✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञ

ह
हेमंतकुमार यांनी
Fri, 08/11/2017 - 12:04  ·  लेख
लेख
गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्‍या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे: १. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात. २. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS ३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात: • मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात. • फुफ्फुसरोग तज्ञ • बालरोगतज्ञ • स्त्री रोग व प्रसूती तज्ञ • त्वचा व गुप्तरोग तज्ञ • मनोविकार तज्ञ . Pathology ( laboratory medicine) • Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ • भूलतज्ञ ४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे : • जनरल सर्जन • हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics) • डोळ्यांचे विकार तज्ञ • कान, नाक व घसा तज्ञ • Plastic surgeon ५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या : • हृदयविकार तज्ञ • मेंदूविकार तज्ञ • कर्करोग तज्ञ • पोट व यकृत विकार तज्ञ • रक्तविकार तज्ञ • हॉरमोन विकार तज्ञ • मूत्रपिंड विकार तज्ञ • सांधे विकार तज्ञ (Rheumatologist) • संसर्गजन्य विकार तज्ञ • अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine) • Immunologist ६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा : • हृदय शस्रक्रिया तज्ञ • मेंदू शस्रक्रिया तज्ञ • पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ • बालक शस्रक्रिया तज्ञ • कर्करोग शस्रक्रिया तज्ञ • मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ • हात शस्रक्रिया तज्ञ MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे. तर, थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. अतिविशिष्ट तज्ञांची माहिती दिलेली नाही. लेख उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
47048 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

याखेरीज इतर पदव्या क्वॅक

गवि
Fri, 08/11/2017 - 12:53 नवीन
याखेरीज इतर पदव्या क्वॅक मानाव्यात का? काही जुन्या पदव्या धारण करणारे डॉक्टरही अद्याप प्रॅक्टिस करताना दिसतात. एफआरसीएस, एलसीपीएच, डीसीएच वगैरे अनेक. काहींच्या पदवीपुढे (Lon. ) म्हणजे बहुधा लंडन असंही लिहीलेलं असतं. माहितगार लोकांनी फसव्या पदव्यांविषयीही लिहावं.
  • Log in or register to post comments

गवि,

हेमंतकुमार
Fri, 08/11/2017 - 13:17 नवीन
गवि, 1. LCPS हा MBBS पूर्व अभ्यासक्रम होता. 2. MBBS नंतर 2 वर्षांचे diploma असतात. उदा DCH, DGO 3. MRCP, FRCS या UK च्या fellowships आहेत.
  • Log in or register to post comments

लोक MRSH किंवा ARSH लंडन

सुबोध खरे
Fri, 08/11/2017 - 13:45 नवीन
लोक MRSH किंवा ARSH लंडन लिहितात. हे म्हणजे मेम्बर ऑफ रॉयल सोसायटी ऑफ हेल्थ आणि असोसिएट मेम्बर( जर आपण होमियोपॅथ किंवा तासांपडवी असेल तर. हे सदस्यत्व (मेम्बरशिप) कोणत्याही व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरला पैसे भरून मिळू शकते. बरेच डॉक्टर एम बी बी एस नंतर हे सदस्यत्व घेऊन पाटीवर आणि आपल्या पत्रकावर आपली पदवी भारदस्त करण्यासाठी एम बी बी एस, एम आर एस एच ( लंडन) असे लिहितात. बाकी पदवी भारदस्त करण्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. उदा MBBS RPMC ( यात RPMC हे राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज पाटणा असे आहे.) BHMS CCH CGO यात CCH आणि CGO हे BHMS किंवा BAMS नंतर एक एक महिन्याचे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत CERTIFICATE IN CHILD HEALTH आणि CERTIFICATE IN GYNECOLOGY AND OBSTE TRICS किंवा DNB च्या पुढे MNAMS लिहितात( दोन्ही एकच आहे).
  • Log in or register to post comments

अस असतयं होय हे. धन्यवाद ह्या

अभिजीत अवलिया
Fri, 08/11/2017 - 14:13 नवीन
अस असतयं होय हे. धन्यवाद ह्या माहितीबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

