✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गूढ (भाग 4)

ज
ज्योति अळवणी यांनी
गुरुवार, 06/22/2017 - 23:07  ·  लेख
लेख
गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024 गूढ भाग २: http://www.misalpav.com/node/40034 गूढ भाग ३: http://www.misalpav.com/node/40049 भाग ४ सूर्य मावळतीला लागला होता. थंडीचे दिवस असल्याने खूपच लवकर अंधारून आले होते. चंद्रभान गाडीने गावात शिरला तोवर चांगलाच उशीर झाला होता. पारावर आता कोणीच दिसत नव्हते. मात्र दूर देवळात आरती चालू असल्याचा आवाज येत होता. त्या आवाजाच्या दिशेने चंद्रभानने गाडी वळवली. देवळाजवळ पोहोचून त्याने गाडी थांबवली आणि पायातले बूट काढून देवळात प्रवेश केला तोवार आरती संपली होती. लोकं प्रसाद घेऊन आपापल्या घराकडे वळले होते. चंद्रभान गाभाऱ्याजवळ गेला आणि त्याने हात जोडले. "शहराकडून आलात वाटत?" त्याचा नमस्कार आटपला आणि तो मागे वळला तर प्रसाद घेऊन समोरच उभ्या असणाऱ्या पुजारीबुवांनी चान्द्रभानला विचारले. "हो!' चंद्रभान म्हणाला. "इथे कसे काय? काही काम होत की कोणाकडे पाहुणे म्हणून आला आहात?" पुजारीबुवांनी विचारले. "काम आहे असच म्हणावं लागेल." चंद्रभान थोडा विचार करून म्हणाला. मग पुजारीबुवांकडे बघत त्याने म्हंटले,"तुम्ही या देवळातले पुजारी का?" पुजारीबुवांनी मान होकारार्थी हलवली. त्यावर चंद्रभान म्हणाला,"पुजारीबुवा, मी एक लेखक आहे." अजूनही त्याला काय आणि कसे सांगावे ते समजत नव्हते. कारण तो नक्की कशासाठी आला होता ते त्याचे त्याला देखील माहित नव्हते. त्यामुळे तो शब्दांची जुळवाजुळव करत होता. "अरे वा! म्हणजे आज शहराकडचे कोणी मोठे पाहुणे आले आहेत आमच्या गावात. कोणाकडे आला आहात आपण? काय काम आहे?" पूजारीबुवानी हसत हसत विचारले. "मी...... म्हणजे..... कोणाकडे आलो आहे अस नाही. पण मी एक भय किंवा रहस्य कथा लिहितो." असे म्हणून चंद्रभान मुद्दाम थांबला. 'भय' आणि 'रहस्य' हे दोन शब्द एकून पुजारीबुवा एकदम ताठ झाले. "हे बघा लेखक महाशय, इथे या गावात तुम्हाला कथा लिहिता येईल असे काही नाही. लोकं काहीही बोलतात. तुम्ही आपले आल्यासारखे आजची रात्र रहा आणि उद्या निघा कसे. कोणाकडे उतरणार आहात?" पुजारीबुवांनी विषय आवरता घेत विचारले. "कोणाकडे असा नाही हो. आणि मी कथेचे सूत्र मिळावे म्हणून आलेलोच नाही." चंद्रभानने घाई-घाईने उत्तर दिले. "मग? असे अचानक उठून इथे का आलात राव? काही कामाने यायचं होत तर वेळेत आला असतात ना... दिवसा-उजेडी. हे अस आड वेळी आला आहात आणि म्हणता आहात काही कारण नाही इथे येण्याच. बर, कोणी ओळखीच नाही म्हणता. कोणाकडे आलेला नाहीत म्हणता. अहो, आम्ही गावातली माणस साधी असतो वेडी नाही." आता पूजारीबुवांचा स्वर रुक्ष व्ह्यायला लागला होता. त्यांना अचानक चंद्रभानशी बोलण्याची इच्छा राहिली नव्हती आणि ते त्यांच्या एकूण देहबोलीतून दिसत होत. "पुजारीबुवा....." त्यांना हाक मारून क्षणभर चंद्रभान थांबला. आणि मग आर्जवी स्वरात म्हणाला,"काका.... प्लीज माझ म्हणण एकून घ्या आणि मग ठरवा मी नक्की काय केल पाहिजे. मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. मी वाचन देतो." आणि उठणाऱ्या पूजारीबुवांचा हात धरला. पुजारीबुवांनी एकदा अंधारात विरघळणाऱ्या गावाकडे बघितले आणि मग चन्द्रभानकडे! चंद्रभान आशेने त्यांच्याकडे बघत होता. क्षणभर विचार करून पुजारीबुवा त्याच्या शेजारी बसले आणि म्हणाले,"मी तुमच सगळ एकून घेईन. पण मग मी जे सांगेन ते ऐकण्याचे वचन तुम्हालाही द्यावं लागेल?" "काका... मी खरच तुम्ही म्हणाल ते एकायला तयार आहे. फक्त मी काय सांगतो ते तुम्ही एकून घ्या... मी खूप गोंधळून गेलो आहे काका. काय बरोबर आहे... किंवा खर आहे ते सुध्दा मला समजत नाही आहे. बर, घरात कोणी वडील माणूस देखील नाही की मी त्यांना काही विचारीन." चंद्रभान अस्वस्थ आणि दु:खी आवाजात म्हणाला. पूजारीबुवांच मन थोड पाझरल. त्यांनी चंद्रभानचा हात हातात घेतला आणि म्हणाले,"बोल बाळा. अरे मी उठून निघून जात होतो ते तुझ्याच भल्यासाठी. आता गावात तूला कोणीच भेटणार नाही. मला वाटलं, मी गेलो की तूदेखील निघून जाशील. जे तुझ्याचसाठी चांगल होत. पण भगवंताच्या मनात दुसरच दिसत." अस म्हणून त्यांनी देव्हाऱ्याच्या दिशेने हात जोडले आणि चंद्रभानकडे वळून ते म्हणाले,"बर... ते राहुदे. सांग तुला काय सांगायचं आहे?" "काका.... काल माझा टी. व्ही.वर इंटरव्हू होता. माझा एक मित्र आहे त्यानेच मला बोलावलं होत. हे काहीस वेगळ होत म्हणून मी त्यासाठी थोडा लवकरच पोहोचलो. तिथे मला एक निशा नावाची मुलगी भेटली. माझा मित्र मला म्हणाला तिच माझा इंटरव्यू घेणार होती. अजून तयारी होत होती. म्हणून मग मी आणि निशा आम्ही दोघे गप्पा मारत बसलो काही वेळ. नंतर माझ्या मित्राचा असिस्टंट बोलवायला आला आम्हाला. निशाला तयारी करायची होती म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो. एका सेटजवळ नेऊन तो मुलगा गायब झाला. मी त्या मुलाची आणि माझ्या मित्राची बराचवेळ वाट बघितली आणि मग मित्राला हाका मारायला लागलो. त्यात मी धडपडलो आणि बरेच लोक आले. माझा मित्र देखील मला भेटला. त्याला मी सांगितले की मी आणि निशा तुझ्याच केबिनमध्ये गप्पा मारत बसलो होतो. तर तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघायला लागला. मी एकूण घडलेला प्रसंग त्याला सांगितला तर त्याने मला सांगितले की निशा पूर्वी त्याच्याकडे काम करत होती, पण मग तिने राजीनामा दिला आणि त्याच कारण सांगितले की ती उमरगावची आहे आणि इथे अस काहीतरी घडल होत की तिला इथे यावे लागणार होत. ती परत येणार की नाही तेदेखील तिला माहित नव्हत. त्यामुळे सुट्टी घेण्याएवजी तिने राजीनामाच दिला होता. ते एकून मला मोठा धक्का बसला. काही सुचेनास झाल. कारण मी निशाशी बोलत बसलो होतो ते माझ्या दृष्टीने तरी अगदी खर होत. त्यामुळे मी खूपच अस्वस्थ झालो. इंटरव्हू देण मला अवघड वाटायला लागल. म्हणून मग तस सांगून मी तिथून निघालो आणि घरी परत आलो. मित्राला काही कळू दिले नाही.... रात्री मित्र घरी आला तेव्हा परत एकदा त्याच्या बोलण्यातून या गावाचा उल्लेख झाला आणि मला आठवलं की या गावाबद्धल मी पूर्वीदेखील एकल होत. खूप पूर्वी! त्या अफवेवरून मी एक गोष्ट देखील लिहिली होती तेव्हा. पण मी नक्की काय गोष्ट लिहिली होती ते मला आठवत नव्हत. म्हणून मग मी ती गोष्ट शोधून काढली आणि वाचायला लागलो. गोष्ट वाचून झाली आणि मला झोप लागली. परत एकदा माझ्या स्वप्नात निशा आली आणि म्हणाली की मला माझ्या कथेची आठवण व्हावी म्हणून ती मला सकाळी भेटली होती. मी जागा झालो तेव्हा माझ्याकडे काम करणाऱ्या मीराताई आल्या होत्या. त्यांनी मला जे सांगितल ते एकून तर मी पुरता हडबडलो काका..." अस म्हणून चंद्रभान क्षणभर थांबला. "काय सांगितल त्यांनी तुला?"पुजारीबुवांनी त्याच्या पाठीवर थोपटत अगदी शांत आवाजात त्याला विचारले. "काका........... मीराताई म्हणाल्या की त्या घरी येत होत्या तेव्हा त्यांना निशा भेटली होती. त्यांना देखील तिने सांगितले की तिला माझ्या मदतीची गरज आहे. याचा अर्थ मला भास नव्हता झाला काल सकाळी. हो न काका?" चंद्रभानने आवंढा गिळला. चन्द्रभानची हकीकत एकून पुजारीबुवादेखील विचारात पडले. चंद्रभान पुजारीबुवांकडे आशेने बघत होता. पुजारीबुवा बोलाव की नाही अशा विचारात होते. त्यांनी चंद्रभानकडे बघितल आणि त्याच्या डोळ्यातल्या आशेकडे बघून त्यांना वाटल की त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितलच पाहिजे. त्यांनी गाभाऱ्याच्या दिशेने बघून परत एकदा हात जोडले आणि "शंभो... शंकरा... पाठीशी रहा रे भक्तांच्या" असे म्हणून चंद्रभानशी बोलायला सुरवात केली. "बेटा, मला तुझ नाव नाही माहित आणि आत्ता तू जे सांगितले आहेस ते ऐकल्यानंतर तू काय करावस ते मी सांगू शकत नाही. खर तर मी तुझ सगळ एकून घेणार होतो आणि मग तुला इथून निघून जायला सांगनार होतो. पण आता वाटत की मला जे माहित आहे ते मी तुला सांगितलेच पाहिजे. तू म्हणतोस ते खरे आहे. ती मुलगी.. निशा... ती खरच काही महिन्यांपूर्वी इथे या गावात आली होती. कर्मधर्म संयोगाने ती आली ती थेट इथेच याच देवळात आली होती. या गावात तिची पहिली भेट झाली ती माझ्याशीच. तुझ नाव जरी मला माहित नसल तरी तू लिहिलेली कथा मला माहित आहे....." अस म्हणून पुजारीबुवा थांबले. त्याची कथा पूजारीबुवाना माहित आहे हे एकून चंद्रभानला आश्चर्य वाटले. "तुम्हाला मी लिहिलेली कथा माहित आहे? अहो खूप पूर्वी लिहिली होती मी ती कथा. तुम्हाला कशी माहित ती?" चंद्रभानने विचारले. "कारण... ती कथा मला निशाने सांगितली. इथेच याच देवळात! ती आली तेव्हा टळटळीत दुपार होती. मी आत गाभाऱ्यात जप करत बसलो होतो. तिने मला हाक मारली. मी बाहेर आलो. थोडावेळ इथल्या तिथल्या गप्पा मारल्यानंतर तिने मला तुझी कथा दाखवली आणि विचारले की 'असा कोणता वाडा आहे का इथे? अस कोणी कधी आल होत का इथे?' ती कथा एकून मला थोड आश्चर्य वाटल. कारण खरातांचा वाडा आहे या गावात आणि वेगवेगळ्या दंतकथा देखील आहेत त्या वाड्याबद्धल. म्हणूनच तर त्या वाड्याकडे कधीच कोणी जात नाही. आता त्या वाड्याच्या आत कोण रहात.. ते काय करतात.. कोणालाही माहित नाही. हा... पण आत कोणीतरी रहात हे मात्र खर. आता कस म्हणशील तर वाड्यातला वावर जाणवतो बाहेर. पण उलट त्या जाणवणाऱ्या वावरामुळेच त्या वाड्याबद्धल जास्त अफवा निर्माण झाल्या आहेत. आणि हो... काही वर्षांपूर्वी असा कोणी मुसाफिर आला होता म्हणे गावात. असाच संध्याकाळच्या वेळी आणि थेट वाड्याकडे गेला, अस देखील म्हणतात. मात्र तो आलेला कोणालाच कधीच दिसला नाही. एकट्या वेड्या म्हादुने त्याला पहिले होते. पण म्हादुला गावातले लोकं वेडा म्हणतात. त्यामुळे त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार. मी निशाला हेच सांगितल. तिने त्या म्हादुला भेटायची इच्छा व्यक्त केली. मी तिला म्हादू कुठे राहतो ते सांगितले. पण त्याचवेळी हे देखील तिला विचारले की उगाच उत्सुकतेपोटी कशाला अशा आपल्या आवाक्यापलीकडच्या गोष्टींमध्ये पडते आहे. त्यावर ती क्षणभर काहीच बोलली नाही. पण तिची नजर हरवली होती. माझ्या प्रश्नाचे उत्तर तिने दिले नाही पण ती म्हणाली,'जर ही कथा खरी असेल तर अजून या कथेचा शेवट जसा इथे लिहिलेला आहे तसा झालेला नाही.' मला कळलेच नाही तिला काय म्हणायचे आहे. पण तिच्या चेहेऱ्यावरचा निर्धार बघून मी काहीच म्हंटले नाही. तिने म्हादुच्या घराचा रस्ता समजून घेतला आणि निघून घेली. त्यानंतर मात्र मला माहित नाही तिचे काय झाले. दुसऱ्या दिवशी म्हादुला भेटून तिच्याबद्दल विचारव अस मनात आल होत माझ्या. पण मुळात तो वेडा आहे. त्यामुळे तो काय सांगेल याचा भरवसा नव्हता. त्यात आमच्या गावातले लोक त्या वाड्याबद्द्ल बोलायला तयार नसतात. त्यामुळे पुजारीबुवा म्हादुला कोणा मुली बद्दल आणि त्या वाड्याबद्दल विचारत होते हे जर त्यांना कळल असत तर ते मला जड गेल असत. म्हणून मग मी तो विषय मनात मागे टकून दिला. आणि मग तू आता तिच्याबद्धल बोलेपर्यंत मी ती विसरूनही गेलो होतो." पुजारीबुवा बोलायचे थांबले. पूजारीबुवानी सांगितलेली घटना ऐकून चंद्र्भान अजूनच बुचकळ्यात पडला. निशा इथे आली होती हे खरे होते. ती पूजारीबुवाना भेटली होती. तिने आपणच लिहिलेली कथा त्यांना सांगितली होती आणि तिचे म्हणणे होते की त्या कथेचा शेवट अजून झालेला नाही. म्हा णजे तिला नक्की काय म्हणायचे होते? ती आपल्या स्वप्नात का येत असेल? मुळात ती स्वप्नात येते आहे की ... आपल्याला भास होत आहेत... की.... चन्द्रभानला शेवटचा पर्याय मनातही आणायची इच्छा होती. त्याने पुजारीबुवांकडे बघितले आणि त्यांना विचारले,"काका तुम्हाला काय वाटते? निशा का आली होती इथे. मी जी कथा लिहिली होती ती खूप पूर्वी.. त्या कथेचा निशाशी काय संबंध असेल. कारण मी तर माझ्या मित्राने केवळ या गावाचा आणि वाड्याचा उल्लेख केला होता आणि सांगितले होते की या वाड्याबद्द्ल बऱ्याच गूढ कथा प्रचलीत आहेत; त्यावरून एक कल्पना केली होती." "खरच सांगू बेटा, मलाही काहीच सुचत नाही आहे. काहीतरी चुकत