भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जन्मशताब्दी आहे.त्याबद्दल त्यांना अभिवादन.
या निमित्ताने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीविषयी थोडक्यात लिहितो. एक भारतीय म्हणून मला वाटते की त्यांची कारकिर्द भारतासाठी संमीश्र होती. म्हणजे त्यांनी देशासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या आणि काही वाईट गोष्टीही.
चांगल्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी देशाला एक कणखर नेतृत्व दिले. १९७१ मध्ये रिचर्ड निक्सन-हेनरी किसिंजर या जोडगोळीच्या धमकावणीला अजिबात धूप न घालता त्यांनी समर्थपणे देशाचे नेतृत्व केले आणि पाकिस्तानविरूध्दच्या युध्दात विजय मिळवून दिला. पोखरणमध्ये १९७४ मध्ये पहिली अणुचाचणीही इंदिरांनीच घडवून आणली. तसेच नेहरूंच्या काळात भारताचे परराष्ट्रधोरण काहीसे स्वप्नाळू होते. ते तसे न ठेवता त्याला वास्तविकतेची जोड इंदिरांनी दिली. १९८३ मध्ये सियाचीनमध्ये पाकिस्तानी सैन्य पोहोचायच्या आत त्यांनी भारतीय सैन्याला तिथे जायचा आदेश दिला. तेव्हापासून आजपर्यंत सियाचीनमध्ये आपले सैन्य पाकिस्तानी सैन्यापेक्षा अधिक उंचीवर आहे आणि त्याचा आपल्याला फायदा मिळत आलेला आहे. त्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सी.सुब्रमण्यम यांना कृषीमंत्री म्हणून नेमले. सुब्रमण्यणम यांनी एम.एस.स्वामीनाथन, बी.शिवराम आणि नॉर्मन बोरलॉग या तज्ञ सल्लागारांच्या मदतीने पावले उचलली, महत्वाचे निर्णय घेतले आणि १९७० च्या सुमारास भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.
इंदिरांनी काही वाईट गोष्टीही केल्याच होत्या. १९८० च्या दशकात पंजाब आणि आसामचा प्रश्न उग्र झाला. पंजाबच्या प्रश्नात तर त्यांच्या सरकारने केलेल्या काही चुकांमुळे
जरनेलसिंग भिंद्रनवालेला फायदा झाला.त्यानंतर ८-१० वर्षे पंजाबची जखम भळभळत होती. पंजाबमध्ये दहशतवाद थंडावे पर्यंत हजारो लोक मारले गेले. तसेच निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैसे खर्च करणे आणि म्हणून भ्रष्ट मार्गांचे अवलंब करणार्यांकडे कानाडोळा करणे या वाईट प्रकाराची सुरवात इंदिरा गांधींनी केली. न्यायव्यवस्थेत ढवळाढवळ करून आपल्या सरकारला रूचणारा निर्णय देणार्या न्यायाधीशांना सेवाज्येष्ठता डावलून मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणे हा प्रकार इंदिरांच्या सरकारने एकदा नाही तर दोनदा केला. पंडित नेहरूंनी सुरवातीच्या काळात काही संस्थांचे पावित्र्य जपले होते त्याची पायमल्ली इंदिरांनी केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला समाजवादी वळण लावून अनेक उद्योगांमध्ये राष्ट्रीयीकरण करणे (बँका, कोळसा, पेट्रोलियम) हे प्रकारही इंदिरांनीच केले. त्यातून इंदिरांचा पंतप्रधानपदाचा काळ म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी काहीसा 'स्टॅगनेशन' असलेला काळ ठरला.
इंदिरांच्या काळाचे मूल्यमापन करताना आणीबाणीचा उल्लेख करायलाच हवा. आपले पंतप्रधानपद वाचविण्यासाठी इंदिरांनी आणीबाणी आणली. त्या काळात उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले. लाखभर लोकांना अनिश्चितकाळासाठी तुरूंगात डांबले गेले, हजारो लोकांची सक्तीने नसबंदी करण्यात आली. संजय गांधीसारखे घटनाबाह्य सत्ताकेंद्र तयार झाले. आणीबाणी हा इंदिरांच्या पंतप्रधानपदावर मोठा कलंक होता हे नक्कीच. तरीही ही आणीबाणी आली त्या पार्श्वभूमीत विरोधकांची (विशेषतः जयप्रकाश नारायण आणि सहकार्यांची) भूमिकाही धुतल्या तांदळासारखी नक्कीच नव्हती. आणीबाणी आणली ही इंदिरांची चूक झालीच. पण त्याचबरोबर विरोधकांनी कोणत्या चुका केल्या याचा उल्लेख फार होताना दिसत नाही.
