✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हागृ महिमा..

प
पुंबा यांनी
Wed, 08/30/2017 - 13:30  ·  लेख
लेख
महागुरू सचीन 'पीळ'गावकर हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आता, त्यांचे कर्तृत्वच इतके महान की स्वतःविषयीचे गौरवोदगार त्यांनी काढले नाहीत तर बोलणंच बंद करावे लागायचे त्यांना. काही नतद्रष्ट मात्र टिंगल करतात त्यांची, पण म्हाग्रु त्या सर्वांना पिळून(सॉरी, पुरून) उरलेत. महाराष्ट्राचा अल पचिनो असे त्यांना म्हणतात खरे पण जॉनी डेप ला अमेरिकेचा सचिन पीळगावकर म्हणतात हे कुणी नाही सांगत.(ये बीक गयी है मिडिया, दुसरं काय?) विग घालून का होईना, पण तारूण्य काय टिकवलंय म्हाग्रुंनी! अभिनय, दिग्दर्शन, नृत्य यातलं म्हाग्रुंचं कर्तृत्व सगळ्यांना आतापर्यंत माहित झालंय(त्यांनीच कान किटेपर्यंत ऐकवलंय ते.) पण 'तू माझी पाठ खाजव, मी तुझी खाजवतो' ही सहकारी संस्था महेश मांजरेकरबरोबर सुरू करण्याचं श्रेय देखिल त्यांचंच. आता, त्यालाच 'चला हवा येऊ द्या' म्हणतात. स्वतःच्या पिक्चरमध्ये 'सुबल सरकार' यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली नाचायचे, पण कुठलाशी हिंदी नृत्यस्पर्धा जिंकली काय आणि क्षणात नृत्याचे महागुरू झाले(म्हाग्रुला काय कठीण हो?). आता, तर ते इतक्या गोष्टींचे म्हाग्रु आहेत की त्यांना महाविद्यापिठच म्हणने योग्य ठरेल. मराठीतले अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले सगळेच नवे लोक त्यांच्याकडे शिकलेत. उदा. स्वप्निल जोशी नावाचा उकडलेला बटाटा, त्यांच्याच कुकरमधला(सॉरी तालमीमधला). म्हाग्रुंकडे पाहिले की क्षणात ठसते ते त्यांचे आत्मसंतुष्ट स्मित(महाराष्ट्राचा नार्सिसस जणू.) स्वतःवर इतका खुष असणारा दुसरा मराठी माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही. पंचावन्न वर्षे झाले मराठी चित्रपटसृष्टीत डेरा टाकून बसलेले आहेत पण तरी सुद्धा त्यांचं म्हणावं असं चीज झालं नाही. एक चिंचपोकळीचा 'बोर'कर पुरस्कार सोडला तर फार सन्मान त्यांच्या वाट्याला नाही आले. रशियाचा प्रतिष्ठीत 'चावलास्की' पुरस्कार मिळाला आणि तो त्या पुरस्काराचाच सन्मान झाला अशी रशियनांची भावना झाली. पण म्हाग्रुंचा विनय की त्यांनी याचा कधी गाजावाजा केला नाही. आता मात्र, आमची विनंती मान्य करून त्यांनी त्यांचं मौन सोडायचं ठरवलंय. 'पिळून दाखवलं!' या त्यांच्या दुसऱ्या आत्मचरित्रातून ते आपल्यासमोर येणार आहेत. आमचंच प्रकाशन आहे. त्यासाठी त्यांच्या डायरीची काही पाने मागितली, पण त्यात फक्त 'जय मी' हा एकच मंत्र १००८ वेळा लिहिलेला आढळला. त्यांच्या 'मी'लाखतींचं (हो 'मी'लाखतच, मुलाखत असते ती सामान्यांची..) शब्दांकन करून प्रस्तुत 'मी'चरित्र संपन्न केले आहे. त्याचाच थोडा वानवळा खाली देत आहे.. १. अवघा साडेचार वर्षाचा होतो तेव्हा मी. राजाभाऊ परांजपे नव्या चित्रपटाची जुळणी करत होते. त्यांच्या कानी माझी किर्ती गेलेली. 'हा माझा मार्ग एकला' हा चित्रपट मग त्यांनी माझ्यासाठी काढला. त्यातला एक डायलॉग राजाभाऊंच्याने काही जमेना. राजाभाऊंना महाराष्ट्राचा पॉल म्युनी म्हणायचे पण मी पण महाराष्ट्राचा जॅक निकोल्सन+ अल पचिनो+ रॉबर्ट डि निरो थ्री इन वन होतो. शिवाय मागच्या चार जन्मापासून मी अभिनेता. माझा या क्षेत्रातला अनुभव असा दांडगा. राजाभाऊंनी पृच्छा केली, 'बाबा रे, हा एवढा डायलॉग कसा म्हणायचा ते सांग'. मी पण काय आढेवेढे नाय घेतले, शिकवलं त्यांना. असा तो चित्रपट पूर्ण झाला. शेवटी मला काय, सग्गळं सग्गळं येतं.... - (म्हागृचे पाय.. या प्रकरणातून) २. सन १९८९.. अशी ही बनवाबनवी ह्या अभिनव, कुणी कधीही ऐकलेल्या, न पाहिलेल्या अश्या संकल्पनेवर आधारीत चित्रपटाला माझ्यामुळे अफाट यश मिळालेले, सक्सेस पार्ट्यांत मी व्यग्र. अशात स्पिलबर्गांच्या स्टिव्हनचा(हॉलिवूडचा महेश मांजरेकर) फोन आला. म्हणाला, अरे आपल्या रॉबिन विल्यम्सला तुझ्याशी बोलायचेय. म्हटले, ठीकाय. रॉबिन आपला टेन्शनमध्ये, म्हंटला 'अहो, म्हाग्रु, नविन पिक्चर करतोय, मिसेस डाऊटफायर, त्यात अहो, बाईचा रोल करायचाय'. मी म्हटलं बरं मग? तर म्हणतो कसा, 'अहो, मला काही बेअरींग जमेना, तुम्ही तो सुधाचा रोल कसा केलात तो मला शिकवा ब्वा..' आता, सुधाच्या रोलसाठी मी काय अभ्यास केला होता! शेकडो बायका न्याहाळल्या(कितीदातरी थोबाड फुटलं, ते एक असो..) माझ्या प्रदीर्घ अभ्यासाने, तो रोल मला करता आलेला. आता, याला शिकवायचं म्हणजे, वेळ जाणार, पण सुप्रिया म्हटली, जा की एवढा म्हणतोय तर.. आता बायकोपुढं म्हाग्रुचं तरी काय चालणार.. मग काय गेलो हॉलिवूडला आणि शिकवलं रॉबिनला सगळं.. मग तिथं आपला जिम कॅरी आला, त्याला पण थोडं टायमिंगचे धडे दिले.. आता, बिचारा रॉबिन नाही, पण दोन वर्षांपुर्वीपर्यंत महागुरूपौर्णिमेला(म्हणजे माझ्या वाढदिवसाला) त्याचा फोन यायचा. मी काय अश्या गोष्टी बोलून नाय दाखवत.. पण मला कसंय सग्गळं सग्गळं येतं.... - ('म्हागृ हॉलिवूडमध्ये' या प्रकरणातून)
प्रेर्णा
'माझा' कट्टा...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नृत्य
नाट्य
संगीत
मौजमजा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
माध्यमवेध
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35507 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