आहे किंवा तुला आणि मला माहित नाही अस यात काहीतरी आहे." पुजारीबुवा म्हणाले. "काका... तुम्ही मला त्या म्हादूचा पत्ता सांगता का? त्याला भेटीन म्हा णतो." चंद्रभान थोडा विचार करून म्हणाला. "बेटा, नको पडूस तू या फंदात. मी निशालासुद्धा हेच सांगितले होते. जे भूतकाळात होऊन गेले ते गेले. आता त्यातील सत्यता उकरून काढून काहीही मिळणार नाही आहे. तो वाडा आहे हे सत्य आहे आणि तेवढेच खरे हे देखील आहे की त्या वाड्याबद्धल वाईट वंदता देखील आहेत. त्यामुळे आपल्याला माहित नसलेल्या वाटेने न जाणेच चांगले." पूजारीबुवानी चंद्रभानला म्हंटले. "तुमच म्हणण मान्य आहे काका... पण मग माझ्या स्वप्नात येऊन माझ्याकडे मदत मागणाऱ्या निशाच काय? बर ते फक्त स्वप्न म्हणून सोडून द्यावं तर मीराताईना ती भेटली आहे अस त्याचं म्हणण आहे. त्याकडे कसे दुर्लक्ष करायचे?" चंद्रभानने पूजारीकाकांना विचारले. "खर आहे तुझ म्हणण. पण मग पुढे काय?" पुजारीबुवा म्हा णाले. "काका... माझ मन मला सांगत आहे की मी गप्प बसणे योग्य नाही. निशा खरच अडचणीत असावी. तिला माझ्या मदतीची गरज असावी. म्हणूनच तिने ज्या मार्गाने शक्य आहे त्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच मी तिच्या मदतीला गेलेच पाहिजे." चंद्रभान म्हणाला. "ठीक आहे. तुला मी म्हादूच्या घराचा रस्ता दाखवतो." असे म्हणून पुजारीबुवा उठले आणि गाभाऱ्यात गेले. चंद्रभानदेखील त्यांच्या मागे गाभाऱ्यात गेला. पूजारीबुवानी शंकराच्या पिंडीला साष्टांग नमस्कार घातला आणि पिंडीसमोरच्या धुनीतून भस्म उचलले आणि चान्द्रभानच्या हातावर ठेवले. चंद्रभानचे दोन्ही खांदे धरून पुजारीबुवांनी त्याच्या डोळ्यात स्थिर नजरेने बघितले आणि ते म्हणाले,"मी तुला तुझे नाव विचारेल नाही किंवा विचारणार देखील नाही कारण तू इथे कोणाच्या तरी हाकेला ओ देऊन मदतीसाठी आला आहेस. याचा अर्थ तुझा उद्देश चांगलाच आहे. तू म्हणतोस ते खरच असेल कदाचित. निशाला तुझ्या मदतीची गरज असेलही कदाचित. बेटा, तुझ्या बरोबर माझे आशीर्वाद आहेत. मुख्य म्हणजे प्रामाणिक आणि चांगला उद्देश असणाऱ्या लोकांच्या पाठीशी देव देखील असतो. त्यामुळे यापुढे तुला जे योग्य वाटत ते तू कर. फक्त एकच सांगतो... केवळ यापूर्वी या गावात आलेल्या त्या बाबूने किंवा निशाने जे केलं तेच तसच तू करावस अस नाही. तुझ्या इथे येण्याला एक वेगळ कारण आहे. ते समजून घे. निशाच्या मागे जाण महत्वाच आहे की तिला सोडवण महत्वाच याचा विचार कर. आणि मगच तुझी कृती ठरव." चंद्रभानने पूजारीबुवांच सांगण मनापासून स्वीकारलं आणि देवाच्या दिशेने तोंड करून नमस्कार केला. मग पूजारीबुवाना देखील वाकून नमस्कार केला आणि म्हादुच्या घराचा रस्ता समजून घेतला. मग मात्र मागे वळूनही न बघता तो देवळातून बाहेर पडला. पुजारीबुवा चालत जाणाऱ्या चंद्रभानच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही क्षण बघत उभे राहिले आणि आपल्या घराकडे निघाले. क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा

प्रतिक्रिया द्या
5697 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

खूप धन्यवाद

छोटा चेतन-२०१५
गुरुवार, 06/22/2017 - 23:27 नवीन
खूप धन्यवाद आता उत्सुकतेने पुढील भागासाठी प्रतीक्षा करीत आहे !!!
  • Log in or register to post comments

प्रचंड आवडतेय ही कथा.

पद्मावति
Fri, 06/23/2017 - 00:03 नवीन
प्रचंड आवडतेय ही कथा.
  • Log in or register to post comments

खूप छान वेग घेतला आहे कथेने

इडली डोसा
Fri, 06/23/2017 - 01:18 नवीन
लवकर लवकर टाका पुढचा भाग.
  • Log in or register to post comments

तुझ्या मागे लागुन पुढचा भाग

स्रुजा
Fri, 06/23/2017 - 04:56 नवीन
तुझ्या मागे लागुन पुढचा भाग टाकायला लावला त्याचं सार्थक झालं. आता येऊ दे पुढचे भाग नाही तर पुन्हा मागे लागेन :)
  • Log in or register to post comments

स्रुजा, अग मागे एकदा एका

ज्योति अळवणी
Fri, 06/23/2017 - 06:36 नवीन
स्रुजा, अग मागे एकदा एका कथेचे भाग लागोपाठ टाकले होते तर अस नका करू म्हणून अनेकांचं मत पडलं होतं. म्हणून मग एक दिवसा आड टाकाच भाग अस ठरवलं होतं इतकंच. पण तू आग्रह केलास आणि मी ऐकलं नाही असं कसं होईल. पुढचा भाग उद्या रात्री नक्की
  • Log in or register to post comments

बरोबर असावं ते पण, पण आम्ही

स्रुजा
Fri, 06/23/2017 - 15:59 नवीन
बरोबर असावं ते पण, पण आम्ही रेग्युलर वाचक वाट पाहत असतो. त्यामुळे तू टाकत जा आपली. आणि व्हॉट्सअ‍ॅप वर पिडुन सुद्धा लगेच ऐकलंस म्हणुन खरंच धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी

मस्त! उत्सुकता वाढतच चालली

रुपी
Fri, 06/23/2017 - 07:15 नवीन
मस्त! उत्सुकता वाढतच चालली आहे प्रत्येक भागाबरोबर..
  • Log in or register to post comments

दररोज वाट बघतो

योगेश लक्ष्मण बोरोले
Fri, 06/23/2017 - 10:37 नवीन
नविन भाग येण्याची वाट बघत असतो दररोज. उत्कंठा वाढतेय.
  • Log in or register to post comments

मस्त!

नितिन५८८
Fri, 06/23/2017 - 11:01 नवीन
पुढील भागासाठी प्रतीक्षा करीत आहे, उत्सुकता वाढतच चालली आहे .. . .. . .
  • Log in or register to post comments

जमलिय बरका.

अभ्या..
Fri, 06/23/2017 - 11:20 नवीन
जमलिय बरका. लेखनसातत्य प्रशंसनीय.
  • Log in or register to post comments

पुढे काय ही उत्सुकता लागून

दशानन
Fri, 06/23/2017 - 11:26 नवीन
पुढे काय ही उत्सुकता लागून राहिली आहे! पुलेशु.
  • Log in or register to post comments

सर्वच प्रतिसादांबद्दल धन्यवाद

ज्योति अळवणी
Fri, 06/23/2017 - 13:32 नवीन
सर्वच प्रतिसादांबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

मस्त !!! पु.भा.प्र

राजाभाउ
Fri, 06/23/2017 - 13:47 नवीन
मस्त !!! पु.भा.प्र
  • Log in or register to post comments

ज्योतीताई...पुढील भाग

चिनार
Fri, 06/23/2017 - 14:42 नवीन
ज्योतीताई...पुढील भाग वाचण्यास उत्सुक !! लवकर टाका.. पण या भागात नायकाने पुजाऱ्याला परत एकदा सगळी कथा सांगण्याचा पॅराग्राफ जरा कंटाळवाणा होतो. कथा तिथेच फिरते आहे असे वाटले. अर्थात हे माझं मत आहे.
  • Log in or register to post comments

कथा तशी मोठी आहे आणि

ज्योति अळवणी
Fri, 06/23/2017 - 15:49 नवीन
कथा तशी मोठी आहे आणि चंद्रभानने पूजारी बुवाना सगळी कथा सांगितली इतकंच लिहिलं असत तर कदाचित पटकन लिंक लागली नसती वाचकांची. म्हणून परत लिहिली इतकंच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

खुप च उत्कंठावर्धक आहे ही कथा

सुचिता१
Fri, 06/23/2017 - 20:19 नवीन
खुप च उत्कंठावर्धक आहे ही कथा मात्र एक दिवस आड चा नियम शिथील करा ,,... मोठी कथा आहे आणि व्यस्त दिनक्रम असलयाने .. काही छोटे छोटे तपशील विसरले जातात .. पु भा प्र
  • Log in or register to post comments

सुंदर लिहिताय ताई सगळे भाग

प्रीत-मोहर
Sat, 06/24/2017 - 09:09 नवीन
सुंदर लिहिताय ताई सगळे भाग एकत्र वाचले. खूप मस्त चाललीय कथा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ज्योति अळवणी
Sat, 06/24/2017 - 16:30 नवीन
तुमच्या सर्वांच्या आग्रहामुळे मी पुढेच्या भागात संपूर्ण कथा टाकते आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा