Skip to main content

कोथरूड (पुणे) इथे कुणी मिपाकर आहेत का? मी उद्या ३ जुलै २०१७ ला कोथरूडला आहे.

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 02/07/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो) मी उद्या संध्याकाळी, सोमवार दिनांक ३-०७-२०१७ कोथरूड (पुणे) इथे येत आहे. मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीला परत येणार. एखादा मिनी कट्टा पण करता येईल आणि त्या निमित्ताने पुण्यातील मिपाकर मित्रांना पण भेटता येईल, हा हेतू आहेच. आपलाच (कट्टाप्पा) मुवि
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13234
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

धागा काढून करायचं प्रयोजन कळलं नाही. त्यातही माझं असंच असतं अन माझं तसं असतं प्रकारच जास्त, एकंदरीत मला पहा फुले वहा प्रकार..... अत्यंत वायफळ धागा

In reply to by जेम्स वांड

+ १ पण आम्ही नेहमीच वायफळ धागे काढतो, त्यात आता आम्हाला पण विशेष वाटत नाही.आमच्या धाग्यांकडे आपण दूर्लक्ष केल्यास उत्तम. उगाच तुम्ही मानसीक त्रास करून घेवू नये, ही विनंती. शिवाय आम्हाला समाजात रहायला (झुंडीत नाही.) आवडते. साधारण पणे एक तरी समान आवड असलेले मिपाकर मिळाले तर उत्तमच आणि अद्याप तरी ते मिळालेले आहेत.

In reply to by जेम्स वांड

खेदाने नमूद करतो, माझ्यामते अत्यंत अनावश्यक प्रतिक्रिया! पुण्यात कट्टा करता येईल का? अशा साधारण आशयाचा धागा आहे हे साधारणपणे दिसून येते आहे आणि त्यात वायफळ असे काही वाटत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आपण मालक /चालक/ संस्थळाचे अधिकारीक धोरण वाचलेलं दिसत नाहीये त्यातील काही मुद्दे इथे देतोय, जेणेकरून आपला दोघांचा खेद कमी व्हावा
६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.
लिंक - ही आहे आता खेदाची दुसरी बाब अशी की सन्माननीय सदस्य असल्या प्रकारांना पाठीशी घालताना दिसतात , नवीन सदस्य असलेल्या माझ्यासारख्याने जर धोरण वाचले आहे तर मुक्तविहारींसारख्या जुन्याजाणत्या आयडीने स्वतः त्याला हरताळ फासणे अजूनच वाईट वाटले. अजून एक, नुसते कट्टाभिलाषी लेखन असते तरी एकवेळ चालले असते, पण त्यात तुम्हाला 'मी कारण असल्याशिवाय पुण्याला येणे टाळतो' छाप वाक्य वायफळ वाटले नाही ही गंमतच आहे. नेमकं काय सुचवायचं आहे? १. मला पुणे आवडत नाही २. मला वेळ नसतो ३. मला फार कामे असतात? का अजून काही? पिंका टाकल्यागत पुण्याचे नाव घेण्याला काय अर्थ ?

In reply to by जेम्स वांड

मुद्दा एक : एक दोन ओळी म्हणजे साधारण एखादा प्रश्न प्रकाराचा धागा असून नये असा त्याचा अन्वयार्थ असावा आणि मुद्दा दोन : जर धोरणाबाहेरील धागा असेल तर तो उडवला जाईल याची खात्री बाळगायला हरकत नाही. शिवाय, प्रत्येक धाग्यातील अशायकडे न पाहता प्रत्येक वाक्याकडे पाहिल्यास चर्चा वेगळ्याच मार्गावर जातात असे नाही वाटत? बाकी आपण सुज्ञ आहोतच.

In reply to by जेम्स वांड

अपेक्षित प्रतिसाद! असो, अतिअवांतर प्रतिसादांकडे दुर्लक्ष करणे (किंवा सर्वमान्य संकेतांनुसार "फाट्यावर मारणे") यापेक्षा चांगला मार्ग नाही. चालू द्या! :)

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

सर्वसामान्य संकेतानाच फाट्यावर मारणार्‍यांसाठी अजून दुसरा कुठला मार्ग नसावा बहुतेक. बादवे मुविकाकांविषयी प्रचंड आदर होता पण आजकालचे त्यांचे धागेलिखाण अन प्रतिसाद वाटचाल पाहता हा काय सिरियसली घ्यायचा प्रकार नाही हे पक्के कळलेले आहे. बेस्ट लक मुविकाका, गो अहेड.

In reply to by जेम्स वांड

सहमत आहे एकतर पुण्याच्या नावाने उगाच गळे काढायचे आणि मग परत पुणेकरांनाच हाक द्यायची कि मला येऊन भेटा, मला येऊन भेटा :)

ह्यांच्याकडे रहायचे ठरले आहे. उद्या संध्याकाळी ----सोमवार, ०३-०७-२०१७---- कोथरूड मधले कुठलेही ठिकाण चालेल.

@मुवि : जराश्या मध्यवर्ती ठिकाणावरची (उदा: जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, इ) जागा/रेस्तराँ आणि वेळ ठरवा आणि ती माहिती इथे टाका. खूप दिवसांत कट्टा झाला नाही. जमतील तेवढे मिपाकर मिळून कट्टा करू. काय म्हणता ?

ठिकाण ठरल्यास कळवा नाहीतर खतरुडात स्वागत आहेच.

त्यामुळे, कोथरूडच्या आसपासचे कुठलेही ठिकाण चालेल. अभिजित अवलिया कोथरूड मध्येच रहात असल्याने, त्याला पण "कोथरूद"च्या आसपासचेच ठिकाण चालेल असे वाटते.

In reply to by मुक्त विहारि

नाही हो. मारोतवार किंवा खंडोबावार असता तर नक्की भेटलो असतो. आठवडावारांना कार्यालयीन वेळ जरा विचित्र असल्याने संध्याकाळी भेटणेही जमत नाही.

कट्टा सकाळी करणार की संध्याकाळी. सकाळी झाला तर येते मी. खतरुडापासून जरा लांब रहात असल्याने संध्याकाळी जरा कठीण आहे.

कट्ट्यास शुभेच्छा! कुठायत ते मिपाकर, पुण्यात तीन धागे आल्यावरच कट्टा होतो म्हणणारे! पुण्याबाहेर असल्याने यावेळी योग नाही. पुकप्र!

असं कोणाचेही (विशेषतः स्त्री सदस्यांचे) पत्ते वगैरे ओपन फोरमवर देणे संस्थळाला मान्य आहे का? आश्चर्यच आहे बुआ.

In reply to by जेम्स वांड

तसाही तो टेंपररी पत्ता आहे .कल्जी क्रु नये हां. बाकी कट्ट्याला येणाऱ्यांपेक्षा न येणाऱ्या लोकांची निरनिराळ्या प्रकारची जळजळ वाचून मनोरंजन झाले :)

In reply to by अजया

लोकांची निरनिराळ्या प्रकारची जळजळ वाचून मनोरंजन झाले असं नका हो, भळभळत्या जखमेवर मीठ टाकू ;)

भेटायची इच्छा होती
काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो)
पोस्टकर्त्याला मेसेज केला भेटण्यासाठी पण वरील वाक्य वाचले आणि मग विचार बदलला.

In reply to by आशु जोग

व्यनित उत्तर दिले आहे. माझ्याकडे स्मार्ट फोन नसल्याने, व्य.नि. पाठवायला उशीर झाला. क्षमस्व.

जगातील मध्यवर्ती ठिकाणच्या लोकांचा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी होणारा कट्टा झाला/होत आहे/होणार आहे/रद्द झाला आहे/पुढे ढकलण्यात आला आहे/कट्ट्याची जागा बदलली आहे?

In reply to by एस

एवढा सार्वजनिक पत्ता देऊन कट्टा खाजगी होईल का! यायचं की. मजा आली कट्ट्याला. खूप गप्पा झाल्या. सायली नावाची माझी शेजारीण कम मिपाकर पण हजर होती. ती सतरा अठरा देश फिरली आहे. तिचे किस्से ऐकायला धमाल आली. मुविंशी शेतीवर गप्पा झाल्या. नवा आलेला इश्वरदास बिचारा बावरुनच आला होता. त्यात तो उशीरा आल्याने मला तो पाइप्ड गॅसवाला आला वाटून आनंद झाला ! पण तो मिपाकर निघाला ;) लांबून आवर्जून येऊन तो कट्ट्यात सामील झाला. तो आला तेव्हा पिंचिला नावे ठेवणे सुरु होते. तो म्हणाला तो पिंपरीहून आलाय. त्यामुळे दोन मिनिटं शांतता पाळली गेली पण त्याने लगेच तो मूळचा पिंपरीवाला नाही सांगून टाकले ;) पिंपरीकर नाही पिंपरी गावाला नावे ठेवल्या गेली आहेत. नीट वाचावे हां ! कारण एकीचे सासर तिकडे आहे ;) साडेनऊला शेवटी सर्व निघाले तरी दारात गप्पा सुरूच होत्या. पुढच्या मोठया पुणे कट्ट्याच्या प्रतीक्षेत ... . .

In reply to by अजया

एवढा सार्वजनिक पत्ता देऊन कट्टा खाजगी होईल का! यायचं की. हे स्पष्टीकरण तुम्ही देऊन काय उपयोग लोकांचा आक्षेप तुमच्या कमेंटला नाहीच्चे मुळी

In reply to by अजया

पिंचिंला का नावे ठेवली गेली म्हणे? पुण्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. :) बाकी सविस्तर वृत्तांत येऊ द्यात.

झाला कट्टा. मुवि आणि अजयाताई आणि अन्य एक मिपाकर (नाव विसरलो) ६ वाजल्यापासून कट्ट्यास उपस्थित होते. मी आणि ईश्वरदास शेवटचा अर्धा तास (८:३० ते ९:०० ) उपस्थित होतो.

In reply to by अभिजीत अवलिया

मी पावणे दहाला चांदणी चौकात होतो. कट्टा संपला असणार म्हणून पुढची फोनाफोनी केली नाही. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जास्त डेटा वापरणे म्हणजे जास्त मोबाईल बिल. म्हणजे परत बिलावरचा GST पण वाढणार :-)