मनुस्मृति (भाग १)
मनुस्मृति (भाग १)
आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू.
वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द. हा सगळा प्रकार कितीही श्रेष्ठ असला तरी सामान्य माणसांच्या रोजच्या व्यवहारात त्याला लागते साध्या साध्या नियमांची जंत्री
माणसांनी एकमेकांशी, राजाने प्रजेशी आणि प्रजेने राजाशी, व्यापार्याने ग्राहकाशी, आई-वडिलांनी मुलांशी आणि त्यांनी आई-वडिलांशी, एका वर्णाने दुसर्या वर्णाशी, इत्यदि इत्यादि कसे वागावे याचे नियम असणे समाजाला अत्यंत गरजेचे असते; नव्हे. समाज त्या शिवाय राहूच शकत नाही. हे नियम किंवा कायदे ज्या साहित्यात लिहले आहे ते साहित्य म्हणजे स्मृती. अध्यात्मदर्शनाचा पाया शुद्ध आचार आहे. तो आचार आणि त्याच्या नीतीरुपी, सदाचाररुपी सीमारेषा नियमबद्ध करणे हे स्मृतींचे कार्य. आचार शुद्ध रहावा, कायदे नीट पाळले जावेत म्हणून " प्रायश्र्चित्त " (दंड) आलेच. तर अशा या स्मृती. किती आहेत ? प्रमुख वीस. उदा. अत्री, आपस्तम्ब, पाराशर वगैरे. त्यातील सर्वात प्रमुख व ब्रिटिश शासन कालातही न्यायालयात वापरली जाणारी म्हणजे " मनुस्मृती ". एक अतिशय प्रज्वलनशील ग्रंथ. भाजपाला मनुवादी म्हणून हिणवावयास व केव्हाही रस्त्यावर जाळावयास उपयोगी म्हणून "बहेनजीं"ना फारच आवडणारा. आज आपण.मनुस्मृतीची माहिती घऊं..
मी अशा विषयावर लिहतो तेव्हा सहसा संक्षिप्त स्वरूपात लिहतो. वाचणार्याला किती त्रास द्यावयाचा हा साधा हिशेब. पण आज जरा विस्ताराने लिहिन म्हणतो. लेख तीन भागात आहे. पहिल्या दोन भागात ग्रंथाची माहिती व तिसर्या भागात याच स्मृतीला प्रखर विरोध कां ? ते पाहू.
तर आता सुरवात करू मनुस्मृती लिहणार्या मनुपासून. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र्र ही ओळख सोडली तर त्याचा ऐतिहासिक.काळ काही सापडत नाही. तेव्हा जरा वळसा घेवून मनुस्मृतीचा काळ कोणता ते पहिल्यांदी ठरवून मग तो काळ मनूचा असे म्हणावे लागते. इथेही अडचण अशी की आज आपल्यासमोर जी मनुस्मृती आहे ती मनूने लिहलेली नव्हेच. ती आहे एकामागून एक अशी संस्करणे झालेली. पण महाभारतात जर मनूची वचने दिली असतील तर ती त्यावेळी सर्वांना माहीत होती असे म्हणावयाचे. ती बुद्धपूर्व कालातील असणार. द्या सोडून.
तेव्हा आज आपल्या समोर असलेल्या मनुस्मृतीकडे वळू. ग्रंथात १२ अध्याय व २६८४ श्लोक आहेत..प्रत्येक अध्यायातील महत्वाचे विचार बघू...
आज ज्यांना मोठा विरोध आहे ते दोन मुदे (१) "न स्त्री स्वातंत्र्यमर्हति" आणि (२) शूद्र. पहिल्याचा आपण याच भागात योग्य ठिकाणी विचार करू व दुसर्याकरिता भाग ३ आहेच.
(१) अद्याय १ (श्लोक ११९)
परमात्म्याने सर्व सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवाने धर्मशास्त्र मनूला शिकवले. त्याने ते ऋषींना दिले.
निमिषापासून युगापर्यंत कालगणना;
कृतयुगात धर्म, त्रेतायुगात ज्ञान; द्वापारयुगत यज्ञ व कलीयुगात दान प्रधान आहेत;
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण; अध्ययन,अध्यापन,यझ‘करणे-कराविणे दान देणे व घेणे ही ब्राह्मणाची सहा कर्मे; प्रजेचे रक्षण दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन व इंदियजय ही क्षत्रियाची प्रधानकर्मे, गोपालन, दान देणे, यज्ञ करणे, अध्ययन, व्यापार, शेती ही वैश्याची प्रधानकर्मे तर शिल्पकर्मे (कलानिर्मिती व त्रिवर्णाची सेवा ) ही शूद्रांची कर्मे आहेत.
सर्वांनी सदाचारीच असावे.
(२) अध्याय २ (श्लोक २४९)
ब्रह्मावर्त, ब्रह्मर्षी, मध्य देश यांच्या सीमा; पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत आणि हिमालय-विन्ध्यामधील प्रदेशास आर्यावर्त म्हणतात.
ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य याचे उपनयन क्रमश: ८ व्या, ११ व्या; १२ व्या वर्षी करावेत.
भोजन एकाग्रचित्ताने अन्नाचा सन्मान करून करावे. अतिभोजन करू नये.
पतिसेवा हाच स्त्रीसाठी गुरूकुलवास असून उत्तम रीतीने गृहकृत्ये करणे हाच साय़ंप्रातर्होम होय.
प्रतिदिनी जो वृद्धांची सेवा करतो विनम्रभावाने नमस्कार करतो त्याचे आयुष्य, विद्या, यश व बल सर्वच वर्धिष्णु होते.
मावशी, मामी, आत्या, काकू, सासू या सर्व मातेसमान आहेत.
दहा उपाध्यायासमान आचार्य असतो, शंभर आचार्यासमान पिता असतो आणि पित्यापेक्षा मातेची थोरवी सहस्रगुणित असते.
ब्राह्मणाने मानसन्मान विषवत् टाळावे व अपमानची अमृतवत् इच्छा करावी, तात्पर्य त्याने निर्द्वंद्व व्हावे.
माता-पिता-आचार्य यांचा कधीही अनादर करू नये. हे तीन लोक, तीन आश्रम, तीन वेद आणि तीन अग्नी आहेत. (त्यांच्याप्रमाणे पवित्र आहेत.
उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा. विद्या, धर्म, सुचिता, उत्तम वचन इ.अनेक प्रकारच्या चिद्या ज्यांच्याकडून मिळतील त्यांच्याकडून घ्याव्यात.
(३) अध्याय तीन (श्लोक २८६)
गुरूकुलात ब्रह्मचर्यव्रताने राहून मग गुरूच्या आज्ञेनेच गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.
ब्राह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, आसूर, गंधर्व, राक्षस आणि पैशाच्य हे विवाहाचे आठ प्रकार आहेत. यापैकी पहिले चार श्रेष्ठ आहेत.
ज्ञानवान पित्याने द्रव्याच्या मोहाने आपल्या कन्येला कधीही विकू नये. स्त्रीचा सदैव आदरच केला पाहिजे.जेथे (ज्या कुळात) स्त्रीचा सन्मान होतो तेथे देवता रमतात आणि जिथे स्त्रियांचे पूजन होत नाही, तेथे यज्ञादी सर्व क्रीया निरर्थक होतात.
ज्या कुलातील स्त्रिया दु:ख करतात, शोक करतात, त्या कुलाचा तात्काळ नाश होतो
स्त्रीला सन्मान वा शोभा असेल तरच त्या कुळाला शोभा आहे.
देवता, अतिथी, सेवक, माता, पिता, या सर्वांचा गृहस्थाश्रमीने नित्य सन्मान केला पाहिजे.
संपूर्ण जीव ज्याप्रमाणे वायूच्या आश्रयाने जगतात, त्याप्रमाणे सर्व आश्रम गृहस्थाश्रमाच्या आश्रयाने जगतात.
सर्वांना जेवण दिल्यावरच पति-पत्नीने अन्नग्रहण करावे.
(४) अध्याय ४ (श्लोक २६०)
सत्य व प्रिय बोलावे, अप्रिय बोलू नये. असत्य पण प्रिय, सत्य पण अप्रिय तेही बोलू नये हाच सनातन धर्मा होय.
निष्प्रयोजन वैर किंवा भांडण कधीही करू नये.
धर्मवर्जित व धर्माचे अधिष्ठान नसलेल्या अर्थ व काम यांचा संपूर्ण त्याग करावा.
नोकर आपली छाया असतात, त्यांच्या मुखातून काही वाईट बोलले गेले तर त्याचा राग करू नये..
कन्या विशेष कृपापात्र असते.
विद्वान पुरुषाने सदैव यम-नियमांचे सेवन करावे.
तपाचरण करणार्याने अहंकार वाढू देऊं नये; यज्ञ करणार्याने असत्य बोलू नये; दु:ख असलेल्याने विप्रांची निंदा करू नये; दान देणार्याने दानाची वाच्यता करू नये
अहंकाराने तपाचा, असत्याने यज्ञाचा, परनिंदेने आयुष्याचा व वाच्यतेने दानाचा नाश होतो.
परलोक प्राप्त करतांना माता-पिता, पुत्र, पत्नी कोणीही उपयोगी येत नाही. केवळ एक धर्मच सहाय्यभूत होतो. जीव एकटाच जन्माला येतो व एकटाच मरतो. एकटाच सुकृत-दुष्कृताला भोगतो.
उत्तमांचा संग धरावा आणि अधर्माचा संग टाळावा.
(५) अध्याय ५ (श्लोक १६९)
आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही.
शंभर अश्चमेध करणार्याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते.
सन्मार्गाने द्रव्य मिळविणे श्रेष्ठ आहे.विद्वान क्षमेने, नदी वेगाने, शरीर जलाने, मन सत्याने, जीवात्मा विद्या व तपाने, बुद्धी ज्ञानाने व ब्राह्मण त्यागाने शुद्ध होतात.
मांस खाण्यात, दारू पिण्यात वा संभोगात पाप नाही परंतु त्यापासून दूर राहण्यात जास्त फायदा होतो.
मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरातही काहीही स्वेच्छेने करू नये.
बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पति वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात. म्हणून स्त्रीने स्वतंत्र राहू नये. पिता, भर्ता वा पुत्रापासून अलग झालेल्या स्त्रीची निंदा होते. पतिसेवेतच स्त्रीची सर्व व्रते, उपवास, यज्ञ समाविष्ट आहे. मन, वाणी व देह यांने पतीला दु:ख न देणारी स्त्री उत्तम लोकाला जाते.
(२००० वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रीने जर पिता, भर्ता आणि पुत्र यांचा आश्रय सोडून स्वतंत्र रहावायाचे ठरविले तर तिला चरितार्थाचे साधन काय असणार ? संरक्षणाची व्यवस्था कोणती ? अशा स्त्रीची समाज निंदा करणार हे उघडच होते. मनूने इतर ठिकाणी स्त्रीची केलेली स्तुती पहाता त्याच्या मनात स्त्रीबद्दल आदरच होता असे दिसते.पण समाजाचा एक भाग म्हणून विचार केला तर त्या काळी स्वतंत्र स्त्री ही कल्पना अव्यवहार्य होती हे मान्य करावेच लागेल. आज काळ बदलला आहे. आज स्त्रीने स्वतंत्र रहावयाचे ठरविले तर ते शक्य आहे,सुरक्षित आहे की नाही हे अलग, तेव्हा या विधानाबद्दल मनूला किती दोष द्यावयाचा हे प्रत्येकाने वैयक्तिक ठरवावे.)
(६) अध्याय ६ (श्लोक ९७)
माणसाने गृहस्थाश्रमात नियमपूर्वक व जितेंद्रिय रहावे. वृद्धत्व आल्यावर वानप्रस्थाश्रमाचा आश्रय घ्यावा. शेवटी सन्यास घ्यावा. या अध्यायात प्रत्येक आश्रमात कसे रहावे याचे मार्गदर्शन केले आहे.
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व यती हे चार आश्रम गृहस्थाश्रमाधिष्ठित आहेत.
धैर्य, क्षमा, दम अस्तेय, सुचिता, इंद्रियनिग्रह, शास्त्रज्ञान, आत्मज्ञान, सत्य, अक्रोध ही दहा धर्मलक्षणे आहेत. यांच्या अनुसरणानेच मोक्षलाभ होतो.
Book traversal links for मनुस्मृति (भाग १)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
++११११
प्रतिसादाला आपले +111
लाभार्थी समाजगट?
आपण स्वतची समजूत नेमकी कशी काढता ?
लाभार्थी म्हणजे फक्त अार्थिक नव्हे
न स्त्री: स्वातन्त्र्यमर्हति|
कोल्हटकरजी कृपया खालील श्लोकांकडे ही लक्ष द्यावे
पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा:१- विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः । उपचार्यः स्त्रिया साध्व्या सतत देववत् पतिः ५-१५४ पती हा जरी शीलरहीत असला , स्वैराचारी कामुक असला, जरी चांगल्या गुणांनी रहीत असला , तरीही त्याला देव मानुन त्याची सेवा केली पाहीजे. २- नास्ति स्त्रीणा पृथग् यज्ञो न व्रत नाप्युपोषणम् । पति शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते ५-१५५ पाणिग्राहस्य साध्वी स्त्री जीवतो वा मृतस्य वा । पतिलोकमभीप्सन्ती नाचरेत् कि चिदप्रियम् ५-१५६ काम तु क्षपयेद् देह पुष्पमूलफलैः शुभैः । न तु नामापि गृह्णीयात् पत्यौ प्रेते परस्य तु ५-१५७ आसीतामरणात् क्षान्ता नियता ब्रह्मचारिणी । यो धर्म एकपत्नीना काङ्क्षन्ती तमनुत्तमम् ५-१५८ स्त्रीयांसाठी वेगळ्या व्रत उपवासांची काहीही गरज नाही. पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते ( ज्ञानेश्वर माऊली देखील याच लाइनवर आत्महिताचा सोपा मार्ग सांगतात = पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते -अ-१६ ओ-४५६) पाणिग्रहण केलेल्या साध्वी स्त्री ने जिला पतिलोकाची इच्छा आहे तीने जिवीत असो वा मृत पतीविरोधात कुठलेही आचरण करु नये. पतीनिधनानंतर शरीराला क्षीण करत फ़ळे फ़ुले खाऊन जगले पाहीजे व्याभिचाराचा विचारही मनात येउ देउ नये. एव वृत्ता सवर्णा स्त्री द्विजातिः पूर्वमारिणीम् । दाहयेदग्निहोत्रेण यज्ञपात्रैश्च धर्मवित् ५-१६७ भार्यायै पूर्वमारिण्यै दत्त्वाऽग्नीनन्त्यकर्मणि । पुनर्दारक्रिया कुर्यात् पुनराधानमेव च ५-१६८ पुरुषाने मात्र अशी साध्वी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे विधीपुर्वक दहन करुन त्यानंतर पुन्हा विवाह करुन घेतला पाहीजे. ३- पौंश्चल्याच्चलचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावतः । रक्षिता यत्नतोऽपीह भर्तृष्वेता विकुर्वते ९-१५ एवं स्वभावं ज्ञात्वाऽसां प्रजापतिनिसर्गजम् । परमं यत्नमातिष्ठेत् पुरुषो रक्षणं प्रति ९-१६ शय्याऽऽसनमलङ्कारं कामं क्रोधमनार्जवम् । अनार्यतां ] द्रोहभावं कुचर्यां च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ९-१७ नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रैरिति धर्मे व्यवस्थितिः । निरिन्द्रिया ह्यमन्त्राश्च स्त्रीभ्यो अनृतमिति स्थितिः ९-१८ स्त्रीया स्वभावत:ह चंचल मनाच्या , व्याभिचारी स्वभावाच्या असतात हा त्यांचा स्वभाव निसर्गत: च आहे. झोपुन राहणे, बसुन राहणे, कामुक क्रोधग्रस्त असणे द्रोह करणे दुराचार करणे हे स्त्रीयांच्या स्वभावात आहे. ४- अक्षमाला वसिष्ठेन संयुक्ताऽधमयोनिजा । शारङ्गी मन्दपालेन जगामाभ्यर्हणीयताम् ९-२३ एताश्चान्याश्च लोकेऽस्मिन्नपकृष्टप्रसूतयः । उत्कर्षं योषितः प्राप्ताः स्वैः स्वैर्भर्तृगुणैः शुभैः ९-२४ अक्षमाला ही अधम जातीची योनीची स्त्री वसिष्ठा शी विवाहीत झाल्याने व शारंगी मन्दपालाशी विवाहीत झाल्यानेच पुज्य ठरल्यात. या आणि इतरही स्त्रीया केवळ आपल्या पतीच्या गुणांनीच उत्कर्षाला पोहोचल्यात. ५- अतिक्रामेत् प्रमत्तं या मत्तं रोगार्तमेव वा । सा त्रीन् मासान् परित्याज्या विभूषणपरिच्छदा -९-७८ उन्मत्तं पतितं क्लीबमबीजं पापरोगिणम् । न त्यागोऽस्ति द्विषन्त्याश्च न च दायापवर्तनम् -९-७९ जी स्त्री आपल्या रोगी, मद्यपी पतीची सेवा करत नाही तिची आभुषणे काढुन घेउन तिचा तीन महीन्यासाठी त्याग केला पाहेजे परंतु जी स्त्री आपला पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी जरी असला व तरीही त्याची सेवा करत असेल तर तिचा त्याग करु नये. मनुच्या वरील नियमा संदर्भात एक बाब बघण्यासारखी आहे इथे वरील नियमात मनु पती जरी पतित असला तरी त्याची सेवा करणे ही श्रेष्ठ बाब मानतो धर्म मानतो. मात्र नारद स्मृती पाच कारणांसाठी त्यापैकी एक पतित असणे साठी स्त्रीला त्या पुरुषाचा अगदी त्याग करुन दुसरा विवाह करण्याची परवानगीही देत होती. मात्र कलिवर्ज्य या ट्रीकच्या नावाखाली हा अधिकार काढुन घेण्यात आला. मनु देखील तेच करतो मनु पतित पतीची सेवा करण्याचा उलट गौरव करतो सरळ सरळ उलटा नियम अशा स्त्रीचा त्याग उलट पतित पुरुषानेच तीन महीन्यासाठी करावा असा आदेश देतो. पती पतित असेल तर एकीकडे त्याच्या त्यागाची व पुनर्विवाहाची परवानगी नारद स्मृती सारख्या स्मृती देतात व मनु त्याच्या अगदी उलट पुनर्विवाहाची परवानगी तर नाकारतोच ( शरीर क्षीण करत फ़ळे खाऊन जगावे वरील दिलेल्या श्लोकात आदेश देतो ) कलिवर्ज्य संबंधातील अन्यत्र दिलेले विवेचन इथे पुन्हा चिकटवतो. जुना मुळ नियम- स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती. तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती. इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार. कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.कोल्हटकरजी कृपया खालील श्लोकांकडे ही लक्ष द्यावे