हाहाहाहा!

एस
Wed, 08/30/2017 - 13:44 नवीन
हाहाहाहा!
  • Log in or register to post comments

तु नळी दुवा

कुंदन
Fri, 09/01/2017 - 10:03 नवीन
तु नळी दुवा साठी लै लै धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लौल.

आदूबाळ
Wed, 08/30/2017 - 14:10 नवीन
लौल. आणखी एक पानः
खूप वाईट परिस्थिती होती हो, खूपच वाईट. रावल्या हुंदके देत होता, लक्ष्या तर धाय मोकलून रडत होता. अपयश समोर उभं होतं. त्यांना म्हटलं, अरे बाळांनो असा धीर सोडू नका. काबिल बनो, कामयाबी तो साली झक मार के पीछे भागेगी. (कोणीतरी लिहून घेतलं वाटतं हे. नंतर एका सिनेमात हा डायलॉग म्हणून आला म्हणे. पण त्यात सगळे माझे ज्युनियर असल्याने मी तो पाहिला नाही.) लक्ष्या आणि रावल्या म्हणाले, म्हाग्रू मला वाचवा. (हेही कोणीतरी म्हणालं होतं. नक्कीच कोणीतरी ज्युनियर असणार.) मी त्यांना म्हणालो, रावल्या तुझं बिहेव चुकतंय. आय हॅव नथिंग टु ऑफर यू बट ब्लड, टॉईल, टियर्स अ‍ॅण्ड स्वेट. वी विल फाईट ऑन बीचेस. (हेही कोणी ज्युनियर... पण आता तुम्हाला माहीत आहेच.) मग असा धीर दिल्यावर लक्ष्या आणि रावल्या गेले बाहेर आणि चिकटून बसले दिवसभर. मी बाहेरूनच त्यांना मार्गदर्शन करत होतो. जिथे गॅप असेल त्या बाऊंड्रीबाहेर जायचो, आणि ते तिथे मारायचे शॉट. (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) दिवसभर असा गोल गोल इकडेतिकडे पळत राहिलो, आणि लक्ष्या आणि रावल्या तिथे तिथे मारत राहिले. मध्येच मला घाईची लागली म्हणून ड्रेसिंग रूममध्ये जावं लागलं. लक्ष्याचा गैरसमज झाला की आता गॅप तिथे आहे, म्हणून त्याने चक्क सिक्सर मारली की हो! - "ईडन गार्डन्समध्ये म्हाग्रू" या प्रकरणातून साभार.
  • Log in or register to post comments

हाहाहाहा...

पुंबा
Wed, 08/30/2017 - 15:20 नवीन
हाहाहाहा...
(त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.)
ROFL....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बेक्कार

संग्राम
Wed, 08/30/2017 - 16:38 नवीन
आधी लक्ष्या म्हणजे बेर्डेंचा वाटला ...मग म्हटलं रावल्या कोण .... :-) (त्यांना दिसावं म्हणून विग काढून ठेवला होता. डोकं तापलं, पण काय करता. एकदा म्हागॄपदी पोचलं की थोडं सहन करावं लागतंच.) अगागागा .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

हहपुवा!!!

mayu4u
Wed, 08/30/2017 - 17:02 नवीन
बेक्कार हसतोय राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भारीच

सूड
Wed, 08/30/2017 - 14:22 नवीन
भारीच
  • Log in or register to post comments

हे लै भारीय

राजाभाउ
Wed, 08/30/2017 - 14:38 नवीन
हे लै भारीय
  • Log in or register to post comments

हे लै भारीय. हाहापुवा

राजाभाउ
Wed, 08/30/2017 - 14:38 नवीन
हे लै भारीय. हाहापुवा
  • Log in or register to post comments

जबरदस्त! मझा आला.

श्रीगुरुजी
Wed, 08/30/2017 - 14:42 नवीन
जबरदस्त! मझा आला.
  • Log in or register to post comments

मझा नही महामझा!! (हेही एका

रुपी
गुरुवार, 08/31/2017 - 01:32 नवीन
मझा नही महामझा!! (हेही एका ज्युनियरने अ‍ॅडसाठी ढापलेलं..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हाहाहाहा!

बाजीप्रभू
Wed, 08/30/2017 - 14:54 नवीन
हाहाहाहा!
  • Log in or register to post comments

एस, आबा, श्रीगुरुजी, सूड,

पुंबा
Wed, 08/30/2017 - 15:18 नवीन
एस, आबा, श्रीगुरुजी, सूड, राजाभाऊ, बाजीप्रभु, धन्यवाद..
  • Log in or register to post comments

लॉल =))

एमी
Wed, 08/30/2017 - 15:26 नवीन
लॉल =))
  • Log in or register to post comments

ह्यो

इरसाल
Wed, 08/30/2017 - 15:44 नवीन
म्हागृंचा अपमान हे. तेंच्या आतम्चरित्रातुन घेतलेल्या तुकड्यांच सुद्ध्हा एक पुस्तक(ग्रंथ ~ जाडजुड बाड)) व्हईल. तुम्ही लैच लवकर आवरलत. ते रमेश सिप्पी, अमिताभ बच्चन, ए.के. हंगल, धर्मेण्द्र, वगैरेंवर्च्या उपकारांना का फाटा दिलात ????? ##सही## "मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
  • Log in or register to post comments

हो ना, महागृंवर कितीही लिहिलं

पुंबा
Wed, 08/30/2017 - 19:13 नवीन
हो ना, महागृंवर कितीही लिहिलं तरी कमीच..अमजद खान तर टिकला तोच म्हागृंमुळे हो.. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

च्यायला लैच बेक्कार हो सौराजी

जेम्स वांड
Wed, 08/30/2017 - 15:47 नवीन
ये बीक चुकी है मीडिया वाचून, एकदम पाकिस्तानातल्या सुप्रसिद्ध अश्या 'गोरमिंट आंटी' ची आठवण आली अन तिचे (कदाचित एआयबीनेच) बनवलेले हे शे ग्वेरा स्टाईल पोस्टर पण Image removed.
  • Log in or register to post comments

आरारारा!

चांदणे संदीप
Wed, 08/30/2017 - 15:51 नवीन
जब्रा!! Sandy
  • Log in or register to post comments

अगागागागागा!!

प्रीत-मोहर
Wed, 08/30/2017 - 16:52 नवीन
अगागागागागा!! फेबुवर अनेक मित्रांनी बाजार उठवलेला त्यांच्याइतकच हेही आवडलं. पण फार लवकर आवरतात का पीळ गावकर?
  • Log in or register to post comments

अरारारारारा!

mayu4u
Wed, 08/30/2017 - 17:00 नवीन
पार बाजार उठिवला की तुम्ही!
  • Log in or register to post comments

मीनाकुमारीने उर्दू शिकवलं

कंजूस
Wed, 08/30/2017 - 17:10 नवीन
मीनाकुमारीने उर्दू शिकवलं त्यांना. पण ते इतर कलाकारांचीही स्तुती करतात याकडे दुर्लक्ष करू नका.
  • Log in or register to post comments

लई भारी!!!!

दुर्गविहारी
Wed, 08/30/2017 - 17:25 नवीन
लई भारी!!!! म्हाग्रुंचे कैसे बोलणे । म्हाग्रुंचे कैसे चालणे । म्हाग्रुंचे कैसे नाचणे । अवघा हलकल्लोळ करावा। म्हाग्रु मस्तकी धरावा। महाराष्ट्र कारणे।
  • Log in or register to post comments

Hahaha..

पुंबा
Wed, 08/30/2017 - 19:21 नवीन
Hahaha..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुर्गविहारी

=)). =)) =))

सस्नेह
Wed, 08/30/2017 - 17:29 नवीन
=)). =)) =)) बेक्कार पंचनामा !
  • Log in or register to post comments

ही ही ही.

रेवती
Wed, 08/30/2017 - 17:49 नवीन
ही ही ही.
  • Log in or register to post comments

सुपर्ब!

