Skip to main content

निघाला शिकारीला कालीयानाग

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 20/08/2017 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
घालून विळखा दोन्ही धृवांना दाबून शेपटीत हिमालयाला दहाफणांनी ओकीत विषारी आग निघालाआहे शिकारीला कालीयानाग. अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे. कारण दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच निघाला आहे शिकारीला कालीयानाग.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2462
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मस्त कविता ! आवडली.
अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.
शेवटी मानवाला परमेश्वराचाच आधार आहे. त्यानेच तर अशा कालीयाचा वध केला.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय राव तुम्ही ? जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदीच दिसतात काय तुम्हाला :) कायतरी रसग्रहण करा कि कवितेचे ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कालियानाग इंद्रिय सुखासाठी लोलुप माणसाचे प्रतीक आहे। आजचे प्रदूषित वातावरण माणसाच्या करणीचा परिणाम आहे। आता मानवावर त्याच्या कर्माचे फळ भोगण्याची पाळी आली आहे। बाकी यत्र तत्र सर्वत्र कुणाला मोदीजी दिसत असतील तर काय करणार। लवकर उपाय शोधा

In reply to by विवेकपटाईत

ते मोदींबद्दल बिरुटे ह्यांनी विचारले होते, ते सांगतील काय ते, माझा एक प्रश्न, तुम्ही सेवानिवृत्त वगैरे आहात का?

> घालून विळखा दोन्ही धृवांना दाबून शेपटीत हिमालयाला दहाफणांनी ओकीत विषारी आग हा एवढ्या प्रचंड नागाला जायचंय तरी कुठे ? उगाच हिमालयाला विळखा वगैरे कशाला ?

कालिया नाग हा प्रदूषणचा प्रतिक आहे. बाकी या कवितेची प्रेरणा सुभाष एस नाईक यांची आंग्ल कविता : Without Hindrance No passport needed Nor visa Nor Security Check Nor Customs formalities Travels anywhere without hindrance Unwanted by all countries And yet, None can stop this, This – Pollution

In reply to by विवेकपटाईत

ऑ!! अहो ही कविता तर प्रदूषणावर आहे न... तुम्ही तर थेट इंद्रियसुख अन काय काय मध्ये शिरलात की हो काका, कॉन्टेक्सट हुकला असं वाटतंय.

In reply to by जेम्स वांड

दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे

In reply to by जेम्स वांड

दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे