घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला
दहाफणांनी ओकीत विषारी आग
निघालाआहे शिकारीला
कालीयानाग.
अदृश्य या दैत्य पुढे, व्यर्थ आहे
मानवी अस्त्र, शस्त्र, क्षेपास्त्र सारे.
कारण
दशेंद्रीयांच्या रथावर स्वार होऊनच
निघाला आहे शिकारीला
कालीयानाग.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2498
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त कविता !
मस्त कविता ! आवडली.
शेवटी मानवाला परमेश्वराचाच आधार आहे. त्यानेच तर अशा कालीयाचा वध केला.
मोदींवर आहे का ही कविता ?
काय समजू नै राह्यला राव कवितेचा अर्थ. :(
-दिलीप बिरुटे
मोदींवर आहे का ही कविता ?
In reply to मोदींवर आहे का ही कविता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय राव तुम्ही ?
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मोदीच दिसतात काय तुम्हाला :)
कायतरी रसग्रहण करा कि कवितेचे ?
अहो
In reply to मोदींवर आहे का ही कविता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालियानाग इंद्रिय सुखासाठी
In reply to मोदींवर आहे का ही कविता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालियानाग इंद्रिय सुखासाठी लोलुप माणसाचे प्रतीक आहे। आजचे प्रदूषित वातावरण माणसाच्या करणीचा परिणाम आहे। आता मानवावर त्याच्या कर्माचे फळ भोगण्याची पाळी आली आहे। बाकी यत्र तत्र सर्वत्र कुणाला मोदीजी दिसत असतील तर काय करणार। लवकर उपाय शोधा
ते मोदींबद्दल बिरुटे ह्यांनी
In reply to कालियानाग इंद्रिय सुखासाठी by विवेकपटाईत
ते मोदींबद्दल बिरुटे ह्यांनी विचारले होते, ते सांगतील काय ते, माझा एक प्रश्न, तुम्ही सेवानिवृत्त वगैरे आहात का?
> घालून विळखा दोन्ही धृवांना
> घालून विळखा दोन्ही धृवांना
दाबून शेपटीत हिमालयाला
दहाफणांनी ओकीत विषारी आग
हा एवढ्या प्रचंड नागाला जायचंय तरी कुठे ? उगाच हिमालयाला विळखा वगैरे कशाला ?
हा ना राव, दोन ध्रुवांना
In reply to > घालून विळखा दोन्ही धृवांना by साहना
हा ना राव, दोन ध्रुवांना विळखा घालून, हिमालयाला दाबून बिबुन जायचेय कुठे?
नावावरुन अश्लील कविता असेल
नावावरुन अश्लील कविता असेल वाटलेलं. निराशा झाली.
कालिया नाग हा प्रदूषणचा
कालिया नाग हा प्रदूषणचा प्रतिक आहे. बाकी या कवितेची प्रेरणा सुभाष एस नाईक यांची आंग्ल कविता :
Without Hindrance
No passport needed
Nor visa
Nor Security Check
Nor Customs formalities
Travels anywhere without hindrance
Unwanted by all countries
And yet,
None can stop this,
This – Pollution
ऑ!! अहो ही कविता तर
In reply to कालिया नाग हा प्रदूषणचा by विवेकपटाईत
ऑ!! अहो ही कविता तर प्रदूषणावर आहे न... तुम्ही तर थेट इंद्रियसुख अन काय काय मध्ये शिरलात की हो काका, कॉन्टेक्सट हुकला असं वाटतंय.
दहा इंद्रियांचे सुख हे
In reply to ऑ!! अहो ही कविता तर by जेम्स वांड
दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे
दहा इंद्रियांचे सुख हे
In reply to ऑ!! अहो ही कविता तर by जेम्स वांड
दहा इंद्रियांचे सुख हे प्रदूषणाचे मूळ आहे। पुन्हा एकदा कविता वाचा । तुमच्या साठी विस्तृत लेख ही लिहिला आहे