RPMC हे राजेंद्र प्रसाद

गवि
Fri, 08/11/2017 - 14:36 नवीन
RPMC हे राजेंद्र प्रसाद मेडिकल कॉलेज पाटणा असे आहे.
हायला.. हद्दच आहे. बादवे. पूर्वी गावाकडे पदवीपुढे कंसात (BOM) म्हणजे मुंबई असं लिहूनही भारदस्तपणा आणला गेलेला पाहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

CGO-CERTIFICATE IN GYNECOLOGY

साधा मुलगा
Sat, 08/12/2017 - 14:43 नवीन
CGO-CERTIFICATE IN GYNECOLOGY AND OBSTE TRICS या लोकांना कायद्याने प्रसुती करण्याचा अधिकार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कायद्या चे माहीत नाही पण

हेमंतकुमार
Sat, 08/12/2017 - 15:12 नवीन
कायद्या चे माहीत नाही पण शेवटी हे लोक डॉ च्या तुलनेत दुय्यमच असतात. जर मूल अडले तर त्यांची भंबेरी उडते.वर रुग्णाला धोका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

चांगली माहिती

मनिमौ
Fri, 08/11/2017 - 14:57 नवीन
बर्याच गोष्टी माहित नवत्या
  • Log in or register to post comments

MD चे प्रकार..

IT hamal
Fri, 08/11/2017 - 15:48 नवीन
आजकाल आयुर्वेदाचा MD नाही हे लोकांना कळावे म्हणून ऍलोपॅथी डॉक्टर MBBS , MD असे लिहितात.. LCEH काय प्रकार आहे/होता? ...आम्ही शाळेत जातांना एका डॉक्टर च्या पाटीवर DHB पदवी लिहिलेली रोज बघायचो...आम्ही शाळकरी मुलांनी त्याचा फुलफॉर्म " डॉक्टर हा x x ला बसले " असा बनवला होता !!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद. प्रत्येक शब्दाचे

अत्रे
Fri, 08/11/2017 - 15:49 नवीन
धन्यवाद. प्रत्येक शब्दाचे इंग्रजी भाषांतर दिले तर बरे होईल.
  • Log in or register to post comments

LCEH = Licenciate Of College

हेमंतकुमार
Fri, 08/11/2017 - 16:20 नवीन
LCEH = Licenciate Of College of Electro Homeopathy. हा BHMS पूर्व डिप्लोमा होता. एका डॉक्टर च्या पाटीवर DHB पदवी लिहिलेली रोज बघायचो...आम्ही शाळकरी मुलांनी त्याचा फुलफॉर्म " डॉक्टर हा x x ला बसले " असा बनवला होता !!! >>> सही ! तसा आम्ही पी. एच. डी. चा बनवला होता : पा** हा** धु** !! (ओळखा)
  • Log in or register to post comments

LCEH म्हणजे Licentiate of C

सुबोध खरे
Sat, 08/12/2017 - 09:50 नवीन
LCEH म्हणजे Licentiate of C ourt of Examiners of Homeopathic and biochemic system of medicine GCEH म्हणजे Graduate of Court of Examiners of Homeopathic and biochemic system of medicine पूर्वी DHMS ,डिप्लोमा इन होमिओपॅथिक मेडिसिन DSAC डिप्लोमा इन शुद्ध आयुर्वेदिक कोर्स MFAM मास्टर इन फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन GFAM ग्रॅज्युएट इन फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन DHB डिप्लोमा इन होमिओपॅथिक बोर्ड होत्या अशा सर्व तर्हेच्या वेगवेगळ्या पदव्या पदविका बंद करून प्रमाणीकरण(STANDARDIZATION) करण्याच्या दृष्टीने सरकारने BAMS बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी BHMS बॅचलर इन होमीयोपॅथीक मेडिसिन अँड सर्जरी BUMS बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी अशा प्रमाणित पदव्या देणे सुरु केले जेणे करून पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग खुला झाला. पूर्वी या इतर पदविकांना पदव्युत्तर पदवी किंवा व्यवस्थापनातील पदवी उदा. हॉस्पिटल मॅनेजमेंट मधील एम बी ए सारखी पदवी घेणे शक्य होत नसे. आता सर्व पदव्याचे आणि अभ्यासक्रमांचे प्रमाणीकरण झाल्याने हे मार्ग खुले झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सुबोध, आभार.

हेमंतकुमार
Sat, 08/12/2017 - 12:07 नवीन
सुबोध, आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

@Atre:

हेमंतकुमार
Fri, 08/11/2017 - 16:29 नवीन
@Atre: • फुफ्फुसरोग तज्ञ Pulmonologist / chest physician • बालरोगतज्ञ Pediatrician • स्त्री रोग व प्रसूती तज्ञ Gynecologist & Obstetrician • त्वचा व गुप्तरोग तज्ञ Dermatologist & Venereologist • मनोविकार तज्ञ Psychiatrist • भूलतज्ञ Anesthesiologist हृदयविकार तज्ञ Cardiologist • मेंदूविकार तज्ञ Neuro .... • कर्करोग तज्ञ Onco..... • पोट व यकृत विकार तज्ञ :Gastroentero...... • रक्तविकार तज्ञ Hemato..... • हॉरमोन विकार तज्ञ Endocrino.... • मूत्रपिंड विकार तज्ञ Nephro..... हृदय शस्रक्रिया तज्ञ Cardiothoracic surgeon • मेंदू शस्रक्रिया तज्ञ Neuro.... • पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञGastroentero.... • बालक शस्रक्रिया तज्ञ Pediatric S.... • कर्करोग शस्रक्रिया तज्ञ Onco S.... • मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ Uro S... • हात शस्रक्रिया तज्ञ Hand S...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अत्रे
Sat, 08/12/2017 - 06:10 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

एका शाखेच्या पदवीधराने

कंजूस
Fri, 08/11/2017 - 21:56 नवीन
एका शाखेच्या पदवीधराने दुसय्राच्या कक्षेतील रुग्णास औषधोपचार केले तर चालतात का? शरीरशास्त्र प्रत्येकालाच शिकावे लागते.
  • Log in or register to post comments

कायद्याप्रमाणे "नाही"

सुबोध खरे
Fri, 08/11/2017 - 22:32 नवीन
कायद्याप्रमाणे "नाही"
  • Log in or register to post comments

आणि कायदा फक्त पुस्तकात च

हेमंतकुमार
Sat, 08/12/2017 - 11:02 नवीन
आणि कायदा फक्त पुस्तकात च राहत असल्याने देशात काय चालले आहे ते आपण पाहतोच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, सुबोध आणि कुमार१

कंजूस
Sat, 08/12/2017 - 13:12 नवीन
धन्यवाद, सुबोध आणि कुमार१
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती कुमार साहेब, डॉक

साधा मुलगा
Sat, 08/12/2017 - 14:40 नवीन
उत्तम माहिती कुमार साहेब, डॉक खरे यांचीही छान माहिती.
  • Log in or register to post comments

बीडीएस वाले ह्या डॉक्टरात

अभ्या..
Sat, 08/12/2017 - 16:57 नवीन
बीडीएस वाले ह्या डॉक्टरात मोडत नसतात का? मेडीकल कॉलेजात ही फॅकल्टी नसते का? किंबहुना डेंटल कॉलेजेस सेपरेट का असतात?
  • Log in or register to post comments

वरील प्रश्न Dental Council.

हेमंतकुमार
Sat, 08/12/2017 - 18:03 नवीन
वरील प्रश्न Dental Council. ला विचारायला हवा !
  • Log in or register to post comments

वरील प्रश्न Dental Council.

हेमंतकुमार
Sat, 08/12/2017 - 18:03 नवीन
वरील प्रश्न Dental Council. ला विचारायला हवा !
  • Log in or register to post comments

या विषयात रस दाखवून चर्चेत

हेमंतकुमार
Sun, 08/13/2017 - 09:47 नवीन
या विषयात रस दाखवून चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

या धाग्याच्या निमित्ताने

हेमंतकुमार
Sun, 08/13/2017 - 17:36 नवीन
या धाग्याच्या निमित्ताने सर्वांना एक विनंती, की 'allopathy' हा कालबाह्य आणि अशास्त्रीय शब्द न वापरता त्याला ' Modern Medicine' च म्हणावे .
  • Log in or register to post comments

का?

दशानन
Sun, 08/13/2017 - 20:02 नवीन
का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

allopathy' साठी Modern

विवेकपटाईत
Mon, 08/09/2021 - 11:51 नवीन
allopathy' साठी Modern Medicine' शब्द वापरणे केंव्हाही उचित नाही. कारण या शब्दाचा अर्थ "आधुनिक मान्य तंत्राने विकसित औषधी". जगात अनेक चिकित्सा प्रणाली आहेत त्या हि Modern Medicine आहे. आज आयुर्वेदात हि आधुनिक मान्य तंत्राने औषधी बनविल्या जात आहे. करोना काळात हे स्पष्ट झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

The practice of medicine in

सुबोध खरे
Sun, 08/13/2017 - 20:52 नवीन
The practice of medicine in both Europe and North America during the early 19th century is sometimes referred to as heroic medicine because of the extreme measures (such as bloodletting) sometimes employed in an effort to treat diseases.[7] The term allopath was used by Hahnemann and other early homeopaths to highlight the difference they perceived between homeopathy and the medicine of that time. With the term allopathy (meaning "other than the disease"), Hahnemann intended to point out how physicians with conventional training employed therapeutic approaches that, in his view, merely treated symptoms and failed to address the disharmony produced by the underlying disease.[clarification needed] Homeopaths saw such symptomatic treatments as "opposites treating opposites" and believed these conventional methods were harmful to patients.
  • Log in or register to post comments

The term allopath was used by

अत्रे
Tue, 08/15/2017 - 08:30 नवीन
The term allopath was used by Hahnemann and other early homeopaths to highlight the difference they perceived between homeopathy and the medicine of that time.
हे माहिती नव्हते! मग ऍलोपॅथीला पर्यायी शब्द कोणता? एक शब्द असला तर उत्तम. (मॉडर्न मेडिसिन फार उथळ शब्द वाटतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सोपे नाव Medicine

हेमंतकुमार
Tue, 08/15/2017 - 10:43 नवीन
सोपे नाव Medicine अवघड नाव Evidence based Medicine
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

आधुनिक वैद्यकशास्त्र (modern

सुबोध खरे
Tue, 08/15/2017 - 12:30 नवीन
आधुनिक वैद्यकशास्त्र (modern medicine) हाच शब्द योग्य आहे. या वैद्यक शास्त्रातील बहुसंख्य गोष्टी गेल्या 100 वर्षातच उगम पावलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

Medicine चे एक नवे नाव ह. वि.

हेमंतकुमार
Tue, 08/15/2017 - 14:12 नवीन
Medicine चे एक नवे नाव ह. वि. सरदेसाई यांच्या लेखात वाचले होते पण आता आठवत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुबोध यांचा प्र. +११

हेमंतकुमार
Sun, 08/13/2017 - 21:08 नवीन
सुबोध यांचा प्र. +११ आता थोडे व्यवस्थित मांडतो: १ .मुळात ‘अलोपथी’ हे नाव अन्य शास्त्राच्या व्यक्तीने दिले. केवळ ‘होमीओ’ पासून फरक करण्यासाठी. २. कोशातील व्याख्येनुसार त्याचा अर्थ असा: रुग्णाच्या लक्षणाच्या विरुद्ध गुणधर्माची औषधे वापरून केलेले उपचार. ही व्याख्या आजच्या युगात फारच बाळबोध ठरेल कारण, ३.बऱ्याचदा हे औषध लक्षणाच्या विरुद्ध नसतेही. किबहुना ते रोगाच्या मूळ pathology वर क्रिया करते आणि त्यामुळे नंतर लक्षणे कमी होतात.
  • Log in or register to post comments

कुमार साहेब

सुबोध खरे
Sun, 08/13/2017 - 21:38 नवीन
कुमार साहेब होमियोपथ आम्हीच रोगाचा मुळापासून नायनाट करतो आणि *ऍलॉपॅथी* वाले रोग तिथल्या तिथे रोग दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात असा दुष्प्रचार वर्षानुवर्षे करीत आले आहेत.
  • Log in or register to post comments

बरोब्बर. 'सप्रेस ' करणे हा

हेमंतकुमार
Sun, 08/13/2017 - 22:04 नवीन
बरोब्बर. 'सप्रेस ' करणे हा त्यांचा लाडका शब्द आहे
  • Log in or register to post comments

चांगला धागा

पैसा
Sun, 08/13/2017 - 22:47 नवीन
माहितीपूर्ण धागा आहे.
  • Log in or register to post comments

माझे पण २ पैसे

डॉ श्रीहास
Tue, 08/15/2017 - 08:13 नवीन
A rheumatologist is an internist or pediatrician who received further training in the diagnosis (detection) and treatment of musculoskeletal disease and systemic autoimmune conditions commonly referred to as rheumatic diseases. Rheumatologist = ही सुपर स्पेशॅलिटी बरेचदा कन्फ्युझ करते , हे डॉक्टर्स फक्त सांधेविकार तज्ञ नाहीत तर autoimmune आजारांचे तज्ञ असतात , त्यामुळे सर्वसामान्य ह्यॅबद्दल बरेचदा अनभिज्ञ असतात (https://en.m.wikipedia.org/wiki/Rheumatology ) ही लिंक मुद्दामुन देत आहे कारण पेशंटना नेमकं rheumatologist का जायचं हेच माहिती नसतं .... मी बरेचदा पेशंट रेफर करण्याअगोदर हे समजावून सांगून पाठवतो , जेणेकरून पुढच्या डॉक्टरचं काम सोप होतं आणि पेशंटच्या मनात धाकधुक राहत नाही.
  • Log in or register to post comments

श्रीहास , सहमत. अलीकडे

हेमंतकुमार
Tue, 08/15/2017 - 09:13 नवीन
श्रीहास , सहमत. अलीकडे त्यांचे महत्व वाढले आहे.
  • Log in or register to post comments

इंटर्निस्ट म्हणजे फिजिशियन(एम

सुबोध खरे
Tue, 08/15/2017 - 09:27 नवीन
इंटर्निस्ट म्हणजे फिजिशियन(एम डी मेडिसिन). आपल्या बोली भाषेप्रमाणे. करण बरेच लोक इंटर्निस्ट म्हणजे इंटर्नशिप करणारा डॉक्टर समजतात. असाच एक किस्सा-- कमांड रुग्णालयात असताना सेरेमोनिअल परेड (विधिवत कवायत) यासाठी मी जवळच्या केश कर्तना लयात गेलो असताना आमचे दोन वरिष्ठ तेथे बसले होते. नाभिक कारागिराने आपण काय करता हे विचारले? आम्ही सर्व डॉक्टर आहोत हे त्याला माहित होते. मी म्हणालो रेडियोलॉजिस्ट आहे . म्हणजे काय? मी म्हणालो एक्स रे सोनोग्राफी करणारे डॉक्टर त्याने आमच्या अस्थीव्यांगोपचार तज्ञाला विचारले सर आपण काय करता तुपावर तो म्हणाला हाड मोडल्यावर उपचार करतो ऑपरेशन वगैरे. त्याने समजल्याची मान हलवली. शेवटी सर्वात वरिष्ठ अशा gastroenterologist ला विचारले. सर आपण काय करता? त्यांनी सांगितले पोटाच्या विकाराचे तज्ञ. म्हणजे तुम्ही ऑपरेशन करता का? सर म्हणाले नाही. तर तो म्हणाला मग तुम्ही काय करता? सर हताश चेहरा करून म्हणाले आता याला काय सांगणार? एवढा सुपर स्पेशालिस्ट झालो पण याला मी काय करतो ते काही सांगता येत नाही. मग मी त्या कारागिराला समजावले की सर ओपॅरॅशन न करता पोटात दुर्बीण टाकून बाहेर काही जखम न करता पोटातील आजाराचा उपचार करतात. हे ऐकून त्याला सर "बरंच काही करतात" असं वाटल्याचं दिसलं. सरांनी सुस्कारा सोडला आणि आम्ही हसू लागलो.
  • Log in or register to post comments

ओपॅरॅशन न करता पोटात दुर्बीण

अत्रे
Tue, 08/15/2017 - 09:46 नवीन
ओपॅरॅशन न करता पोटात दुर्बीण टाकून बाहेर काही जखम न करता पोटातील आजाराचा उपचार करतात
यालाच "पोटाचे ऑपरेशन" का नाही म्हणता येणार? की "ऑपरेशन" या शब्दात कापाकापी गृहीत धरलेली असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शब्दच्छल न करता कारागिराला

सुबोध खरे
Tue, 08/15/2017 - 09:50 नवीन
शब्दच्छल न करता कारागिराला समजेल अशा भाषेत अजून काय सांगायला हवं होतं?
  • Log in or register to post comments

मला वाटलं "पोटाचे ऑपरेशन करता

अत्रे
Tue, 08/15/2017 - 09:55 नवीन
मला वाटलं "पोटाचे ऑपरेशन करता का" याचे उत्तर "हो" असे देता आले असते. पण ऑपरेशन मध्ये कापाकापी गृहीत शहारली असेल तर मग त्यांनी डिटेलमध्ये सांगितले ते बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

समाजातील मधुमेहाचे झपाट्याने

हेमंतकुमार
Sun, 08/27/2017 - 10:33 नवीन
समाजातील मधुमेहाचे झपाट्याने वाढणारे प्रमाण पाहता आता त्या आजारासाठी वैद्यकाची स्वतंत्र शाखा करण्यावर विचार चालू आहे. त्यासंबंधीची बातमी : http://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=5 तेव्हा येत्या काही वर्षांत "एम. डी. (मधुमेह)" अशी पदवी वास्तवात येउ शकेल.
  • Log in or register to post comments

शक्य आहे

Rajesh188
Sun, 12/27/2020 - 22:20 नवीन
सर्व महत्वाच्या अवयव चे तज्ञ आहेतच. आता मधुमेह ‌तज्ञ,मलेरिया तज्ञ,सर्दी तज्ञ,फक्त डोकेदुखी तज्ञ आणि असेच प्रतेक आजाराचे तज्ञ निर्माण च होणार आहेत. मार्केटिंग साठी ते गरजेचे आहे. आताच आहार तज्ञ आहेतच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

जे diabetologist असतात

मराठी_माणूस
Mon, 12/28/2020 - 10:30 नवीन
जे diabetologist असतात त्यांची डीग्री काय असते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

म मा

हेमंतकुमार
Mon, 12/28/2020 - 10:59 नवीन
सध्या तरी एम डी (मेडिसिन) असे काही जण मधुमेहाचे विशेष प्रशिक्षण / पदविका प्राप्त करतात . काही विद्यापीठांत तशी सोय आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

भर ...

हेमंतकुमार
Mon, 12/28/2020 - 11:08 नवीन
तसेच D M (endocrino) या अतिविशेष डॉ चाही मधुमेहाचा अधिक अभ्यास असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

म मा

गुल्लू दादा
Mon, 08/09/2021 - 12:48 नवीन
डिप्लोमा सुद्धा आहे याचा 2 वर्षे कालावधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मुंबईत नुकत्याच झालेल्या

हेमंतकुमार
Sat, 09/02/2017 - 09:33 नवीन
मुंबईत नुकत्याच झालेल्या तुफान पावसाने जो हाहाकार उडवला त्यात ख्यातनाम पोटविकारतज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर, एम. डी. (मेडि). , डी. एम.( पोटविकार) यांचे निधन झाले. ते या विषयातील भारतातील नामांकित तज्ञ होते. 'यकृतविकार' यात तर ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ञ होते. या धाग्याच्या माध्यमातून त्यांना आदरांजली .
  • Log in or register to post comments

अजब !

हेमंतकुमार
Fri, 12/25/2020 - 16:16 नवीन
६४ वर्षीय जय प्रधान यांनी एमबीबीएस ला प्रवेश घेतला !! https://www-newindianexpress-com.cdn.ampproject.org/v/s/www.newindianexpress.com/states/odisha/2020/dec/25/vimsar-getsa-64-year-oldmbbsstudent-2240979.amp?amp_js_v=a6&amp_gsa=1&usqp=mq331AQFKAGwASA%3D#csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&amp_tf=From%20%251%24s&ampshare=https%3A%2F%2Fwww.newindianexpress.com%2Fstates%2Fodisha%2F2020%2Fdec%2F25%2Fvimsar-getsa-64-year-oldmbbsstudent-2240979.html
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा