Skip to main content

लग्नाचा उद्देश काय!!!! सेक्सची सोय? साहचर्य? की आणखी काय??????

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 16/05/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ही संस्था कशी अस्तित्वात आली यावर समाजशास्त्रज्ञांनचं एकमत आहे.पुर्वापार पुरुष हे अपत्याला पोसत असल्याने होणारे अपत्य आपलेच असले पाहीजे हा रोख होता ,त्यातून स्त्रीला स्वतःशी बांधुन ठेवले तर तिच्यापासून होणारे अपत्य आपलेच असेल याची बर्यापैकी खात्री असते.यातूनच विवाहसंस्था अस्तित्वात आली.भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या वि का राजवाडे यांच्या पुस्तकानुसार पुर्वी मुक्त लैंगिक संबंध चालायचे.पुढे ते कमी होत एकपत्नीव्रताला ग्लॅमर आले.मुक्त लैंगिक संबंधात कामभावनेचा निचरा योग्य प्रमाणात होतो हे मी माझ्या आधीच्या एका धाग्यात मांडले होते,अनेकजण त्याच्याशी सहमतही होते. तर ही मुक्त व्यवस्था बंद पडल्याने पुरुषांची पंचाईत झाली .मग ते बिचारे लग्न या एकाच गोष्टीकडे " लैंगिक भावनेचा निचरा म्हणून पाहू लागले.भारतातलं लैंगिकतेला अनैसर्गीक समजण्याचं हिंदूंचं धोरण विवाहसंस्थेला बळकट करु लागले .यात मग स्त्री चे वस्तुकरण होणे अपरिहार्य होते. आजकाल विवाहाचा उद्देश काय हे जेव्हा माझ्या मित्रांना मी विचारतो तेव्हा सेक्सची सोय असे उत्तर मिळते.कुणी फार पुढे जाऊन दोन जिवांचे मिलन,सृजनशिलता,साहचर्य(companionship) अशी मखलाशी करत असतात.प्रत्यक्षात बायकोशिवाय इतरही स्त्रीयांकडे वखवखलेल्या नजरेने हे कल्पितानंदही बघत असतात. प्रत्यक्षात लग्न हा माझ्यामते पुरुषाच्या अनावर कामेच्छेला मोकळी वाट करुन देण्याचा एक करार आहे ,बाकी काही नाही. दो बदन एक जान,अर्धांगिनी,बेटर हाफ,सृजन वगैरे कविकल्पना म्हणून ठीक असतील पण प्रत्यकषात निसर्गाचे नियम फार वेगळे असतात.हा माझा दृष्टीकोण असेल कदाचित पण त्याला वास्तवाची किनार निश्चित आहे. तर,मिपाकरांना याविषयी काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल. १ .लग्न ही व्यवस्था "सेक्सची सोय म्हणून आहे असे आपल्याला वाटते का? नसल्यास का नाही? २.एकपत्नीव्रत ह्याला आपला समाज आदर्श मानत असेल तर बहुतांश विवाहीत पुरुष इतर स्त्रीयांकडे कोणत्या उद्देशाने पाहतात्? ३.सिधि बात नो बकवास" याचं भारतीयांना वावडं का आहे? चर्चेदरम्यान येणारे मुद्दे धाग्यात समाविष्ट केले जातील ,धन्यवाद.

वाचने 74234
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चवथीच्या मराठी शिक्षकाला विचारलं तरी हरकत नाही. `उद्देश' असंच लिहीतात `उद्येश' असं कदापी लिहीत नाहीत. इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

संक्षी, तुमची इयत्ता सांगून अजून किती हसवणार तुम्ही आता ? पोट दुखायला लागलं =)) =)) =)) अजून एक म्हण आठवली, "स्वतःचे ठेवी झाकून, दुसर्‍याचं पाही वाकून !" :D

In reply to by संजय क्षीरसागर

इतकी छोटीशी सुधारणा मनातल्या मनात करुन घेतली तरी काम होईल. मन ? हे मन तर लै खट्याळ असतं आणि त्या मनाचा लब्बाड कंप्युटर बंद करून मगच त्याच्यातून उत्तरे बाहेर (कशी ? काय ? कोण जाणे :D ) काढायची असतात ना, तुमच्याच पूर्वीच्या एका उपदेशानुसार ???!!! मग आता त्या लब्बाड मनातल्या मनात काही तरी करायचा सल्ला कसा काय देताय, आँ ?! =)) =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

उद्देश हा शब्द चवथीपर्यंत जायला हरकत नाही असा प्रतिसादाचा अर्थ होतो. एनी वे, मनातल्या मनात निदान हा प्रतिसाद तरी वाचता येतोयं का ? तसाच तो शब्द मनातल्या मनात म्हणा. इतक्या दीर्घ प्रतिसादांची आवश्यकता नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून, अतीटोकाचे विचार पुढे मांडून, वाचकांचे मनोरंजन करणे
अगदी अगदी.

