गेल्या काही दिवसांत मला अनेक ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांनी शहरांत उपलब्ध असणार्या वैद्यकीय तज्ञांबद्दल शंका विचारल्या. तेव्हा असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे:
१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.
२. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS
३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात:
• मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात.
• फुफ्फुसरोग तज्ञ
• बालरोगतज्ञ
• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
• त्वचा व गुप्तरोग तज्ञ
• मनोविकार तज्ञ
. Pathology ( laboratory medicine)
• Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ
• भूलतज्ञ
४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे :
• जनरल सर्जन
• हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics)
• डोळ्यांचे विकार तज्ञ
• कान, नाक व घसा तज्ञ
• Plastic surgeon
५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या :
• हृदयविकार तज्ञ
• मेंदूविकार तज्ञ
• कर्करोग तज्ञ
• पोट व यकृत विकार तज्ञ
• रक्तविकार तज्ञ
• हॉरमोन विकार तज्ञ
• मूत्रपिंड विकार तज्ञ
• सांधे विकार तज्ञ (Rheumatologist)
• संसर्गजन्य विकार तज्ञ
• अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine)
• Immunologist
६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा :
• हृदय शस्रक्रिया तज्ञ
• मेंदू शस्रक्रिया तज्ञ
• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ
• बालक शस्रक्रिया तज्ञ
• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ
• हात शस्रक्रिया तज्ञ
MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे.
तर, थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. अतिविशिष्ट तज्ञांची माहिती दिलेली नाही. लेख उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.
वाचने
47298
प्रतिक्रिया
90
मिसळपाव
प्रतिक्रिया
@ Rajesh188
In reply to हे कधी पासून सुरू झाले by Rajesh188
राजेश,
पण प्रथमच स्पेशालिस्टकडे जायचे नाही/नसते
याचिका
हिंदीतून अभ्यास
अंध डॉक्टर व प्रवेश
भारतातील 6 'एम्स' मध्ये
व्वा!!
चांगला प्रश्न
In reply to व्वा!! by जेम्स वांड
सुधारणा ..
In reply to चांगला प्रश्न by हेमंतकुमार
च्यामारी
In reply to चांगला प्रश्न by हेमंतकुमार
हो ना
In reply to च्यामारी by जेम्स वांड
'सरकारी-खाजगी भागीदारी'
नव्या अभ्यास शाखा:
या विज्ञान शाखा नवीन नसून
In reply to नव्या अभ्यास शाखा: by हेमंतकुमार
या विज्ञान शाखा नवीन नसून
In reply to नव्या अभ्यास शाखा: by हेमंतकुमार
धन्यवाद !
In reply to या विज्ञान शाखा नवीन नसून by सुबोध खरे
नुकतीच माध्यमात वैद्यकिय आणि
ध, मु,
In reply to नुकतीच माध्यमात वैद्यकिय आणि by धर्मराजमुटके
मराठीतून पण...