✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सामाजिक उपक्रम २०१७ आढावा

अ
अरुंधती यांनी
Tue, 08/15/2017 - 18:00  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी! मिसळपाव साईटवर आवाहन जरी प्रथमच केले तरी आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ८वे वर्ष. या उपक्रमांतर्गत चांगले काम करणाऱ्या; गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे याची एक यादी करुन, त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोली.कॉम, मिसळपाव.कॉम तसेच फ़ेसबुकच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन केले. ( संदर्भ : http://www.misalpav.com/node/39108 ) याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी दे‌ऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले. त्यामुळे त्या संस्थेकडून देणगीची पावती घेणे, ती देणगीदारांस सुपूर्द करणे व ज्या कामासाठी किंवा वस्तूसाठी देणगी दिली आहे त्या कामाची / वस्तू खरेदीच्या प्रगतीची संस्थेकडून माहिती घेणे यासंदर्भात आम्ही थोडीफार मदत करू शकलो. ज्यांनी असा पसंतीक्रम कळवला नव्हता त्यांना देणगी देण्यासाठी आपण संस्था अशाप्रकारे निवडून दिल्या की जेणेकरुन प्रत्येक संस्थेला शक्यतो समप्रमाणात देणगी मिळणे शक्य व्हावे. असे करताना आपण त्या त्या संस्थेच्या गरजेची शक्यतो पूर्तता हो‌ईल याकडेही शक्य तेव्हढे लक्ष दिले आहे. सांगावयास आनंद वाटतो की या वर्षीदेखील उपक्रमाची माहिती वाचून मिसळपाव व मायबोलीचे सभासद नसलेल्या किंवा मिसळपाव व मायबोलीवर केवळ वाचनमात्र येणाऱ्या काहीजणांनीही मदतीचा हात पुढे केला. नियमीतपणे उपक्रमाचा भाग होणारे आपले देणगीदार, नवीन देणगीदार, मिपाकरांचे व मायबोलीकरांचे मित्र नातेवाईक, मिसळपावचे सभासद, युनायटेड किंगडम येथील लंडनस्थित काळे ट्रस्ट अशा सगळ्यांच्या हातभारामुळे हा उपक्रम पूर्णत्वास जाऊ शकला आहे. देणगीदारांकडून त्या त्या संस्थेत देणगी जमा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आवाहनात लिहील्याप्रमाणे त्या देणगीचा विनियोग देखील काही संस्थांनी केला आहे. काही संस्थांमधे विनियोगाचे काम अजून चालू आहे. त्या सगळ्याची माहिती खाली देत आहोत. आपण यंदा एकूण ३,७५,०७६ /- (रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार शहात्तर मात्र) इतकी देणगी जमा करु शकलो. संस्थांची नावे व त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी केलेली कामे / घेतलेल्या वस्तूंची यादी देत आहोत : १. सहारा अनाथालय: रु. ७०५७५/- (रुपये सत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर मात्र) इतकी रक्कम देणगी दाखल देण्यात आली आहे. देणगी रकमेतून अनाथालयातील मुलींसाठी १० बंक बेड्स करुन घेण्यात आले. २. अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला : संस्थेने त्यांना मिळालेल्या रु. ५५००१/- (रुपये पंचावन्न हजार एक मात्र) या देणगी रकमेमधून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी केली आहे आणि मेडीकल कँप आयोजीत करणार आहेत. ३. माऊली सेवा प्रतिष्ठान: संस्थेने त्यांना मिळालेल्या रु.५२५००/- (रुपये बावन्न हजार पाचशे मात्र) या देणगी रकमेमधून त्यांच्या ६०० बेड असलेल्या हॉस्टेलसाठी बांधकाम साहित्याची खरेदी केली आहे. ४. घरकुल परिवार : आपण त्यांना रु. ५५०००/- (रुपये पंचावन्न हजार मात्र) देणगी जमवून दिली. या देणगी मधून संस्थेला डायनिंग टेबल आणि खुर्च्या खरेदी करायच्या आहेत. संस्थेच्या आवरातील बांधकाम अजुन पूर्ण झाले नसल्याने अजून खरेदी केलेली नाही. खरेदी पूर्ण झाल्यावर माहिती प्रकाशित करु. ५. सुहित जीवन ट्रस्ट: आपण त्यांना रु. ६२,०००/- (रुपये बासष्ठ हजार मात्र) देणगी जमा करून दिली. त्याच्या विनियोगाबद्दल लवकरच माहिती प्रकाशित करु. ६. सावली सेवा ट्रस्ट: आपण त्यांना रु. ८०,०००/- (रुपये ऐंशी हजार मात्र) देणगी जमा करून दिली. या देणगी रकमेचा विनियोग त्यांनी गरजू मुलींची फी भरणे आणि शालेपयोगी साहित्य खरेदीसाठी केला आहे. सर्व संस्थांनी देणगीदारांना पावत्या दिल्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य खरेदीच्या पावत्या, साहित्याचे फोटोग्राफ्स आपल्यासाठी पाठविले आहेत. ते आपल्या वाचनासाठी लवकरच प्रकाशीत केले जातील. उपक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक : सुनिधी, अतरंगी, महेंद्र ढवाण, निशदे, अरुंधती कुलकर्णी, प्राची., वृंदा, कविन या सर्व उपक्रमामध्ये प्रत्येक पावलाला मायबोलीकरांनी आणि मिपाकरांनी खूपच मोलाचे सहकार्य केले. मिपा व मायबोली प्रशासनाने मिपा व मायबोलीचे माध्यम वापरण्याची परवानगी दिली यासाठी त्यांचे खास खास आभार. सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे व त्यानिमित्ताने अगोदर कधी न भेटलेल्या मिपा व मायबोलीकरांनी एकत्र ये‌ऊन काम करणे हा अनुभव नेहमीइतकाच यावर्षीही आम्हां सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी होता. काही उल्लेख नजरचुकीने राहिलेले असल्यास आपण लक्षात आणून द्यालच याची खात्री आहे. सस्नेह, सामाजिक उपक्रम २०१७ स्वयंसेवक टीम
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
3835 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

अप्रतीम :)

टवाळ कार्टा
Tue, 08/15/2017 - 21:43 नवीन
अप्रतीम :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

पैसा
Tue, 08/15/2017 - 21:54 नवीन
अतिशय उत्तम काम करता आहात!
  • Log in or register to post comments

वा!

एस
Tue, 08/15/2017 - 22:46 नवीन
तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

उपक्रमास शुभेच्छा

कवितानागेश
Wed, 08/16/2017 - 01:27 नवीन
अरुंधतीला मिपावर बघून आनंद झाला. :)
  • Log in or register to post comments

अत्यंत चांगले काम करत आहात!

पिलीयन रायडर
Wed, 08/16/2017 - 02:52 नवीन
अत्यंत चांगले काम करत आहात! जमेल ती सर्व मदत नक्कीच करेन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी!

अरुंधती
Wed, 08/16/2017 - 10:03 नवीन
हा स्नेह असाच लाभू देत. प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी! :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी

महेन्द्र ढवाण
Wed, 08/16/2017 - 13:19 नवीन
अरुंधतीला मिपावर बघून आनंद झाला. =+१११११
  • Log in or register to post comments

स्पृहणिय उपक्रम !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/16/2017 - 15:35 नवीन
स्पृहणिय उपक्रम !
  • Log in or register to post comments

खुप छान उपक्रम :)

खलबत्ता
गुरुवार, 08/17/2017 - 07:30 नवीन
खुप छान उपक्रम :)
  • Log in or register to post comments

प्रतिसादकांचे आभार!

अरुंधती
Fri, 08/18/2017 - 09:37 नवीन
प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा