Skip to main content

शेतकर्‍यांचा संप

लेखक मार्मिक गोडसे यांनी गुरुवार, 01/06/2017 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ? १) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा. २) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी. ३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. ४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा. ५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी. ६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. ७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. ८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. का केल्या शेतकर्‍यांनी ह्या मागण्या? शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्‍यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली. मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी? राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्‍यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्‍यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले. सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का? दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्‍यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्‍यांन्ची कोंडी केली आहे. शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का? अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे. संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्‍याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्‍याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.

वाचने 73767
प्रतिक्रिया 349

प्रतिक्रिया

In reply to by विशुमित

म्हणजे ज्यांनी मेहनत करून स्वतः च भलं करून घेतलं ते भरल्या पोटी ढेकर देतात .. आणि जे जुन्याच गोष्टीत अडकून राहिले त्यांना सरकारने सगलं फुकट द्यायचं ? ठीक आहे सरकारने आपली आश्वासने पूर्ण नाही केली. पण मग स्वतःचा जोडधंदा चालू करणे किती कठीण आहे ? तुम्ही स्वतः नोकरीला जाऊन पण शेती करत आहेत ना ? सगळ्यांनी हा विचार करणे का जमत नाही ? जर एका धंद्यात पूर्ण लाभ मिळत नसेल आणि तो सोडता हि येत नसेल तर तर जोड धंदा का करू नये ?

In reply to by विशुमित

वस्तुस्थिती १९४७ साली आपली लोकसंख्या होती ४० कोटी आणि सरासरी आयुर्मान होते ३२ आता आहे सव्वाशे कोटी आणि आयुर्मान आहे ६९. जमीन एक फूटभरही वाढली नाही. या सात पट लोकसंख्येला खायला घालायला काय करायचं?

In reply to by सुबोध खरे

आणि त्यात चुकीचे काय आहे ? आम्हा बहुतेक सर्वंच लोकांचे पूर्वज कधी ना कधी शेतीच करत होते आम्ही शेतीत राम नाही हे ओळखून धडपड करून इतर व्यवसाय सुरु करून इतकी वर्षे बेजबाबदार आणि अकार्यक्षम अश्या शेतकऱ्यांना पोसले ह्यांत आमची ती काय चूक ? शेती हा इतर व्यवसाया प्रमाणेच एक व्यवसाय आहे ज्यांना जमत नाही त्यांनी तो सोडून इतरांना द्यावा.

१,४,७,८ हे मुद्दे पटत नाहीत. केवळ स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी केली तरी राजकीय पक्षांना कार्यकर्ते हि मिळणार नाहीत आणि कोणी थुकूनही विचारणार नाही त्यांना ,ना शेतकऱ्यांना कोणत्या अनुदानाची वा पेन्शनची गरज लागेल. त्यामुळं हे आंदोलन कोणत्याच राजकीय पक्षाच्या हिताचं वाटत नाही. आंदोलन हिंसक करण्यासाठी काही पक्षांच्या गाव-गुंडांच्या टोळ्या सक्रिय झालेतही. आता बाकीचे मुद्दे :- १) शेतकरी लग्नात लाखो खर्च करतात ,स्कॉर्पिओ -बुलेट घेऊन फिरतात - ज्यांची ऐपत आहे ते या गोष्टी करतात ,त्यासाठी ते तुमच्या बापाचे पैसे नाहीत वापरत ना कोणत्या आरक्षणातून असले धंदे करतात. तुम्हाला बघवत नसेल तर सरळ डोळे बंद करून घ्या. २) दुधाचा भाव :- मॉल-पिझ्झा शॉप मधून महागड्या वस्तू मुकाट्याने आणून खाता ,चितळे जेवढे रेट छापतो तेवढे पैसे गपचूप मोजता ,मग शेतकऱ्याने त्याच्या दुधाचा दर वाढवून मागितलं तर कुटला पार्ट दुखाय लागला तुमचा? नाही परवडलं तर नका पिऊ दूध , बार मध्ये जाऊन मु* पितातचकि बरेच जण. * स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी* वरती बऱ्याच जणांनी आपले मुद्दे मांडलेत पण एकजण ही या मुद्द्यावर काही बोलला नाही ,का? तेवढी अक्कल कुठे आहे म्हणावं तो मुद्दा काय आहे हि समजून घ्यायची? कामावरून काढलं कि संप , पगार कमी केला कि संप ,वाढवला नाही कि संप ,वेतन आयोगासाठी संप -हे सगळं चालत तुम्हाला मग शेतकऱ्याने संप केल्यावर कशाला बोंबलता? तो तुमच्या जीवावर जगात नाही तुम्ही त्याच्या जीवावर जगता हे लक्षात ठेवा.

In reply to by बापू नारू

तो तुमच्या जीवावर जगात नाही तुम्ही त्याच्या जीवावर जगता हे लक्षात ठेवा.
हे अत्यंत बोगस आणि निखालस चूक विधान आहे. शेतकरी इतर लोकांवर अवलंबुन नाही म्हणताय? मग आजारी पडल्यावर डाक्टरकडे नाही जात तो? औषधकंपन्यांनी बनवलेली औषधं नाही घेत? हत्यारं ही धातुंपासुन येतात. धातु कंपन्या नसतील तर शेतकरी कशाने कसेल? शेतात मोठ्या कंपन्यांनी बनवलेले ट्रॅक्टर नाही वापरत? खतं/किटक नाश़कं कोण बनवतं? शेतकरी स्वतः बनवतो का ते? माल विकायला वापरले जाणारे ट्रक टेम्पो कोण बनवतं? शेतकरी बँक वापरतो जी आयटी इन्जिनेरांच्या सॉफ्टवेअरवर चालते. मोटरसायकल्/कार नाही वापरत शेतकरी? ते कुठुन येतं? ( मोबाईल फोन/ टीव्ही वगैरे गोष्टी देखील आहेत. त्या तूर्त बाजुला ठेवता येतील.) मी जे सॉफ्ट्वेअर बनवतो ते ट्रॅक्टर/ट्रक/कार बनवायला वापरतात. सो शेतकरी माझ्यावर देखील अवलंबुन आहे.

In reply to by अनुप ढेरे

आपल्या आजोबांच्या काळात हे काही होत का? तेव्हा हि छानपैकी शेती होतच होती का? म्हणजे तुम्ही एकप्रकारे नकळत हे मान्य केलेत कि शेतकर्यांच्या जीवावर किती उद्योग सुरु झालेत , प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद _/\_.

In reply to by बापू नारू

म्हणजे अक्ख्या जगात वाहतूक , धातू आणि सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी फक्त शेतकऱ्यांनी धरून ठेवलेत ? हे नव्हतं माहित हा मला .. धन्यवाद

In reply to by बापू नारू

नव्हतंच. लोकांना शंभर वर्षापुर्वीचं आयुषष्य जगायची का इच्छा असते कोण जाणे. माझ्या आजोबांपेक्षा मी खूप जास्तं सुस्थितीत आहे. आरोग्य, दूरसंचार , आराम सगळ्याच बाबतीत. आजोबांना न मिळालेल्या सुविधा मला मिळालेल्या आहेत. त्याच सुविधा शेतकरी देखील वापरतो. एवढं जर वाटत असेल तर जगावं शेतकर्‍यांनी १०० वर्षापूर्वीच्या काळात. नका वापरुन औषधं, फोन, कार, बँका, ट्रक वगैरे. कोण तयार आहे का? आधुनिक सुविधांवर शेतकरी अवलंबुन आहेच. शेतकरी आयसोलेशनमध्ये जगु शकत नाही. जेवढे इतर लोक त्याच्यावर अवलंबुन आहेत तेवढाच तो देखील इतरांवर अवलंबुन आहे.

In reply to by अनुप ढेरे

१९४७ साली भारतात आयुर्मर्यादा ३२ वर्षे होती. Life expectancy in India rose to 65 years in 2012 from 32 years at the time of independence in 1947 https://blogs.wsj.com/indiarealtime/2013/08/15/indias-record-since-inde… २०१७ साली हीच ६८. ७८ वर्षे आहे. http://www.geoba.se/population.php?pc=world&type=015&page=2 क्रमांक १६६ हे दुपटीपेक्षा जास्त जगणे शेतकऱ्यांच्या मुळेच झाले आहे का शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे झालंय. आम्हीच हुशार हा दंभ झाला कि परिस्थिती हाताबाहेर जाते.

In reply to by अनुप ढेरे

शेतकऱ्यांना इतकीच घमंड असेल तर शेती खुशाल बंद करावी. दिवसे दिवस शेतकरी आणि त्यांच्या नेते मंडळींची मुजोर वृत्ती वाढत आहे. भारतीय शेतकरी जगांतील सर्वांत अकार्यक्षम शेतकर्या पैकी एक आहे. वरून फुकट पाणी आणि काय काय मिळवतो ह्याला गिणतीच नाही. भारतीय शेतकरी म्हणजे आधी पेपर मिळून सुद्धा फेल होणाऱ्या विद्यार्थ्या सारखे आहेत. एक तर आपली जमीन चांगल्या हुशार शेतकऱ्यांना विकून मोकळे व्हावे नाहीतर शेत बंद करून आणखीन काही करावे कुणाचेही घोडे अडणार नाही. अमेरिका मधील गहू आणि ब्राझील मधील साखर ह्यांच्या पेक्षा कमी किमतीत आयात केली जाऊ शकते. शेतकरी म्हणजे जणू काही जगावर उपकार करत आहे हा आव जो लोग अनंत आहेत तो कदाचित १९६० मध्ये खपला असता पण मदर इंडिया चे दिवस गेले आहेत.

In reply to by बापू नारू

नाही परवडलं तर नका पिऊ दूध ओके. आधी १०० रुपये लीटरने दूध विकून दाखवा. दम नसेल तर गप बसा. शेतकरी संपावर गेला म्हणून काय अडले आहे. आत्महत्या केल्या तेंव्हासुद्धा काही अडले नाही. इथे लोक निवांत बासुंदी-पुरी झोडत बसलेत. पारंपारिक शेतीला भारतात भविष्य नाही. ज्यांची इच्छा आहे ते शेतकरी शेतीमाल प्रक्रिया ,दुग्ध जन्य पदार्थ निर्मिती, विपणन वगैरे क्षेत्रात उतरुन चांगले काम करत आहेत. रडणारे काय दूध ओतत बसलेत रस्त्यावर. ओता.

In reply to by बापू नारू

१) शेतकरी लग्नात लाखो खर्च करतात ,स्कॉर्पिओ -बुलेट घेऊन फिरतात - ज्यांची ऐपत आहे ते या गोष्टी करतात ,त्यासाठी ते तुमच्या बापाचे पैसे नाहीत वापरत ना कोणत्या आरक्षणातून असले धंदे करतात. तुम्हाला बघवत नसेल तर सरळ डोळे बंद करून घ्या. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी का म्हणून ? २. दुधाचा भाव :- मॉल-पिझ्झा शॉप मधून महागड्या वस्तू मुकाट्याने आणून खाता ,चितळे जेवढे रेट छापतो तेवढे पैसे गपचूप मोजता ,मग शेतकऱ्याने त्याच्या दुधाचा दर वाढवून मागितलं तर कुटला पार्ट दुखाय लागला तुमचा? नाही परवडलं तर नका पिऊ दूध , बार मध्ये जाऊन मु* पितातचकि बरेच जण. अत्यन्त चुकीचा मुद्दा ... प्रत्येक वस्तूची एक किंमत असते ... गेल्या सहा महिन्यात दुधाचे दर दोन वेळा वाढले आहेत ... हेही लक्षात घ्या .. काही ब्रॅण्डस जसे चितळे हे इतरांपेक्षा जास्त भावाने दूध विकतात .. व लोकही घेतात ... तसेच type II चे दूध जवळजळ १० रुपये जास्त दराने विकले जाते ... तेंव्हा हिम्मत असेल तर स्वतः:ची ओळख बनवा (ब्रँड आयडेंटिटी ) आणि विका दूध जास्त दराने ... बाकी आम्ही काय खायचे काय प्यायचे ता आमचे आम्ही ठरवू ..

In reply to by अमर विश्वास

काय लॉजिक आहे? पिझ्झा, दारु, चितळेच्या भाकरवड्या आणि दूध यांची तुलना? पिझ्झा, दारु हे काय जिवनावश्यक आहे? लोक काय रोज पिझ्झा खातात? ज्यांची ऐपत आहे ते या गोष्टी करतात ,त्यासाठी ते तुमच्या बापाचे पैसे नाहीत वापरत ना कोणत्या आरक्षणातून असले धंदे करतात. तुम्हाला बघवत नसेल तर सरळ डोळे बंद करून घ्या. >> ज्यांची ऐपत आहे त्यांनी करावी शेती! बाकीच्यांनी दुसरे काही व्यवसाय करावेत.

In reply to by बापू नारू

ह्यालाच माज म्हणतात. अत्यंत चुकीचा प्रतिसाद. कोणीही कोणाच्या जीवावर जगत नाही. शेतकरी काय लोकांना फुकट वाटतात की काय ? मॉल मधली महाग वस्तू घ्यायची का वाण्यांकडची स्वस्त हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेतकरी जर कोणाच्या बापाचे पैसे वापरत नाहीत तर मग बाकीचे पण त्यांनी कमावलेलाच पैसा वापरतात. चितळेंनी कितीही रेट लावला तरी घ्यायची सक्ती नाही. ज्याला परवडतंय त्याने घ्यावी खुशाल किंवा मग शेजारच्या xyz स्वीट मार्ट मधून निम्म्या किमतीला घ्यावीत.
नाही परवडलं तर नका पिऊ दूध
मग नाही शेती करणे परवडत तर नका ना करू. कोणी सक्ती केली आहे का ?
तुम्हाला मग शेतकऱ्याने संप केल्यावर कशाला बोंबलता?
अजून तरी सामान्य जनतेने बोंबाबोंब केलेली नाहीये, किंवा रस्त्यावर उतरून जाळपोळ/फोडाफोडी केलेली नाहीये. उलट संप करून सामान्य शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे ह्याचे त्याला मनातून वाईट वाटत आहे. बाकी हा संप होऊच दे, कधीपासून पेंडिंग होताच नाहीतरी. त्यानिमित्ताने कोण किती पाण्यात आहे ते सर्वांनाच कळेल.

In reply to by तेजस आठवले

बाकी हा संप होऊच दे, कधीपासून पेंडिंग होताच नाहीतरी. त्यानिमित्ताने कोण किती पाण्यात आहे ते सर्वांनाच कळेल. बेशर्त सहमत. शेतकर्‍यांच्या आडून राजकारण करणार्‍यांचा माज उतरलाच पाहिजे.

In reply to by तेजस आठवले

कोणी कुटला पैसे वापरायचा आणि वस्तू महाग घ्यायची कि स्वस्त हा जसा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तसाच ,स्वतःच्या मालाची किंमत किती ठरवायची हा पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला परवडत असेल तर घ्या शेतकऱ्यांकडून नाहीतर इम्पोर्ट करा ,नाहीतर व्यापारी तुमच्या सारख्यांचीच वाट बघत असतात बाजारात. आणि या हफ्त्यात कळेलच... राहिली गोष्ट सामान्य जनतेची ,तर शेतकरी तुमच्याकडे सामान्य वर्गात मोडत नाहीत वाटत?. शेतकरी कधीच जाळपोळ/फोडाफोडी करायच्या भानगडीत पडत नाही ,TV -news पेपर मध्ये दूध-भाज्यांची नासधूस करणाऱ्यांच्या गळ्यात कोणत्या पक्षाचे पट्टे आहेत ते पाहायला विसरू नका. बाकी वस्तू स्वतःच्या कष्टाची असेल तर त्याचा माज करायचा पूर्ण हक्क आहे त्या व्यक्तीला...

In reply to by बापू नारू

बापू नारू आपण काय लिहितो याचा जरा विचार करा ... स्वतःच्या मालाची किंमत किती ठरवायची हा पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.. असे तुम्ही लिहिता ... मग तुम्हाला सरकार कशाला हवे आहे हमी भाव द्यायला ? तुम्ही ठराव किंमत आणि विका ... उगाच फुकाच्या गप्पा कशाला? बाकी आम्हाला काय परवडते ते आम्ही बघू ...

In reply to by अमर विश्वास

फुकाच्या गप्पा कोण मारतय ते दिसतच आहे ,लोकशाहीत सरकार कडे मागण्या मागायच्या नाहीतर कोठे मागायच्या? आणि एवढेच प्रामाणिक पणे लिहीत असाल तर मग आता शेतकऱ्यांच्या वस्तू वापरणं बंद करा ,बघा जमतंय का

In reply to by अमर विश्वास

मग तुम्हाला सरकार कशाला हवे आहे हमी भाव द्यायला ? कांद्याचे उत्पन्न कमी होउन देशात भाव वाढल्यास सरकार का निर्यातबंदी करतं? त्यावेळी कांद्याचे दर आवाक्यात आल्यावर तुम्हाला आनंद होतो की दु:ख ?

In reply to by मार्मिक गोडसे

मार्मिक गोडसे पूर्ण ओळ वाचा .. स्वतःच्या मालाची किंमत किती ठरवायची हा पण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.. असे तुम्ही लिहिता ... मग तुम्हाला सरकार कशाला हवे आहे हमी भाव द्यायला ? असे लिहिले आहे ... जर शेतकरी स्वतः किंमत ठरवत असतील तर सरकार कशाला हवे ? असा अर्थ होतो ... तुम्ही फक्त वाक्याचा एक तुकडा वाचलात (In isolation) तर अर्थ बदलेल. सरकार का व कशासाठी हवे याची मला पूर्ण कल्पना आहे

In reply to by बापू नारू

तुम्ही किंमत ठरवा आणि त्या किमतीला विका की. सरकार कशाला हवंय मग तुम्हाला हमी भाव द्यायला ? सामान्य शेतकरी हा सामान्य वर्गातच मोडतो. पट्टे कोणत्या पक्षाचे आहेत ते सांगा की सगळ्यांना. बाकी मला एक गोष्ट कळत नाही, शेतकरी ही एक स्वतंत्र उत्पादक एन्टिटी आहे ना ? मग जो शेतकरी स्वतः कष्ट घेऊन ,कर्ज काढून, खस्ता काढून शेती करून उत्पादन करतो, तो स्वतःच ते विकणार नाही असे म्हणून स्वतःचेच नुकसान कसे काय करून घेतो ? म्हणजे उद्या एखादा कारखानदार म्हणाला की तो त्याने उत्पादन केलेला माल बाजारपेठेत पोहोचूच देणार नाही, तर हे स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारण्यासारखे नाही का ?ही एक प्रकारची आत्महत्याच नाही का ? हाच प्रश्न मला रिक्षावाल्यांचे संप असताना पण पडत असे. हातावर पोट असलेल्यांची रिक्षा नुसती उभी करून ठेवली तर नुकसान रिक्षावाल्याचे पण आहेच की.

स्वामिनाथन आयोगाचा अहवाल हरित क्रांतीचे जनक मा. डॉ एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २००४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना शेती व शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली . आयोगाने २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सादर केले. शेवटचा अहवाल ४ ऑक्टोबर २००६ रोजी सदर करीत आयोगाने शेतकऱ्यांचा दुरवस्थेची कारणे व त्यावर उपाय सुचवले . खेदात्मक बाब हि कि दुसर्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर ला सरकारने कर्मचार्यासाठी सहावा वेतन आयोगाची स्थापना करून २००८ मध्ये शिफारशी लागू केल्यात .अजून यात भर म्हणजे सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी पण सरकार लागू करायच्या तयारीत आहे आणि जवळपास १० वर्षे होऊन सुद्धा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी धूळ खात पडलेल्या आहेत हि स्थिती २०१४ ची आहे स्वामिनाथन आयोगाचा अहवाल काय म्हणतोय ते पहा आणि त्यावर गेल्या तीन वर्षात काय प्रगती झाली याचे जेवढे मिळाले तेवढे दुवे दिले आहेत. परवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये ,नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैर्संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी. http://www.mahaagri.gov.in/level3disp.aspx?id=6&subid=6 सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा http://indianexpress.com/article/business/business-others/govt-set-to-u… पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा http://indianexpress.com/article/business/business-others/govt-approves… शेतमालाची आधारभूत किमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी http://www.narendramodi.in/minimum-support-prices-msp-for-kharif-crops-… बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=117762 आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=161283 संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन India will provide soil testing for farmers to target the correct use of fertilizers, Prime Minister Narendra Modi said on Thursday, to push up yields and cut back on costly misuse. http://in.reuters.com/article/india-agriculture-idINKBN0LN1FH20150219 जाता जाता -- आज जे शेतकऱ्यांच्या नावाने गळा काढत आहेत त्यांचेच कल्याणकारी सरकार १० वर्षे काय करत होते हे विचारायचे नाही. आणि आजच्या यांच्या मागण्या काय आहेत ते पहा. राजकारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरताना आणि लोकांच्या डोळ्यात धूळ फेकताना लाज हि वाटत नाही. बेशरमपणाची कमाल आहे. ज्यांना यात छिद्रांवेशी पणा करायचा आहे त्यांनी तो खुशाल करावा. मी उत्तर देण्यास बांधील नाही.

In reply to by सुबोध खरे

१० वर्षे त्यांनी काय केले याचे दळण किती दिवस दळणार आहेत? आताचे वांझोटे सरकार स्वामिनाथन आयोगाच्या तरतुदी बाबत काय करणार आहेत ते सांगा. माझ्या पहिल्या प्रतिसादातच मी नमूद केले आहे माननीय मुख्यमंत्री मागच्या सरकारवर बिल फाडून मोकळे झाले आहेत. कधी कर्जमुक्ती होणार आहे? कधी तोडगा काढणार आहेत ते की अजून अभ्यास चालू आहे? इतका ढ विध्यार्थी राज्याचा मुख्यमंत्री कशाला बनवला आहे? राज्य चालवायची कुवत नव्हती तर सरकार का स्थापन केले? विरोधातच बसायचे होते?

In reply to by विशुमित

१९९३ ते १९९५ च्या काळात साप्ताहिक सकाळ च्या दिवाळी अंकात कधी तरी अनिल अवचटांनी संगमनेर परिसरात सी सी टी अन तत्सम उपाय करुन गावांचा झालेला कायापलट , वाढलेले उत्पादन अन स्वयंपुर्ण झालेले शेतकरी यावर लेख लिहिला होता. हिवरे बाजार म्हणुन एक पॅटर्न प्रसिद्ध आहे. मा. जा. राजा अन इतर पुढार्‍यांनी वरील पॅटर्न ची कॉपी केली असती तरी ही वेळ आली नसती.

In reply to by कुंदन

त्यांना फक्तं सध्याच्या सरकारवर टिका करता येते. तो वेळ अश्या प्रकल्पांचा अभ्यास करुन शेतकरी बंधुना विकासाठी वापरायची तया॑री नाही. बाकी चालु द्या.

In reply to by विशुमित

त्यांना हवे तितके दिवस ते दळण दळू शकतात. राज्य चालवायची चांगली कुवत आहे आणि ते सिद्ध झालेलेच आहे. बाकी कोण ढ आहे ते माजी उपमुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहेच. कर्जमुक्ती सरसकट देऊ नयेच. जे लोक सत्तेमध्ये होते त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले ते सांगावे, आणि त्याचा काही उपयोग झाला नसेल तर सरळ तसे सांगावे.

In reply to by विशुमित

आताचे वांझोटे सरकार स्वामिनाथन आयोगाच्या तरतुदी बाबत काय करणार आहेत ते सांगा. विशुमित साहेब आताच्या वांझोट्या सरकारने काय केले आहे प्रत्येक मुद्द्यानंतर मी दुवे दिलें आहेत तेवढे वाचून पाहायची जरी तसदी घेतलि असतीत तर असे विधान केले नसते. पूर्वग्रहदूषित मनोवृत्ती असली कि असे प्रश्न निर्माण होतात. अर्थात आपल्याला डोळ्यावर झापडे बांधायची असतील तर गोष्ट वेगळी. तेरा वर्षात न झालेल्या गोष्टी जादूच्या कांडीप्रमाणे होत नाहीत हे आपण समजून घ्या सरकारने प्रत्येक मुद्द्यावर काहीतरी काम केलेले आहे एवढे जरी आपण डोळे उघडून पाहिलेत तरी ठीक आहे अन्यथा आपली मर्जी

In reply to by विशुमित

काहीच झालं नाही कि काहीच वाचलं नाही ((--)) तुम्हाला "आदर्श" सरकारच पाहिजे आहे त्याला कोण काय करणार.

In reply to by विशुमित

आयकर रिटर्न फाइल करायच्या अंतिम तारखेच्या आत कर्जमाफी करून घेण्यासाठी ही धडपड चालु आहे. Dwarkanath Surendranath Kulkarni Courtesy Deepak Paranjpe ८ नोव्हेंबर २०१६ ....रात्री ८ वाजता ....पंतप्रधान अचानक नोटबंदीची घोषणा करतात....महाराष्ट्रातील सर्व साखरसम्राटांची ( काँग्रेस आणि राष्ट्रवादी ) अचानक झोप उडते....घरात तर शेकडो करोडो रुपये पडून आहेत....आता काय करायचे....तोंडचे पाणी पळते....अचानक सर्वांना सहकारी बँकांची आठवण येते....त्या बँक तर आपल्याच आहेत....सर्व हरामखोर काळा पैसा सहकारी बँका मध्ये ठेवतात....दुसऱ्या दिवशी सरकार घोषणा करते कि सहकारी बॅंकांमधला पैसा आम्ही स्वीकार करणार नाही....आता मात्र सगळ्या चोरांची झोप उडते....दुसरा उपाय काय ....कोणीतरी शक्कल चालवतो ....शेतकऱ्यांना कर्ज वाटा....सगळे हरामखोरांना हि कल्पना पटते....शेतकऱ्यांच्या नावाखाली , आपल्याच लोकांना कर्ज वाटतात....त्यांना असं वाटत कि हे सरकार पडले कि पुन्हा आपलेच सरकार येणार आहे....तेव्हा कर्ज माफी करून घेऊ आणि परत आपला काळा पैसा , पांढरा होईल ....पण मोदी सगळ्यांना पुरून उरतो ....पुढची १० वर्षे काय आपलं सरकार येत नाही म्हटल्यावर ह्यांना बाप आठवतो ....कर्ज माफी जर आता मिळाली नाही तर आपले सगळे काळे पैसे बुडतील ह्याची खात्री सगळ्या चोरांना होते....अचानक शेतकऱ्याची आठवण येते ....कर्ज माफी , आत्महत्त्या सुरु होते....आसूड मोर्चा , शेतकऱ्यांचा अचानक पुळका येतो....शेतकरी संप सुरु होतो....शेतकरी ज्या कज॔ माफीबदल बोलत आहैत ते कीती खरे आहे.कारण गेली 60 वष॔ अनेकदा नुकसान झाले शेतीचे व मिळकत कमी झाली तेव्हा हे सुचले नव्हते.आताच का ही नाटक चालु आहेत.यांचा बोलविता धनी कोण आहे.....खर तर आज जर खरच गंभीर परिस्थीती असेल तर याला जबाबदार गेली 60 वष॔ राज्य करणारे आहेत.

In reply to by मामाजी

@मामाजी, ह्या पोस्टच्या सुरवातीच्या भागाबद्दल शंकेला वाव आहे. परंतू कर्जाबाबतच्या बातमीत काहीही तथ्य नाही.,कारण शेतकर्‍याल्या पीककर्ज हे शेतीच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात मिळते. सहकारी बँकेत जमा झालेल्या कथित काळ्या पैशाचे आकडे बघितले तर ईतके पिककर्ज वाटप होणे शक्य नाही.

स्वामिनाथन आयोगाचा अहवाल कुठेही सरसकट कर्ज माफी द्या दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा. शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा. ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे. असे म्हणत नाही उलट हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये ,नैसर्गिक आपत्ती वेळी ,पूर्वस्थिती येईपर्यंत गैर्संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे. काहीही मागण्या करून राजकारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरून सरकारला जेरीस आणणे एवढाच अजेंडा आहे. हे जेंव्हा शेतकऱ्यांना आणि त्यांना आंधळं समर्थन देणाऱ्यांना समजेल तो सुदिन.

In reply to by विशुमित

जोडधंदा सुरु करणे हा उत्तम मार्ग आहे माझ्या एक जवळच्या मित्राने पाच पैकी एका एकरात शेळी पालन सुरु केले आहे .. . नुसते सुरु केले आहे असे नव्हे तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही यात सामावून घेतले आहे. अनेक छोट्या शेतकऱयांना शेळी पालनास दिली आहे .. व त्याची पिल्ले / शेळी माझा मित्रच परत विकत घेणार अशी काहीशी योजना आहे .. व या सगळ्याचा उत्तम फायदा होत आहे.. हे सगळे खासगी आहे .. सरकारचा सहभाग नाही ..

शेतकरी चुकत असतीलही काही बाबतीत. पण आपण एकंदरीत शेतकरी प्रश्नाकडे फार असंवेदनाशील आणि तिर्हाइत होऊन बघतो. दुर्दैवाने ह्यात राजकारण फार मोठ्या प्रमाणात घुसलेले असल्याने शेतकऱ्यांच्या खऱ्या अवस्थेकडे लोकांचे दुर्लक्ष होते. दूध महागले म्हणून कुरकुरणारा माणूस डोमिनोज चा पिझ्झा मोठी रक्कम देऊन घेतो हे शहरातले दृश्य आहे. शेतकरी आणि सामान्य माणसाचे आरोग्य ह्या प्रश्नाकडे हातात हात घालून बघितले तर प्रश्न सुटू शकतात का? माझ्या एका मैत्रिणीने छान विचार मला सांगितलेला - फॅमिली डोक्टर असतात तसा फॅमिली शेतकरी असावा. त्याने एथिकल फार्मिग(नैसर्गिक पद्धतीने) करावे आणि त्या बदल्यात शहरी कुटुंबांनी त्याच्या कडून फिक्स्ड रेट ने उत्पादन घ्यावे (उत्पादन खर्च व नफा ह्यावर ठरवून). नैसर्गिक संकटात त्याला सांभाळून घ्यावे. विन विन होऊ शकतं. ग्राहक दर्जेदार - पेस्टिसाईड /कृत्रिम खते वगैरे विरहीत अन्न मिळवू शकतो. शेतकऱ्याला सिक्युरिटी मिळू शकते.

In reply to by nanaba

//फॅमिली डॉक्टर असतात तसा फॅमिली शेतकरी असावा. त्याने एथिकल फार्मिग(नैसर्गिक पद्धतीने) करावे आणि त्या बदल्यात शहरी कुटुंबांनी त्याच्या कडून फिक्स्ड रेट ने उत्पादन घ्यावे (उत्पादन खर्च व नफा ह्यावर ठरवून). नैसर्गिक संकटात त्याला सांभाळून घ्यावे. विन विन होऊ शकत///// खरंच चांगली कल्पना आहे. सरकारने हमी देण्याऐवजी गिर्‍हाईकाने हमी देणे केव्हाही चांगले. यावर दोघांनाही दोघांची किंमत कळेल. शिवाय शेतकर्‍याला शेतात काय लावावे हेही गिर्‍हाईक सांगू शकेल.

In reply to by जयंत कुलकर्णी

पण माझा एक अनुभव सांगतो. पुण्याच्या मार्केटयार्ड मधे शेतकर्‍यांसाठी खास जागा निर्माण करण्यात आली होती. त्यात त्यांनी येऊन गिर्‍हाइकाला आडत्यांना मधे न घेता माल विकावा अशी कल्पना होती. मी प्रथम तिकडे न जाता आमच्या नेहमीच्या आडत्याकडे चौकशी केली. संवाद खालीलप्रमाणे.. मी : मेथी फारच महाग आहे. मी शेतकर्‍याकडून घेतो.'' आडता: जाऊन पहा, मग घ्या. मी लगेच तेथे सुरवातीलाच असलेल्या शेतकर्‍याकडे गेलो. संवाद खालीलप्रमाणे. मी: मेथी ? शेतकरी: २० रु. मी: आहो तिकडेही २० रु. आहे. शेतकरी: मग आम्ही का कमी किमतीला विकावी ? म्हणजे शेतकरी तेथे ५ रु ला मेथी घालायला तयार आहे पण येथे गिर्‍हाइकाला १५ रु. द्यायला तयार नाही. शेतकर्‍याकडून सरळ गिर्‍हाइकाला या योजनेचा हा असा बोजवारा वाजला. त्या शेतकर्‍याने जर ती मेथी १० रु ला विकली असती तर त्या आडत्यांकडून कोणी घेतली असती ? आजही मार्केटमध्ये हीच परिस्थिती आहे. (असावी) थोडक्यात काय शेतकरी गिर्‍हाइकाच्या संपर्कात आला की तो आडत्याप्रमाणेच विचार करतो. पुढचा विचार करत नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

सांगायला कशाला लागतंय, थोडी खोलात विचारपूस करून बघा त्यांना, माहिती मिळेल. तसा तो नावालाच शेतकरीच असतो, व्यापार हा त्याचा फुल्ल टाईम धंदा असतो.

In reply to by जयंत कुलकर्णी

आमच्या इथे दर गुरवारी "Farmers' Market" भरते. शेतकरी स्वतः त्यांची उत्पादने घेउन येतात. तिथे वेगळा अनुभव येतो. लोकांचा खुप चांगला प्रतिसाद आहे. मुख्य म्हणजे बाहेर व्यापार्‍या कडे न मिळणार्‍या वस्तु शेतकर्‍याकडे मिळतात (उदा. खपली गहु). भाव सुध्दा वाजवीच आहेत.

In reply to by जयंत कुलकर्णी

पुण्यात हवे असेल तर .. ब्रह्मे सभागृहाजवळ , एक्स सर्विसमेन कॉलनी, पौड रोड (दर मंगळवारी )

In reply to by जयंत कुलकर्णी

आम्ही आहोत काही जणांचे फॅमिली शेतकरी. ते आणि आम्ही कधीही खळखळ घालत बसत नाही. दोघांना ही परवडतं. पुढे जाऊन मी असे सुचवू इच्छितो की सरकारी MSP वर अवलंबून न राहता प्रत्येक शेतकऱ्याने उत्पादन खर्च व नफा ठरवून शेताच्या बांधावरच शेतमालाची किंमत स्वतः ठरवून किरकोळ ग्राहक आणि व्यापाऱ्यांना विकावा. स्वतःची किंमत ठरवण्याची समांतर व्यवस्था शेतकऱ्यांनी आता अवलंबली पाहिजे. नाहीतर माल तसाच शेतात कुजवावा. संप वगैरे करून काहीही साध्य होणार नाही याबद्दल माझी १००% पक्की धारणा झाली आहे.

In reply to by nanaba

मी प्रत्येक वाक्य वेगळे काढून उत्तर देत आहे, कृपया गैरसमज करून घेऊ नये. शेतकरी चुकत असतीलही काही बाबतीत. या विधानाशी किती शेतकरी आणि शेतकरी नेते सहमत होतील..? पण आपण एकंदरीत शेतकरी प्रश्नाकडे फार असंवेदनाशील आणि तिर्हाइत होऊन बघतो. असहमत. शेतकरी आणि शहरी लोकांचा दुवा हा दुर्दैवाने राजकारण्यांच्या हातातून जात असल्याने दोन्ही गट एकमेकांविरूद्ध उभे असतात. शेतकरी नेत्यांनी पुढाकार घेऊन हा दुवा साधणे आवश्यक आहे. दुर्दैवाने ह्यात राजकारण फार मोठ्या प्रमाणात घुसलेले असल्याने शेतकऱ्यांच्या खऱ्या अवस्थेकडे लोकांचे दुर्लक्ष होते. शक्यता आहे. दूध महागले म्हणून कुरकुरणारा माणूस डोमिनोज चा पिझ्झा मोठी रक्कम देऊन घेतो हे शहरातले दृश्य आहे. सरसकट सर्वजण असे करतात का..? सगळे शेतकरी शेतकर्ज काढून लग्नात लाखो रूपये उडवतात या विधानाप्रमाणेच हे विधान चुकीचे आहे. शेतकरी आणि सामान्य माणसाचे आरोग्य ह्या प्रश्नाकडे हातात हात घालून बघितले तर प्रश्न सुटू शकतात का? हो. सुटू शकतात. पण असे न होऊ देण्यातच राजकारणी लोकांचा स्वार्थ आहे. बाकी प्रतिसादावर पास.

In reply to by nanaba

फॅमिली डोक्टर असतात तसा फॅमिली शेतकरी असावा.>>>> सहा सात वर्षांपूर्वी सर्वोदयी शेतकरी फुटाणे ंंंंंंं ह्यांच्यावर मैत्रीणीला लेख लिहायचा​ होता म्हणून गेलो होतो. ते सेंद्रिय शेती करतात. परदेशातून लोक त्यांच्या कडे शिकायला येतात. त्यांनी हीच कल्पना मांडली होती. जून मध्ये काही आगाऊ रक्कम जमा करायची. अधूनमधून तुम्ही शेतात पिकणारं आपलं धान्य पाहू शकता. त्याबरोबर आपलं एक भावनिक नातं तयार होतं. छान कल्पना आहे. काही कारणाने सहभाग घेतला नाही. पण त्यांच्या कडून धान्य घेतो.

In reply to by nanaba

दूध महागले म्हणून कुरकुरणारा माणूस डोमिनोज चा पिझ्झा मोठी रक्कम देऊन घेतो हे शहरातले दृश्य आहे. हा शहरी लोकांचा द्वेष करणारा प्रातिनिधिक प्रतिसाद आहे. दूध हा अत्यावश्यक घटक आहे आणि डॉमिनो असला काय नसला काय. अर्धा ते एक लिटर दूध हे गरिबापासून ते ऊच्च वर्गापर्यंत लागणारी गोष्ट आहे. डॉमिनो मध्ये पिझ्झा खाणारी माणसं हि फक्त उच्च माध्यम वर्गातील असतात. माझी मुले महिन्यातून एकदा डॉमिनो चा पिझ्झा खातात पण रोज दूध पितात. माझ्याकडे काम करणाऱ्या वर्गातील लोक डॉमिनोचा पिझ्झा खातच नाहीत पण रोज दोन तीन वेळा चहा मात्र पितात. दूध महाग झाले कि प्रत्येक माणसाला त्याची झळ बसते. चहा ५ रुपयाचा ७ रुपये होतो. मग भाजीवाला झाडूवाला सर्व लोक पगारवाढ मागतात. डॉमिनो चा पिझ्झा पाचशे ऐवजी सातशे झाल्यामुळे सामान्य माणसाला काहीच फरक पडत नाही. पण राळ उडवण्यासाठी लोक अशा गोष्टीचा वापर करतात.

In reply to by सुबोध खरे

नेमका प्रॉब्लेम तरी काय आहे ? पिझ्झा तुम्ही रोज खाता कि कधीतरी याच्याशी काय संबंध आहे ? पिझ्झा ६०० रू ला मिळतो आणि ती त्याची किंमत अवाजवी आहे हे ठाऊक असूनही कुरकूर न करता, घासाघीस न करता आपण तो घेतो हा मुद्दा आहे. दूध रोज लागतं म्हणून स्वस्त द्या आणि पिझ्झा मौज म्हणून खातो म्हणून आम्ही महाग घेऊ हे कुठलं तर्कशास्त्र आहे ? आणि हे तर्कट मांडलं म्हणून शहरीद्वेष ! कमाल आहे ब्वॉ ! तर्कतीर्थच ! बरं जी उत्तरं इथे दिली जाताहेत त्यात शेतकरीद्वेष ठासून भरला आहे याची जाणीव आहे का ? भाजीपाला आणि दूध रोज लागते हा शेतक-याचा दोष का ? या हिशेबाने रक्तदाब आणि मधुमेहावरील औषधे उत्पादनखर्चाइतक्या किंमतीतच उपलब्ध करायला हवीत.

In reply to by खटासि खट

पिझ्झा तुम्ही रोज खाता कि कधीतरी याच्याशी काय संबंध आहे ? पिझ्झा ६०० रू ला मिळतो आणि ती त्याची किंमत अवाजवी आहे हे ठाऊक असूनही कुरकूर न करता, घासाघीस न करता आपण तो घेतो हा मुद्दा आहे. टॅक्सीची भाववाढ झाली म्हणून आंदोलन झाल्याचं तुम्ही पाहिलंय का? पण हेच रेल्वे ची किंवा बसची भाववाढ झाल्यावर आंदोलनं होतात ना? रेल्वे बसने आपण रोज जातो आणि टॅक्सिने कधीतरी(लग्नाला जायचंय इ) दूध रोज लागतं म्हणून स्वस्त द्या आणि पिझ्झा मौज म्हणून खातो म्हणून आम्ही महाग घेऊ हे कुठलं तर्कशास्त्र आहे ? दूध न खरेदी करता चालतं का? गरीबात गरीब माणसाला सुद्धा आपल्या मुलाबाळांसाठी दूध लागतंच. पिझ्झा घेणारी माणसं "गरीब" नसतात. निमन मध्यमवर्गीय सुद्धा ती गोष्ट "चैनीची" म्हणूनच घेतो. अत्यावश्यक आणि चैनीची वस्तू (essential and luxury) यात आपण "फार गल्लत" करता आहात अत्यावश्यक वस्तू अधिनियम याखाली किमती नियंत्रणात ठेवणे हे सरकारचे काम आहे. एकदा वाचून पहा http://www.amazon.in/Houses-Essential-Commodities-Marathi-Shelkar/dp/97… आणि हे तर्कट मांडलं म्हणून शहरीद्वेष ! कमाल आहे ब्वॉ ! तर्कतीर्थच !काय टिप्पणी आहे? बरं जी उत्तरं इथे दिली जाताहेत त्यात शेतकरीद्वेष ठासून भरला आहे याची जाणीव आहे का ? द्वेष शेतकर्याकचा नसून त्यांच्या नावाने आपली पोळी भाजून घेणाऱ्यांचा आहे. श्री शरद पवार १० वर्षे कृषी मंत्री होते २००४ ते २०१४ तेंव्हां त्यांना हमी भाव वाढवून द्यावा किंवा स्वामिनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा असे का वाटले मात्र शेतकरांबद्दल सहानुभूती आणि काळजी दाखवतात आणि पावसाच्या तोंडावर शेतकऱ्यांना नांगरण्या पेरण्या सोडून केवळ स्वतःच्या सत्तेसाठी आंदोलनास भरीस पडतात यापेक्षा निर्लज्जपण दुसरा नसेल. भाजीपाला आणि दूध रोज लागते हा शेतक-याचा दोष का ? या हिशेबाने रक्तदाब आणि मधुमेहावरील औषधे उत्पादनखर्चाइतक्या किंमतीतच उपलब्ध करायला हवीत साहेब, हजारो औषधे "औषध किंमत नियंत्रण आज्ञावली) किंवा DPCO (DRUG PRICE CONTROL ORDER) खाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्या किमती जगात अत्यंत स्वस्त अशा आहेत. शिवाय नवीन http://www.nppaindia.nic.in/whatsnew.htm राष्ट्रीय औषध नियंत्रण आयोग आहे. हा औषधांच्या किमतींवर सतत लक्ष ठेवून असतो. आपला हा प्रतिसाद अज्ञानातून आला आहे समजून सोडून देतो.

या मुद्याबाबत एक शंका अाहे, जाणकारांनी स्पष्ट करावे. ज्या शेतकर्यांनी कर्ज फेडले अाहे, त्यांना यातून काय मिळेल? त्यांनी कर्ज फेडून चूक केली, हा धडा? ही मागणी मान्य झाली, तर पुढे हा पायंडाच पडेल, नाही का? उलट ज्यांनी कर्ज फेडलंय, त्यांना अाणखी कर्ज बिनव्याजी द्यावे, अशी मागणी करायला पाहिजे. ज्या उद्योजक (उदा. मल्ल्या) व संस्थांनी कर्ज घेतले अाहे, त्यांना ते कदापि माफ होता कामा नये. अामच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटाचे एक सदस्य म्हणाले होते, की शेतकर्याचे मुख्य उत्पादन त्याला जमिनीतून मिळते. न पैसे देता! त्यामुळे शेतकर्याला काहीही तसंच मिळालं पाहिजे, अशी सवय लागते. अतिशयोक्ती सोडून द्या, पण मुद्दा अाहे विचार करण्यासारखा.