तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
उच्चार नसाल करत भले, पण एक रेखा असते ना?
भले तुमची बायको सुशील सुंदर सुगरण,
द्रुष्ट लागावी असं सुखी संसारीक जीवन.
पण कधीतरी कुठ्ठतरी आठवण ही येतेच ना?
सिलसिला बघताना मन गिरकी घेतेच ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
नसाल तुम्ही अमिताभ पण म्हणून काय झालं?
साले उप्परवालेने भी असलं हार्ट दिलं.
संस्कार बिस्कार,पाप-पुण्य,समाज काय म्हणेल?
इमोशनल लोच्यामध्ये भिजत घोंगडे पडते ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
वाचताना कविता तुमच्या ओठी हसू फुललं.
कुणी नाही ना आजूबाजूला हळूच बघून घेतलं.
कुणी म्हणजे नक्की कोण तुम्हालाही कळलं.
पण आणखी एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं.
आपली 'जाया' कुणाची तरी रेखा असू शकते ना?
तुमच्यासुद्धा मनामध्ये एक रेखा असते ना?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5316
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)आपली 'जया' कुणाची तरी रेखा
हा हा मस्तच.आपली 'जया' कुणाची तरी रेखा असू शकते ना?झकास्स!!
आवडली कविता ...
हो
+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
In reply to हो by तिमा
:):)
In reply to +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ by ज्ञानोबाचे पैजार
नाही
In reply to +९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ by ज्ञानोबाचे पैजार
कालच्या अमिताबच्या
Edit request for typo
नक्की? :प
In reply to Edit request for typo by चुकलामाकला
आवडली कविता..
झक्कास
हा हा हा ! अफलातुन कविता. नर
आपली जया
कविता मस्त !
हेच
आपलातुपला अमिताभ अन्