Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by हेमंतकुमार on Fri, 08/11/2017 - 12:04
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य
गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्‍या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे: १. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात. २. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS ३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात: • मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात. • फुफ्फुसरोग तज्ञ • बालरोगतज्ञ • स्त्री रोग व प्रसूती तज्ञ • त्वचा व गुप्तरोग तज्ञ • मनोविकार तज्ञ . Pathology ( laboratory medicine) • Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ • भूलतज्ञ ४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे : • जनरल सर्जन • हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics) • डोळ्यांचे विकार तज्ञ • कान, नाक व घसा तज्ञ • Plastic surgeon ५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या : • हृदयविकार तज्ञ • मेंदूविकार तज्ञ • कर्करोग तज्ञ • पोट व यकृत विकार तज्ञ • रक्तविकार तज्ञ • हॉरमोन विकार तज्ञ • मूत्रपिंड विकार तज्ञ • सांधे विकार तज्ञ (Rheumatologist) • संसर्गजन्य विकार तज्ञ • अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine) • Immunologist ६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा : • हृदय शस्रक्रिया तज्ञ • मेंदू शस्रक्रिया तज्ञ • पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ • बालक शस्रक्रिया तज्ञ • कर्करोग शस्रक्रिया तज्ञ • मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ • हात शस्रक्रिया तज्ञ MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे. तर, थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. अतिविशिष्ट तज्ञांची माहिती दिलेली नाही. लेख उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.
  • Log in or register to post comments
  • 47052 views

प्रतिक्रिया

Submitted by हणमंतअण्णा शंक… on Sun, 05/08/2022 - 13:38

In reply to अजब ! by हेमंतकुमार

Permalink

प्रेरणा

व्वा! म्हणजे माझे राहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता तरी आहे. मी डॉक्टर होणारच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Mon, 12/28/2020 - 09:30

Permalink

डेंटिस्ट्री म्हणजे फक्त दात

डेंटिस्ट्री म्हणजे फक्त दात काढणे आणि कवळी बसवणे इतकच मर्यादित नाही. त्यातही अनेक specialities आहेत. Forensic dentistry, दात सरळ करणे, योग्य त-हेने श्वसन करण्यासाठी जबड्याची योग्य वाढ करण्यात मदत करणे, त्यासाठीची appliances, दातांच्या मुळांची, हिरड्यांची ट्रीटमेंट, sports dentistry, smile designing , community dentistryअशा अनेक शाखा आहेत. त्याचे basics हे BDS मधे तर त्यापुढे तीन वर्षांचे MDS हे उच्चशिक्षण असते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Mon, 12/28/2020 - 09:31

In reply to डेंटिस्ट्री म्हणजे फक्त दात by प्राची अश्विनी

Permalink

सॉरी, चुकून इथे आला प्रतिसाद,

सॉरी, चुकून इथे आला प्रतिसाद, अभ्या यांना द्यायचा होता.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 08/09/2021 - 11:08

Permalink

भारीच ..

एमबीबीएस अभ्यासक्रम साडेपाच वर्षांचा असतो. लखनऊ येथील एका विद्यापीठात ८ पासून २७ वर्षे झाली तरीसुद्धा एम बी बी एस उत्तीर्ण होऊ न शकलेले काही मोजके विद्यार्थी राहिले आहेत. जे असे 27 वर्ष अजून उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत, त्यांची स्वतःची अपत्ये मात्र डॉक्टर झालेली आहेत !! आता या ‘वयस्कर’ विद्यार्थ्यांना अजून दोनदा परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Mon, 08/09/2021 - 13:25

Permalink

पाटी

भारतात विवाद्यकीय क्षेत्रात "मधुमेहावर काम करणारे "डायबेटॉलॉजिस्ट " अशी पाटी लावतात ! कितीपत योग्य आहे ते ? पाश्चिमात्य देशात हा शब्द ऐकलं नाही दंतवैद्य हे इम्प्लिटलॉजिस्ट " असे लिहितात! म्हणजे इम्प्लांट करणारे.. पण अशी काही पव्दिउत्तर शिक्षण हं का? याशिवाय होमॅओपथिक आणि आयुर्वेदिक ला डॉक्टर लिहण्याचे अधिकार कसे काय? आणि त्यापेक्षाही सरळ सरळ हे डॉक्टर ऍलोपॅथी ची औषधे कशी काय देतात? हे अवैध नाही का? त्यांनी फक्त होमेपती आणि आयुर्वेदाची औषधे द्यवीत जास्तीत जास्त !
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 08/09/2021 - 13:27

In reply to पाटी by चौकस२१२

Permalink

चौकस,

चौकस, कायद्याची अंमलबजावणी न होणे ही भारताची मोठी समस्या आहे. अधिक काय लिहिणे ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 08/21/2021 - 09:42

Permalink

वय १७

वैद्यकीय अभ्याक्रमास प्रवेशासाठीचे किमान वय १७ हा नियम खूप जुना आहे. ( मूळ १८ वर्षे होता पण १०+२+३ आल्यापासून ते १७ वर आणले होते). तरीसुद्धा विद्यार्थी असे कोर्टात का जातात हे समजत नाही : https://medicaldialogues.in/news/education/neet-2021-mbbs-aspirant-pleads-for-age-relaxation-hc-rejects-plea-80954 अभियांत्रिकी ला १५ चालत असेल तरी वैद्यकीय नियमाची कारणे वेगळी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गुल्लू दादा on Sat, 08/21/2021 - 09:57

Permalink

नीट

नीट ug म्हणजे वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी परीक्षा 12 sept ला असून आपले मिपाकर हॅरी पॉटर ती देत आहेत आणि मी नीट pg म्हणजे पदव्युत्तर mbbs नंतर md/ms साठी लागणारी परीक्षा 11 sept ला देत आहे. आता तुम्ही म्हणाल की इथे काय करतोय मग अभ्यास कर ना ! तुमचंही खरंय म्हणा पण काय करावं चक्कर टाकावी वाटते मधात मधात तेवढाच मूड फ्रेश.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sat, 08/21/2021 - 10:10

In reply to नीट by गुल्लू दादा

Permalink

तुम्हा

दोघांनाही शुभेच्छा ! चांगले यश मिळो .
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 08/21/2021 - 10:55

In reply to नीट by गुल्लू दादा

Permalink

शेवटच्या ५ ओव्हर्स बाकी आहेत.

शेवटच्या ५ ओव्हर्स बाकी आहेत. जोर लावा आणि षटकार मारा तुम्हाला परीक्षेच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by गुल्लू दादा on Sat, 08/21/2021 - 13:05

In reply to शेवटच्या ५ ओव्हर्स बाकी आहेत. by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद

कुमार सर आणि सुबोध सर खूप धन्यवाद. आपल्या सारखी विद्वान मंडळी पाठीशी असली की सीमारेषा जवळ वाटू लागतात आणि षटकार ठोकणे आवाक्यात वाटू लागते. 10 jan ची परीक्षा नंतर 18 एप्रिल आणि आता ढकलत ढकलत 11 sept ला आलीये.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sat, 08/21/2021 - 20:29

In reply to धन्यवाद by गुल्लू दादा

Permalink

गल्लूभाऊ

नापास होण्यासाठी माझ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा :) कधी तूम्ही नापास होताय अन नैराश्यातून ओल्ड मंकची पार्टी आयोजित करताय असे झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गुल्लू दादा on Sat, 08/21/2021 - 21:17

In reply to गल्लूभाऊ by गॉडजिला

Permalink

हे हे

पार्टीला काय कारण लागत व्हय. कधी पण या गुमनाम बाबाची बॉटल हजर आहे तुमच्या सेवेत. ;) नापास म्हणजे काय असतं? Either u win or learn असं काहीतरी म्हणतात बाबा.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sat, 08/21/2021 - 23:28

In reply to हे हे by गुल्लू दादा

Permalink

_/\_

आपली परीक्षा उत्तम रित्या पार पडावी...
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 08/22/2021 - 03:54

Permalink

याचिका

अजून एक जनहित याचिका उच्च न्यायलयात ! "पदव्युत्तर 'neet' रद्द करावी . तसेच त्या जागा दुप्पट कराव्यात " https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/amp/news/education/why-neet-pg-when-someone-is-competent-enough-to-be-doctor-pil-at-bombay-hc-seeks-scraping-of-entrance-test-80700?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16295835738218&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fmedicaldialogues.in%2Fnews%2Feducation%2Fwhy-neet-pg-when-someone-is-competent-enough-to-be-doctor-pil-at-bombay-hc-seeks-scraping-of-entrance-test-80700
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 08/22/2021 - 05:38

Permalink

मॉडन मेडसिन - अवांतर

पूर्वी केशराचा उपयोग ताप उतरवण्यासाठी करत. पण केशर एवढे महाग की फक्त श्रीमंतांचाच ताप उतरवत असणार. केशरातले पिवळसर नारिंगी द्रव्य क्रोसिन हे त्यास कारणीभूत . तेच/ त्यासारखे द्रव्य केमिकली बनवले तर? तर ते स्वस्तात झाले. म्हणजे केमिकल कंपांउंड करून औषधासाठी वापरणे यास मॉडन मेडिसिन म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 08/22/2021 - 09:09

In reply to मॉडन मेडसिन - अवांतर by कंजूस

Permalink

+१

अगदी बरोबर. अजून एक उदा : Cinchona tree पासून Chloroquine हे मलेरिया चे औषध.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 08/22/2021 - 11:20

In reply to +१ by हेमंतकुमार

Permalink

हो.

पण काही वनस्पतीजन्य द्रव्य ( अल्कलॉईडस) इतके स्वस्त मिळू शकतात ते केमिकली बनवलेच पाहिजेत असे नसते. उदाहरणार्थ अडुळसा.
  • Log in or register to post comments

Submitted by Rajesh188 on Sun, 08/22/2021 - 09:31

Permalink

हे कधी पासून सुरू झाले

प्रतेक अवयव चे तज्ञ डॉक्टर कधी पासून तयार होवू लागले. जसे की किडनी तज्ञ यकृत तज्ञ . आणि त्याची गरज का पडली.
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Mon, 08/23/2021 - 09:35

In reply to हे कधी पासून सुरू झाले by Rajesh188

Permalink

आणि त्याची गरज का पडली.

आणि त्याची गरज का पडली.
ते ही सगळे प्राचिन ग्रंथात लिहले असता…
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 08/23/2021 - 10:26

In reply to हे कधी पासून सुरू झाले by Rajesh188

Permalink

@ Rajesh188

@ Rajesh188 प्रतेक अवयव चे तज्ञ डॉक्टर कधी पासून तयार होवू लागले. तुमचा मोबाईल बिघडला कि शेजारच्या इलेक्ट्रिशियन कडून दुरुस्त करून घेता का?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 08/22/2021 - 10:20

Permalink

राजेश,

भारतात सुमारे साठ वर्षांपूर्वी असे अभ्यासक्रम सुरू झाले. जसा मानवी शरीराचा अभ्यास वाढत गेला तसे विविध आजारांचा अभ्यास खोलात जाऊन करण्याची गरज निर्माण झाली. पारंपरिक फिजिशियनला असा सर्व अवयवांचा खोलात जाऊन अभ्यास करणे शक्य झाले नसते.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 08/22/2021 - 11:18

Permalink

पण प्रथमच स्पेशालिस्टकडे जायचे नाही/नसते

असा अलिखित नियम आहे. आपल्या नेहमीच्या डॉक्टरनाही चांगली परीक्षा असते. ते प्रथम चार दिवस औषध देऊन खात्री झाल्यावर योग्य स्पेशालिस्टकडे पाठवतात. उदाहरणार्थ डोकूदुखी. त्याची बरीच कारणे असतात. अगदी सामान्य ते गंभीर.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Mon, 08/23/2021 - 12:09

Permalink

याचिका

एमबीबीएस च्या प्रवेशासाठी एक मूलभूत अर्हता म्हणजे बारावीच्या परीक्षेत पीसीबी मिळून किमान 50 टक्के गुण मिळालेले असणे. हा नियम गेल्या कित्येक वर्षांपासून संपूर्ण भारतात लागू आहे. नुकतेच आसाम सरकारने यामध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. १. पीसीबी मध्ये किमान 60 टक्के गुण हवेत आणि २. बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण हवी . याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. तिथल्या न्यायमूर्तींनी केंद्र सरकार व एन एम सी यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केलेली आहे. यानिमित्ताने, एखादे राज्य सरकार स्वतःच्या अखत्यारीत असा मूलभूत नियम बदलू शकते का, याचा आता उहापोह होईल. https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/amp/news/education/can-states-prescribe-qualifying-criteria-for-mbbs-admissions-sc-issues-notice-to-nmc-centre-81094?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16296909513580&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fmedicaldialogues.in%2Fnews%2Feducation%2Fcan-states-prescribe-qualifying-criteria-for-mbbs-admissions-sc-issues-notice-to-nmc-centre-81094
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 09/16/2021 - 09:49

Permalink

हिंदीतून अभ्यास

एम बी बी एस चा अभ्यासक्रम हिंदी भाषेतून शिकवण्यासाठी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मध्ये तयारी सुरू. काही विद्यापीठांनी त्यासंदर्भात पाऊल उचलले आहे https://medicaldialogues.in/news/education/soon-mbbs-in-hindi-in-indian-two-states-82008
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on गुरुवार, 02/24/2022 - 11:32

Permalink

अंध डॉक्टर व प्रवेश

एका पूर्ण अंध डॉक्टरने पदव्युत्तर नीट ही परीक्षा पार केली असून त्याने एमडी मानसोपचार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मागितला होता परंतु तज्ञ समितीने त्याचा अर्ज फेटाळला आहे. त्याविरुद्ध संबंधित डॉक्टर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. जगभरात या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला गेल्याची उदाहरणे आहेत. आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 04/24/2022 - 12:24

Permalink

भारतातील 6 'एम्स' मध्ये

भारतातील 6 'एम्स' मध्ये कुटुंबवैद्यक या विषयातील एमडी पदवीचा अभ्यासक्रम सुरू होत आहे. चांगला निर्णय. अभिनंदन !
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sun, 04/24/2022 - 18:25

Permalink

व्वा!!

मूत्रपिंड रोगतज्ञ - युरोलीजिस्ट का नेफ्रॉलॉजिस्ट ? जर युरो तर नेफ्रो काय करतो अँड व्हाईस व्हर्सा ? अंडाशय तज्ञ असतो का ? अँड्रॉलॉजिस्ट असे काहीसे वाचलेले स्मरते त्याचे काम काय असते ? म्हणजे पुरुष अंडकोष आणि प्रजनन स्वास्थ्य संबंधी का मूत्रमार्ग विशेष मधलीच ही एक उपशाखा होय ?
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 04/24/2022 - 19:05

In reply to व्वा!! by जेम्स वांड

Permalink

चांगला प्रश्न

मूत्रपिंड रोगतज्ञ - युरोलीजिस्ट का नेफ्रॉलॉजिस्ट ? >>> झोप फिजिशियन मुत्रपिंड समस्यांचा अभ्यास करतो तो नेफरोलॉजिस्ट. जो सर्जन मूत्रमार्ग, मूत्राशय, प्रोस्टेट इत्यादींचा अभ्यास आणि शस्त्रक्रिया करतो तो यूरोलॉजिस्ट. ... अँड्रॉलॉजिस्ट हा शब्द भारतात इतका वापरात नाही. परंतु जशी बायकांची गायनॅकॉलॉजिस्ट तसा पुरुषांचा अँड्रॉलॉजिस्ट म्हणता येईल
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 04/24/2022 - 19:06

In reply to चांगला प्रश्न by हेमंतकुमार

Permalink

सुधारणा ..

झोप>>>जो असे वाचावे
  • Log in or register to post comments

Submitted by जेम्स वांड on Sun, 04/24/2022 - 19:11

In reply to चांगला प्रश्न by हेमंतकुमार

Permalink

च्यामारी

असा का हो पुरुषांचा अनुशेष, गल्लोगल्ली गायनेकॉलॉजिस्ट मिळतात पण पुरुषमंडळी अँड्रॉलॉजिस्टला मोताद, पुरुष स्वास्थ्य हा तितकासा महत्वाचा विषय वाटत नाही वाटतं एकंदरीत लोकांना
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 04/24/2022 - 19:17

In reply to च्यामारी by जेम्स वांड

Permalink

हो ना

सध्या आपण बरेच अन्याय सहन करण्याचे युग आहे खरे ! :))))
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Sun, 05/08/2022 - 12:22

Permalink

'सरकारी-खाजगी भागीदारी'

महाराष्ट्र सरकारने 'सरकारी-खाजगी भागीदारी' या तत्त्वावर शासकीय जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 10/19/2022 - 06:56

Permalink

नव्या अभ्यास शाखा:

नव्या अभ्यास शाखा: १.MD (aerospace medicine) आकाश व अवकाश वैद्यकविज्ञान २.M.D.(marine-medicine) सागरी वैद्यकविज्ञान
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/19/2022 - 09:51

In reply to नव्या अभ्यास शाखा: by हेमंतकुमार

Permalink

या विज्ञान शाखा नवीन नसून

या विज्ञान शाखा नवीन नसून गेली ३५ वर्षे तरी त्यात MD हि पदवी उपलब्ध आहे आणि त्यापूर्वी त्यात पदविका अभ्यासक्रम उपलब्ध होता. मरीन मेडिसिन हा अभ्यासक्रम नौदलाच्या अश्विनी या रुग्णालयाशी संलग्न INM (Institute of Naval Medicine) Mumbai, Maharashtra आणि एरोस्पेस मेडिसिन हा बंगळुरूच्या एरोस्पेस मेडिसिन संस्थेत Institute Of Aerospace Medicine या पदव्याचे शिक्षण दिले जाते. येथे प्रामुख्याने लष्करातील डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत असल्याने सामान्य माणसांना या अभ्यासक्रम बद्दल फारसे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 10/19/2022 - 09:51

In reply to नव्या अभ्यास शाखा: by हेमंतकुमार

Permalink

या विज्ञान शाखा नवीन नसून

या विज्ञान शाखा नवीन नसून गेली ३५ वर्षे तरी त्यात MD हि पदवी उपलब्ध आहे आणि त्यापूर्वी त्यात पदविका अभ्यासक्रम उपलब्ध होता. मरीन मेडिसिन हा अभ्यासक्रम नौदलाच्या अश्विनी या रुग्णालयाशी संलग्न INM (Institute of Naval Medicine) Mumbai, Maharashtra आणि एरोस्पेस मेडिसिन हा बंगळुरूच्या एरोस्पेस मेडिसिन संस्थेत Institute Of Aerospace Medicine या पदव्याचे शिक्षण दिले जाते. येथे प्रामुख्याने लष्करातील डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी येत असल्याने सामान्य माणसांना या अभ्यासक्रम बद्दल फारसे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 10/19/2022 - 10:07

In reply to या विज्ञान शाखा नवीन नसून by सुबोध खरे

Permalink

धन्यवाद !

धन्यवाद !
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Wed, 10/19/2022 - 09:07

Permalink

नुकतीच माध्यमात वैद्यकिय आणि

नुकतीच माध्यमात वैद्यकिय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी भाषेतून चालू केल्याच्या बातम्या ऐकल्या. या संकेत स्थळावरील डॉक्टर मंडळींना याबाबत काय वाटते ? यामुळे या क्षेत्राची प्रगती होईल काय ? अधोगती होईल काय ? जास्त प्रमाणात डॉक्टर निर्माण झालयास डॉक्टरांचे उत्पन्न घसरेल काय ? हिंदी डॉक्टर वि. इंग्रजी डॉक्टर यांत उच्च नीच भेदभाव होऊन नवीन जमात उदयास येईल काय ? मते ऐकायला किंवा स्वतंत्र धाग्यावर चर्चा वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Wed, 10/19/2022 - 10:08

In reply to नुकतीच माध्यमात वैद्यकिय आणि by धर्मराजमुटके

Permalink

ध, मु,

हा विषय महत्त्वाचा असून एका प्रतिसादात उरकण्यासारखा नक्कीच नाही. इच्छुकांनी यावर स्वतंत्र धागा काढावा. तूर्त मी काही मूलभूत माहिती देतो. १. गेल्या चार वर्षांपासून एमबीबीएसचा नवीन अभ्यासक्रम लागू झाला. त्याच्या पहिल्या वर्षी प्रत्यक्ष वैद्यकीय विषय शिकवण्यापूर्वी दोन महिने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विषय शिकवले जातात. ज्यामध्ये, संबंधित राज्याच्या (मातृ)भाषेचाही समावेश असतो. मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना चांगली व महत्त्वाची आहेच. २. अजून एक मुद्दा. सध्या वैद्यकीय प्रवेश हे बऱ्यापैकी अखिल भारतीय पातळीवर होतात. त्यामुळे एखाद्या उत्तर टोकाकडच्या राज्यातील विद्यार्थ्याला जर दक्षिण भारतात प्रवेश मिळाला असेल तर त्याने रुग्णांशी बोलायला म्हणून संबंधित राज्यभाषा शिकणे आवश्यक आहे. ….. समजा, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे हिंदीतून वैद्यकीय शिक्षण घेतले आहे, त्यांची जर आयुष्यभर फक्त त्या राज्यापुरताच व्यवसाय/ नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यांचे काही अडणार नाही. तरीही शिक्षणादरम्यान संघर्ष करावा लागेल. तसेच अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी एक आडकाठी निर्माण होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंतकुमार on Fri, 10/28/2022 - 19:58

Permalink

मराठीतून पण...

आता वैद्यकीय शिक्षण मराठीतून, राज्य सरकारचा मोठा निर्णय हा पर्याय ऐच्छिक असेल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com