Skip to main content

मग्न तळ्याकाठी

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 07/05/2017 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
जा॑भळ्या टेकडी तळिचे ते तळे खुणावुन हसले अन पहाटफुटणी मधल्या केशरात अलगद लपले थरथरली तीरावरची गवताची पाती ओली वाऱ्याची फु॑कर येता पाण्यावर झु॑बर फुटले घनदाट शा॑तता तिथली तोलून थिरकत्या प॑खी पाखरू एक इवलेसे क्षण एक लकेरुन गेले नि:शब्द, तरल जे सारे ते इथेच जन्मा आले कोवळे ऊन टिपताना झिरझिरित धुके शिरशिरले चल पुन्हा तळ्याच्या काठी चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ अस्वस्थ जगाचे मागे कोलाहल सोडुनी सगळे. - उदय
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4216
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अत्यंत सुरेख कविता. नाव वाचूनच लेख उघडावा अशा मिपाकरांपैकी तुम्ही एक आहात.
अन पहाटफुटणी मधल्या केशरात अलगद लपले
आहाहा...
वाऱ्याची फु॑कर येता पाण्यावर झु॑बर फुटले
....प्रचंड आवडले आहे.

>>>घनदाट शा॑तता तिथली तोलून थिरकत्या प॑खी पाखरू एक इवलेसे क्षण एक लकेरुन गेले>>>क्या बात है! क्या बात है! खूप आवडली कविता! दोन वेळा वाचली...नि मग पुन्हा पुन्हा स्मरत राहिली! धन्यवाद!

अहाहा... काय सुंदर! "पाण्यावर झु॑बर फुटले" फारच आवडले. मिपावर सध्या एक से एक कविता येत आहेत.

सर्व प्रतिसादका॑ना मनःपूर्वक धन्यवाद!