Skip to main content

ताज्या घडामोडी: भाग ८

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 27/07/2017 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद आल्याने प्रतिसाद एका पानात रहावे यासाठी नवीन धागा सुरु करीत आहे. धाग्याची सुरूवात http://indianexpress.com/article/india/gujarat-congress-three-mlas-join… या बातमीने करीत आहे. गुजरातमध्ये वाघेलांपाठोपाठ अजून ३ कॉग्रेस आमदारांनी (बळवंतसिंह राजपूत, तेजश्री पटेल, पी आय पटेल) राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला आहे. डिसेंबर २०१७ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये काँग्रेसला धक्के बसायला सुरूवात झाली. विशेष म्हणजे या ३ आमदारांपैकी २ पटेल आहेत. मागील दीडदोन वर्षे पटेलांना राखीव जागा द्यावात यासाठी गुजरात पेटविण्याचे प्रयत्न झाले. त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता. या पार्श्वभूमीवर २ पटेल आमदारांनी भाजपत जाणे ही भाजपसाठी आनंदाची बातमी आहे.

वाचने 42850
प्रतिक्रिया 215

प्रतिक्रिया

In reply to by babubobade

खंडोबा ला जसे शंकराचा अवतार आहे म्हणून प्रेसेंट केले अगदी तसे च चले जावं आंदोलनाचं होऊ नये म्हणजे झाले.

In reply to by विशुमित

चिन्हे तशीच वाटली , म्हणूनच लिहिले. खादीवरचा बापूंचा फोटो उठला, ह्यांचा लागला. आता ७० वर्षापुर्वी चले जावला फिदीफिदी हसणारे , चले जावचाच संदर्भ देऊन स्वतःला प्रमोट करत आहेत.

In reply to by babubobade

मोगाखान, कांही लिंका पुरावे आहेत का..? का नेहमीप्रमाणे भाजपा / हिंदूद्वेष..

डाव्यांचा केरळ मधील हिंसाचार (विशेषतः rss आणि भाजप विरुद्ध) पाहून डावे सत्तेत नसताना तत्ववादी, विचारवादी आणि अहिंसाकवादी असतात आणि सत्तेत आल्यास वरील तत्वांना तिलांजली देऊन हिंसक होतात , मदमस्त होतात हे वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. बंगाल मध्ये ही हेच होत. महाराष्ट्रातील डावे जरा बरे वाटतात, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा परिणाम की सत्तेत नसल्याचा परिणाम? डावे सुधारले नाहीत तर नामशेष होणार हे नक्की. Mob हिंसेला आळा घातला पाहिजे।

हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बरालांच्या चिरंजीवांनी एका चंडीगढमध्ये एका मुलीचा पाठलाग करून stalking केले. ती मुलगी खमकी निघाली आणि त्यातून आय.ए.एस अधिकार्‍याची मुलगी असल्यामुळे इतर सामान्य घरांमधील मुलींना असते त्यापेक्षा जास्त पाठबळ तिला होतेच. तिने हे प्रकरण नेटाने लावून धरले आणि या चिरंजीवांना अटक झाली. कायदा गाढव असतो या उक्तीचे प्रत्यंतर द्यायला की काय या चिरंजीवांची काही तासात जामीनावर सुटकाही झाली. आता हरियाणा पोलिसांनी या चिरंजीवांविरूध्दचे आरोप त्याला लवकरात लवकर जामीन मिळावा या उद्देशाने 'डायल्युट' केले असा आरोप होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे की या प्रकरणाशी या चिरंजीवांच्या वडिलांचा काहीही संबंध नाही. नसेलही. जर का या वडिलांनी आपल्या दिवट्या चिरंजीवांना यापूर्वीच घरातून हाकलून दिले नसेल (किंवा या कृत्यामुळे ते त्याला हाकलून देणार नसतील) तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध करणे आणि कायद्याप्रमाणे आपल्या मुलाला शिक्षा व्हावी एवढे तरी म्हणणे या वडिलांचे उत्तरदायित्व ठरते. अजून तरी त्यांनी तसे काही केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पोलिसांनी मुद्दामून आरोप 'डायल्युट' केले या आरोपाविषयी स्वतः खट्टर यांनीही काही म्हटल्याचे किंवा संबंधित पोलिस अधिकार्‍यांविरूध्द कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.>>> ==> मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील.

In reply to by विशुमित

सध्याची परिस्थिती अशी आहे की मोदींच्या वर्चस्वाला कोणी विरोधी पक्ष आव्हान द्यायच्या स्थितीत नाहीत. ते कमी करायचे काम कोणी करत असेल तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच. सहमत. मोदी जी आणखी किती दिवस पुरणार आहेत देशासाठी. ही टर्म किंवा जास्तीत जास्त पुढची टर्म. ते एकदा सत्तरी पार झाले की राजकारणातून संन्यास घेतील. (सन्यास घेतील का ते दिसेलच बहुदा). मोदींसारखा ब्रँड होण्याच्या दुर्ष्टीने भाजप काही पाऊले उचलत आहेत का, हे कळायला मार्ग नाही. असा ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमीत २० वर्ष तरी लागतील. तुम्ही गंभीरपणे हा प्रश्न विचारला आहे असे समजून उत्तर देत आहे. मोदींनी ऑक्टोबर २००१ पासून खुर्ची सांभाळल्यापासून ते १६ मे २०१४ पर्यंत उण्यापुर्‍या साडेबारा वर्षात इतिहास घडवला. त्यामुळे कमीतकमी वीस वर्षे हा दावा कशावरून केलात हे कळाले नाही. दुसरी गोष्ट, मोदींनी गुजरात मॉडेल यशस्वी केले आणि तो बेंचमार्क तयार झाला आहे, त्यामुळे आपल्या कामगिरीचे मूल्यमापन गुजरातच्या तुलनेत होणार हे सर्वांना माहिती असावे. हे माहिती असणारे भाजपाच्या दुसर्‍या फळीमध्ये भरपूर नेते आहेत आणि समजा तुमच्या मते ते कर्तबगार नसले तरी त्यांच्या पासंगाला पुरणारे नेते विरोधी पक्षात आहेत का..? बाकी मला विचाराल तर २०२४ मध्ये मोदी पंतप्रधान नसतील. फडणवीस / योगी किंवा एखादा तरूण चेहरा पुढे येईल. (सध्याच्या कॅबीनेटमध्ये तसे कोणी पंतप्रधानपदासाठी पुढे येईल असे वाटत नाही - गडकरी सोडले तर!)

In reply to by गॅरी ट्रुमन

असली बांडगुळगिरी , वर शांत राहणे, वर गुन्हेगाराला वाचवणे बरेच महाग पडणार आणि पडावे.

In reply to by गॅरी ट्रुमन

तर या कृत्याचा जाहिरपणे निषेध करणे आणि कायद्याप्रमाणे आपल्या मुलाला शिक्षा व्हावी एवढे तरी म्हणणे या वडिलांचे उत्तरदायित्व ठरते
हे बरोबर आहे पण कायद्याने तशी घटना घडली असे सिद्ध झाले तर. आरोप झाले, अटक झाली, जमीन झाला हि तर कायदेशीर प्रक्रियेची सुरुवात आहे. सिद्ध झाले आरोप तर या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी जाहीर वक्त्यव्य करावे आणि जी काय शिक्षा कोर्ट देईल ती भोगू द्यावी.
तर ही सत्तेचा माज चढलेली असली बांडगुळेच.
असली कृत्ये करण्यासाठी सत्तेचाच मज असावा लागतो काय भारतात?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हे भाजपच्या माणसाचे कृत्य आहे ...हेच जर दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या संबंधित लोकांनी केलं असतं तर ? जरा शिवसेनेचे नाव टाकून पहा बरं ? मिपावर वेगळा धागा निघाला असता , शेलक्या शब्दात प्रतिक्रिया लिहिल्या गेल्या असत्या ...कुठे गेले आता ते सगळे मिपाकर ???

In reply to by अभिदेश

भाजप मध्ये असल्यावर/गेल्यावर वाल्याचा पण वाल्मिकी होणार होते, ह्या प्रक्रियेला किती दिवस लागतात हो? पोरींच्या मागावर कसे राहायचे आणि त्यातून कशी सहीसलामत सुटका करून कशी घायची हा आदर्शच त्यांच्या समोर असेल तर ते तरी काय करणार म्हणा..!! ==================================================== कुठे गेले आता ते सगळे मिपाकर ??? त्यांनी दिवट्या पोराच्या बापावर जवाबदारी टाकून मोदींना सेफ केले आहे. संस्कार शिकवायला पाहिजे होते म्हणे बापाने पोराला. पोरगी इतक्या रात्री का फिरत होती हे पण एक मंत्र्याने तारे तोडले आहेत. -------------------------------------------------------------------------------------------- हायला त्या पाकिस्तानी बहिणीचे कोड कौतुक करण्याला न चुकलेले ट्विटर किंग ची काही प्रतिक्रिया नाही आली अजून वर्णिका बद्दल.

In reply to by विशुमित

पोलिसांनी जर सौम्य कलमे लावली, तर न्यायालयात आव्हान दिल्यास न्यायालय कडक कलमे लावण्याचा आदेश देऊ शकते का? हे प्रकरण दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसतो. अर्थात माध्यमातून बरेच स्पेक्युलेशन सुरू आहे. अजून सविस्तर माहिती बाहेर आलेली नाही. हे प्रकरण, मेहता प्रकरण भाजपला जड जाणार आहे. भाजपने आरोपींना वाचविण्याचा अजिबात प्रयत्न करू नये.

In reply to by श्रीगुरुजी

मेहता राष्ट्रीय अध्यक्ष्यांचे नातेवाईक आहेत. कारवाई होण्याची शक्यता कमी वाटते. बघू पार्टी विद डिफरेन्स वाले काय करतात ते.

In reply to by अभिदेश

फक्त शिवसेनेच्या कुणी असे काही केले असते तर शिवसेना समर्थक किती आय.डी नी त्याचा निषेध केला असता? जर रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्याला थोबडावले होते तेव्हा कोणीही शिवसेना समर्थक जे काही झाले ते चुकीचे होते हे म्हणायलाच मुळी तयार नव्हता. तो अनुभव लक्षात घेता त्या मुलीचीच कशी चूक आहे यावर सगळे शिवसेना समर्थक काथ्या कुटत राहिले असते हीच शक्यता सर्वात जास्त. तसले तारे कुणा नेत्याने तोडले आहेत. पण असले काही शिवसेनेच्या माणसाने केले असते तर मिपावरही असेच काही वाचायला मिळाले असते हीच शक्यता जास्त.

In reply to by गॅरी ट्रुमन

फक्त शिवसेनेच्या कुणी असे काही केले असते तर शिवसेना समर्थक किती आय.डी नी त्याचा निषेध केला असता?>>> ==> मी शिवसेना समर्थक नाही पण राष्ट्रवादीच्या कोण्या नेत्याच्या पोराने असले केले असते तर नक्कीच मी निषेद केला असता. तसले तारे कुणा नेत्याने तोडले आहेत.>>> ==>>रामवीर भट्टी http://www.loksatta.com/desh-videsh-news/woman-shouldnt-have-gone-out-s…

In reply to by गॅरी ट्रुमन

जर रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडिया कर्मचाऱ्याला थोबडावले होते तेव्हा कोणीही शिवसेना समर्थक जे काही झाले ते चुकीचे होते हे म्हणायलाच मुळी तयार नव्हता.
हे आपले वक्तव्य चुकीचे आहे, आपण धागा काढून परत वाचण्यास हरकत नसावी.

In reply to by गॅरी ट्रुमन

विरोध एअर इंडिया च्या सर्व्हिस ला होता . आणि कारण न वाचता तोंडसुख घेणाऱ्या लोकांना . दुसरे पक्ष ह्याविषयी काही चर्चा असली कि भाजप समर्थकांचा तोल जातो हे वेळोवेळी दिसले आहे . भाजप च्या चुका असल्या कि सौम्य शब्द बाकी काय असेल तर १० प्रतिसाद झोडपायला इतरांना .

In reply to by वरुण मोहिते

विरोध एअर इंडिया च्या सर्व्हिस ला होता .
आणि अगदी तसाच विरोध रमेश किणी प्रकरणात रमेश किणींनाही होता. श्री.रा.रा. राज ठाकरेंना ती जागा खाली करून हवी होती आणि तरीही रमेश किणी ते सोडायला तयार झाले नाहीत. काय हा मराठी बाण्याचा मराठी माणसानेच केलेला उपमर्द. तरीही किती शिवसेना समर्थकांनी निदान राज ठाकरेंना निदान प्रश्न तरी विचारले होते? त्यावेळी मिपा नव्हते. पण असते तर रविंद्र गायकवाड प्रकरणी झाले त्याच्या हजार पटींनी मोठे रण शिवसेना समर्थकांनी मांडले असते हे नक्कीच. तेव्हा शिवसेना समर्थकांचा विरोध नक्की कशाला होता आणि समर्थन कशाला आहे याच्या कहाण्या ऐकवूच नका. तो इतिहास बराच जुना आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नसताना आपल्या सरसकट विधानाच्या समर्थनार्थ हे उदाहरण देणे पटले नाही. परत एकदा आधीचा धागा वाचून आपली मते बनवा असे सुचवतो. सरसकट शिवसेना समर्थक, भाजप समर्थक वगैरे विधाने पटत नाहीत असे नमूद करतो.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

ह्या दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नसताना आपल्या सरसकट विधानाच्या समर्थनार्थ हे उदाहरण देणे पटले नाही.
दोन प्रकरणांचा काडीमात्र संबंध नाही हे खरे असले तर मग हरियाणातील त्या दिवट्याचे कृत्य हलकटपणाचे आहे आणि खट्टर सरकारचे पोलिस याप्रकरणी त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहेत हे लिहिल्यावर प्रतिसादात शिवसेना आणायची काहीच गरज नव्हती. त्या हरियाणातील भाजप प्रदेशाध्यक्षाच्या दिवट्याचा आणि शिवसेनेचा काय संबंध? काहीच नाही. तरीही शिवसेना प्रतिसादात आणायची ती आणलीच. मग इतरांनी त्यावर भाष्य केलेच पाहिजे ही अपेक्षा करणे जसे अयोग्य आहे त्याचप्रमाणे इतरांनी त्यावर भाष्य करूच नये ही अपेक्षा करणेही. संदर्भासाठी हा प्रतिसाद.

In reply to by गॅरी ट्रुमन

अच्छा म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने मांडले म्हणून तुम्हीपण "जशास तसे(?)" उत्तर दिले असे आहे ते! मला तुमच्या लेखनाबद्दल आणि मतांबद्दल आदर आहे म्हणून आपलं सांगायचं प्रयत्न केला!

In reply to by गॅरी ट्रुमन

अवांतर: गायकवाडच्या मागे दिल्ली पोलीस का लागले नाहीत अजून? fir होऊन बरेच दिवस झाले.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हे बरोबर आहे पण कायद्याने तशी घटना घडली असे सिद्ध झाले तर.>>> ==>> सिद्ध बिद्ध काही होणार नाही. रस्त्या वरील सगळे सी सी टीव्ही बंद होते(?) सिद्ध झाले आरोप तर या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी जाहीर वक्त्यव्य करावे>>> ==>> २०-२५ वर्षांनी ? जी काय शिक्षा कोर्ट देईल ती भोगू द्यावी.>>> ==>> पेरोल वर १० वेळा घरी आंतील त्याला.

In reply to by विशुमित

हो आपले बरोबर आहे, cctv बंद होणे, पॅरोलवर दहा वेळा सोडणे हे सगळे गेल्या तीन वर्षात घडायला सुरुवात झाली! तो फक्त शिवसेनेचा किंवा भाजपचा नेता किंवा नेत्याचा नातेवाईक होता एवढेच काही लोकांसाठी त्या घटनेची तीव्रता वाढवून तथाकथित निषेध वगैरे नोंदवायला पुरेसे ठरते यातच सगळे आले!

हरयाणा प्रकरणावर मत न देता , गायकवाड प्रकरण , सेना इत्यादी संबंध नसता उकरुन काढुन , मनातील भडास काढण्याचा थयथयाट मनोरंजक आहे.

