जा॑भळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले
थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फु॑कर येता
पाण्यावर झु॑बर फुटले
घनदाट शा॑तता तिथली
तोलून थिरकत्या प॑खी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले
नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
झिरझिरित धुके शिरशिरले
चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.
- उदय
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4216
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्रदर्शी कविता ! सुरेख !!!
अत्यंत सुरेख कविता.
सुंदर!
अप्रतिम सुंदर रचना.
नितांत सुंदर कविता!ः
वा! कविता आवडली.
अहाहा... काय सुंदर!
फारच सुंदर
धन्यवाद,
वा! सुरेख!
अप्रतिम रचना. आवडली.
++, सुंदर कविता. आवडली.
In reply to अप्रतिम रचना. आवडली. by दशानन
प्रमोद,
In reply to ++, सुंदर कविता. आवडली. by प्रमोद देर्देकर
यशोधरा, दशानन