मनुस्मृति भाग (३)
मनुस्मृति भाग ३
पहिल्या दोन भागात आपण १२ अध्यायातील काही श्लोकांचे भाषांतर पाहिले. त्यात एक भाग जाणीवपूर्वक गाळला होता; तो म्हणजे शूद्रासंबंधी मनूचे विचार. आज आपण त्या संबंधातील काही श्लोक पहाणार आहोत. मनूचे विचार वीसाव्या शतकात पटणारे नाहीत. पण मनुस्मृतीवर विश्वास ठेऊन, त्याप्रमाणे वागणारे अनेक लोक भारतात होते. दलितांना मिळणारी वागणुक अमानुष अशीच होती. म्हणून १९२७ साली डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी प्रथमच मनुस्मृति जाहीरपणे जाळली. या घटनेची तुलना मुसलमान आक्रमकांनी नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळली त्याच्याशी केली गेली पण ’ज्याचे जळते, त्यालाच कळते" हेच सत्य. आजही जाळली जाते पण फरक एवढाच की डॉ. साहेबांची कृती राजकारणाचा भाग नव्हता तर आज जे.एन.यु, वा तत्सम ठिकाणी जाळली जाते ती केवळ राजकारणाच्या उद्देशाने केली जात असावी असे वाटते. या तीन लेखांतील उद्देश केवळ माहिती असा असल्याने काही टीकाटिपणी नाही.
लोकवृद्धीसाठी ब्रह्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची उत्पती अनुकरमे मुख, हात, मांडी व पाय यापासून केली.
नाव ठेवतांना ब्राह्मणाचे पहिले नाव मंगलसूचक, क्षत्रियाचे बलसूचक, वैश्याचे धन-संपतीसूचक व शूद्राचे निंदित (तिरस्करणीय) ठेवावे.
दुसरे नाव ब्राह्मणाचे सुखकारक, क्षत्रियाचे रक्षणकर्ता, वैश्याचे वर्धमान व शूद्राचे सेवाकर्ता असे असावे.
शुद्रांकरिता यज्ञयागादी केल्यास उच्च कुलाचाही नाश होतो.
स्ववर्ण स्त्रीशी विवाह झाल्यावर ब्राह्मणाने दुसरा विवाह शूद्र स्त्रीशी केला तर तो ससंतान शूद्रत्व पावतो.
शूद्र स्त्रीचे अधरपान करणारा आणि तिच्या श्वासाने दुषित झालेला ब्राह्मण व त्याची संतती शुद्ध होत नाही.
ब्राह्मणाकरिता ब्राह्म, दैव, आर्ष आणि प्राजापत्य हे चार विवाह प्रशस्त मानले आहेत. क्षत्रियासाठी राक्षस व वैश्य-शूद्रासाठी आसुर.
पैसे घेऊन शिकवणारा, पैसे देऊन शिकणारा, शूद्राचा शिष्य आणि शूद्राचा गुरू यांना कुण्ड-गौलक म्हटले आहे.
(कुण्ड=जाराचा मुलगा, गौलक=जारापासून विधवेचा मुलगा)
शूद्राचा यज्ञ करणारा ज्या इतर ब्राह्मणांना स्प्रर्श करेल त्या ब्राह्मणांना, केलेल्या हव्य-कव्य दानाचे फळ दानकर्त्याला मिळत नाही.
वेदज्ञाता ब्राह्मण जर लोभाने शूद्राकडून दान घेईल तर तो कच्या घड्यात पाणी ठेवल्यावर घडा नष्ट होतो त्याप्रमाणे नष्ट होतो
डुक्कराने हुंगलेले, कोंबड्याच्या पंखाने, कुत्र्याने पाहिलेले किंवा भोजनकर्त्या ब्राह्मणाने कुत्र्यास पाहिल्याने जसे अन्न अग्राह्य होते तसे शूद्राने पाहिल्याने होते.
श्राद्धामध्ये ब्राह्मणभोजन झाल्यावर उरलेले अन्न शूद्राला दिले तर तो ब्राह्मण नरकात अधोमुख पडतो.
शूद्राचे अन्न ब्रह्मतेज नाहिसे करते.
ब्राह्मणाचे अन्न अमृतासारखे, क्षत्रियाचे दूधासारखे, वैश्याचे अन्नासारखे तर शूद्राचे अन्न रक्तासारखे असते..
पंचमहायज्ञ न करणार्या (शूद्राला याची परवानगी नाही) शूद्राचे पक्वान्न ब्राह्मणाने घेऊ नये. दुसरे भोजन उपलब्ध नसेल तर एका रात्रीला पुरेल एवढाच शिधा घ्यावा पण पक्वान्न कधीही घेऊ नये.
मृत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांना अनुक्रमे शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेच्या दरवाज्यातून बाहेत काढावे.
स्वबांधव उपस्थित नसतील तर मृत ब्राह्मणाला शूद्राद्वारे वेशीबाहेर नेऊ नये.
(द्विजसेवा आदि) यथाशास्त्र आचरण करणार्याया शूद्राला दर महिन्याला मुण्डण केले पाहिजे. ब्राह्मणाचे उच्छिश्ट खाल्ले पाहिजे.
(ब्राह्मणाचे आचरण करणारा वा धर्मात्मा) शूद्र राजाने न्यायाधीश म्हणून नेमू नये.
ज्या राज्यात शूद्र नायाधीश म्हणून काम करतात ते राज्य चिखलातील गायी प्रमाणे बुडते.
जिथे बहुसंख्येने शूद्र व नास्तिक रहातात ते राज्य दुर्भिक्ष व रोगराईने नष्ट होते.
वारंवार खोटी साक्ष देणार्या वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र यांना दंड करून राज्यातून हाकलून द्यावे; ब्राह्मणाला दंड न करता फक्त हाकलून द्यावे.
ब्राह्मणाकडून दोन, क्षत्रियाकडून तीन, वैश्याकडून चार आणि शूद्राकडून पाच टक्के व्याज घ्यावे.
नीच जातीत उत्पन्न झालेल्या शूद्राने ब्राह्मणाला दारुण शब्दांनी संबोधित केल्यास शूद्राची जीभ कापावी.
शूद्राने त्रिवर्णांना जातीवाचक शब्द उच्चारून ( उदा. " अरे यज्ञदत्ता, तू नीच ब्राह्मण आहेस ’) अपमान केला तर त्याच्या तोंडात तापवून लाल केलेली लोखंडाची सळई कोंबावी.
अभिमानाने ब्राह्मणाला धर्मोपदेश करणार्या शूद्राच्या कानात व तोंडात गरम तेल ओतावे.
शूद्राने त्रिवर्णांपैकी कोणाला मारहाण केली तर ज्या अवयवाने (उदा. हात) केली तो तोडून टाकावा.
ब्राह्मणाच्या बरोबर एका आसनावर बसणार्या शूद्राला तापलेल्या तव्याबर दाबून बसवावे अगर त्याचे ढुंगण कापावे.
शूद्राने अभिमान धरून ब्राह्मणाचे केस पकडले किंवा त्यालाच पकडले तर राजाने त्याचे दोन्ही हात कापावेत.
शूद्र अपमान करण्याकरिता ब्राह्मणावर थुंकला तर त्याचे दोनही ओठ कापावेत. मुतला तर त्याचे लिन्ग कापावे. पादला त्रर ढुंगण कापावे.
मर्जीप्रमाणे वेतन देऊन किंवा न देता ब्राह्मणाने शूद्राकडून सेवा करून घ्यावी कारण ब्राह्मणांची सेवा करण्याकरिताच ब्रह्मदेवाने शूद्रांना निर्माण केले आहे.
मालकाने मुक्त केले तरी शूद्र दास्यत्वापासून मुक्त होऊ शकत नाही कारण ब्रह्मदेवाने त्याला दास्य करण्याकरिताच निर्माण केले आहे.
ब्राह्मण आपल्या दास शूद्राचे धन विनासंकोच घेऊ शकतो कारण शूद्राला स्वत:चे असे काही धन नसतेच. स्वामी त्याच्या धनाचाही स्वामी असतो.
ब्राह्मणाला चारही वर्णाच्या स्त्रीयांपासून संतती झाली असेल तर ब्राह्मणीच्या मुलाला तीन भाग, क्षत्रिय स्त्रीच्या मुलाला दोन भाग, वैश्य स्त्रीपासून झालेल्या मुलाला दीड भाग व शूद्र स्त्रीच्या मुलाला एक भाग असे संपत्तीचे विभाजन करावे.
जाणूनबुजून ब्राह्मणाला आर्थिक किंवा शाररिक त्रास देणार्या शूद्राचा वध हात-पाय कापून (हालहाल करून) मग करावा.
ब्राह्मणाची सेवा हेच शूद्राचे मुख्य काम आहे. इतर केलेल्या कर्माची फळे त्याला मिळत नाहीत.
यज्ञ पुरा करण्यात आर्थिक अडचण येत असेल तर शूद्राकडचे धन बलात्काराने किंवा चोरी करून मिळवावे.
परंतु त्याच्या कडून दान घेऊन यज्ञ करू नये इति.
शरद
Book traversal links for मनुस्मृति भाग (३)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संपादकांनी धागा लेखक शरद
१
यकदम तिखाट इशय हाये
२
शरद जी...
३
४
शरद जी..!!
मनुस्मृति हा धागा का काढला ?
मी पहिल्यांदाच मनुस्मृतीतले
बादवे.. मनु ब्राह्मण होता का?
चर्चेचा फोकस
बापरे, असले काही त्यात असेल
लेखकांनी लेखनाचा पुरेपूर आनंद
मी या लेखमालेच्या पहिल्या
जी लोकं हा ग्रंथ त्या काळाशी
आत्माजी कालसुसंगत हा नीचतेला पचवण्याचा एक उत्तम दांभिक पवित्रा
श्राद्धविधी आणि ब्राह्मण
केवढे भयानक आहे हे, हे सगळे