स्वधर्म
Wed, 08/30/2017 - 18:19 नवीन
सचिनरावांचं सगळंच न्यारं अाहे भाऊ. अभिनय तर काय विचारता? कुठल्यातरी सिनेमात ते अांधळ्य़ाची भूमिका करत होते. सगळे अंध लोक चाचपडतात, पण म्हाग्रु मात्र इतके ‘जास्त’ चाचपडत होते, की याला म्हणतात मनापासून जोरकस अभिनय. कोण अाहे रे तो? अोव्हर अॅक्टींग म्हणून अोरडणारा?
  • Log in or register to post comments

हाहाहा.. हो.. आणि चित्रपट पण

पुंबा
Wed, 08/30/2017 - 19:20 नवीन
हाहाहा.. हो.. आणि चित्रपट पण कोणता? एका पेक्षा एक.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

उकडलेला बटाटासाठी आधी शाबासकी

पिलीयन रायडर
Wed, 08/30/2017 - 18:47 नवीन
उकडलेला बटाटासाठी आधी शाबासकी! बटाट्या जोशी कुठला.. बाकी लेख भारीच!
  • Log in or register to post comments

अगदी अगदी..

रुपी
गुरुवार, 08/31/2017 - 01:29 नवीन
अगदी अगदी.. मागच्याच आठवड्यात नवरा मला म्हणत होता की माझा स्वप्नील जोशीवर उगाच्च खूप राग आहे.. त्याला दाखवते आता हे =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

एक तो तेंडुलकरांचा सचिन

बोका-ए-आझम
Wed, 08/30/2017 - 19:07 नवीन
आणि एक हा पिळगावकरांचा सचिन! (शराबी मध्ये महागुरुंचा ज्युनिअर अमिताभ म्हणून एक सामान्य नट आहे त्याने असाच एक डायलाॅग टाकलेला आहे.)
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकांचे आभार..

पुंबा
Wed, 08/30/2017 - 19:19 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार.. मी पहिल्यांदाच असं काही लिहिलंय ते पण ह्या माणसाचा मनापासून संताप आला म्हणून. एका गुणी माणसाचं हे असं अधःपतन झालेलं नाही बघवत.
  • Log in or register to post comments

साडीतले पात्र कर तुला छान

कंजूस
Wed, 08/30/2017 - 20:50 नवीन
साडीतले पात्र कर तुला छान दिसते आणि मला गल्ला मिळेल हे निर्माते सर्व नटानांच सांगतात का?
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Wed, 08/30/2017 - 20:51 नवीन
बेक्कार! आदूबाळाचे पुरवणी पानसुद्धा महाळॉळ!
  • Log in or register to post comments

लै हस्लो

गामा पैलवान
गुरुवार, 08/31/2017 - 03:13 नवीन
ज्याऽम्हसलो !! फकस्त शीर्षकात ते म्हैमा पायजेलोतं. -गा.पै.
  • Log in or register to post comments

बाजार

स्वाती दिनेश
गुरुवार, 08/31/2017 - 12:40 नवीन
पार बाजार उठवून टेंपोत बसवला की.. ह ह पु वा.. स्वाती
  • Log in or register to post comments

या लेखासाठी साठी आमच्या कडुन तुम्हाला दोन रुपये बक्षीस....

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 08/31/2017 - 13:05 नवीन
आमच्या महाग्रुं बद्दल बोलियाचे काम नाई, त्ये हिंदी मधले ग्रांड मास्टर मिथुनदा आणि मराठीतले महाग्रू सचिनदा दोघेबी लैभारी आहेत. आम्ही आधीच त्यांचे लै मोठे फॅन होतो पण एका पेक्षा एक चे चक्रीवादळ आल्या नंतर या महासुर्याच्या तेजाने आम्ही आंधळे मुके बहिरे आणि बधिर झालो. एका पेक्षा एक मधे जेव्हा ते ढॅन्सरला दोन रुपयांची नोट द्यायला ष्टेजवर जातानाची त्यांची समोरचा माइक बाजुला करुन थाटात चालत जायची इष्टाइल पण कोणीतरी नंतर ढापली म्हणे. रच्याकने :- त्या कार्यक्रमातले त्यांचे मानसपुत्र आणि कन्या आता काय करतात म्हणे? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

ते अजुनही कुठल्याही

राजाभाउ
Mon, 09/04/2017 - 14:08 नवीन
ते अजुनही कुठल्याही कार्यक्रमात ढॅन्स आवडला कि नोट घेउन ष्टेजवर जातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आरारारा..

संजय पाटिल
गुरुवार, 08/31/2017 - 13:23 नवीन
महालोल.. लोळलो....
  • Log in or register to post comments

प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद...

पुंबा
Fri, 09/01/2017 - 08:52 नवीन
अॅमी, इरसाल,जेम्स वांड, चांदणे संदीप, mayu4u, कंजूस, दुर्गविहारी, स्नेहांकिता, रेवती, स्वधर्म, पिलीयन रायडर, रुपी, बोका-ए-आझम, पैसा, गामा पैलवान, स्वाती दिनेश, ज्ञानोबाचे पैजार, संजय पाटिल
  • Log in or register to post comments

हायला

सुबोध खरे
Fri, 09/01/2017 - 09:28 नवीन
हायला लै म्हणजे लै म्हणजे लैच झकास सकाळी सकाळी हसून पुरेवाट झाली.
  • Log in or register to post comments

सिक्सर एकदम खास

गामा पैलवान
Fri, 09/01/2017 - 13:30 नवीन
आदूबाळ, तुमची सिक्सर खास आहे हां! :-) तुम्ही वेगवेगळी क्षेत्रे फिरा पाहू म्हाग्रूंसोबत. आणि आमच्यासाठी साद्यंत वृत्त प्रसृत करंत चला. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

लोल. "दाऊद फणसेसोबत म्हाग्रू"

आदूबाळ
Fri, 09/01/2017 - 13:43 नवीन
लोल. "दाऊद फणसेसोबत म्हाग्रू" आणि "म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची गोरमिंट" असे आणखी दोन सुचले होते. मूड लागला की लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

"म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची

पुंबा
Fri, 09/01/2017 - 14:29 नवीन
"म्हाग्रू आणि ट्रम्पतात्यांची गोरमिंट"
आबा, हे तर लिहाच लिहा!!! :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

लिहाच आबा हे.

स्वधर्म
Fri, 09/01/2017 - 15:10 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

भारीच.. मजा आली वाचताना.

अमितदादा
Fri, 09/01/2017 - 17:59 नवीन
भारीच.. मजा आली वाचताना.
  • Log in or register to post comments

कडक!!! =)))))

जव्हेरगंज
Sat, 09/02/2017 - 13:16 नवीन
कडक!!! =)))))
  • Log in or register to post comments

आयला लयच जबरदस्त लिहिलंय राव.

चिनार
Sat, 09/02/2017 - 16:41 नवीन
आयला लयच जबरदस्त लिहिलंय राव.. ह्हपुवा ...
  • Log in or register to post comments

अशी ही बनवाबनवी

हुप्प्या
Sun, 09/03/2017 - 21:37 नवीन
अशी ही बनवाबनवी ह्या सिनेमाच्या अफाट यशाबद्दल बोलताना महागुरु म्हणतात "हे मी नाही केलं!...." आता लक्ष्मीकांत बेर्डे वा अशोक सराफ वा सुधीर जोशी ह्यांच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळतील असे वाटले पण नाही. "हे माझ्या हातून घडलं!" ह्या वाक्याने ह्या अफाट यशाचे श्रेय घेण्याचा "विनय" महागुरुंनी दाखवला. धन्य झालो!
  • Log in or register to post comments

इतक्यातच झालेली एबीपी माझा वरची मुलाखत का?

स्वधर्म
Tue, 09/05/2017 - 12:34 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

लोल

चांदणे संदीप
Tue, 09/05/2017 - 12:49 नवीन
लोलच! =)) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा