Skip to main content

ताज्या घडामोडी: भाग ७

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 20/07/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपतीपदासाठी १७ जुलै रोजी मतदान झाले. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. सुरवातीला संसद सदस्यांनी दिलेली मते मोजली जातील आणि त्यानंतर इंग्रजी डिक्शनरीप्रमाणे अक्षरांच्या क्रमाने राज्य विधानसभांच्या सदस्यांनी (अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार इत्यादी क्रमाने) दिलेली मते मोजली जातील. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे. मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीअखेर एन.डी.ए चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना ६०,६८३ तर विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांना २२,९४१ मते मिळाली आहेत. पुढच्या फेर्‍यांचे निकाल आल्यावर वेळ मिळेल त्याप्रमाणे ते या धाग्यावर पोस्ट करेन.

वाचने 36427
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

प्रतिसाद दोन पानात विभागले जाऊ नयेत म्हणून यापुढे १५० प्रतिसादानंतर (म्हणजे १ पान पूर्ण झाल्यानंतर) हा धागा थांबवून नवीन धागा सुरू व्हावा.

राष्ट्रपतीपदासाठी आता रामनाथ कोविंद यांना ४ लाख ७९ हजार ५८५ तर मीराकुमार यांना २ लाख ४ हजार ५९४ मते मिळाली आहेत. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत गुजरातमधील ८ काँग्रेस आमदारांनी मीराकुमार यांना मत न देता रामनाथ कोविंद यांना मत दिले आहे अशी बातमी आहे. गुजरात काँग्रेसमध्ये उद्या शंकरसिंग वाघेला त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही महत्वाची घोषणा करायची शक्यता आहे. वेळ मिळेल त्याप्रमाणे याच चर्चेत शंकरसिंग वाघेलांच्या राजकिय वाटचालीवर एक प्रतिसाद लिहिणार आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणत्या आमदाराने/खासदाराने कोणाला मत दिले हे जाहीर करता येते का? गुजरातच्या ८ आमदारांनी कोविंद यांना मत दिले हे कसे समजले असावे?

In reply to by श्रीगुरुजी

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणत्या आमदाराने/खासदाराने कोणाला मत दिले हे जाहीर करता येते का?
किती क्रमांकाची मतपत्रिका कोणाला दिली याचा रेकॉर्ड असतोच. त्यावरून कोणी कोणाला मत दिले हे तपासून बघता येत असावे. मला वाटते की मतदानात गुप्ततेचा अधिकार लोकांना आहे पण लोकप्रतिनिधी सभागृहात नक्की कोणाला मत देतात हे गुप्त ठेवले जात नाही आणि तसे गुप्त ठेवले जाऊही नये. लोकांना आपण निवडून दिलेले प्रतिनिधी सभागृहात नक्की काय करत आहेत हे माहित व्हायला हवे. १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पडले होते. त्यावेळी नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दिन सोझ यांनी पक्षादेश झुगारून वाजपेयी सरकारविरोधात मत दिले होते. त्या ठरावाचा निकाल लोकसभा अध्यक्षांनी जाहिर केला आणि लोकसभा स्थगित केली त्यानंतर एन.डी.टी.व्ही वर बरखा दत्तने त्यांना,"Prof.Soz, what made you change your vote?" हा प्रश्न विचारला होता हे पक्के आठवते. म्हणजे त्याचवेळी कोणत्या खासदाराने कोणत्या बाजूला मत दिले हे कळले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

एकुण मताच्या बेरजे वरुन सुध्दा कदाचीत कळत असावे, अपेक्षीत मते व मिळालेली मते यांच्यातील फरक.

In reply to by दीपक११७७

एकुण मताच्या बेरजे वरुन सुध्दा कदाचीत कळत असावे, अपेक्षीत मते व मिळालेली मते यांच्यातील फरक.
किती मते इकडची तिकडे गेली हे जरी कळले तरी नक्की कोणाची मते फिरली हे त्यामुळे कळणार नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

आज मोजणी चा दिवस, तेंव्हा हि बातमी सुरुवातीच्या analysis वरच अधारीत असेल.

आतापर्यंत कोविंद यांना एकूण ४,७९,५८५ मूल्य असलेली १३८९ मते मिळालेली आहेत, तर मीरा कुमार यांना एकूण २,०४,५९४ मूल्य असलेली ५७६ मते मिळालेली आहेत. आता कोविंद यांना ७१,००० पेक्षा कमी मूल्य असलेली मते हवी आहेत.

मायावतींनी ३ दिवसांपूर्वी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. राजीनाम्याबरोबर राजीनामा का दिला हे सांगणारे ३ पानी पत्र होते. राजीनामा पत्र नियमांनुसार नसल्याने तो राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळल्यावर आज मायावतींनी नियमानुसार १ ओळीचे राजीनामा पत्र पुन्हा दिल्यानंतर ते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी स्वीकारले आहे. त्यामुळे आता मायावती राज्यसभेच्या खासदार राहिलेल्या नाहीत. राजीनामा देणे ही मायावतींची धूर्त खेळी समजली जाते. तसेही त्यांचे खासदारकीचे शेवटचे ९ महिनेच शिल्लक होते. उत्तर प्रदेश विधानसभेतील संख्याबळानुसार त्यांना परत राज्यसभेवर निवडून येणे अशक्य होते. जर काँग्रेस व सपने आपली जास्तीची मते त्यांना दिली असती तरच त्या पुन्हा निवडून आल्या असत्या. अर्थात त्यासाठी त्यांना अखिलेशबरोबर हातमिळवणी करावी लागली असती ज्याची किंमत अखिलेशने २०१९ मध्ये वसूल केली असती. तसे करण्यापेक्षा आपण दलितांच्या प्रश्नावर राजीनामा दिला असे त्यांना आता सांगता येईल. अर्थात त्यांनी राजीनामा दिला तरी त्याचा त्यांना राजकीय फायदा होणे अवघड आहे. त्यांची विश्वासार्हता खूपच खालावली आहे आणि आता पुन्हा विश्वासार्हता वाढविणे तितकेसे सोपे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मायावती या अत्यन्त धुर्त आहेत. एक तर त्या दलित मतान्चा बागुलबुवा करुन इतर( लालू , ममता किन्वा केजरी ) लोकान्च्या मदतीने राज्यसभेत जातील किन्वा फूलपुर मधून लोकसभा निवडणूक लढवतील. कारण ऊ.प्र मधला त्यान्च्या पक्षाचा पाया डळमळीत झाला आहे

In reply to by रामदास२९

मायावतींना लालू प्रसाद यांनी ताबडतोब पाठींबा जाहीर करून बिहार मधून निवडून देण्याची तयारीही दाखवली आहे. दलितांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी केलेली हि एक खेळी आहे.

Whole Punjab Unit of Chinese company #OPPO resigned from job after Chinese Official passed Derogatory & Racist remarks on India. जिथे शक्य असेल तिथे आपणसुद्धा चिनी मालावर बहिष्कार टाकून आंतरराष्ट्रीय गुंड चीनला धडा शिकविण्यात आपला खारीचा वाटा उचलूया. भारतीय बाजारपेठ चिनी मालाने भरलेली असल्याने सरसकट चिनी मालावर बहिष्कार टाकणे अवघड आहे. परंतु जिथे पर्यायी माल उपलब्ध असेल तिथे चिनी माल विकत न घेता पर्यायी माल विकत घेता येईल.

In reply to by हर्षद खुस्पे

कर्मचार्‍यांची काहीतरी समस्या होती हे ओपोने मान्य केले आहे व १५ तारखेच्या पत्रानंतर १६ तारखेला ती समस्या सोडविली गेली आहे असेही सांगितले आहे. पत्रावरील सही खरी आहे का असे व्यवस्थापक अरूण जोशीला विचारल्यानंतर त्याने काहीच उत्तर दिले नाही. एकंदरीत बातमी १००% खोटी नाही. काहीतरी तथ्य नक्कीच आहे.

भाजपाला मायावतींच्या राजीनाम्याने काही फरक पडेल असे दिसत नाही. दलित वर्गात फार खळबळ होईल असेही नाही. ही गाजराची पुंगी आहे, आणि महत्वाचे म्हणजे कसल्याच कामाची नाही. बाकी वाघेलांवर लिहा. काही जुनी माहिती आठवेल, काही अपडेट होईल. तसे यावेळची गुजरात निवडणुक महत्वाची असेल असे वाटते. जी एस टी मुळे भाजपाला मतदान कमी होते की काय अशी आशा इतर बाळगुन आहेत.

भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे असे आताच टाईम्स नाऊने जाहिर केले आहे. त्यांचा २५ जुलै रोजी शपथविधी होईल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस. खेहर त्यांना शपथ देतील. 1

In reply to by गॅरी ट्रुमन

रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन!! ते निवडून येणारच होते! मीरा कुमार यांनी खरेतर या निवडणूकीला उभेच रहायला नको होतं, पण....

In reply to by संजय पाटिल

सोनिया गांधी या जन्माने इटालियन होत्या पण यांनी भारतीय माणसाशी लग्न केले म्हणू त्या भारतीय आहेत इटालियन नाहीत हा दावा करणाऱ्या काँग्रेसने मीरा कुमार यांनी ब्राम्हण माणसाशी लग्न केले तर त्या ब्राम्हण न होता दलितच कशा राहतात याबद्दल स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

>>>यांनी भारतीय माणसाशी लग्न केले म्हणू त्या भारतीय आहेत इटालियन नाहीत हा दावा करणाऱ्या म्हणजे? त्या भारतीय आहेत हा नुसताच दावा आहे? त्यांना निवडणूकीला उभे कसे राहून दिले जाते मग? >>>मीरा कुमार यांनी ब्राम्हण माणसाशी लग्न केले काय बोलणार आता, अहो ते ब्राम्हण नव्हेत. गुर्जींनी लिहीलं आहेच वरच्या प्रतिसादात.

आकडेवारीनुसार रामनाथ कोविंद यांना ७ लाख २ हजार ४४ तर मीराकुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मते मिळाली आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसची ८ मते तर फुटलीच आहेत. इतर राज्यांमध्येही काही प्रमाणात क्रॉस-व्होटिंग झालेले दिसते. छत्तिसगडमध्येही काँग्रेसची काही मते फुटलेली दिसतात. २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला ९० पैकी ४१ जागा मिळाल्या होत्या. पण राज्यातून काँग्रेसला ३५ आमदारांचीच मते मिळाली आहेत तर ३ मते अवैध ठरली आहेत. आंध्र प्रदेशमध्ये मीराकुमारना एकही मत मिळालेले नाही. ते अपेक्षितच होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशात (तेलंगण जाऊन उरलेल्या सीमांध्र आणि रायलसीमा या परिसरात) काँग्रेसचा व्हाईटवॉश झाला होता आणि काँग्रेसला अगदी एकही जागा मिळाली नव्हती. सत्ताधारी तेलुगु देसम एन.डी.ए चा घटकपक्ष आहे आणि तसेच वाय.एस.आर काँग्रेसनेही कोविंदनाच पाठिंबा दिल्यामुळे मीराकुमारना एकही मत मिळाले नाही.

व्हिस्कि मे विष्णु बसे. रम मे श्रीराम. जीन मे माता जानकी, और ठर्रे मै हनुमान. सियावर रामचंद्र की जय ! समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल यांचे वादग्रस्त विधान ! https://www.youtube.com/watch?v=ap6as0hejas

In reply to by प्रसाद_१९८२

या नालायक नरेश आगरवालचे डोळे कायम इतके सुजलेले दिसतात की हा बहुतेक २४ तास तर्र असतो. उगाच नाही त्याला व्हिस्की, जीन, रम असल्या उपमा सुचल्या.

In reply to by दशानन

उदयन भोसलेला काहीही होणार नाही. सातार्‍यात या माणसाची दहशत आहे. तिथले सर्व पोलिस, अधिकारी इ. याच्या मुठीत आहेत. १९९९ चे शरद आप्पा लेवेच्या खुनाचं प्रकरण आठवत असेल तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल. या नवीन प्रकरणात उदयनला फार तर लुटुपुटीची अटक होईल आणि पुढच्या मिनिटाला जामीनावर सोडतील. समजा न्यायालयाने २-३ दिवसांची पोलिस कस्टडी दिली तर पुढच्या मिनिटाला त्याच्या छातीत दुखायला लागून लगेच रूग्णालयात दाखल केले जाईल, तिथे पंचतारांकित बडदास्त ठेवली जाईल, सर्वजण सेवेला हजर असतील आणि जामिनावर सुटेपर्यंत तिथेच मुक्काम राहील. जामिनावर सुटल्यावर दुसर्‍या मिनिटाला छातीत दुखणे थांबेल. अशा व्यक्तींना त्यांच्या साम्राज्यात कोणी केसालाही धक्का लावू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

थोडे अवांतर: काही लोकांच्या नावाच्या मागे-पुढे "राजे", "योगी", "महाराज" असे शब्द मीडिया का वापरते? फुकटचा सन्मान कशासाठी? त्या लोकांच्या बर्थ सर्टिफिकेट वर या उपाध्या नसतील तर कोणीही मीडियामध्ये असे उल्लेख करू नयेत असे मला वाटते.

In reply to by अत्रे

+१ श्रीमंत छत्रपती ** महाराज, युवराज ***राजे असलं काही वाचलं की चीड येते. अजूनही आपण गुलामीच्या काळात वावरत आहोत असेच वाटते. राजेराजवाडे १९४७ मध्येच अंतर्धान पावले. पत्त्यांच्या पॅकमधल्या राजाइतकी सुद्धा आता यांना किंमत नाही. तरीसुद्धा माध्यमे यांचा राजे, छत्रपती, युवराज, महाराज असा उल्लेख करतात तेव्हा संताप येतो. मी अशा लोकांचा त्यांच्या फक्त नावाने उल्लेख करतो. त्यांच्या नावापुढे असल्या गुलामगिरी प्रदर्शित करणार्‍या उपाध्या लावत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही म्हणताय अशा लोकांना किंमत उरली नाही पण चित्र वेगळंच पाहायला मिळतंय. "आया है राजा " ने दणाणून सोडलं सातारला. http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-udayanraje-bhosal…

