चंद्राचा पाढा
चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन
चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर
चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार,
चंद्र सक ओठावरचा तिळ, साता चंद्र हसू मधाळ
निरीनिरीतुन लगबगणारी चंद्र आठा बोटे आठ
खांद्यावरती पदर विसावे नव्वे चंद्र चोळीगाठ
भांगेतिल कुंकू लावण्याने मुसमुसलेला चंद्रोदय
गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय
सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अरे वा बेलाशेठ,
बेलाशेठ वेलकम बॅक
सुंदर!
चंद्रकळा! अत्त्युत्तम लाडूशेट
अहाहा!! फार आवडली..
व्वाह रे व्वाह!
बेला, किती सुंदर लिहितोस!
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा, प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया... :- YZखुपच छान
मस्तं!
हाहा
हाहा
हे कसं काय सुटलं...