In reply to by मराठी_माणूस

हरयाणा प्रकरणावर मत न देता
वाचत जा हो जरा. सुरवातीलाच त्या प्रकरणाविषयी लिहिले आहे.
गायकवाड प्रकरण , सेना इत्यादी संबंध नसता उकरुन काढुन
बरोबर आहे इथे शिवसेनेचे नाव यायचा काहीच संबंध नव्हता. पण कसे आहे की (माझ्या आकलनाप्रमाणे) शिवसेना समर्थक असलेल्या एका मिपाकराने हा प्रतिसाद देऊन काही कारण नसताना शिवसेनेचे नाव आणले. तेव्हा उकरून कोणी काय काढले आहे हे तुम्हाला दिसत नसले किंवा त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असाल तर त्याला मी तरी काहीही करू शकत नाही आणि करणारही नाही.
मनातील भडास काढण्याचा थयथयाट मनोरंजक आहे.
भडास हा मराठी शब्द आहे का? असो. एकूणच नक्की काय लिहिले आहे ते न वाचताच उगीच काहीतरी प्रतिसाद देऊन आपलेच हसे करून घ्यायचा प्रयत्नही मनोरंजक वाटला.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी , FYI... मी कोणत्याही पक्षाचा समर्थक वा भक्त नाही आपल्यासारखा . मी विरोधाभास दाखवतोय. जेव्हा भाजप सोडून दुसर्या पक्षाचा मुद्दा असतो तेव्हा काही मिपाकर ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात , जी भाषा वापरतात आणि भाजपच्या बाबतीत मात्र गुळमुळीत भाषा वापरतात . हे म्हणजे आपला तो बाब्या हा प्रकार आहे. दुसरे माझे प्रतिसाद जे तुम्ही म्हणताय की शिवसेनेच्या समर्थनार्थ होते , ते तुम्ही नीट वाचलेत तर शिवसेनेला युतीचे कोणतेही श्रेय न देण्याच्या बाबतीत होते. हा कृतघ्नपणा झाला. युतीचा दोघांनाही फाययदा झाला होता , हे मान्य ना करण्याला होता. मुळात वर उल्लेखलेला प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून नसताना , स्वतःवर तुम्ही ओढून घेतलाय.

In reply to by अभिदेश

मुळात वर उल्लेखलेला प्रतिसाद हा तुम्हाला उद्देशून नसताना , स्वतःवर तुम्ही ओढून घेतलाय.>>> -===>> मिपावर फक्त गिनेचुणेच भाजप समर्थक उरल्यामुळे असेल कदाचित. जेवढे उरलेले आहेत त्यातले पण काही निःपक्षतेकडे झुकलेले आणि फक्त मोदी समर्थक दिसतायेत. बाकी इतर पक्षाचे समर्थक तर त्यांच्या पक्षाप्रमाणे अगोदरच बदनाम आहेतच. ते काय आपले विचार बदलतील असे वाटत नाहीत. असो..!!

In reply to by मोदक

मोदी सारखा ब्रँड बनायला आणि एक हाती सत्ता आणायला ७० वर्ष लागली भाजपला. मोदींच्या कर्तृत्वामुळे (?) मी फक्त २० वर्षच गृहीत धरली नवीन ब्रँड साठी. मोदी जो पर्यंत आहेत तो पर्यंत कोणी ब्रँड बनण्याची शक्यता धूसर आहे. २०१९-२०२४ ची टर्म गृहीत धरली तर आणखी ७ वर्ष. त्या नंतर जनता पुढील ३ टर्म भाजपला एकहाती सत्ता देईल असे वाटत नाही. तो पर्यंत २०-२२ वर्ष जाणारच आहे. फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. ) योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत. असो- दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

In reply to by विशुमित

ओके फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. (कृपया ब्राह्मण आहे म्हणून व्हिक्टीम कार्ड खेळू नका. वीट आलाय त्याचा. ) व्हिक्टीम कार्ड काय.. अटलजी पण ब्राह्मण होते. कसे आहे, महाराष्ट्रातले सरंजामवादी विचार सगळीकडेच लागू पडत नाहीत. कळेल हळूहळू. योगीचे नाव घेऊन तुम्ही अमंगळ करमणूक केलीत. मुख्यमंत्री होतील असे वाटले नव्हते. पंप्र होणार नाही असेही वाटून घेऊ शकता. समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..?

In reply to by विशुमित

समजा पुढे कधीतरी पंतप्रधानपदाचा उमेदवार न सांगता भाजपा एकहाती निवडून आली आणि केले योगीला पंतप्रधान.. मग काय करणार..? ?

In reply to by विशुमित

फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. वरील यादीत नितीशकुमार आणि विशेषत: पवारांचे नाव पाहून खूप हसलो.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला पण मराठा मोर्चाच्या हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र बाहेर आहे सध्या. पण पाठिंबा आहेच इथून. लोक पाकिस्तानातून पण पाठिंबा देत आहेत. असो..!!

In reply to by विशुमित

मला नको. मुंबईकरांना शुभेच्छा द्या. महागड्या गाड्यातून येऊन राखीव जागा मागणाऱ्या धनदांडग्यांमुळे उद्या त्यांची वाट लागणार आहे.

In reply to by विशुमित

फडणवीस ब्रँड बनतील या बद्दल शंका आहे. कारण त्यांच्या कडे नेतृत्व करण्यासाठीचा शरद पवार, मोदीजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी यांच्या सारखा स्वतंत्र बाणा नाही आहे. कठपुतळी वाटते. पवार साहेब, नितीश कुमार आणि बॅनर्जी अजून राजकारणात अपरिपक्व आहेत. इतकी वर्षे राजकारणात राहून आणि कोलांट्या उड्या मारुन सुद्धा पवार साहेब फक्त मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री यापलीकडे जाऊ शकले नाहीत. आता नाईलाजाने मराठा मोर्चा कार्ड खेळावे लागत आहे. नितीश कुमार आणि बॅनर्जी यांच्याबद्दल फार काही बोलण्यासारखे सुद्धा नाही. त्यामुळे फडणवीस यांची तुलना वरील व्यक्तींशी होऊ शकत नाही. फडणवीस यांची स्पर्धा मोदी, यशवंतराव चव्हाण किंवा अब्राहम लिंकन यांच्याशी होऊ शकते.

In reply to by अप्पा जोगळेकर

फडणवीस यांची स्पर्धा मोदी, यशवंतराव चव्हाण किंवा अब्राहम लिंकन यांच्याशी होऊ शकते.
खोखो हसत आहे!

In reply to by अत्रे

अप्पा.. काही वयक्तिक कारणांमुळे आज खूप अपसेट होतो. तुमच्या प्रतिसादाने इतका हसलो की सगळं टेन्शन विरघळून गेले. आजच्या मोर्च्यात पाणी वगैरे वाटप केले की नाही आमच्या (तुमचे पण आहेत बरका) बंधू लोकांना??

In reply to by चिर्कुट

कशावरून म्हणजे..? २०१४ चा निवडणुक प्रचार ज्या बेसवर झाला किंवा २००२ ते २०१४ पर्यंत जे गुजरातमध्ये जी वेगवेगळी विकासकामे झाली ते काय होते तुमच्यामते..? २१ अपेक्षित प्रश्नसंचाप्रमाणे प्रश्नोत्तरे हवी असतील तर इतके बेसीक समजावून सांगायला माझ्याकडे वेळ नाही असे समजा. किंवा गुजरात मॉडेल फेल गेले असे समजा - काय फरक पडतो..?

In reply to by मोदक

मुळात 'गुजरात मॉडेल' असं काही अस्तित्चात नव्हतं. ती फक्त प्रचारासाठी तयार केलेली एक टर्म होती, असं माझं मत आहे. काही बेसिक प्रश्न - १. फक्त गुजरातमध्ये झालेली (इतर कोणत्याही राज्यांत न झालेली) कोणती विकासकामे या मॉडेल अंतर्गत झाली आहेत? १. जर इतकंच यशस्वी आहे ते मॉडेल, तर त्याच्याबद्दल काही डॉक्युमेंटेशन आहे का? त्याचा कुणी अभ्यास केला आहे का? २. तुम्ही म्हणता की हे मॉडेल बेंचमार्क आहे. त्याचे काय क्रायटेरिया आहेत? कोणी ठरवलेले? ३. भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत (उदा. महाराष्ट्र, केरळ, इ.) नक्की कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये गुजरात पुढे आहे? असेल तर या मॉडेलच्या नेमक्या कोणत्या पॉलिसीमुळे ते शक्य झालं? ४. इतर भाजपशासित राज्यांमध्ये ते का लागू नाही झालं इतकी वर्षे? अजूनही काही प्रश्न आहेत, पण सध्या इतके पुरे. ता. क. - जर योग्य उत्तरे मिळाली, तर माझे मत जाहीरपणे बदलायला मी तयार आहे. मात्र आजपर्यंत गुजरात मॉडेलबद्दल विचारलेल्या प्रश्नाची टू द पॉईंट उत्तरे मिळत नाहीत असा अनुभव आहे.