In reply to by विशुमित

यांना किंमत उरली नाही याचा अर्थ असा आहे की ते पूर्वाश्रमीचे संस्थानिक/राजे असले तरीसुद्धा त्यांना घटनेने किंवा कायद्याने कोणतेही विशेषाधिकार दिलेले नाहीत. स्वातंत्र्यानंतर त्यांना काही काळ वार्षिक तनखा वगैरे मिळत होता. परंतु १९६९ पासून ते सुद्धा बंद झाले. जे कायदे सर्वसामान्य नागरिकांना लागू आहेत तेच कायदे त्यांनाही लागू आहेत व त्यांना इतर कोणत्याही विशेष सोयीसवलती घटनेने दिलेल्या नाहीत. पत्त्यांच्या कॅटमध्ये राजे, राण्या इं. ची किंमत दुर्री, तिर्री इ. च्या तुलनेत जास्त असते. परंतु राज्यघटनेने या राजांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये फरक केलेला नाही. आपले पूर्वज राजे, महाराज वगैरे असले तरी आता लोकशाहीत राजेराजवाड्यांना स्थान नाही हे अजून यांना उमजलेले दिसत नाही. आपण राजे आणि जनता म्हणजे आपली प्रजा अशी अजूनही समजूत असावी. महाराज, श्रीमंत, सरकार, छत्रपती, युवराज इ. संबोधने लावून माध्यमे सुद्धा या समजुतीला खतपाणी घालीत आहेत. आता प्रत्यक्षात जे होत आहे ती वेगळी गोष्ट आहे. माझे काही नातेवाईक सातार्‍यात आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार सातार्‍यात अजूनही काही जण भोसले घराण्यातील व्यक्तींचा उल्लेख महाराज असाच करतात. त्यांना खाजगीत मुजरा केला जातो असेही ऐकिवात आहे. ते राजे आणि आपण रयत, ते महाराज आणि आपण प्रजा, ते सत्ताधारी आणि आपण गुलाम अशी अजूनही काही जणांची समजूत आहे. असे समजण्यामागे दहशत असावी आणि त्याच बरोबरीने मनातील गुलामगिरीची भावनाही असावी. म्हणूनच उदयन भोसले परवा सातार्‍यात अवतीर्ण झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात 'प्रजा' गोळा होऊन 'महाराजां'चा 'जयजयकार' करीत असावी.

In reply to by श्रीगुरुजी

राजेंना अटक झाल्यास महाराष्ट्र पेटेल: भिडे गुरूजी -- एका गुंडाचे समर्थन संभाजी भिडे गुरुजींनी केल्याचे पाहून आश्चर्य वाटले.

In reply to by विशुमित

तुम्ही म्हणताय अशा लोकांना किंमत उरली नाही पण चित्र वेगळंच पाहायला मिळतंय. "आया है राजा " ने दणाणून सोडलं सातारला. http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-udayanraje-bhosale... जरा त्या बातमीखालील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचा. 'महाराजां'ची किंमत कळेल.

In reply to by विशुमित

वाचक सातार्‍याचे दिसतात. काय करणार? आपला 'पोशिंदा', आपला 'पालनकर्ता' असा अडचणीत सापडल्यानंतर 'रयत' दुसरे काय करणार? यांना अजूनही राजा, सम्राट, छत्रपती, महाराज, आपला पोशिंदा समजणारे व आपण यांची रयत, आपण यांचे सेवक असे समजणारे काही जण अजूनही भारतात आहेत. बॉबी जिंदाल ल्युझिआनाच्या गव्हर्नरपदी निवडून आल्यानंतर त्याच्या पूर्वजांच्या मूळ गावी लोकांनी घरांवर गुढ्या तोरणे उभारून आनंदोत्सव केला. बिचार्‍यांना हे कळलेच नाही की भारताचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. त्याचा जन्म अमेरिकेत झाला, त्याने अमेरिकन मुलीशी लग्न केले, भारताशी त्याची जी एकमेव नाळ होती तो हिंदू धर्म सोडून तो ख्रिश्चन झाला, त्याने आपल्या आयुष्यात भारतात कधीही पाऊल टाकलेले नाही . . . अशा माणसाचे पूर्वज आपल्या गावचे होते म्हणून तिथले लोक आनंदाने बेभान झाले होते. तसेच उदय भोसलेच्या काही पूर्वजांनी महापराक्रम गाजविला, पण हा त्यांच्या पासंगालाही पुरत नाही. याचे पूर्वज अत्यंत न्यायी व पराक्रमी राजे म्हणून नावाजले होते. परंतु हा त्यांच्या एकदम विरूद्ध निघाला. तरीसुद्धा काही जणांना त्याच्या पूर्वजांमुळे याच्याबद्दल अभिमान वाटतो.

In reply to by श्रीगुरुजी

04:22 PM साताराः कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खासदार उदयनराजे यांना कोर्टाकडून जामीन मंजूर ... महाराष्ट्र टाईम्स..!!

In reply to by अभ्या..

इथे उत्तर मिळत नसतंय दादा. इथे आणि इथे चांगली माहिती दिली आहे. बाईंनी अनाथाश्रमाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्‍या टोळीला मदत केली असा आरोप आहे. चाईल्ड ट्रॅफिकिंग्ची केस.

In reply to by पुंबा

मग ताज्या घडामोडी असले कशाला नाव? सरळ पांचजन्य नायतर ऑर्गनायझर ठेवा की. दुसरे काय चालते इथे भाजपाच्या मुखपत्राशिवाय?

गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते शंकरसिंग वाघेला यांनी काँग्रेस पक्षाने आपल्याला २४ तासांपूर्वीच पक्षातून काढून टाकले होते असा दावा केला आहे. ते त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांच्याबरोबर आणखी काही आमदार पक्षाबाहेर पडू शकतील. आसामात निवडणुकांपूर्वी काही महिने ज्येष्ठ नेते हिमंत बिस्व शर्मा आणि काही काँग्रेस आमदार बाहेर पडले. त्यातून काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होणार का असा प्रश्न उभा करणारी ही घटना आहे. वास्तविकपणे जर काँग्रेसला गुजरातमध्ये कधीतरी पुनरागमन करायचे असेल तर २०१७ इतकी चांगली संधी दुसरी मिळणे कठिण आहे. नरेंद्र मोदींनी १२-१३ वर्षे काँग्रेसला गुजरातमध्ये डोके वर काढायला फार संधी दिली नव्हती. मोदी कितीही कुशल प्रशासक आणि लोकप्रिय असले तरी त्यांच्या कारकिर्दीत पक्षाचा 'एकखांबी तंबू' बनला. ते गुजरातमध्ये असेपर्यंत गुजरात भाजपमध्ये त्या उंचीचे नेतृत्व उभे राहूच शकले नाही (किंवा मोदींनी तसे होऊ दिले नाही). मोदी केंद्रात गेल्यानंतर जवळपास दोन वर्षे आनंदीबेन पटेल यांची त्यामानाने निष्प्रभ कारकिर्द झाली. पटेल आंदोलन त्यांना हाताळता आले नाही म्हणून त्यांना पदावरून काढून त्यांच्याजागी विजय रूपानी यांची नियुक्ती झाली. विजय रूपानी हे भाजपचे तितके ज्येष्ठ नेते नव्हतेच. नितीन पटेल १९९५ मध्ये केशुभाई पटेलांच्या पहिल्या सरकारमध्येही मंत्री होते. इतर नेते-- वजुभाई वाला (सध्या कर्नाटकचे राज्यपाल), दिलीप संघानी इत्यादी विजय रूपानींना बरेच जास्त ज्येष्ठ आहेत. तेव्हा विजय रूपानींचा कितपत प्रभाव आहे याची कल्पना नाही. तसेच भाजप १९९५ पासून (सप्टेंबर १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता) कायम सत्तेत आहे. म्हणजे 'भाजप फटिग' लोकांमध्ये आला असला तरी ते अपेक्षितच आहे. अशा परिस्थितीत चांगले राज्यस्तरीय नेतृत्व आणि निवडणुकांची आधीपासून केलेली शिस्तबद्ध तयारी या जोरावर भाजपच्या तोंडचे पाणी काँग्रेसला पळवता आले असते. नेमक्या अशाच वेळी वाघेला प्रकरण झाले तर मात्र काँग्रेसला जड जायची शक्यता आहे.

शंकरसिंग वाघेलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ते भाजपमध्ये जाणार नाहीत तर बहुदा स्वतःचा पक्ष स्थापन करतील किंवा राष्ट्रवादीमध्ये जातील अशी चिन्हे आहेत. या निमित्ताने त्यांच्या राजकिय कारकिर्दीविषयी लिहितो. गुजरातमध्ये भाजप पक्ष मोठा करण्यात महत्वाचा वाटा होता केशुभाई पटेल, अशोक भट आणि शंकरसिंग वाघेलांचा. त्यापैकी वाघेला हे सर्वात जास्त जनसंग्रह असलेले नेते होते. एकेकाळी शंकरसिंग वाघेला हे पक्षाचे मोठे नेते होते आणि नरेंद्र मोदी तितके महत्वाचे नव्हते. मोदी पंतप्रधानपदावर विराजमान होणार हे नक्की झाल्यावर गुजरात विधानसभेत त्यांना निरोप देण्यात आला होता. त्यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते असलेले शंकरसिंग वाघेला थोडे भावूक झाले होते. वाघेला आणि मोदींनी एकत्र गुजरात अक्षरशः पिंजून काढून पक्षाची लोकप्रियता वाढवली. बहुतेक वेळा वाघेला स्कूटर चालवत आणि मोदी त्यांच्यामागे असत ही आठवण त्यांनी गुजरात विधानसभेत सांगितली. जनसंघाच्या काळात मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पक्षाची थोडीफार ताकद होती. पण गुजरातमध्ये पक्ष कधीच बळकट नव्हता. अशा राज्यात पक्षाची पाळेमुळे रोवण्यापासून पक्षाला मोठे करण्यात शंकरसिंग वाघेलांचा मोठा वाटा होता. १९९० मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि जनता दलाने १८२ पैकी सुमारे १५० जागांवर युती करून निवडणुक लढवली. आणि उरलेल्या जागांवर दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. निवडणुकांमध्ये जनता दलाला ७० तर भाजपला ६७ जागा मिळाल्या. गुजरातमध्ये प्रथमच भाजपला इतके यश मिळाले. माझ्या आठवणीप्रमाणे या निवडणुकांच्या वेळी वाघेला भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी निवडणुक लढवली नव्हती. ते संघटनेचा माणूस म्हणूनच राहिले. १९९० मध्ये अडवाणींनी त्यांची रथयात्रा गुजरातमधील सोमनाथ येथून सुरू केली. या रथयात्रेला गुजरातमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये पक्षाला अजून मजबूत करण्यासाठी लालकृष्ण अडवाणींनी गांधीनगर मधून निवडणुक लढवली आणि ते १ लाख २५ हजार मतांच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यावेळी वाघेला गोधरा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. वाघेलांचे मताधिक्य १ लाख ११ हजार म्हणजे अडवाणींपेक्षा कमी असले तरी टक्केवारीमध्ये ते गुजरातमध्ये सर्वाधिक होते (जवळपास ३४%). १९९१ मध्ये गुजरातमध्ये 'हिंदुत्वाची लाट' आली होती आणि भाजपने २६ पैकी २० जागा जिंकल्या. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या रामायणातील रावण (अरविंद त्रिवेदी साबरकांठामधून) आणि सीता (दिपीका चिखलिया बडोद्यामधून) भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यानंतर वाघेलांचे गुजरातमधले महत्व अजून वाढले. इतकी वर्षे वाघेला हे संघटना बांधणारे आणि केशुभाई पटेल हे पक्षाचे गुजरात विधानसभेतील नेते होते. केशुभाई १९७७, १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये विधानसभेवर निवडूनही गेले होते. ते १९९० मध्ये चिमणभाई पटेल हे जनता दल-भाजप सरकारचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीही होते. पक्षाला एवढे यश मिळाले त्यामागे सगळ्यात महत्वाचा वाटा वाघेलांचा होता. त्यांचे संघटना कौशल्य, लोकसंग्रह आणि नेतृत्वाची लोकप्रियता इतर कोणत्याही भाजप नेत्यापेक्षा जास्त होती. त्यातून त्यांची महत्वाकांक्षा जागी झाली आणि त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली. १९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे पक्षाचा जोरदार प्रचार केला. भाजपला विजय मिळणार हे अगदीच पक्के होते. फक्त किती जागा मिळणार हा प्रश्न होता. शेवटी भाजपने १८२ पैकी १२१ म्हणजे जवळपास दोन-तृतीयांश बहुमत मिळवले. निवडणुकांनंतर आपल्याला मुख्यमंत्री केले जाईल अशी वाघेलांची बर्‍यापैकी रास्त अपेक्षा होती. पण पक्षाने केशुभाई पटेलांना मुख्यमंत्री केले. तिथेच वाघेला दुखावले गेले. मुख्यमंत्री झाल्यानंतर केशुभाईंनी काही प्रमाणावर वाघेलांना एकटे पाडायचा प्रयत्न केला. नवे राज्य सरकार आल्यावर राज्याच्या अखत्यारीतल्या विविध महामंडळांवर नव्या नियुक्त्या केल्या जातात आणि बहुतेक सर्व नियुक्त्या राजकीयच असतात. अशा नियुक्त्या करताना केशुभाईंनी वाघेलांना विश्वासात न घेता परस्पर आपल्याच मर्जीतल्यांची नियुक्ती केली. मे १९९५ मध्ये मुख्यमंत्री केशुभाई पटेल गुजरातमध्ये परदेशातून गुंतवणुक आणायच्या उद्देशाने अमेरिकेला गेले होते आणि त्या काळात अशोक भट यांच्याकडे महत्वाचे निर्णय घ्यायचे अधिकार केशुभाईंनी दिले होते. त्यावेळी वाघेलांनी काही महामंडळांवरील नियुक्त्या रद्द करायला अशोक भटना भाग पाडले. दुखावल्या गेलेल्या वाघेलांच्या भावनांचा स्फोट झाला सप्टेंबर १९९५ च्या शेवटी. २८ सप्टेंबर १९९५ रोजी पक्षाच्या सुमारे ५० आमदारांना एकत्र आणून वाघेलांनी केशुभाईंच्या सरकारविरूध्द बंड पुकारले. भाजपमध्ये ही गोष्ट अगदीच अभूतपूर्व होती. १९७३ मध्ये बलराज मधोकांना पक्षातून काढले हा एक अपवाद वगळता इतक्या ज्येष्ठ नेत्याने असे बंड करणे पक्षात त्यापूर्वी कधीच झाले नव्हते. वाघेलांनी काही मुद्दे मांडले होते ते रास्त होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी केशुभाई आणि आपण आठवड्यातून एकदा तरी भेटत असू आणि अनेकदा एकत्र जेवणही करत असू पण मुख्यमंत्री झाल्यानंतर केशुभाई बदलले आहेत असे वाघेलांनी म्हटल्याचे पेपरात छापून आले होते. तसेच भाजपच्या १२१ आमदारांपैकी किमान ४० आमदार मुळात काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये डावलले गेल्याची भावना आहे हा दुसरा त्यांचा आक्षेप होता. वाघेलांचा तिसरा आक्षेप होता की केशुभाईंवर 'काही' व्यक्तींचा प्रभाव आहे. आणि या काही व्यक्तींमध्ये होते गुजरात भाजपचे सरचिटणीस नरेंद्र मोदी!! भाजपने शंकरसिंग वाघेलांना पक्षातून काढले. राज्यपाल कृष्णपालसिंग यांनी मुख्यमंत्री केशुभाई पटेलांना ७ ऑक्टोबर १९९५ पर्यंत विधानसभेत बहुमत सिध्द करायला सांगितले. दरम्यानच्या काळात वाघेलासमर्थक आमदारांना खजुराहोला एका रिझॉर्टमध्ये नेण्यात आले आणि एका अर्थी त्यांच्या संपर्कात भाजप नेते येऊ शकणार नाहीत याची काळजी घेतली. दरम्यानच्या काळात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने वाघेलांशी बोलणी सुरू केली. स्वतः अडवाणी आणि वाजपेयींनी मध्यस्थी केली. वाटाघाटींमध्ये अडचण येऊ नये म्हणून वाघेलांच्या मनाप्रमाणे व्हावे या उद्देशाने नरेंद्र मोदींनी गुजरातमधील पक्षाच्या सरचिटणिसपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना दिल्लीला पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात हलविण्यात आले. अगदी शेवटी दोन बाजूंमध्ये समेट झाला. वाघेलांना पक्षात परत घेण्यात आले. ७ ऑक्टोबरच्या विश्वासदर्शक ठरावावर 'खजुरीया' आमदारांनीही केशुभाईंच्या सरकारच्या बाजूने मत देऊन सरकार वाचवावे पण नंतर केशुभाईंनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्याजागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्यात आली असे ठरले. त्यानंतर केशुभाईंच्या जागी सुरेश मेहता यांची मुख्यमंत्रीपदावर नियुक्ती करण्यात आली. वाघेलांचे १९९५ मधील बंड शमले पण त्यामुळे आलेली कटुता कायम राहिली. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाघेलांनी गोधरा लोकसभा मतदारसंघातून परत भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवली पण त्यात त्यांचा ३ हजार मतांनी थोडक्यात पराभव झाला. आपला जाणूनबुजून पराभव करण्यात आला हे वाघेलांना समजले. पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते वाघेलांच्या बंडामुळे दुखावले गेले होते. त्यांनी वाघेलांचा व्यवस्थित प्रचार केला नाही हे तर अगदीच उघड होते. आणि पडद्याआडून गुजरात भाजपमधील नेत्यांनीही वाघेलांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. त्यातून वाघेला आणि पक्ष नेतृत्व यांच्यात मतभेद अजून वाढले. शेवटी २८ ऑगस्ट १९९६ रोजी वाघेलांची भाजपमधून परत हकालपट्टी करण्यात आली. सप्टेंबर १९९६ मध्ये वाघेलांनी मोठी सभा घेऊन आपल्या 'महागुजरात जनता पक्ष' या पक्षाची स्थापना केली. त्या पक्षात भाजपचे अनेक आमदार सामील झाले. दरम्यान सुरेश मेहतांना राज्यपाल नरेश चंद्रांनी बहुमत सिध्द करायला सांगितले. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी १८२ पैकी ९२ मते घेऊन बहुमत सिध्द केले. पण त्यावेळी गुजरात विधानसभेत बराच गदारोळ झाला. त्याचे निमित्त करून विश्वासदर्शक ठरावावर खुल्या वातावरणात मतदान झाले नाही हा ठपका देवेगौडांच्या केंद्र सरकारने ठेऊन सुरेश मेहतांचे सरकार ३५६ व्या कलमाखाली बरखास्त केले. भाजपमधून बाहेर पडल्यावर सुरवातीला वाघेला आम्हीच खरे रा.स्व.संघवाले असे म्हणत असत (जसे काँग्रेसमधून बाहेर पडलेले अनेक 'आमचीच खरी काँग्रेस' असे म्हणतात त्या धर्तीवर). पण नंतर काँग्रेसच्या पाठिंब्याने वाघेला मुख्यमंत्री बनू शकतात ही चाहूल लागल्यावर वाघेलांनी परत 'आम्हीच खरे संघवाले' असे म्हटले नाही. शेवटी ऑक्टोबर १९९६ मध्ये वाघेला काँग्रेसच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. वाघेलांचा काँग्रेसबरोबरचा संसार वर्षभर टिकला. त्यातही कुरबुरी होतच होत्या. शेवटी वाघेलांच्या सरकारचा पाठिंबा काँग्रेसने ऑक्टोबर १९९७ मध्ये काढला. एक तडजोड म्हणून वाघेलांच्या ऐवजी दुसर्‍या नेत्याला पाठिंबा द्यायला काँग्रेसने तयारी दाखवली. त्यानुसार दिलीप पारेख हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले. ही तडजोडही फार काळ चालली नाही. परत काँग्रेसबरोबर कुरबुरी झाल्या आणि दिलीप पारेखनी राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त केली. गुजरात विधानसभेसाठी मतदान फेब्रुवारी १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांबरोबर झाले. दरम्यान वाघेलांनी आपल्या पक्षाचे नाव 'राष्ट्रीय जनता पक्ष' असे बदलले. १९९८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये वाघेलांच्या राजपला १८२ पैकी चारच जागा मिळाल्या पण सुमारे बारा टक्के मते मिळाली. वेगळा पक्ष काढून आपल्याला फारसे काही मिळाले नाही हे वाघेलांच्या लक्षात आले. त्यांना न आवडणारे केशुभाई परत मुख्यमंत्री झाले. भाजपत परत जायचा प्रश्नच नव्हता. स्वतंत्र अस्तित्व ठेवले तर त्यातून हातात फारसे काही मिळत नाही. अशावेळी वाघेलांनी १९९८ च्या शेवटी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. म्हणजे गंमत बघा-- भाजपच्या आमदारांपैकी बरेच आमदार मुळचे काँग्रेसचे आहेत म्हणून भाजप कार्यकर्त्यांना डावलले जाते असा आरोप करणारे वाघेला स्वतःच काँग्रेसवासी झाले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाघेलांच्या पक्षाची मते अधिक काँग्रेसची मते एकत्र होऊन विजय मिळेल अशी काँग्रेसची अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. वाघेला काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांच्या मतदारांनी परत भाजपला मते दिली आणि भाजपने राज्यातील २६ पैकी २० जागा जिंकल्या. २००२ च्या दंगलींनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वाघेला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले नव्हते. पण त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. अर्थातच त्याचा फार उपयोग झाला नाही. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वाघेला कपडवंज लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते मनमोहनसिंगांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला. २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शंकरसिंग वाघेला कपडवंज विधानसभा मतदारसंघातून तर त्यांचे पुत्र महेंद्र वाघेला बायडमधून विजयी झाले. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांचा-- अर्जुन मोडवाडिया, भरत सोळंकी पराभव झाला. त्यानंतर शंकरसिंग वाघेला गुजरात विधानसभेतील विरोधीपक्षनेते झाले. गेल्या काही महिन्यांपासून वाघेला काँग्रेस नेतृत्वाविषयी नाराज होते अशा बातम्या होत्याच. ज्या पध्दतीने काँग्रेस पक्ष गुजरातमधील कारभार बघत आहेत त्यावरून काँग्रेस जिंकणे कदापि शक्य नाही आणि मला त्या पापात भागीदार व्हायचे नाही असेही वाघेला जाहिरपणे म्हणाले. त्यांनी राहुल गांधींना ट्विटरवर अनफॉलो केले. तरीही नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. काँग्रेस पक्ष संकटात असताना जे काही करू शकतील अशा नेत्यांना जवळ ठेवायचे सोडून राहुल गांधी अधिकाधिक दूर लोटत आहेत. आसामात हिमंत बिस्व शर्मा गेले तसे गुजरातमध्ये आता वाघेला गेले. आपल्याला २०१७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहिर करावे आणि आपल्याला गुजरातमध्ये उमेदवार निवडीपासून प्रचाराप्रर्यंत 'फ्री हॅन्ड' द्यावा अशी वाघेलांची मागणी होती. ती पक्षाने मान्य केली नाही. शेवटी आज २१ जुलै रोजी त्यांनी पक्षातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. ते भाजपत परत जाणार नाहीत असे म्हणाले आहेत. मला वाटते की १९९९ चा अनुभव लक्षात घेऊन वाघेला भाजपमध्ये परत आल्यापेक्षा स्वतंत्रपणे लढले तर काँग्रेसचे जास्त नुकसान करतील असे वाटून अमित शहांनी त्यांना निवडणुका होईपर्यंत थांबायला सांगितले असावे. वाघेलांची राजकिय कारकिर्द बघून आश्चर्य वाटते आणि वाईटही वाटते. एकेकाळचा इतका मोठा आणि चांगला नेता पण आज तो दर्जा कुठेच राहिला नाही. एकेकाळी नरेंद्र मोदींना गुजरात भाजपमधून दिल्लीला जायला भाग पाडणारे वाघेला त्याच मोदींकडे 'मला पक्षात परत घ्या' असे सांगत असतील का? असेलही. कालाय तस्मै नमः यातून एक धडा नक्कीच आहे. समजा एखादी गोष्ट पटली नाही म्हणून केडर बेस्ड पक्षात बंड केले तर कदाचित तात्कालिक फायदा होऊ शकतो. पण दिर्घकाळाचा विचार करता नुकसानच होते. वाघेला पक्षातच असते तर कदाचित केशुभाईंनंतर मुख्यमंत्री म्हणून मोदींची नियुक्ती करण्याऐवजी त्यांची नियुक्ती केली असती आणि सगळाच इतिहास पालटला असता. अर्थात अशा जर-तर ला अर्थ नसतो. पण वाघेलांना 'कुठून एकदा बंड करायची अवदसा आठवली' असे नक्कीच म्हणत असतील.

In reply to by गॅरी ट्रुमन

मान गये गॅरी भाऊ !!!! वाघेलांच्या बद्दल मस्त लिहिले आहे यातले मला तर काहीच माहिती नव्हते.

In reply to by गॅरी ट्रुमन

१९९० मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि जनता दलाने १८२ पैकी सुमारे १५० जागांवर युती करून निवडणुक लढवली. आणि उरलेल्या जागांवर दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या. निवडणुकांमध्ये जनता दलाला ७० तर भाजपला ६७ जागा मिळाल्या. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत वि. प्र. सिंग यांचा जनता दल व भाजपची गुजरात व राजस्थान मध्ये युती होती. गुजरात मध्ये भाजपने १४ पैकी १२ व जनता दलाने १२ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. राजस्थान मध्ये भाजपने १३ पैकी १३ व जनता दलाने १२ पैकी १२ जागा जिंकल्या होत्या.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, तुमचे असे प्रतिसाद मिपावर यायच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे. तुमचा अभ्यास अफाट आहे. त्याचा आम्हा मिपाकरांना सदैव असाच लाभ मिळू द्यात.

In reply to by गॅरी ट्रुमन

समजा एखादी गोष्ट पटली नाही म्हणून केडर बेस्ड पक्षात बंड केले तर कदाचित तात्कालिक फायदा होऊ शकतो. पण दिर्घकाळाचा विचार करता नुकसानच होते
सहमत. हीच गोष्ट महाराष्ट्रात नारायण राणे ह्यांच्या बाबतीत घडली. एके काळचा मुख्यमंत्री आणि तब्बल सलग ७ वर्षे विरोधी पक्षनेता हे पद संभाळून सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करून सोडलेल्या नारायण राणेंना काँग्रेस मध्ये सुरवातीला महसूल मंत्री आणि नंतर तुलनेत दुय्यम समजले जाणारे ऊर्जा मंत्री पद स्वीकारावे लागले. विरोधी पक्षनेता हे पद तर मुख्यमंत्र्याच्या दर्जाचे समजले जाते. आज राणेंची काय अवस्था झालीय हे दिसतेच आहे. समजा शिवसेनेतच राहिले असते तर राणेंना आणि शिवसेनेला देखील खूप फायदा झाला असता. कारण सरकारच्या प्रत्येक कृतीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करणारा हा सेनेचा एकमेव नेता होता.

In reply to by अभिजीत अवलिया

कारण सरकारच्या प्रत्येक कृतीचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करणारा हा सेनेचा एकमेव नेता होता. असहमत. आजतगायत राणेंचा 'अभ्यासपूर्ण' (!) प्रतिवाद दिसलेला नाही. मागील वर्षी राणे विधानपरीषदेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारवर टीका करणारे व अनेक आरोप करणारे एक जोरदार भाषण केले होते. त्यातील बहुसंख्य आरोप निराधार होते. त्या भाषणानंतर इतर विरोधी पक्षनेत्यांनी वाहिन्यांवरील चर्चेत सांगितले होते की राणेंच्या भाषणाचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला कारण महत्त्वाच्या गंभीर विषयांवर बोलायचे सोडून ते निराधार आरोप करीत होते व ते आरोप मंत्र्यांनी लगेच आकडेवारीसहीत खोडून काढल्यामुळे विरोधकांची विश्वासार्हता कमी झाली आहे. राणे विरोधी पक्षनेता असताना १९९९ ते २००२ अशी लागोपाठ ३ वर्षे राज्याचे अंदाजपत्रक सादर झाले की भरपूर आकडेवारी देऊन त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करणारा जवळपास एक पूर्ण पानी अभ्यासू लेख 'लोकसत्ता'मध्ये त्यांच्या नावाने प्रसिद्ध होत होता. तो लेख एखाद्या अनुभवी अर्थतज्ज्ञाने लिहावा इतका सविस्तर व अभ्यासू असायचा. राणेंसारखा फारसा न शिकलेला माणूस इतका अभ्यासू लेख लिहू शकेल का याविषयी सुरवातीपासूनच संशय होता. त्या लेखाचा खरा लेखक कोणतरी वेगळाच होता अशी वदंता होती. २००३ पासून तसा लेख प्रसिद्ध होणे बंद झाले. हा माणूस खरोखरच अभ्यासू असता तर त्यांच्याकडून सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर असे लेख आले असते. मुळात राणे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेना नेत आणि अभ्यास यांच्या ३६ चा आकडा आहे हे आजही दिसून येते. फुशारक्या, भावनिक मुद्दे, गुंडगिरी यापलिकडे सेना नेत्यांची मजल जात नाही. अभ्यास, चिंतन, विचार करणे इ. यांच्या कक्षेत येत नाही. राणेंनी अशा पक्षात आयुष्यातील बराच काळ घालविलेला आहे. काँग्रेसवासी झाल्यानंतरही या संस्कारात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण प्रतिवाद वगैरे निव्वळ गफ्फा आहेत.

In reply to by गॅरी ट्रुमन

ते भाजपत परत जाणार नाहीत असे म्हणाले आहेत. मला वाटते की १९९९ चा अनुभव लक्षात घेऊन वाघेला भाजपमध्ये परत आल्यापेक्षा स्वतंत्रपणे लढले तर काँग्रेसचे जास्त नुकसान करतील असे वाटून अमित शहांनी त्यांना निवडणुका होईपर्यंत थांबायला सांगितले असावे. देवेगौडा, पवार, केशुभाई पटेल अशा इतर अनेक नेत्यांप्रमाणेच वाघेला is a spent force. त्यांचे राजकीय जीवन आता जवळपास संपुष्टात आले आहे. ते आता काँग्रेसमध्ये राहिले किंवा काँग्रेस सोडून इतर कोणत्याही पक्षात गेले किंवा स्वतःचा वेगळा पक्ष काढला तरी कोणत्याही पक्षाला फारसा फायदा/तोटा होणार नाही व त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. काँगेसने मुळात गुजरातमध्ये १९९५ नंतर नवीन नेतृत्व आणण्यासाठी जवळपास काहीच केले नाही. कधी वाघेला, कधी माधव सोळंकी (आणि नंतर भरत सोळंकी), कधी केशूभाई पटेलांना गुपचुप पाठिंबा इ. वरच काँग्रेस विसंबून राहिली. भाजपच्या हिंदु कार्डला उत्तर म्हणून काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळून पाहिले. परंतु त्याचा उपयोग शून्य झाला. चिमणभाई पटेलसारख्या खमक्या नेत्यानंतर काँग्रेसला आजपर्यंत तिथे योग्य नेता मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वांना धन्यवाद. हो बरोबर. वाघेला हे पण spent force आहेत. २०१२ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसला ६१ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी १२-१५ आमदार जरी वाघेला समर्थक असतील तर तो पण मोठा आकडा आहे-- विशेषतः काँग्रेस सध्या प्रचंड अडचणीत असताना. २०१२ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत ९% चा फरक होता. वाघेला आणि हे १२-१५ आमदार काँग्रेसची समजा अजून २% मते जरी कमी केली तरी काँग्रेसपुढची डोकेदुखी आणखी वाढेल. सध्या काँग्रेसमध्ये spent force नसलेले फारच थोडे नेते शिल्लक आहेत. त्यात आणखी थोडी मतेही काँग्रेसपासून दूर गेली तर कसे चालेल? इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमध्ये काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून दारूण अवस्थेत आहे. काँग्रेसने शेवटची निवडणुक जिंकली होती १९८५ मध्ये म्हणजे तब्बल ३२ वर्षांपूर्वी. १९७३-७४ मधील गुजरातमधील नवनिर्माण विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोठ्या अडचणीत होती असे म्हटले जात होते. १९७५ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने १८२ पैकी ७५ जिंकल्या तरी तो काँग्रेस पक्षाचा मोठा धुव्वा उडाला असे म्हटले गेले होते. १९९० नंतर काँग्रेसने ६१ पेक्षा जास्त जागा मिळविलेल्या नाहीत यातूनच काँग्रेसची गुजरातमधील अवस्था समजून येईल. अर्थातच पूर्ण देशातील कलाला अनुसरूनच गुजरातमध्येही झाले. १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १९७ जागा मिळविल्या होत्या तो काँग्रेसचा मोठा पराभव समजला गेला होता पण २००९ मध्ये त्यापेक्षा थोड्याच जास्त म्हणजे २०६ जागा मिळविल्या तर तो काँग्रेसचा 'नेत्रदीपक विजय' वगैरे म्हटले गेले होते. काँग्रेस पक्ष इतक्या अडचणीत असताना थोडाथोडका का होईना जनाधार असलेल्यांना दूर लोटून कसे चालेल?

गॅरी ट्रुमन,
केडर बेस्ड पक्षात बंड केले तर कदाचित तात्कालिक फायदा होऊ शकतो. पण दिर्घकाळाचा विचार करता नुकसानच होते.
याबाबत उदिशाचे बिजू व नवीन पटनायकांचं कौतुक आहे. त्यांनी भाजपला योग्य अंतरावर ठेवून हाताळलं. आ.न., -गा.पै.

एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला आहे. त्यात चीन कशा भारतात घडामोडी घडवुन आणत आहे असे सुचित केले आहे. त्यात असेही लिहीलेय की कर्नाटक मध्ये यायला व्हिसा लागु करावा अशी तिथेल्या काँग्रेस सरकारची मागणी आहे आणि केरळातही वेगळ्या झेंड्याची मागणी केलीये, असे लिहीलेय. हे खरे आहे का? झेंडा तर असु शकतोच ना वेगळा राज्याचाही. जसा आर्मीचा असतो. की तशी परवानगी नसते? आणि व्हिसा वगैरे तर काहीच्या काही फेकलंय असं माझं मत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

भारतीयांना मुंबईत येण्यासाठी व्हिसा सिस्टीम राबवावी अशी मागणी पूर्वी एकदा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती असे अंधुक अंधुक आठवत आहे. कुणाला याची कांही माहिती आहे का..?

In reply to by मोदक

भारतीयांना मुंबईत येण्यासाठी व्हिसा सिस्टीम राबवावी अशी मागणी पूर्वी एकदा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती असे अंधुक अंधुक आठवत आहे.
१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मुंबईत परमीट पध्दती अंमलात आणावी असे म्हटले होते. म्हणजे मुंबईबाहेरून कोणी शहरात येणार असेल तर त्या व्यक्तीला किती काळ मुंबईत वास्तव्य करता येईल ही मुदत घालावी आणि ती मुदत संपल्यावर त्या व्यक्तीला मुंबई सोडणे सक्तीचे व्हावे. मनोहर जोशींनी हे वक्तव्य मुख्यमंत्री झाल्यावर अगदी आठवड्याभरातच केले होते. नंतर त्यांनी परमीट पध्दत ही एक सूचनाच आहे असे म्हटले होते. मनोहर जोशींच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत बराच गदारोळ झाला होता. मनोहर जोशींच्या विधानावरून उठलेला वाद शमतो ना शमतो तोच बाळासाहेब ठाकरेंचे एक वादग्रस्त वक्तव्य आले होते त्यामुळे लोकसभेत परत गदारोळ उडाला होता. त्यावेळी बाळासाहेबांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशा स्वरूपाची माहिती मुंबई पोलिसांकडे आली होती आणि ती बातमी वर्तमानपत्रांमध्येही छापण्यात आली होती. त्यावर सामनात लिहिताना बाळासाहेबांनी 'तशीच वेळ आली तर हल्लेखोर ज्या रंगाचा असेल तो रंग हिंदुस्तानातून मिटवून टाका' असे म्हटले होते. बाळासाहेबांच्या या वक्तव्यानंतर परत एकदा लोकसभेत गदारोळ झाला होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

त्यावर सामनात लिहिताना बाळासाहेबांनी 'तशीच वेळ आली तर हल्लेखोर ज्या रंगाचा असेल तो रंग हिंदुस्तानातून मिटवून टाका' असे म्हटले होते. याचे मी ऐकलेले वर्जन असे आहे की "ज्या रंगाची गोळी माझा वेध घेईल तो रंग हिंदूस्थानातून मिटेल" तुम्ही म्हणत आहात त्या वाक्यामध्ये आवाहन आहे तर मी म्हणतो आहे त्यात त्यांनी (त्यांच्या अनुषंगाने) वस्तुस्थिती मांडली होती, जी किमान महाराष्ट्राच्या बाबतीत खरी होती. अगदी रंग नामशेष झाला नसता पण दंगली नक्की झाल्या असत्या.

In reply to by मोदक

तुम्ही म्हणत आहात त्या वाक्यामध्ये आवाहन आहे तर मी म्हणतो आहे त्यात त्यांनी (त्यांच्या अनुषंगाने) वस्तुस्थिती मांडली होती, जी किमान महाराष्ट्राच्या बाबतीत खरी होती.
ज्या रंगाची गोळी माझा वेध घेईल तो रंग मिटेल असे बाळासाहेबांनी म्हटले असेल ही शक्यता जास्त. बाळासाहेबांच्या वक्तव्यात रंग मिटवण्याचा उल्लेख असल्याचे माझ्या लक्षात आहे. पण ते रंग मिटेल असे म्हणाले होते की मिटवा असे म्हणाले होते हे बघायला हवे. 'मिटेल' आणि 'मिटवा' या दोन शब्दांमध्ये बराच फरक आहेच.

In reply to by गॅरी ट्रुमन

मिटवा असे म्हटले होते. 'गोळी ज्या रंगाची असेल तो रंग महाराष्ट्रातच नव्हे तर हिण्दुस्थानात शिल्लक ठेवायचा नाही. सगली अंडी-पिल्ली ठेचून टाका. शिवरायाची शपथ आहे.' असे वाक्य होते.

In reply to by मोदक

बाळासाहेब अशी वक्तव्ये वेगवेगळ्या संदर्भात अनेकदा करायचे. त्यांच्या वक्तव्यांना गांभिर्याने घ्यायची गरज नव्हती. "देशात गांधीजींच्या पुतळ्याऐवजी नथुरामचे पुतळे उभारले पाहिजेत", "फक्त १ दिवस पंतप्रधान करा. काश्मिर प्रश्न २४ तासात सोडवून दाखवितो.", "हिंदू जिहादी तयार व्हायला हवेत" अशा प्रकारची त्यांची वक्तव्ये कोणी गांभिर्याने घेतली असतील असे वाटत नाही. मुंबईत येण्यासाठी व्हिसा किंवा ज्या रंगाच्या गोळीने मला मारतील तो रंग मिटवून टाका ही वक्तव्ये त्याच प्रकारातील आहेत. मातोश्रीत सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात बसून अशी निरर्थक प्रक्षोभक वक्तव्ये करण्याचा त्यांचा वारसा त्यांच्या सुपुत्राने, पुतण्याने व इतर सेना नेत्यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असहमत. मला विचाराल तर मुंबईमध्ये येण्यावर बंधन घालण्याची सूचना लॉजिकल आहे आणि फक्त ती शिवसेनेकडून / बाळासाहेबांच्याकडून आल्यामुळे त्याचा विरोध झाला. मुंबईची लोकसंख्या सहन करण्याची क्षमता कित्येक वर्षांपासून संपली आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात लोकसंख्या एकवटली आहे की आता विकेंद्रीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. वेगळे विमानतळ बांधा, वेगळ्या रेल्वे / लोकल लाईन बनवा आणि सरळ एक वेगळे शहर वसवा पण सध्या मुंबईत लोकल आणि बसगाड्या ज्या प्रकारे ओसंडून वाहतात ते पाहता ही सूचना योग्य होती असे माझे वैयक्तीक मत.

In reply to by मोदक

लोकसंख्या कमी करायचे अजूनही मार्ग आहेत (मुंबई व्हिसा ऐवजी). उदा. झोपडपट्टयाना परवानगी न देणे, फेरीवाल्याना, रस्त्यावर झोपणार्यांना बंदी घालणे वगैरे वगैरे. असे उपाय केले की मुंबईतून लोकं आपोआप कमी होतील, व्हिसा ची गरज नाही. पण या सर्व लोकांकडून मते आणि हफ्ते मिळत असल्याने परिस्थिती बिघडत असावी.

http://indiatoday.intoday.in/story/nia-hurriyat-india-today-expose-paki… काश्मिरमध्ये अशांतता माजविण्यासाठी पाकिस्तानकडून हवाला मार्गाने पैसे घेतल्याच्या आरोपावरून हुरियतच्या ७ नेत्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. या ७ जणांमध्ये गिलानीच्या जावयाचा देखील समावेश आहे. पुढील काळात मिरवैझ, शब्बीर शाह, यासिन मलिक इ. पकडले जातील असे वाटते. केंद्र सरकार व लष्कर हळूहळू पण निश्चितपणे काश्मिरमधील देशद्रोह्यांच्या भोवती फास आवळत आहे. २०१७ मधील पहिल्या ६ महिन्यातच लष्कराने ९२ अतिरेकी/घुसखोरांना गोळ्या घालून मारले आहे. मागील २-३ वर्षांपेक्षा हा आकडा जास्त आहे. कोणाशीही चर्चा नाही व गोळीला गोळीने उत्तर देण्यासाठी लष्कराला मुक्तहस्त हे नवीन धोरण निर्धाराने राबविले जात आहे. जुलै २०१६ मध्ये बुर्‍हान वाणीला मारल्यानंतर जवळपास ४ महिने पोलिस व लष्करावर दगडफेक होत होती. त्यात अनेक जवान व पोलिस जखमी झाले. परंतु लष्कराने अतिशय कठोरपणे परिस्थिती हाताळून व प्रसंगी पॅलेट बंदुकीचा वापर करून निदर्शकांवर जोरदार कारवाई केली. यापुढे लष्कराची भूमिका अजून कठोर होत जाणार असा अंदाज आहे.