पण मनूने अशाहि काही गोष्टी म्हणून ठेवल्या आहेत की तो स्त्रियांचा आदर करतांना दिसतो. उदाहरणार्थ पुढील दोन श्लोक वानगीदाखल पहा:१- विशीलः कामवृत्तो वा गुणैर्वा परिवर्जितः । उपचार्यः स्त्रिया साध्व्या सतत देववत् पतिः ५-१५४ पती हा जरी शीलरहीत असला , स्वैराचारी कामुक असला, जरी चांगल्या गुणांनी रहीत असला , तरीही त्याला देव मानुन त्याची सेवा केली पाहीजे. २- नास्ति स्त्रीणा पृथग् यज्ञो न व्रत नाप्युपोषणम् । पति शुश्रूषते येन तेन स्वर्गे महीयते ५-१५५ पाणिग्राहस्य साध्वी स्त्री जीवतो वा मृतस्य वा । पतिलोकमभीप्सन्ती नाचरेत् कि चिदप्रियम् ५-१५६ काम तु क्षपयेद् देह पुष्पमूलफलैः शुभैः । न तु नामापि गृह्णीयात् पत्यौ प्रेते परस्य तु ५-१५७ आसीतामरणात् क्षान्ता नियता ब्रह्मचारिणी । यो धर्म एकपत्नीना काङ्क्षन्ती तमनुत्तमम् ५-१५८ स्त्रीयांसाठी वेगळ्या व्रत उपवासांची काहीही गरज नाही. पती सेवा करुनच ती सहज स्वर्ग प्राप्ती करु शकते ( ज्ञानेश्वर माऊली देखील याच लाइनवर आत्महिताचा सोपा मार्ग सांगतात = पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता । अनायासें आत्महिता । भेटेचि ते -अ-१६ ओ-४५६) पाणिग्रहण केलेल्या साध्वी स्त्री ने जिला पतिलोकाची इच्छा आहे तीने जिवीत असो वा मृत पतीविरोधात कुठलेही आचरण करु नये. पतीनिधनानंतर शरीराला क्षीण करत फ़ळे फ़ुले खाऊन जगले पाहीजे व्याभिचाराचा विचारही मनात येउ देउ नये. एव वृत्ता सवर्णा स्त्री द्विजातिः पूर्वमारिणीम् । दाहयेदग्निहोत्रेण यज्ञपात्रैश्च धर्मवित् ५-१६७ भार्यायै पूर्वमारिण्यै दत्त्वाऽग्नीनन्त्यकर्मणि । पुनर्दारक्रिया कुर्यात् पुनराधानमेव च ५-१६८ पुरुषाने मात्र अशी साध्वी स्त्री मरण पावल्यानंतर तिचे विधीपुर्वक दहन करुन त्यानंतर पुन्हा विवाह करुन घेतला पाहीजे. ३- पौंश्चल्याच्चलचित्ताच्च नैस्नेह्याच्च स्वभावतः । रक्षिता यत्नतोऽपीह भर्तृष्वेता विकुर्वते ९-१५ एवं स्वभावं ज्ञात्वाऽसां प्रजापतिनिसर्गजम् । परमं यत्नमातिष्ठेत् पुरुषो रक्षणं प्रति ९-१६ शय्याऽऽसनमलङ्कारं कामं क्रोधमनार्जवम् । अनार्यतां ] द्रोहभावं कुचर्यां च स्त्रीभ्यो मनुरकल्पयत् ९-१७ नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रैरिति धर्मे व्यवस्थितिः । निरिन्द्रिया ह्यमन्त्राश्च स्त्रीभ्यो अनृतमिति स्थितिः ९-१८ स्त्रीया स्वभावत:ह चंचल मनाच्या , व्याभिचारी स्वभावाच्या असतात हा त्यांचा स्वभाव निसर्गत: च आहे. झोपुन राहणे, बसुन राहणे, कामुक क्रोधग्रस्त असणे द्रोह करणे दुराचार करणे हे स्त्रीयांच्या स्वभावात आहे. ४- अक्षमाला वसिष्ठेन संयुक्ताऽधमयोनिजा । शारङ्गी मन्दपालेन जगामाभ्यर्हणीयताम् ९-२३ एताश्चान्याश्च लोकेऽस्मिन्नपकृष्टप्रसूतयः । उत्कर्षं योषितः प्राप्ताः स्वैः स्वैर्भर्तृगुणैः शुभैः ९-२४ अक्षमाला ही अधम जातीची योनीची स्त्री वसिष्ठा शी विवाहीत झाल्याने व शारंगी मन्दपालाशी विवाहीत झाल्यानेच पुज्य ठरल्यात. या आणि इतरही स्त्रीया केवळ आपल्या पतीच्या गुणांनीच उत्कर्षाला पोहोचल्यात. ५- अतिक्रामेत् प्रमत्तं या मत्तं रोगार्तमेव वा । सा त्रीन् मासान् परित्याज्या विभूषणपरिच्छदा -९-७८ उन्मत्तं पतितं क्लीबमबीजं पापरोगिणम् । न त्यागोऽस्ति द्विषन्त्याश्च न च दायापवर्तनम् -९-७९ जी स्त्री आपल्या रोगी, मद्यपी पतीची सेवा करत नाही तिची आभुषणे काढुन घेउन तिचा तीन महीन्यासाठी त्याग केला पाहेजे परंतु जी स्त्री आपला पती वेडा, पतित, बीजहीन, पापरोगी जरी असला व तरीही त्याची सेवा करत असेल तर तिचा त्याग करु नये. मनुच्या वरील नियमा संदर्भात एक बाब बघण्यासारखी आहे इथे वरील नियमात मनु पती जरी पतित असला तरी त्याची सेवा करणे ही श्रेष्ठ बाब मानतो धर्म मानतो. मात्र नारद स्मृती पाच कारणांसाठी त्यापैकी एक पतित असणे साठी स्त्रीला त्या पुरुषाचा अगदी त्याग करुन दुसरा विवाह करण्याची परवानगीही देत होती. मात्र कलिवर्ज्य या ट्रीकच्या नावाखाली हा अधिकार काढुन घेण्यात आला. मनु देखील तेच करतो मनु पतित पतीची सेवा करण्याचा उलट गौरव करतो सरळ सरळ उलटा नियम अशा स्त्रीचा त्याग उलट पतित पुरुषानेच तीन महीन्यासाठी करावा असा आदेश देतो. पती पतित असेल तर एकीकडे त्याच्या त्यागाची व पुनर्विवाहाची परवानगी नारद स्मृती सारख्या स्मृती देतात व मनु त्याच्या अगदी उलट पुनर्विवाहाची परवानगी तर नाकारतोच ( शरीर क्षीण करत फ़ळे खाऊन जगावे वरील दिलेल्या श्लोकात आदेश देतो ) कलिवर्ज्य संबंधातील अन्यत्र दिलेले विवेचन इथे पुन्हा चिकटवतो. जुना मुळ नियम- स्त्री ला काही विशीष्ट परीस्थीतीत पुनर्विवाह करण्याची परवानगी काही धर्मग्रंथांनी दिलेली होती.उदा. नारद स्मृती (स्त्रीपुंस प्र. ९७) ने पाच आपत्त्तीत जर पती हरवला असेल, मृत झाला, संन्यासी झाला, नपुंसक असेल, पतित झाला असेल तर दुसरा विवाह करण्याची परवानगी दिली होती. तसेच वसिष्ठ धर्मसुत्र स्त्रीचे दोन प्रकार मानतो एक जिचा विवाह झालेला आहे मात्र ती अक्षतयोनि आहे दुसरी जिचा विवाह झालेला आहे मात्र क्षतयोनि आहे. यात केवळ पहील्या प्रकारात स्त्री ला पुनर्विवाहाची परवानगी होती. इतरही काही ग्रंथ घर सोडुन गेलेल्या पतिची कीती काळ वाट पाहुन मग दुसरा विवाह कधी करावा या संदर्भात नियम देतात उदा. ८ वर्ष ४ इ. वर्णानुसार. कलिवर्ज्य- यानुसार वरील सर्व प्रकारच्या सर्व ग्रंथानी दिलेली सवलत काढुन कुठल्याही परीस्थीतीत पुनर्विवाह हा स्त्री ला या कलियुगात वर्ज्य आहे असे नोंदवतो. स्त्री चा पुनर्विवाहाचा अधिकार पुर्णपणे अमान्य करतो.भाषांतर काहीही असो...
