मण मुलगा-दलित मुलगी/ दलित मुलगा-ब्राह्मण मुलगी किंवा मराठा मुलगा-ब्राह्मण मुलगी; ब्राह्मण मुलगी - मराठा मुलगा; मराठा मुलगा-ओबीसी मुलगी; ओबीसी मुलगा-मराठा मुलगी; पारसी मुलगा-बौद्ध मुलगी; बौद्ध मुलगा-पारसी मुलगी.जैन-हिंदू किंवा जैन-बौद्ध विवाह क्वचितच एखाद्या प्रकारचा विवाह सुटला असेल. कुंडली न बघता केलेले आणि सुमुर्ह्त न पाहता केलेले हे सर्व जोडपी अगदी गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. त्यामुळे लव्हजिहाद यावर विश्वास ठेवणे कठीण. मुलगा-मुलगी असे विलग करून सांगण्यामागे हेतू हा की काही स्वयंघोषित रक्षक लोक अशीही चर्चा करतात उदा: १. आमच्या जातीची / धर्माची मुलगी / मुलगा त्यांनी "पळवली"/ "पळवला" ती/तो मुळात अशी / असा / नव्हता. तिने त्याला / त्याने तिला "नादाला" लावलं. नाहीतर माझी लेक म्हणजे सद्गुणांची खाण / माझा लेक म्हणजे सोन्याहून पिवळा इ.इ. २. "वरच्या" जातीतला मुलगा चालेल हो "खालच्या" जातीतली सून कशी आणू किंवा याच्या अगदी विरुद्धही! ...म्हणजे "वरच्या" जातीतली मुलगी चालेल हो "खालच्या" जातीतला जावई कसा करणार. ३. मुलगी म्हणजे "घर की इज्जत" त्याहूनही पुढे जाऊन मुलगी म्हणजे "समाजाच नाक". त्यामुळे आपली मुलगी "दुसऱ्या" घरात नको एखाद वेळेस "दुसऱ्याच्या" घरची मुलगी आली तरी चालेल. माझे तर निरीक्षण आहे ज्यांनी आंतरजातीय /आंतरधर्मीय विवाह केले त्यांना या स्वयंघोषित रक्षक लोकांच्या म्हणण्याशी काही देणे-घेणे नाही.उलट या स्वयंघोषित रक्षकांमुळे त्यांच्या जीवनात नको त्या अडचणी निर्माण होतात. एकट्या-दुकट्या केस घडतच नाही असे माझे म्हणणे नाही पण विनाकारण तो राष्ट्रीय प्रश्न असल्याचे भासवणे ही अतिरेकी विचारसरणी आहे. विवाहात अनेकांची फसवणूक होते पण ती फसवणूक स्त्री-पुरुष (लिंगाधारित) अशा अर्थाने घ्यावयाची की धर्माचे लेबल लावून? गुन्ह्याचा हेतू पाहणे महत्वाचे! स्वयंघोषित रक्षकांना तो हेतू काय वाटतो हे महत्त्वाचे नाही. हुंडा पद्धत हिंदू समाजाचे लक्षण आहे. सन. २०१५ साली एकूण ७६३४ महिलांचे मृत्य हुंडाबळी म्हणून झाले. म्हणजे साधारणत: एका दिवसात २०-२१ महिलांचे बळी जातात याचाच अर्थ दर सव्वा तासाला एखद्या महिलेला हुंड्यामुळे मृत्यू पत्करावा लागतो. हे माझे म्हणणे नाही केंद्र शासनाचा अहवाल सांगतो. एन.सी.आर.बी. चा अहवाल साधारण ५५४ पानांचा आहे तो वाचणे शक्य नसल्यास http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/FILES/Figures%20at%20a%… ही संक्षिप्त माहिती वाचावी आणि आपले मत नोंदवावे ही विनंती! हे प्रमाण असेच चालू राहिले तर आणि स्त्रीभृण हत्या सुरु राहिली तर सन २१०० पर्यंत हिंदूंना लग्नाला मुली तरी राहतील का? ...त्यासाठी इतर दुसऱ्या धर्माच्या लोकांना दुषणे देण्यात काय अर्थ!

In reply to by Duishen

विवाहात अनेकांची फसवणूक होते पण ती फसवणूक स्त्री-पुरुष (लिंगाधारित) अशा अर्थाने घ्यावयाची की धर्माचे लेबल लावून? गुन्ह्याचा हेतू पाहणे महत्वाचे! स्वयंघोषित रक्षकांना तो हेतू काय वाटतो हे महत्त्वाचे नाही. >> +१

In reply to by Duishen

नका करू असाच तर हात लेख सांगतोय. माहिती आहे की मुस्लीम तरुणाशी लग्न केले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त.. मग का करावा असा विवाह?

In reply to by सुखीमाणूस

फसवणूक कोणत्याही विवाहात होऊ शकते. ज्याला बालपणापासून २०-२५ वर्ष ओळखत असतो त्याच्याशी लग्न केले तरी पुढे भ्रमनिरास होऊ शकतो. खात्री कुठेच देता येत नाही. लोक बदलतात, वेळ बदलते, आपण स्वतः बदलतो.....

In reply to by एमी

नीट खात्री करून, डोळे उघडे ठेवून, पुढील परिणाम विचारात घेऊन लग्न करावे. मग विवाहानंतर मनाविरुद्ध काही करायला लागण्याची शक्यता कमी होते.

In reply to by सुखीमाणूस

नीट खात्री करून, डोळे उघडे ठेवून, पुढील परिणाम विचारात घेऊन लग्न करावे. मग विवाहानंतर मनाविरुद्ध काही करायला लागण्याची शक्यता कमी होते. आपल्या या विधानाशी पूर्णत: सहमत. आणि असा विवाह कुठल्याही जाती-धर्म-लिंग, प्रदेश, भाषा, देश याच्यावर बंधन न ठेवता व्हावे.

मुस्लिम पुरुषाशी विवाह केल्याने नक्की काय होते ह्यावर एक बुकलेट बनवून आपली ५ वर्षांच्या मुलीला वाचायला द्यावी. ह्या बुकलेट मध्ये खरी आणि पूर्णतः unbiased माहितीच द्यावी. उदा : १. एकदा महिलेशी तलाक झाला कि तिचा तान्ह्या बाळावर काहीही अधिकार राहत नाही. पण तिच्या स्तनातील दुधावर पुरुषाची मालकी असते त्यामुळे मुलाला ती घरी घेऊन जाऊ शकत नाही पण तलाक दिलेल्या पतीच्या घरी येऊन तिला त्या बाळाला दूध जबरदस्तीने पाजावे लागते. एकदा मी हा विषय एका मित्राच्या घरी काढला असता "आमची रश्मी नाही कधी कुणाबरोबर जाणार, तिला नको असली घाणेरडी माहिती" म्हणून मला गप्प केले. रश्मी नंतर मुस्लिम नाही तरी आणखी कुणाबरोबर तरी पळून गेलीच. सत्य स्वीकारावे : आजच्या काळांतील सत्य हे आहे कि आपली बाळे घरी कितीही सोज्वळ वाटली तर बाहेर त्यांचे गर्लफ्रेंडमी बॉयफ्रेंड असणार आहेतच. आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. आपण पालक म्हणून काहीही करू शकणार नाहीत. हे सत्य पालकांनी आधी स्वीकारले पाहिजे. ह्यांत अल्फा पुरुष बाजी मारतील आणि मूर्ख uninformed मुली चुकीचे निर्णय घेतील. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले मुलगे अल्फा असतील तसेच आपल्या मुली १००% informed असतील किमान इतकी काळजी घ्यावी व इतर सर्व निर्णय त्यांच्यावरच सोडून द्यावेत. नवीन पिढी आपले निर्णय घेण्यास सक्षम आहे. सत्यकथा: माझी एक कझन बहीण २६ वर्षांची असताना एका मुलाबरोबर पळून गेली. मुलगा ख्रिस्ती होता. नंतर तिच्या जीवनाची विल्हेवाट लागली पण आमच्या परिवाराच्या मदतीने तिने आयुष्य पुन्हा व्यवस्तिथ उभारले. तर आम्ही टिनयेजर असताना आमच्या बिल्डिंग मध्ये ३ मुलगे राहायचे. चांगली घराणे, दोघे इंजिनीअर तर एक वकिली शिकत होता. निर्व्यसनी इत्यादी. तिन्ही मुलगे आमच्यावर तथाकथित लाईन मारायचे. माझ्या कझिन च्या आईने ह्यावर आकांड तांडव करून जबरदस्तीने तिन्ही मुलांना आपल्या मुलीला राखी बांधायला लावले. त्या दिवसापासून त्यांचा इंटरेस्ट संपला. माझ्या मते तिन्ही मुलगे चांगले असल्याने त्यांची मुलगी हैपैकी कुणाबरोबरही गेली असती तर आज सुखांत असली असती. जुने तुणतुणे : शेवटी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व संतशतवार आपला थोडा तरी कंट्रोल पाहिजे. उदाहरण म्हणजे शाळा.

In reply to by babu b

धन्यवाद _/\_ मुस्लिम पर्सनल लॉनुसार: • आईने पुर्नविवाह केला नसेल तर ७/८ (मी ६ ऐकलेलं) वर्षांपर्यंत कस्टडी (शक्यतो) आईकडे. • त्यानंतर वयात येईपर्यंत [मुलगा १४(??), मुलीची पाळी येईपर्यंत (१० ते १४ कधीही)] जो कोणी खर्च उचलेल त्याच्याकडे कस्टडी ie (शक्यतो) बाप. • त्यानंतर मुल ठरवणार कोणाकडे रहायचय. हिंदू पर्सनल लॉनुसार: • १८ वयपर्यंतच्या मुलांची कस्टडी (शक्यतो) आईकडे असते. • बाप (शक्यतो) केवळ खर्च उचलत असतो. (चूक असेल तर दुरुस्त करा कृपया) आता जर आईवडील वेगवेगळ्या धर्माचे असतील आणि लग्नानंतर त्यांनी धर्मांतर केलं नसेल तर स्पेशल लग्न कायदा लागू होतो. मग त्यात कस्टडी कशी ठरवतात १८- वयाच्या मुलांची?

In reply to by साहना

कुणीही व्यक्ती तत्व आणि मुल्यांपेक्षा 'जात/धर्म/प्रादेशिकता/ वंश/लिंग' याची बाजू घेऊन लिहितात त्यांचे लिखाण कधीही unbiased असत नाही.

In reply to by साहना

एकदा महिलेशी तलाक झाला कि तिचा तान्ह्या बाळावर काहीही अधिकार राहत नाही. पण तिच्या स्तनातील दुधावर पुरुषाची मालकी असते त्यामुळे मुलाला ती घरी घेऊन जाऊ शकत नाही पण तलाक दिलेल्या पतीच्या घरी येऊन तिला त्या बाळाला दूध जबरदस्तीने पाजावे लागते. >> नक्की का? कारण मी अगदी उलटं ऐकलं आहे. मुस्लिम कायद्यानुसार 'अगदी तान्ह्या मुलालादेखील त्याची आई दूध पाजायला नकार देऊ शकते. तलाक झाला असो/नसो'. === सत्य स्वीकारावे : आजच्या काळांतील सत्य हे आहे कि आपली बाळे घरी कितीही सोज्वळ वाटली तर बाहेर त्यांचे गर्लफ्रेंडमी बॉयफ्रेंड असणार आहेतच. आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. आपण पालक म्हणून काहीही करू शकणार नाहीत. हे सत्य पालकांनी आधी स्वीकारले पाहिजे. ह्यांत अल्फा पुरुष बाजी मारतील आणि मूर्ख uninformed मुली चुकीचे निर्णय घेतील. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले मुलगे अल्फा असतील तसेच आपल्या मुली १००% informed असतील किमान इतकी काळजी घ्यावी व इतर सर्व निर्णय त्यांच्यावरच सोडून द्यावेत. नवीन पिढी आपले निर्णय घेण्यास सक्षम आहे. >> विवाहबाह्य नाही ओ विवाहपूर्व :D पण एकंदर भावनेशी सहमत आहे. === जुने तुणतुणे : शेवटी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व संतशतवार आपला थोडा तरी कंट्रोल पाहिजे. उदाहरण म्हणजे शाळा. >> awww you are cho chweet ;)

In reply to by साहना

आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. विदा तरी द्या.का तुम्ही म्हणता म्हणून मान्य करायचं?

In reply to by साहना

एकदा का मुले मोठी (सज्ञान) झाली की पालकांनी कितीही प्रकारे त्यांना परधर्मात लग्न करण्यापासून परावृत्त केले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. जर लहानपणीच योग्य ती माहिती मुलांना दिली तर कदाचित, मोठेपणी अश्या वेगळ्या धर्मात लग्न करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

In reply to by साहना

एकदा का मुले मोठी (सज्ञान) झाली की पालकांनी कितीही प्रकारे त्यांना परधर्मात लग्न करण्यापासून परावृत्त केले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. जर लहानपणीच योग्य ती माहिती मुलांना दिली तर कदाचित, मोठेपणी अश्या वेगळ्या धर्मात लग्न करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

आ.न., -गा.पै.
प्रति गा.पै. कश्याला वेळ वाया घालवताय. ते बडबडणारं स्वतःच्या "बूद्दीमट्टेच्या" जोरावर बोलत नैये. बी-ग्रेडी तृतीयपंथी अनेकवचनी बाप ज्या कामासाठी पॉकेटमनी देणार तसं ते टंकणार. एकप्रकारचा बौद्धीक वेश्याव्यवसाय आहे तो. :). बामनाला दोन शिव्या जास्तं दिल्या की दोन वडापाव आणि एक कटिंग इन्सेंटिव्ह असावा. बाकी जाती-पातीचा विचार नं करता प्रगतीचा विचार करणार्‍यांना वरचा "सु"विचार लागु नाही. त्यांचं क्लबात स्वागत आहे. वरच्या कॅटेगरीतले ये*** लोकं ना स्वतःची प्रगती करत ना दुसर्‍याची होउ देत. हाथी चले बझार कुत्ते भोंके हजार एवढं ध्यानात ठेउ. कसं? आ.न.कॅ.जॅ.स्पॅ.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अर्थात ब्राह्मण जात/ ब्राह्मण्यावर चर्चा सुरू असली / झाली तर इतके हिडीसपणे व्यक्त होण्याचे प्रयोजन कळले नाही... असो एकेकाची स्टाईल म्हणावी तर वेगळी च