In reply to by चिर्कुट

तुमच्या सदस्यनामा प्रमाणेच, तुम्ही विचारलेले प्रश्न देखिल अगदीच 'चिर्कुट' आहेत.

In reply to by प्रसाद_१९८२

@प्रसाद_१९८२ - शक्य असल्यास विषयाशी संबंधीत उत्तरे द्यावीत अन्यथा आपले मुखकमल उचकटलेच पाहीजे असे काही नाही. व्यक्तिगत टिप्पणीला त्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचे उत्तर मिळेल. @श्रीगुरुजी - धन्यवाद. लिंक पाहातो.

In reply to by चिर्कुट

चिर्कुट साहेब (आणि इतरही ज्यांना वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे) कोणताही पूर्वग्रह न ठेवता खाली दिलेले दोन दुवे वाचून पहा. गुजरात राज्य वीज मंडळ तोट्यातून नफ्यात कसे आले आणि सर्वाना २४ तास वीज कशी मिळते http://www.businesstoday.in/magazine/case-study/gujarats-power-sector-t… https://www.wsj.com/articles/SB10000872396390444226904577560702435343314 विदर्भापेक्षा सर्वच दृष्टींनी वाईट परिस्थिती असताना जलसंधारण आणि इतर अनेक कामांमुळे सौराष्ट्राची शेतीची प्रगती का आणि कशी झाली आणि विदर्भाची प्रगती मात्र सरकारी मदत आणि बऱ्याच सवलती असून का झाली नाही याचा एक तौलनिक अभ्यास आहे http://www.indiawaterportal.org/sites/indiawaterportal.org/files/genera… पहा वाचून आणि पटलं तर. मग अजूनही बरंच काही दाखवता येतील. मी गेली काही वर्षे गुजरात मध्ये प्रत्यक्ष जाऊन( मेडिकल कॅम्पसाठी)पाहिलेल्या गोष्टी आहेत या.

In reply to by मोदक

२१ अपेक्षित प्रश्नसंचाप्रमाणे प्रश्नोत्तरे हवी असतील तर इतके बेसीक समजावून सांगायला माझ्याकडे वेळ नाही असे समजा. किंवा गुजरात मॉडेल फेल गेले असे समजा - काय फरक पडतो..?>>> ==>> एवढे फ्रस्टरेट होऊ नका, आम्ही नाही तुमच्या मागे लागणार स्पष्टीकरणासाठी. गुजरात मॉडेल फेल च होते. त्याच्या मृगजळाला जनता भुलली. जसे जसे लोक त्याच्या जवळ जातील त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटेल.

In reply to by विशुमित

एक वेळ मानून चालू कि गुजरात बाहेरचे लोक फसले, भुलले, पण गुजरात मधले लोक पण भुलले असे म्हणायचे आहे का? आणि तीन वर्षात त्या मृगजळाच्या किती जवळ पोहोचले असतील म्हणे लोक? म्हणजे या वर्षाखेरीस पर्यंत पुरेसे जवळ पोहोचतील ना? नाही, नाहीतर परत गुजरात मध्ये मृगजळवालेच यायचे! शिवाय केंद्रातला भ्रमाचा भोपळा फोडायला पण दोनच वर्षे वेळ आहे बरं!

In reply to by मराठी_माणूस

वेळोवेळी उघडे पडले आहेत भाजप समर्थक . अमित शहा सारख्या फालतू माणसाबद्दल तर बोलावेसे पण वाटत नाही . ५-१० वर्षे ऐश मग पक्ष परत त्याच ठिकाणी भाजप .