Skip to main content

दिमाग का दही (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 28/09/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसचा पहिला दिवस. मस्तपैकी लवकर उठलो...अंघोळ वगैरे आटपून कपड्यांना इस्त्री केली...मग घातले! फॉर्मल शर्ट... इन केला. नवा चेरीचा डबा फोडून बुटपॉलिश उरकलं. सकाळी ऑफिसात पायधूळ झटकणारा पहिलाच एम्प्लॉयी. कुठे बसायचं माहित नसल्याने रिसेप्शनला सोफ्यावर रेलून मॅगझीन चाळत बसलो. ऑफिसबॉयने इंटरव्हयूला पाहिलेलं मला. ओळखून हसला, म्हणाला, "काय घेणार सर?" मी खूषच, ऐटीत, "काय मिळत आपल्या ऑफिसात?" एखाद्या सराईत वेटरसारखा तो उत्तरला..., "सिनियर्सची अरेरावी, ज्युनिअर्सची कामचुकारी, दुपारी जेवल्यानंतरच्या चर्चा, त्यातून रोज नवा वाद, परदेशवास्तव्याची आस,   दिवसाची दिवास्वप्नं, रिइम्बर्समेंटचे क्लेम्स,   नवेनवे ईएमआय, अप्रेझलच राजकारण, काम संपल्यावर नवीन काम, वर बॉसच्या शिव्या!... ... तुम्हांला काय हवंय?" "दिमाग का दही... नको आणू आता, झालंय ऑलरेडी!" - संदीप चांदणे

वाचने 3907
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

हा हा हा. आजचा दिवसच मस्त गेला. तिकडे शिल्लक दुधाचा आणि विडंबनाचा धागा वाचतोय तोपर्यंत तुम्ही दिमागचे दही केले.

मिपावर दूधदुभतं भरपूर आहे हल्ली ! :)

हा हा हा.. मस्त! :-)