धाग्यावर मांडले गेलेले चांगले विचार वाचताच येत नाहीत असं दिसतं.

एकटं जगणे कठीण आहे . म्हणून सहजीवनासाठी लग्न आवश्यक आहे. वय कोणतेही असो , एकटं जगणं कठीण जातं . एकड्या लोकांना विचारून पाहा.

संजय क्षीरसागर,
लिव-इन म्हणजे दोघांनी रेनकोट घालून झेपेल तेवढी अंघोळ करणं आहे,
शंभर टक्के सहमत. रेनकोटाची कुठलीही आवृत्ती घ्या, सत्य काही बदलंत नाही! :हसून हसून गडबडा लोळण: आ.न., -गा.पै.

या लेखावरील काही रिप्लाईज हे विवाहसंस्थेचे समर्थन कमी आणि I am living great married life अशी स्वतःची लाल करणारे अधिक वाटतात.

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

ज्यांना व्यक्त होण्याची हिंमत आहे ते व्यक्त होतात. ज्यांना आधीच वैवाहिक जीवनात पाचर बसली आहे ते गप राहातात. ज्यांच्याकडे काहीच सांगण्यासरखं नाही किंवा करण्याची हिंमत नाही त्यांना कुठेच काही विधायक दिसत नाही. असे लोक सर्कास्टिक कमेंटस करण्यापलिकडे विशेष काही करु शकत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही ज्याला हिंमत करुन व्यक्त होणं म्हणता त्याला आम्ही कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे म्हणतो :)

In reply to by वेशीवरचा म्हसोबा

आमचाकडे अशी म्हण आहे की जो उघडाच आहे तो सोडणार काय आणि गुंडाळणार काय ? फक्त फालतू कमेंटस करण्यापलिकडे त्याच्याकडे काही नाही.

अॅमी, सगळ्या विकसित देशात marital rape कायद्याने गुन्हा झालेला आहे. भारतीय लोकांच्यात नवराबायकोमधली भांडणं नवरा आणि बायकोनेच सोडवायची पद्धत आहे. ही पद्धत परिपूर्ण आहे असा दावा नाही. मात्र हिच्यामुळे भारतात दरडोई घटस्फोट अत्यल्प आहेत. तुम्ही म्हणता त्या विकसित देशांत जोडप्यांत स्वत:ची धुणी दाराआड धुण्याची प्रगल्भता नाही. सरकारी चव्हाठ्यावर धुतल्याने काही विशेष साफ होतात असंही नाही. नवरा सांभाळायची अक्कल नसेल तर लग्नंच करू नये, अशी भारतीय धारणा आहे. कशाला पाहिज मग वैवाहिक बलात्कार! आ.न., -गा.पै.

१) जमलं तर marital rape ची wiki वाचून काढा. ज्यांची धारणा लग्न म्हणजे एकाच पुरुषाकडून होणारा रोजचा बलात्कार अशी आहे त्यांना सहजीवन कळण्याची शक्यता शून्य ! तस्मात, असले फालतू विचार वाचायचं तुम्ही सुद्धा थांबवाल तर प्रतिसादातून दिसणारा उद्वेग कमी होण्याची शक्यता जास्त . २) ठीक. बाईचं तळ्यात मळ्यात चालू आहे वाटत. इतक्या वेळानं का होईना तुम्हाला मुद्दा समजला हे काय कमीये ! ३) तुमची मतं कळली काय लायकीची आहेत. अनुबंध कृतज्ञता वगैरेच्या आवरणाखाली केवळ आपल फोबियां आणि इन्सेक्युरिटी लपवताय. नेमकी उलटी परिस्थिती आहे ! ज्यांना इन्सिक्योरिटी वाटते ते दुसर्‍यावर विश्वास टाकूच शकत नाहीत. साध्यासाध्या आनंदाच्या गोष्टीत, जिथे दोघांनी एकत्र एंजॉय करायचं, तिथे त्यांना दुसरा बळजबरी करतोयं असं वाटू शकतं. अशा लोकाच्या जीवनात लग्न अशक्य आहे कारण तो पारस्पारिक विश्वासाचा मामला आहे. इन फॅक्ट, ज्याला आपल्या निर्णयाची खात्री नाही अशी व्यक्ती कुणाबरोबरही कायम साशंक राहाणार आणि जोडीदाराच्या कधीही प्रेमात पडू शकणार नाही. कारण प्रेम विश्वासातून निर्माण होतं. प्रेम हा तुम्ही म्हणत असलेल्या `फोबियां आणि इन्सेक्युरिटी ' वर एकमेव उपाय आहे. ४) असो तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. हा मात्र तुमच्यादृष्टीनं योग्य निर्णय असू शकतो. माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात !

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्याशी वाद घालणारे चुकीच्या धारणातून मुक्त होतात कारण वादात त्यांचे मुद्दे बाद होतात ! व्हय द्येवा म्हाराजा, शिरी शिरी शिरी स्वामीम्हाराजा ! तुम्च द्येवुळ कुटंसं हाय म्हनाव ? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) हायला काय काय म्हुन डिल्युजन आसतात येकेकाची *yahoo* लईच कटिन हाय कि रे खर्र्या द्येवा म्हाराजा *fool* *dash1*

In reply to by गब्रिएल

गब्रिएल भाऊ .. जवळपासच्या एखाद्या कृष्ण मंदिरात डोकं टेकवून या...हे साहेब आसपासचं असतील कारण असंच काहीसं वाक्य भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं आहे

तुमचं पुरेसं मणोरंजन झालं असेल तर आता दुसरा एखादा विषय घ्या च्युइंगमसारखा चघळायला.

In reply to by संजय क्षीरसागर

तसे नाही..... एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते. (आणि ती बर्‍याचदा व्यक्ती सापेक्ष असते.सामाजिक भान हा वेगळा मुद्दा आहे आणि तो ह्या धाग्यात नाही.) जादूची छडी हॅरी पॉटरच्या हातात आली की समाजोपयोगी ठरते आणि टॉम रीडलच्या हाती आली की समाजविघातक वागते (मग भले त्या छडींचे केंन्द्र एक असले तरी.) असो, ह्या धाग्यावर चर्चा करण्यात जास्त अर्थ नाही. बादवे, आपला एक कट्टा बॅलन्स आहे. डोंबोलीला कधी येताय?

In reply to by मुक्त विहारि

एखाद्या गोष्टीचा उपयोग तुम्ही कसे करता त्यावर त्या गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता ठरत असते. एकदम बरोब्बर ! या पोस्टचा उपयोग लग्न या एका महत्वाच्या पर्यायाची विधायकता मांडण्यासाठी केला गेला. अर्थात, ज्यांना लग्न करुन मजा येत नाही ते करवादले आहेत, कदाचित त्यामुळे ते धागा भरकटवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला माझा इलाज नाही. जे लग्नाला घाबरलेले आहेत त्यांना लिव-इनची निष्फलता सांगण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना इथे प्रतिवाद जमला नाही, हे कदाचित या पोस्टचं यश आहे. ज्यांना कशातच काही मजा येत नाही ते केवळ फ्रस्ट्रेशन काढायला इथे येतात असा अनुभव आहे. ते एकसंध पोस्ट टाकू शकत नाहीत की एका ओरियंटेशननी विचार करु शकत नाहीत. अशा लोकांना किमान प्रतिसाद वाचून एक- विचार- दिशा मिळावी अशी आशा आहे. तुम्ही म्हणता तसा संकेतस्थळाच्या सुविधेचा उपयोग कोण कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे, धागा कुणाचा आहे यानं फारसा फरक पडत नाही. आणि कट्टा म्हणाल तर मिपा हाच माझा ऑन-लाईन कट्टा आहे :) ज्याच्याकडे व्यक्त करण्यासारखं काही आहे त्याला बोललं काय आणि लिहीलं काय, काही फरक पडत नाही. इन फॅक्ट, धिस इज फास्टेस्ट अँड ऑलवेज टू द पॉइंट. आता काही लोक चर्चेचा खफ करतात, तेवढीच त्यांची प्रगल्भता ! :)

In reply to by संजय क्षीरसागर

असे नसते हो, मी तरी जाणून बुजुन एखाद्या धाग्याचा खफ करतो. (काही धागे त्या साठी(च) असतात, असे माझे मत.) एखाद्या धाग्याचा खफ का होतो? किंवा ह्या धाग्याचा खफ का झाला? हे चर्चेचे विषय नाहीत.... टाईमपासचेच विषय आहेत. आणि कट्याचे म्हणाल तर...... मी तरी कट्याचा उपयोग एकत्र खाणे-पिणे (अगदी चिंचेची चटणी आणि बटाटे-वडे असले तरी पण त्यावेळी चालते) आणि गप्पा-टप्पा ह्या साठीच करतो. असो, जमल्यास कधीतरी एकत्र भेटू आणि निवांत पणे गप्पा मारू. (कुणास ठावूक कदाचित तुम्ही पण आमच्यासारखे कट्टा प्रेमी व्हाल.)

In reply to by मुक्त विहारि

चर्चेत अनेकांनी मनापासून सहभाग घेतला आणि मी तर घेतलाच घेतला. कारण विवाह हा माझ्या अनेक प्रिय विषयांपैकी एक आहे. शिवाय इथलं माझं स्टेटस `नोन टू ऑल बट मिसींग फ्रॉम ऑल' मला फार आवडतं. लोक्स माझी तमा न बाळगता माझ्या पोस्टसवर काहीही ठोकू शकतात आणि मी तर अर्थात, ....ठोकतोच ! एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो.

In reply to by संजय क्षीरसागर

एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो. +1

In reply to by विशुमित

"एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो." असे म्हणणे एकांगी आहे. मी आणि बरेच मिपाकर (उदा. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे, स्पा, औरंगजेब...सूड (ह्याचे शाब्दिक आसूड बर्‍याचदा खाल्ले आहेत....)पण आज जर काही मदत लागली तर हीच मंडळी मदत पण करतात.) इथेही बर्‍याच मुद्द्यांवर एकमतात नसतो. पण एकत्र गप्पा मारतांना "मिपा"चा उपयोग फक्त एक बहाणाच असतो. मतभेद असणे उत्तमच...पण एकमेकांच्या मताचा आदर करून इतर अनेक गोष्टींचा एकत्र उपभोग तर घेवू शकतोच की. मला चेस खेळायला येत नाही...पण इथे जेंव्हा-जेंव्हा चेसचे धागे निघतात तेंव्हा तेंव्हा हजेरी लावतोच. चित्रकला अजिबात येत नाही आणि फोटोग्राफी पण येत नाही...पण म्हणून एसचे किंवा अभ्याचे किंवा चित्रगुप्त ह्यांचे धागे बघतोच की....

In reply to by मुक्त विहारि

हाच धागा बघा. समजा माझी लेखकाशी ओळख आहे. आता पोस्टमधली सगळी मजाच गेली ! याला अनेक कारणं असू शकतात : १) लेखक विवाहित आहे (आता काय लिहीणार मी ?) २) लेखक बेंगरुळ असल्यानं त्याच्या विवाहाचा मुहूर्त निघत नाही ( कसं बोलणार या धाग्यावर?) ३) त्याच्या वैवाहिक जीवनाचा बाजा वाजला आहे. (ओळखे म्हटल्यावर झक मारत गप बसायला लागेल!) ४) लेखकाला विवाहातही यश नाही आणि खेड्यात कसली आलीये घंटा लिव-इन ? तस्मात, तो उगीच खयाली धागे टाकतोयं (पण हे उघड कसं लिहीणार?) ५) लेखकानं लिव-इनमधे माती खाल्ली आहे. आता लग्नचं वय ही उलटून गेलं आहे पण पहिल्या लफड्यांमुळे लग्न ही नाही आणि लिव-इन ही नाही अशी गोची झाली आहे ! ( काय बोलणार दोस्तीत?) _____________________________ आता वास्तविक पोजिशन बघा : माझी लेखकाशी ओळख नाही ! आता लेखनाचा सगळा फोकस विवाह वर्सेस लिव-इन या एका मुद्यावर आहे :)

In reply to by संजय क्षीरसागर

लेखात काय आहे? हे बघून प्रतिसाद देणे (मेक द थिंकिंग स्वीच ऑन) कुणी लेख लिहिला आहे, हे बघायचे नाही... (मेक द रेकनायझेशन स्वीच ऑफ) तुम्हाला हे असे वागणे जमत नसेल तर...... एक साधी टिप.... चहा कसा झाला आहे? हे बघा... कुणी केला आहे? हे बघत बसू नका...(बायकोच्या हातच्या चहापेक्षा काही ठराविक मेहूणीच्या हातचा चहा उत्तम लागतोच.त्याला आमचा नाईलाज.)

In reply to by संजय क्षीरसागर

http://www.misalpav.com/comment/reply/39914/942451 तुम्ही जर कायम वर्तमानातच राहणार असाल तर, तुम्हाला वैयक्तिक ओळखीचा आणि प्रतिसादांचा बाऊ करण्यात अर्थ नाही. तुम्ही उगाच भीत आहात, अशी शंका आहे. शिवाय मला तरी तुम्ही कधी वैयक्तिक प्रतिसाद (चिखलफेक) दिलेला नाही. आपले जे काही वाद-प्रतिवाद झाले ते विषयानुरुपच झाले... (जे आपण दोघांनीही सांभाळले.)

In reply to by मुक्त विहारि

संदर्भ तुमच्या लक्षात आला नाही ! व्यक्तिगत ओळख झाली की मुद्दा सोडून व्यक्तीला काय वाटेल याची फिकीर केली जाते. मी तर जसा लेखनात आहे तसाच प्रत्यक्षात आहे. तुम्ही न सांगता कोणत्याही वेळी माझ्या घरी आलात तरी जे लिहीतो तसाच जगतो असं दिसेल. सो, मला कोणत्याच गोष्टीची काहीच काळजी नाही. मला माझ्या लेखन स्वातंत्र्याची बूज राखण्यात रस आहे. कदाचित तुम्ही या भूमिकेतून कधी लेखन केलं नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही. मित्र दोन-चार कमी असल्यानं काही फरक पडत नाही. हा जो माझ्या मर्जीनं, कधीही आणि केव्हाही ऑन-लाईन कट्टा चालतो, ती मजा फार वेगळी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

एकदा ओळख झाली की सगळी निर्वैयक्तिकता हरवते. फोकस मुद्यावर न राहाता, संबंध जपणं आणि पुढे कंपूगिरीवर जातो. --- असे होऊ शकते पण होईलच असे नाही. एकमेकांशी तात्त्विक मतभेद असले तर ते बिनधास्त मांडता आलेच पाहिजेत (वैयक्तिक उणीदुणी न काढता). जर तसे करता येत नसेल आणि कंपुगिरी करून संबंध जपण्याची गरज पडत असेल तर असे संबंध म्हणजे एक ओझे आहे असे मी समजतो.

In reply to by अभिजीत अवलिया

पण जिथे व्यक्तिगत ओळख आहे तिथे सदस्याची सर्व बॅकग्राऊंड माहिती असते. मग सदस्य फ्रस्ट्रेशनमधून जरी लिहीत असला तरी तसं उघड बोलता येत नाही. शिवाय इथे सदस्यांना काहीही संबंध नसतांना सर्वज्ञ, अध्यात्म अशा कोणत्याही विषयावर घसरण्याची सवय आहे (इथलेच प्रतिसाद पाहा) अशा वेळी ओळखीत त्यांना ही ती सवय सोडावी लागण्याची शक्यता आहे आणि मग दोस्तीखातर मला ही निर्वैयक्तिक होता येणार नाही. कविता किंवा इतर ललित साहित्यात तर कंपुबाजी मोठ्याप्रमाणावर चालते तिथे पोस्टचं योग्य मूल्यमापन करायला दोस्ती कायम आड येते.

In reply to by संजय क्षीरसागर

सहमत. प्रतिवाद करताना संबध आड येउ शकतात. (एका चिकीत्सा करणारार्‍याला "अरे प्रतिवाद करताना वर कोणी लिहले आहे ते तर पहा" अशा प्रकारची कॉमेंट वाचल्याचे आठवते)

In reply to by संजय क्षीरसागर

स्व गवसलेल्या आणि आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीने इतक्या क्षुल्लक गोष्टीच्या बाबतीत भोचकपणा करणे बरे दिसत नाही. ते एक असो. तुमच्या उजेड पाडणाऱ्या वेबसाईटचे काय झाले? मी सदस्यत्व घेण्यास उतावीळ आहे. आधी मी कुठेतरी तरी वाचले होते की तुमचे अध्यात्मावरील मराठीतील एकमेवाद्वितीय असे पुस्तक येणार आहे. मी लगेच एमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तुमचे पुस्तक ऍडव्हान्स बुकिंगला आहे का पाहीले. ते नाही कळल्यावर आणि नंतर तुम्ही पुस्तक लिहीणार नाही कळल्यावर माझा भ्रमनिरास झाला. मात्र तेव्हाच तुमची पायऱ्या-पायऱ्याने उजेड पाडणारी वेबसाईट येणार आहे म्हटल्यावर हायसे वाटले. त्यामुळे असल्या फुटकळ गोष्टींकडे लक्ष न देता उजेड पाडणारी वेबसाईट बनवण्याकडे लक्ष द्या अशी आपणास नम्र विनंती.