Skip to main content

अहेवपण ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 14/11/2017 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळी अस्वस्थ मनाला दुरच्या दिव्यांची वाटे आस स्तब्ध-निःशब्द सूर्यास्तवेळा कितीक स्मरती हळवे भास उगाच ओठी शब्द अडकती दूर कोणी कोकिळ बोलतो तुडुंब मनाचे आगर भरतां उद्रेकाला मग वाट शोधतो नाद खगांचे, स्वर समीराचा कातळडोही अनाम खळबळ विजनवास व्रतस्थ मनाचा गर्द सावल्या सावळ सावळ पैलतीरी उभे दुत प्रकाशी कुणी छेडले सनईचे सूर अहेवपण सजले सरणावर प्रिया मनी हे कसले काहूर? © विशाल कुलकर्णी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4815
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

पैलतीरी उभे दुत प्रकाशी कुणी छेडले सनईचे सूर अहेवपण सजले सरणावर प्रिया मनी हे कसले काहूर?
क्या बात.... काय लिहितोस... बेहद्द आवडले... वाचताना आरती प्रभुंची "विश्रब्ध मनाच्या कातरवेळी" ही कविता आठवत होती. त्या कवितेमधला "अहेवपण" असाच अस्वस्थ करुन गेला होता.... पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अजुन काय हवं माझ्यासारख्या नवख्या कविला. माझ्या ओळी वाचताना तुम्हाला आरतीप्रभु यांचे स्मरण व्हावे... ही आजवरची सगळ्यात मोठी दाद आहे माझ्या लेखनाला. _/!\_

निराश केलं नाहीस जियो हळवा प्रापंचिक नाखु