१९८९ मध्ये नेहरूंची जन्मशताब्दी होती त्यावेळी मी शाळेत होतो. १९८८ च्या शेवटपासूनच नेहरू जन्मशताब्दीबद्दल अनेक कार्यक्रम आयोजित केले जायला सुरवात झाली होती. त्यावेळी वाटले होते की २०१७ मध्ये इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दीला पण असेच होईल. पण त्यावेळी सत्तांतर झाले असेल ही कल्पना थोडीच होती :)
असो. हा छोटेखानी लेख संपविण्याआधी एक गोष्ट लिहितो. ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय आपल्या जीवावर बेतणार हे त्यांना चांगलेच माहित होते. तरीही तो निर्णय घेताना इंदिरा अजिबात डगमगल्या नाहित. आपल्या जीवावर बेतू शकेल असा निर्णय बेधडकपणे घ्यायला जबरदस्त जिगर लागते. ती जिगर इंदिरांमध्ये नक्कीच होती. अशा जिगरबाज नेत्याला अभिवादन.
या निमित्ताने इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर साधकबाधक चर्चा व्हावी ही अपेक्षा. अशाप्रकारचे लेख लिहिताना नेहमी मी जितकी तयारी करून लेख लिहितो त्याच्या ५% तयारीही हा लेख लिहिताना केलेली नाही आणि हा लेख तसा घाईतच लिहिला आहे. इंदिरांच्या काळाचे व्यवस्थित मूल्यमापन करणारा लेख लिहायचा असेल तर किमान आठवडाभर आधी असा लेख लिहायला सुरवात करायला हवी. ती मी केली नव्हती. आणि आजच इंदिरांची जन्मशताब्दी असल्यामुळे आजच्या दिवशीच लेख येणे गरजेचे होते. यावर जर चर्चा अधिक रंगली तर एकेक मुद्द्यावर प्रतिसादात लिहिता येईलच. आजपर्यंत मी मिसळपाववर इंदिरांवर बरेच लिहिले आहे. तेच प्रतिसाद आधार म्हणून घेतले किंवा अगदी कॉपी-पेस्ट केले तरी चालतील :)
तेव्हा इंदिरांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीविषयी तुमचे मत काय?

वाचने
22387
प्रतिक्रिया
93
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंदिरा गांधी यांना अभिवादन
.. तरीही ही आणीबाणी आली त्या
प्रतिसाद
In reply to .. तरीही ही आणीबाणी आली त्या by दुश्यन्त
@गॅरी ट्रुमन
In reply to प्रतिसाद by गॅरी ट्रुमन
आणीबाणी लादल्याबद्दल
In reply to .. तरीही ही आणीबाणी आली त्या by दुश्यन्त
पुलं ?
In reply to आणीबाणी लादल्याबद्दल by रामदास२९
बरोबर
In reply to पुलं ? by तिमा
इन्दिरा गांधीना आदरांजली
मत-मतान्तरे असतील पण इन्दिरा
In reply to इन्दिरा गांधीना आदरांजली by सुखीमाणूस
उत्तम लेख आणि प्रतिसाद
अभिवादन.
बँकांचे राष्ट्रीयीकरण
In reply to अभिवादन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बॆंकाचे राष्ट्रीयीकरण....
In reply to बँकांचे राष्ट्रीयीकरण by गॅरी ट्रुमन
मुद्दा
In reply to बॆंकाचे राष्ट्रीयीकरण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संस्थानिकांचे तनखे बंद करणे
In reply to मुद्दा by गॅरी ट्रुमन
कारण
In reply to संस्थानिकांचे तनखे बंद करणे by दुश्यन्त
....
In reply to कारण by गॅरी ट्रुमन
सरदार पटेलांनाच विचारा
In reply to .... by babu b
नोप!
In reply to .... by babu b
....
In reply to .... by babu b
संस्थानिकांचे तनखे बंद
In reply to कारण by गॅरी ट्रुमन
आधीपासूनच राजकारणात होते
In reply to संस्थानिकांचे तनखे बंद by पुंबा
धन्यवाद माहितीबद्दल..
In reply to आधीपासूनच राजकारणात होते by गॅरी ट्रुमन

ग्रामीण भागातील शेतक-यांची
In reply to बॆंकाचे राष्ट्रीयीकरण.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अफूची गोळी
In reply to ग्रामीण भागातील शेतक-यांची by अनुप ढेरे
:)
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
..
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
चुकीची माहिती
In reply to .. by babu b
हेच विमान कंपन्यांबाबतीतदेखील
In reply to चुकीची माहिती by गॅरी ट्रुमन

रेशनच्या रांगा

लोल
In reply to रेशनच्या रांगा by राही
रेशनच्या दुकानांपुढील रांगा
In reply to रेशनच्या रांगा by राही
रेशनच्या दुकानांपुढील रांगा ऐंशीच्या दशकातच अदृश्य होऊ लागल्या होत्या. टेलिफोनच्या प्रतीक्षायाद्याही भराभर कमी होत चालल्या होत्या.-१ पुणे शहरात नोव्हेंबर १९८९ मध्ये लँडलाईन दूरध्वनी जोडणीसाठी अर्ज केला होता. तब्बल ६ वर्षे ३ महिने प्रतीक्षा केल्यानंतर फेब्रुवारी १९९६ मध्ये जोडणी मिळाली. सव्वा सहा वर्षे हा कालखंड प्रतीक्षायादी कमी झाल्याचा दावा असेल तर वरील दाव्याशी सहमत. राजीव गांधींनी भारतात संगणक आणला किंवा राजीव गांधींनी दळणवळण क्रांती केली हे दावे जितके सत्य आहेत तितकाच सत्य वरील दावा आहे.सहमत, त्यातही लवकर मिळायला
In reply to रेशनच्या दुकानांपुढील रांगा by श्रीगुरुजी
सहमत आहे.
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
सोशल कंट्रोल आणि पुढे राष्ट्रीयीकरण
In reply to बँकांचे राष्ट्रीयीकरण by गॅरी ट्रुमन
असहमत
In reply to सोशल कंट्रोल आणि पुढे राष्ट्रीयीकरण by राही
दुसरे म्हणजे जर सरकारला
In reply to असहमत by गॅरी ट्रुमन
..परंतु त्यांनी नंतर
In reply to अभिवादन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१९८४
In reply to ..परंतु त्यांनी नंतर by दुश्यन्त
बाळासाहेबांनी सतत विरोध केला.
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद.
इंदिरा गांधी
कारण
In reply to इंदिरा गांधी by तिमा
+१ आणि थोडे अधिक
In reply to कारण by गॅरी ट्रुमन
पण कुठेतरी असे वाटते की
In reply to +१ आणि थोडे अधिक by विकास
खड्यासारखे बाजूला ठेवणे
In reply to +१ आणि थोडे अधिक by विकास
१९८० मध्ये पुनरागमन
In reply to खड्यासारखे बाजूला ठेवणे by गॅरी ट्रुमन
फरक
In reply to १९८० मध्ये पुनरागमन by कानडाऊ योगेशु
चार फेब्रुवारी, १९८४ ला
हो
In reply to चार फेब्रुवारी, १९८४ ला by लाल टोपी
या प्रकरणात...
In reply to हो by गॅरी ट्रुमन
अजून एक दुष्कृत्य
इंदिराबाईंचे अजून एक मोठे दुष्कृत्य म्हणजे त्यांनी लाल बहादूर ..
In reply to अजून एक दुष्कृत्य by हुप्प्या
बिनबुडाचे वगैरे काही नाही
In reply to इंदिराबाईंचे अजून एक मोठे दुष्कृत्य म्हणजे त्यांनी लाल बहादूर .. by ओम शतानन्द
..
In reply to अजून एक दुष्कृत्य by हुप्प्या
..
..
आदरणीय इंदिराजींचं योगदान
कारण-- समाजवाद
In reply to आदरणीय इंदिराजींचं योगदान by अनुप ढेरे
देशाला देश लावायचे आणि तुलना
In reply to आदरणीय इंदिराजींचं योगदान by अनुप ढेरे
..
In reply to देशाला देश लावायचे आणि तुलना by तर्राट जोकर
यादीतले इतर देश यांचे आकार,
In reply to देशाला देश लावायचे आणि तुलना by तर्राट जोकर
परत तुम्ही नगाला नग लावून
In reply to यादीतले इतर देश यांचे आकार, by अनुप ढेरे
मुद्दा तसा सोपा आहे. १९६५
In reply to परत तुम्ही नगाला नग लावून by तर्राट जोकर
चांगला लेख आणि चर्चा!
धन्यवाद
In reply to चांगला लेख आणि चर्चा! by विकास
पी एल 480
In reply to धन्यवाद by गॅरी ट्रुमन