Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १५

लेखक गॅरी ट्रुमन यांनी शुक्रवार, 03/11/2017 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा. तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकूल रॉय यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच असंतुष्ट होते अशा बातम्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने उत्तर भारत अगदी पूर्ण स्वीप केला होता. अनेक राज्यांपैकी सगळ्या जागा पक्षाने जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये त्यात वाढ होणे नाही आणि होईल ते नुकसानच होईल. त्यामुळे पूर्वापार कधीच शिरकाव करता न आलेल्या राज्यांमध्ये (बंगाल, ओरिसा, तामिळनाडू इत्यादी) बर्‍यापैकी जागा जिंकून इतरत्र पडझड झाल्यास ती भरून काढण्याकडे भाजपचा कल असेलच. त्या दृष्टीने मुकूल रॉय यांचा भाजप प्रवेश ही पक्षासाठी उत्साहवर्धक घडामोड आहे.

वाचने 45131
प्रतिक्रिया 212

प्रतिक्रिया

http://164.100.47.4/BillsTexts/LSBillTexts/Asintroduced/165_2017_LS_Eng… 4जून, 2017ला केंद्रीय मंत्रिमंडळाने The Financial Resolution and Deposit Insurance (FRDI) Bill, 2017 ला मंजूर केलं आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात ते सादर होईल. या बिलाद्वारे एका “Resolution Corporation” ची निर्मिती केली जाणार आहे.

https://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/chhagan-bhujbal-sh… भाजपाच्या नेत्यानीच भुजबळांची प्रकरणे ओपन केली. भाजपानेच त्याना आत टाकले. आता ह्यांचेच नेते बोलतात.. भुजबळ गरिबांचे तारणहार