मनुस्मृती हा त्या काळातील
श्रीगुरुजी
जग पुढे चालले आहे आणि काही जण अजूनही मनुस्मृती चांगली का वाईट, ती जाळावी का पूजावी याविषयावर मंथन करीत आहेत. मनुस्मृती चांगली असली किंवा वाईट असली, ती जाळली किंवा पूजली तरी कोणालाही शष्प फरक पडणार नाही. मनुस्मृतीत स्त्रियांविषयी काय लिहिले आहे यामुळे आजच्या काळात अजिबात फरक पडत नाही कारण मनुस्मृतीप्रमाणे कोणी वागत असेल असे वाटत नाही. मी मनुस्मृती नावाचे पुस्तक/ग्रंथ अजून पाहिलेला सुद्धा नाही व त्यात काय लिहिले आहे त्याविषयी अजिबात उत्सुकता नाही. त्यात जे काय लिहिले असेल ते त्या काळाला अनुसरून असेल जे आजच्या काळाशी सुसंगत नाही.श्रीगुरुजी आपण जो मुद्दा मांडता आहे तो जुनाच आहे . याच व अशाच मुद्द्याला श्री नरहर कुरुंदकर यांनी आपल्या मनुस्मृती : काही विचार या ग्रंथात मार्मिक उत्तर दिलेले आहे भुमिका मांडलेली आहे. असा विरोध का करावा लागतो याची कारण मीमांसा त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे आहे ( जाड ठसा मी वापरलेला आहे मुळ पुस्तकात नाही ) पटवर्धन नावाच्या विद्वानांनी केलेल्या मनुस्मुतीच्या भलामणीचा समाचार घेतांना कुरुंदकर म्हणतात मनुच्या समर्थकांचा हा विचार मी मुद्दामच केलेला आहे. पुष्कळदा आजचा सुशिक्षीत तरुण असे म्हणतो की, मनु गेला, मनुचा काळ गेला. आज मनुस्मृती प्रमाण मानतोच कोण ? जुन्या काळातला एक जुनाट ग्रंथ , त्याच्याविरुद्ध एवढे मोठे आकांडतांडव करण्यात अर्थ काय आहे ? या नव्या तरुण मनाला हे लक्षात आले पाहीजे की, मनुस्मृतीविरुद्ध जो प्रचार चालतो त्याचे कारण हजार वर्षापुर्वीच्या एका ग्रंथात विषमतेचे समर्थन आहे व विषमतेला पुज्य ठरवले आहे हे नाही. हा विरोध एखाद्या लेखकाच्या ग्रंथाचा नाही. मनुस्मृती हा धर्मशास्त्राचा आधारभुत ग्रंथ मानला गेला. त्या ग्रंथात नोंदवलेली समाजरचना बहुअंशी अस्तित्वात होती आणि या ग्रंथातील मनोवृत्ती तर जवळजवळ सर्वअंशी अस्तित्वात होती. पण हेही निषेधाचे प्रमुख कारण नाही. निषेधाचे प्रमुख कारण हे आहे की, आजही मनुला आदर्श आणि पुज्य मानणारे मन अस्तित्वात आहे. मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते. मनुचे समर्थन करणारे आधुनिक विद्वान कुठपर्यंत विपर्यास करतील याला सीमा नाही. ते दास्याचे वर्णन करणारे श्र्लोक समतेचा आधार म्हणुन सांगतील. सर्वांना कमाल दारिद्र्यात राहणे भाग पाडणार्या व्यवस्थेचे वर्णन "गरजेनुसार दाम " ह्या समाजवादी परिभाषेत करतील. सर्वांच्यावर परंपरेचे गुलाम असण्याची जबाबदारी तिला वहीवाटीनुसार वागण्याचे स्वातंत्र्य म्हणतील. हे सारे प्रयत्न मनुचे समर्थन करता यावे यासाठीच आहेत. हे प्रेम मनु नावाच्या माणसाविषयी नाही. मनु हा ब्राह्मणांचा व ब्राह्म्य़्णाचा संरक्षक म्हणुन ब्राह्मणांचे स्वत:च्या हितसंबंधावरील प्रेम आहे. हे हितसंबंध टिकावेत हा आग्रह च मनुच्या प्रेमाचे रुप घेतो. इहलौकिक व आर्थिक हितसंबंध धार्मिक पुज्यबुद्धीचे रुप घेऊन समोर येतात. आजही ही प्रक्रिया चालु आहे.ती स्पष्टपणे समोर असावी म्हणुनच या मनुसमर्थकांचा विचार करणे भाग असते.. ज्यांना काहीही माहीती नाही. ज्यांच्याजवळ धर्मप्रेम व श्रद्धा यापेक्षा अधिक काहीच नाही, त्यांना क्षमा करता येते व त्यांच्या सुधारणेचा प्रयत्नही करता येतो. पण जे जाणुनबुजुन आपल्या हितसंबंधांची सोय पाहतात त्यांना केवळ ज्ञान देणे पुरत नाही. त्यांना क्षमाही करता येत नाही. मनुस्मृती दहनाची कारण दिड हजार वर्षापुर्वीचा ग्रंथ नसतो. मेघातिथी व कुलुकभट्टासारखे हजार -आठशे वर्षांपुर्वीचे लोक नसतात. विसाव्या शतकातील पटवर्धनांच्यासारखे लोक या दहनाचे खरे कारण आहेत. विसाव्या शतकाचे प्रश्न विसाव्या शतकात जे दहाव्या शतकाला आदर्श मानुन करतात त्यांचा निषेध करुन प्रतिकार करुन सोडवावे लागतात. भांडण भुतकालातील मृतांशी नाही. भांडण वर्तमान काळातील हयात परंपरावाद्यांशी आहे.सगळ्याच प्रतिसादांना अनुमोदन!
शब्दजी कंटेट जितका विकृत त्याहुन भयावह त्याची भलामण आहे.
राजस्थान कोर्ट ...
एक मराठा लाख मराठा चालतंय काय
कुरुंदकर...
कुरुंदकर जे म्हणतात आजही ही प्रक्रिया चालु आहे
मनुचे समर्थन करणारे जर फ़क्त परंपरावादी सनातनीच असते तर मग आधुनिक शिक्षण व आधुनिक राज्य या दोन बाबी पुरेशा होत्या. क्रमाने नवे समतावादी मन अस्तित्वात आले असते. पण जर आधुनिक विद्येत पारंगत असणारे लोक नवनव्या पद्धतीने आजही मनुला पुज्यच ठरवु लागले तर या जुनाट मनोवृत्तीचा निषेध म्हणुन मनुस्मृतीचे दहन करणे भाग पडते.मारवाजी यांचे
मारवाजी, प्रतिसाद आवडले.
मारवा यांना प्रतिसाद
गामा जी काही मुद्दे
प्रयोजन काही समजले नाही!
एक उदाहरण
उत्तम विद्या शूद्राकडूनही ग्रहण करावी, परमधर्म चांडाळाकडूनही ग्रहण करावा. स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा.वरील विधानातील "शुद्राकडुनही" यातील हीनतादर्शक भाव आपण सोडुन देऊ. जाउ द्या. पुढील वाक्य पहा स्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर यातील अर्थ असा वाटतो की कुल जरी नीच असले तरी अशा स्त्री चा वरच्या वर्णाच्या पुरुषा ने पत्नी म्हणुन स्वीकारण्यास हरकत नाही असे मनु म्हणत आहे. एक प्रकारचा उदारपणा यातुन भासतो. की उच्च कुलीन ब्राह्मण वा क्षत्रिय अशा स्त्रीचा स्वीकार करु शकतो त्याला वर्णाचा अडथळा जणु नाहीच. पण असे खरेच मनुला अभिप्रेत होते का ? म्हणजे शरदजी एकच श्लोक देतात त्यांच्या वाचकांकडे फारसा वेळ ही नाही फारसा आता वरील शरदजींचा श्लोक लक्षात ठेउन मनु चे खालील छेद देणारे इतर श्लोक बघा. तिसर्या अध्यायात मनु विवाह कुठल्या स्त्री शी करावा कुठल्या नाही या संदर्भात मार्गदर्शन करत आहे. यस्यास्तु न भवेद् भ्राता न विज्ञायेत वा पिता । नौपयच्छेत तां प्राज्ञः पुत्रिकाऽधर्मशङ्कया ॥११॥ जिला भाऊ नसेल तिच्याशी पुत्रिकाधर्माच्या भीतीने शहाण्याने विवाह करू नये. (हिला जे अपत्य होईल ते माझे श्राद्धादि करील असे केवल मनात आणिल्यानेही ती कन्या पुत्रिका होते.) तसेच जिचा पिता कोण हे विशेषे करून समजत नाही तिच्याशीही शहाण्याने विवाह करू नये. ॥११॥ सवर्णाऽग्रे द्विजातीनां प्रशस्ता दारकर्मणि । कामतस्तु प्रवृत्तानामिमाः स्युः क्रमशोऽवराः ॥१२॥ शूद्रैव भार्या शूद्रस्य सा च स्वा च विशः स्मृते । ते च स्वा चैव राज्ञश्च ताश्च स्वा चाग्रजन्मनः ॥१३॥ द्विजांचा प्रथम विवाह कर्तव्य असता सवर्ण स्त्री श्रेष्ठ होय. पण केवल कामलोलुप होऊन विवाहास प्रवृत्त होतात त्यास ह्या पुढील क्रमाने प्रशस्त आहेत. ॥१२॥ शूद्राची स्त्री केवल शूद्रालाच होऊ शकते; अन्य जातीची नाही. वैश्यास वैश्य व शूद्रा अशा जातीच्या कन्या उक्त आहेत. क्षत्रियास शूद्रा, वैश्या व क्षत्रिया अशा तीन कन्या योग्य आहेत व ब्राह्मणास चारी वर्णाच्या कन्यांशी विवाह करिता येतो. ॥१३॥ न ब्राह्मणक्षत्रिययोरापद्यपि हि तिष्ठतोः । कस्मिंश्चिदपि वृत्तान्ते शूद्रा भार्यौपदिश्यते ॥१४॥ पण गृहस्थ धर्माची इच्छा करणार्या ब्राह्मण व क्षत्रिय यांस ते आपत्तीमध्ये असले तरी व त्यास सवर्ण कन्या मिळत नसली तरी कोणत्याही इतिहासादिकांमध्येही शूद्रा स्त्री भार्या होते असे सांगितलेले नाही. ॥१४॥ हीनजातिस्त्रियं मोहादुद्वहन्तो द्विजातयः । कुलान्येव नयन्त्याशु ससन्तानानि शूद्रताम् ॥१५॥ मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥ शूद्रावेदी पतत्यत्रेरुतथ्यतनयस्य च । शौनकस्य सुतोत्पत्त्या तदपत्यतया भृगोः ॥१६॥ शूद्रां शयनमारोप्य ब्राह्मणो यात्यधोगतिम् । जनयित्वा सुतं तस्यां ब्राह्मण्यादेव हीयते ॥१७॥ शूद्रकन्येशी विवाह करणारा ब्राह्मण पतित झाल्यासारिखाच होतो असे अत्रीचे व उतथ्यपुत्र गौतमाचे मत आहे. शूद्रस्त्रीच्या ठायी पुत्रोत्पति केल्याने क्षत्रिय पतित होतो असे शौनकांचे मत आहे व शूद्रकन्येच्या अपत्यास आणखी अपत्य झाले की वैश्य पतित झाल्यासारखा होतो. ॥१६॥ सवर्ण कन्येशी विवाह न करिता जो ब्राह्मण शूद्र स्त्रीस भोगाकरिता आपल्या शय्येवर आरोपित करतो (तिच्याशी विवाह करतो) तो अधोगतीस जातो व तिच्या ठायी पुत्राची उत्पत्ति केल्याने तो आपल्या ब्राह्मण्यापासूनच भ्रष्ट होतो. ॥१७॥ दैवपित्र्यातिथेयानि तत्प्रधानानि यस्य तु । नाश्नन्ति पितृदेवास्तन्न च स्वर्गं स गच्छति ॥१८॥ वृषलीफेनपीतस्य निःश्वासोपहतस्य च । तस्यां चैव प्रसूतस्य निष्कृतिर्न विधीयते ॥१९॥ ज्या ब्राह्मणाची होमादि देवकर्मे श्राद्धादि पितृकर्मेव अतिथिभोजनादि कर्मे विवाहित शूद्रास्त्रीच्या योगाने संपादित होतात त्याचे ते हव्य व कव्य क्रमाने देव व पितर खात नाहीत व तसल्या आतिथ्याने तो गृहस्थ स्वर्गास जात नाही. ॥१८॥ ज्याने शूद्रस्त्रीच्या अधरोष्ठाचे पान केले आहे व एका शय्येवर निजल्यामुळे तिच्या निश्वासाने जो भ्रष्ट झाला आहे व तिच्या ठायी ज्याने अपत्याची उत्पत्ति केली आहे. त्याची शुद्धि कोणत्याचप्रकारे सांगितलेली नाही. ॥१९॥ वरील काहीही वाचण्यास शरदजींच्या तरुण वाचकांस फारसा वेळ नसल्याने शरदजी त्यांना अगदी सार म्हणुन इतका एकच महत्वाचा श्लोक देतात तो म्हणजेस्त्री नीच कुलातील पण श्रेष्ठ असेल तर तिचा पत्नी म्हणून स्विकार करावा.सर्व काही सोयीचे...
एक विसंगती वरच्या मुळ लेखातच
१- शंभर अश्चमेध करणार्याला व
१- शंभर अश्चमेध करणार्याला व संपूर्ण आयुष्यात मांस न खाणारा यांना सारखेच पुण्य मिळते.+ १२-आपल्या सुखाकरिता प्राण्यांची हिंसा करणार्याला इहलोकात व परलोकात सुख मिळत नाही.+ १ बाकी चालू द्या.श्री गुरुजी प्रतिसाद कळला नाही कृपया विस्ताराने मांडावे
मारवा जी आणि Duishen जी आपण
मनुस्मृतीत सांगितले आहे
मनुस्मृती आणि विवाह
गामाजी
मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥ अगदी बरोबर. द्विजानी द्विजासारखं वागायला हवं ना? उद्या वाघ गवत खाऊन जगू लागला तर त्याला कोण भिईल?मारवा,
ब्राह्मण्याचा उदोउदो
ब्राह्मण्य म्हणजे काय ?
गामा जी आणि ब्राह्मण्याचा उदोउदो.. आणि काही मिथके
गामाजी किमान प्रश्न कोणी विचारलाय ते तरी बघण्याची तसदी घ्या
स्वं स्वं चरित्रं
मारवांचे प्रतिसाद खुप आवडले..
ब्राह्मण पुरुष वुड्र स्त्री विवाह
गामाजी
मारवा सर
मारवा सर
स्वधर्मजी
Duishen,
गामा जी... आपले काही प्रतिसाद...
वाघाचे तृणभक्षण
गामाजी
पराशर ऋषींनी मत्स्यगंधेशी फक्त शय्यासोबत केली होती. त्यातून महर्षी व्यास जन्मास आले. सांगायचा मुद्दा काये की वसिष्ठ, मंदपाल, पराशर, मत्स्यगंधा, माधवी, द्रौपदी हे गवतखाऊ भोगलोलुप नव्हेत.पराशर ची कथा महाभारतात आणि त्याहुन अधिक डिटेल मध्ये देवी भागवतातील द्वितिय स्कन्धातील दुसया प्रकरणात येते. पराशरमुनी एक दिवस तिर्थयात्रा करत असतांना यमुनेच्या किनार्यावर येतो आणि तेथील कोळ्याला नदी पार करुन देण्याची विनंती करतो. तो कोळी आपल्या मुलीला मत्स्यगंधेला या पराशराला नावेतुन नदी पार करुन देण्यास सांगतो. नावेतुन जात असतांना पराशर तिच्यावर मोहित होतो. ( या अगोदर पराशराने कधीही मत्स्यगंधेला बघितलेले नाही सर्वस्वी अनोळखी स्त्री ला पहील्याच भेटीत वयात अंतर असुनही ( ओळखच नसल्याने प्रेम वगैरे असण्याचीही शक्यता नाही ) पराशराने कामुकतेत संयम सोडलेला आहे मुळ संबंधित संस्कृत श्लोकाचे इंग्रजी भाषांतर सोबत देत आहे . Once on an occasion, the highly energetic Muni Parāśara went out on pilgrimage and arrived on the banks of the Yamunā, and spoke to the religious fisherman who was taking his food then thus :-- “O fisherman! Take me on your boat and carry me to the other side of the river.” Hearing this, the fisherman spoke to the beautiful girl Matsyagandhā :-- “O beautiful smiling one! This religious ascetic intends to cross the river; so take the boat and carry him to the other bank.” Thus ordered by her father, the exceedingly beautiful Vasu girl Matsyagandhā began to steer the boat whereon sat the Muni. Thus while the boat was sliding on the waters of the Yamunā; the Muni Parāśara saw the beautiful-eyed damsel Matsyagandhā and became as if under the command of the great destiny, greatly enamoured of her. मत्स्यगंधेशी संभोग करण्यास आतुर झालेला पराशर तिचा हात धरतो. यावर मत्स्यगंधा काय पराशराला काय म्हणते बघण्यासारखे आहे. ती पराशराला म्हणते " तुझ्यासारखा धर्म जाणणारा तु हे मदनबाणाने घायाळ होऊन काय करत आहेस ? ही तुझी माझ्याप्रती निर्माण झालेली वासना तुला तुझ्या कुटुंबाला तुझ्या धर्माच्या ज्ञानाला तुझ्या तपस्येला लायक आहे का शोभा देते का ? तुझ्या सारखा वसिष्ठाच्या महान कुलात जन्मलेला ब्राह्मणाला हे योग्य वाटते का ? He desired to enjoy Matsyagandhā, full of youth and beauty and with his right hand caught hold of her left hand; the blue coloured Matsya looking askance spoke out smilingly in the following words :-- O knower of Dharma! What are you going to do, pierced by the arrows of Cupid? What you desire now, is it worthy of your family or your study of the Śāstras or worthy of your Tapasyā; see, you are born in the line of Vaśiṣṭha and you are well known as of good character. O best of Brāhmiṇs! You are quite aware that the attaining of a man-birth in this world is very rare; and over and above this the attainment of Brāhminhood is, as far as my knowledge goes, particularly difficult. त्यापुढे अजुन स्पष्टपणे ती स्वत:च्या शरीराला येत असलेल्या माशाच्या वासाचा ही हवाला देत त्याला रोखु पाहते. ती म्हणते तु कुलाने द्न्यानाने सर्वश्रेष्ठ आहे तुला धर्माचे ज्ञान आहे तरीही तु असे कसे करु पाहतो आहेस जे आर्याला शोभा देत नाही. माझ्या सर्वांगाला माशाचा वास येत असुनही तुला असे करावेसे का वाटत आहे ? 11-14. O Prince of Brāhmiṇs! You are the foremost and best as far as your family, goodness, and learning in the Vedas and other Śāstras are concerned; you are well versed in Dharma; how is it, then, that you are going to do this act, not worthy of an Ārya, though you see me possessed of this bad smell of fish throughout my body. तुला माझ्यात असे काय आढळले की तु माझ्याशी संग करण्यास आतुर होउन माझा हात धरत आहेस ? इतके बोलुन ती स्वत:शी विचार करते की " अरेरे ह्या ब्राह्मणाचे डोके फ़िरलेले आहे हा मला भोगण्याच्या नादात नाव बुडवुन टाकेल हा इतका कामातुर झालेला आहे की याला थांबवणे जगात कोणालाही अशक्य आहे. " अखेर ती थकुन म्हणते की " मुनिवर तुम्ही मला कमीत कमी मला तुम्हाला पलीकडच्या किनार्यावर तरी घेउन जाऊ द्या मग तुम्हाला काय हवे ते मजसोबत करा " O one of unbaffled understanding! O best of twice-born! What auspicious sign do you see in my body that you are stricken with passion on my account that you have caught hold of my hand to enjoy me? Why have you gotten your own Dharma? Thus saying, Matsyagandhā thought within herself :-- “Alas! This Brāhmiṇ has certainly lost his brains in order to enjoy me; certainly he will be drowned just now in his attempt to enjoy me in this boat; his mind is so much agitated with the arrows of Cupid that no body, it seems, can act against his will.” Thus thinking Matsyagandhā spoke again to the Muni :-- “O highly fortunate one! Hold patience! let me first take you to the other side of the river; then you may do as you please.” हे मत्स्यगंधेचे समजुतीचे चार शब्द ऐकुन पराशर तिचा हात सोडत थोडा वेळ स्वस्थ बसतो. पण थोडाच वेळाने पराशर पुन्हा कामविव्हल होऊन उठतो व मत्स्यगंधेचा हात पुन्हा धरतो. यावर मत्स्यगंधा त्याला विंनंती करते मुनिवर थांबा कृपया रात्रीचा काळोख होइपर्यंत तरी थांबा. सर्वजण आपल्याकडे बघत आहेत माझे वडील ही किनार्य़ावरुन आपल्याला पाहत आहेत या सर्वासमोर तरी असे रानटी कृत्य करु नका जे मला अजिबात सहन होणार नाही. वडिलधारे ज्ञानी लोकांनी दिवसा ढवळ्या संभोग करण्याला पाप म्हटलेले आहे. रात्र हीच संभोगासाठीची योग्य वेळ आहे. शिवाय इतक्या लोकांच्या नजरेसमोर संभोग करणे ? तुमच्या वासनेला आवर घाला किमान काही काळासाठी तरी आवर घाला " 20-34. Then the auspicious Satyavatī addressed Parāśara Muni, resolved to enjoy her, thus :-- “O Muni! Behold! all are looking at us; my father too, is there on the bank of the Yamunā; so, O Muni! wait till night this beastly act before all is highly unsatisfactory to me. The wise persons declare it a great sin to commit sexual intercourse during day they have ordained night time as the best time of intercourse for men not the day time; the more so that many person’s eyes are in this direction. So, O intelligent one! hold on your passion for a while; for the blame pronounced by the public is horrible.” Hearing these reasonable words, the liberal minded Parāśara created, by his influence of Tapasyā, a dense fog so that both the banks of the Yamunā became covered with darkness. एका मुलीला जिला आयुष्यात अगोदर कधीही पाहीलेले नाही, जिच्याशी कुठल्याही प्रकारचे प्रेमसंबंध प्रस्थापित झालेले नाही, जिच्या शरीराला माशाचा वास येत असुनही , ज्या मुलीने वारंवार पराशराला त्याच्या कुलाची तपस्येची धर्माची आठवण करुन देऊनही, जो स्वत:च्या कामवासनेला आवरु शकत नाही. ज्याचा संयम नाव पलीकडच्या किनार्याला लागेपर्यंतही टिकु शकत नाही, जो सरळ हात धरुन संभोगासाठी आतुर होतो, जो दिवसा ढवळ्या मुलीचे वडील व इतर लोक पाहत आहेत याचेही भान कामाच्या आवेगात विसरतो, जो काहीही करुन एका अनोळख्या मुलीला पाहताक्षणीच संभोगाला इतका जबर आतुर झालेला आहे तो पराशर हा भोगलोलुप नव्हता असे तुम्ही म्हणता तेव्हा त्या विधानाला काही अर्थ तरी असतो का ? पराशराने फ़क्त शय्यासोबत केली होती असे तुम्ही म्हणता तेव्हा भोगलोलुप नव्हता तर पराशर काय होता नेमका ? पराशरा इतका डेस्परेट कामावेगात वाहत जाणारा आपल्या कुल तपस्ये इ. ची आठवण करुन देऊनही न बधणारा धड किनारा येइपर्यंतही संयम न बाळगु शकणारा भोगलोलुप नाही तर काय संयमाचा पुतळा होता असे तुम्हास म्हणावयाचे आहे काय ? व असे करुन तुमच्याच म्हणण्याप्रमाणे या द्विजाने गवत खाल्ले की नाही ? व मनुच्या म्हणण्याप्रमाणे मोहामुळे हीन जातीच्या स्त्रीशी विवाह करणारे द्विज संतानासहित आपल्या कुलासच तात्काल शूद्रत्वास पोचवितात ॥१५॥ तसा हा पराशर शुद्रत्वास पोहोचला का ?देवीभागवत मुळ संस्कृत व इंग्रजी अनुवादाचा संदर्भ इथे मिळेल
प्रश्न समर्पक आहे
गामाजी
माझ्या आकलनाप्रमाणे पराशर ऋषींचा बीजसंयोग मुहूर्त टळून चालला होता. म्हणून त्यांना घाई झाली होती. ही घाई अन्यांना कामविव्हलता वाटली.गामाजी आपले एक एक प्रतिसाद जस जसे वाचत गेलो मला हा शेर आठवला सरकती जाये है रुख से नक़ाब आहिस्ता आहिस्ता