Skip to main content

कोथरूड (पुणे) इथे कुणी मिपाकर आहेत का? मी उद्या ३ जुलै २०१७ ला कोथरूडला आहे.

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 02/07/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो) मी उद्या संध्याकाळी, सोमवार दिनांक ३-०७-२०१७ कोथरूड (पुणे) इथे येत आहे. मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीला परत येणार. एखादा मिनी कट्टा पण करता येईल आणि त्या निमित्ताने पुण्यातील मिपाकर मित्रांना पण भेटता येईल, हा हेतू आहेच. आपलाच (कट्टाप्पा) मुवि
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13234
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

नाय ब्वा. पुणं लै महाग आहे. आमचा गरीबाचा रायगड जिल्हा झिंदाबाद. पोराच्या अॅडमिशनसाठी पुण्याला आहे. लवकरच परत जाईन.

मला जायला थोडा ऊशीरच झालेला, कसाबसा पत्ता शोधत शोधत गेलो एकदाचा, दारात पोहोचल्यावर वाटत होतं जाऊ का नको आत, पन गेलो धीर एकवटुन, आणि आत जाऊन बसलो मांजरासारखा अंग चोरुन, पन एकंदरीत छान वाटलं सर्वांना भेटुन, फक्त वेळ मात्र थोडाच मिळाला, पुढच्या वेळी खास सवडच काढावी लागेल.

In reply to by भीमराव

प्रत्येक कट्ट्याच्या शेवटी असेच वाटते... आणि मग परत दुसर्‍या कट्ट्याचे वेध लागतात.

मी सायली.. अजयाची शेजारीण . मध्यवर्ती खतरूडातली. नशिबाने फक्त ४ मजले उतरून खाली इतक्या सोईच्य ठिकाणी कट्टा ठरला आणि खूप दिवसा ची ईच्छा पूर्ण झाली मिपाकराना भेटायची. मुवि, अजया, आभिजित , ईश्वरदास. छान वाटलं भेटुन. पहील्यादा भेटतोय असं वाटलंच नाही. मुलगा झोपी गेल्यामुळे गप्पा आवरत्या घ्याव्या लागल्या. नक्की खास सवड काढुन भेटू परत !!! ( मध्यवर्ती खतरूडात ) अन्य मिपा करांना भेटायला नक्की आवडेल.