आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती हव्या आहेत.
(सर्वात आधी पाककृती विभागात आल्याबद्दल क्षमा करा. इथे येण्याचे प्रस्तुत लेखकाचे हे केवळ दुसरे धारिष्ट्य आहे!)
(दुसरे म्हणजे हा धागा पाककृती विभागात काढावा की काथ्याकूट विभागात, हा गहन प्रश्न न सुटल्यामुळे सांप्रत येथेच पांढऱ्यावर काळे करत आहे (पाडत आहे!). तरी धागा कुठल्याही विभागात (अगदी खफवरसुद्धा) हलवला तरी चालेल.)
मला स्वतःला स्वयंपाकाचे शून्य ज्ञान आहे. परंतु वैयक्तिक कारणांस्तव मी बरेच दिवस (किंवा वर्षे) अशा पदार्थांच्या पाककृतींच्या शोधात आहे, जे पदार्थ आरोग्याला आणि जिभेलासुद्धा चांगले असतील. तर मिपावरील सिद्धहस्त सुगरणी आणि बल्लवाचार्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी त्यांना माहीत असलेल्या अशा पाकृ इथे द्याव्यात.
निकष :
१. पदार्थ शक्यतो कमी उष्मांकांचा (क्यालोरी) असावा. तेल-तूप अत्यल्प असावं.
२. पदार्थ भारतीयच असावा. उगीच कसल्या कसल्या फ्यानशी पाकृ नसाव्यात. हे स्यालाड आणि ते ड्रेषिंग वगैरे वगैरे परदेशी फ्याडे नकोत.
३. शक्यतो घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर केला जावा. (महाराष्ट्रीय घरात).
४. पदार्थ बनवायला जरा सोपा असावा.
५. पदार्थाची चव त्यातल्यात्यात बरी असावी. उगीच गवत-बिवत खायला देऊ नका.
६. पदार्थ पोटभरू हवा. पोट भरल्याचं समाधानही लाभावं आणि पोटावरील चरबीही वाढू नये.
७. टार्गेट ऑडियन्स (किंवा खवय्ये) हे हृदयरोगी, मधुमेही, स्थूल वगैरे असतील असे समजून त्यांच्यासाठी (तरस खा के का होईना) पाककृती सुचवायच्या आहेत.
८. पदार्थांमध्ये सकाळच्या न्याहारीचे, दुपारच्या जेवणाचे, मधल्या वेळचे, संध्याकाळच्या जेवणाचे, असे विविध प्रकार सुचवल्यास उत्तम. (इतक्या वेळा चरल्यावर काय डोंबल्याचं कमी होणार वजन? असे पुटपुटू नये. दिवसातून किमान सहा वेळा जेवावं असं आदरणीय ऋजुताताई सांगून गेल्या आहेतच.)
९. पाकृ देताना कृपया दिलेले प्रमाण कितीजणांना पुरेल हेही सांगावे. (यावर 'तुम्हांला किती पुरतं' असा खोचक प्रश्न विचारू नये.)
१०. पाकृचा फोटो असला तरी उत्तम, नसला तरी हरकत नाही. न टाकल्यास फाऊल धरला जाणार नाही.
उदा. भाजणीचे थालिपीठ, उपमा, वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे इत्यादी पर्याय मला सुचत आहेत. तुम्हांला काही माहीत असल्यास आवर्जून सांगा ही पुनरेकवार विनंती.
(सूचना : धाग्यावर दंगा करू नये. वाटल्यास विडंबनात्मक रसग्रहण केले तर चालेल. अन्यथा ताटलीभरून 'तळतळाट' खावा लागेल. काय?)
धन्यवाद!
आपला,
(पाकृपाभिलाषी) एस.
वाचने
19249
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
शाळेतल्या उपहारगृहांतून "जंक
"फ्यानशी" नाहीये पण
In reply to "फ्यानशी" नाहीये पण by रुपी
रुपी ने किसलेल्या किंवा
होस्टेलच्या दिवसातली झटपट पोटभरू "डा॑गरी"
माझी खाद्यशैली योग्य आहे का?
In reply to माझी खाद्यशैली योग्य आहे का? by मुक्त विहारि
मुवि काका मला पण घ्या
In reply to मुवि काका मला पण घ्या by प्रीत-मोहर
मुवि काका मला पण घ्या तुमच्यासोबत.
डब्यातील पदार्थ .....
स्ट्यू
In reply to स्ट्यू by कपिलमुनी
दुवा
सर्वांना खूप खूप धन्यवाद. इथे
In reply to सर्वांना खूप खूप धन्यवाद. इथे by एस
मुविसाहेब, तुम्हांला आपण छायाचित्रणातील एक्स्पर्ट बनवू!
#मिपाफिटनेस अंतर्गत अशा
In reply to #मिपाफिटनेस अंतर्गत अशा by मोदक
अर्रर्रर्र! स्वारी!
In reply to #मिपाफिटनेस अंतर्गत अशा by मोदक
द्या की ह्याच धाग्याला हॅशटॅग
माझं आवडतं कम्फर्ट फूड म्हणजे
In reply to माझं आवडतं कम्फर्ट फूड म्हणजे by रातराणी
एग डोसावर लांब लांब चिरलेला
खुप उपयुक्त धागा.
रुपीताईंचा हा धागा चांगला आहे
उपयोगी धागा,
भरली केळी हा एक प्रकार छान
दिनेशदांचा ब्लॉग सुरु झालाय.
In reply to दिनेशदांचा ब्लॉग सुरु झालाय. by पिलीयन रायडर
क्या बत है! धन्स पिराताई!
In reply to दिनेशदांचा ब्लॉग सुरु झालाय. by पिलीयन रायडर
वा वा !
दिनेशदांच्या ब्लॉगवरुन पाहुन
In reply to दिनेशदांच्या ब्लॉगवरुन पाहुन by पिलीयन रायडर
नागपुरी वडाभात का? वाह!
In reply to दिनेशदांच्या ब्लॉगवरुन पाहुन by पिलीयन रायडर
मला या रेसिपीमागचं लॉजिक काही
In reply to मला या रेसिपीमागचं लॉजिक काही by रातराणी
मलाही आधी असंच वाटायचं पण हा
In reply to मलाही आधी असंच वाटायचं पण हा by रेवती
बर्य्याच वेळा
बटाट्वडा
पोट बिघडल्यास पाणीपुरी उत्तम.
शेपू चे पराठे
नाचणी आणि रव्याचे झटपट अप्पे
धन्यवाद ससन्दीप आणि गम्मत