खरं खरं सांगा
लेखनविषय:
काव्यरस
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
उच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना?
भले तुमची बायको सुशील सुंदर सुगरण,
द्रुष्ट लागावी असं सुखी संसारीक जीवन.
पण कधीतरी कुठ्ठतरी आठवण ही येतेच ना?
सिलसिला बघताना मन गिरकी घेतेच ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
नसाल तुम्ही अमिताभ पण म्हणून काय झालं?
साले उप्परवालेने भी असलं हार्ट दिलं.
संस्कार बिस्कार,पाप-पुण्य,समाज काय म्हणेल?
इमोशनल लोच्यामध्ये भिजत घोंगडे पडते ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
वाचताना कविता तुमच्या ओठी हसू फुललं.
कुणी नाही ना आजूबाजूला हळूच बघून घेतलं.
कुणी म्हणजे नक्की कोण तुम्हालाही कळलं.
पण आणखी एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं.
आपली 'जाया' कुणाची तरी रेखा असू शकते ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
वाचने
5316
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
:)
आपली 'जया' कुणाची तरी रेखा असू शकते ना? हा हा मस्तच.झकास्स!!
आवडली कविता ...
आमच्या मनांत रेखाच काय, मधुबाला, वहिदा, नूतन, मौशुमी अशा कित्येक असतात, आणि आम्ही उघडपणे, आमच्या जयाला हे कधीच सांगितलं आहे! आणि तिचाही, 'गर्जेल तो पडेल काय ?', या म्हणीवर नितांत विश्वास आहे.
In reply to हो by तिमा
वरच्या यादीत फक्त माधुरी दिक्षीत अॅडवा,
पैजारबुवा,
In reply to +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ by ज्ञानोबाचे पैजार
:):)
In reply to +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ by ज्ञानोबाचे पैजार
वरच्या यादीत फक्त माधुरी दिक्षीत अॅडवा,
नाही हो, ती आमच्या स्पेसिफिकेशनमधे बसत नाही. आम्हाला ती कायमच 'हिरड्याकुमारी' वाटत राहिली.
कालच्या अमिताबच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहीलेली दिसते.
सासं ना एक विनंती आहे .
शेवटच्या ओळीत 'जया' च्या ऐवजी 'जाया' करता येईल का?
In reply to Edit request for typo by चुकलामाकला
नक्की?
:प
वाचताना कविता तुमच्या ओठी हसू फुललं.>>>
==>> खरोखर हसू फुलले..!!
मस्त कविता...!
हा हा हा ! अफलातुन कविता. नर हा निसर्गानेच पॉलिगॅमस केला आहे ( आल्या आता अनाहिता ) त्यामुळे रेखा काय बरीच मोठी लिस्ट असु शकते. ;-)
बाकी आमच्या मनात ते स्थान पंजाब दा पुत्तरी 'प्रियांकाने' पटकावले आहे. ;-)
कोणाची तरी रेखा असू शकते !!!!!! लैच भारी वाक्य . आमच्याकडून एक पार्टी लागू तुम्हाला ...
आपली जया कोणाची तरी रेखा असू शकते !!यासाठी टाळ्या !!
कसं सुटलं होतं वाचनातून
शेवटचं वाक्य बुंगाट
आपलातुपला अमिताभ अन् आपलीतुपली रेखा.
:)आपली 'जया' कुणाची तरी रेखा