Skip to main content

चंद्राचा पाढा

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/10/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र एके तुझा चेहरा चंद्र दुणे अन डोळे दोन चंद्र त्रिक डोळ्यांतिल काजळ, भिवयांची वर चंद्रकोर चंद्र चोक वेणीत केवडा, चंद्र पाचा चपलाहार, चंद्र सक ओठावरचा तिळ, साता चंद्र हसू मधाळ निरीनिरीतुन लगबगणारी चंद्र आठा बोटे आठ खांद्यावरती पदर विसावे नव्वे चंद्र चोळीगाठ भांगेतिल कुंकू लावण्याने मुसमुसलेला चंद्रोदय गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय सर्वाना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखनविषय:

वाचने 4768
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

लैच दिवसांनी लिहीते झालात. पुनरागमन दणक्यात झाले आहे आता लिहीते रहा. पैजारबुवा,

सुंदर... जाता जाता :- सध्या आमचा आवडता चंद्र म्हणजे कपाळी "चंद्रकोर" असणार्‍या पाठकबाई ! ;) P1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्रियकर: प्रियकरौ प्रियकरा: प्रथमा, प्रियकरं प्रियकरौ प्रियकरां अद्वितीया... :- YZ

हे भारीये बेलाशेठ

हे भारीये बेलाशेठ

मस्तच!! गालावरच्या खळीत लाली चंद्र दाहे ज्योतिर्मय खास! लिहीते झालात.. खूप आनंद झाला! :)