Skip to main content

पाकिस्तान चे हल्ले

लेखक ओम शतानन्द यांनी बुधवार, 03/05/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या लोकसत्ते मध्ये एक विनोदी बातमी आली आहे जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेची किंमत मोजावी लागेल.. भारताचा पाकिस्तानला सज्जड इशारा वाचुन खूप हसायला आले , पकिस्तान ला ह भारताचा कितवा सज्जड कडक इशारा असेल ?

वाचने 18054
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by माहितगार

माहितगार, सैन्याचा जनतेला उपद्रव होऊ नये हे तत्त्वत: मान्य. पण लोकांचा जर सैन्याला शत्रू समजून प्राणघातक उपद्रव होत असेल तर अशा लोकांना सैन्याचा उपद्रव होणारंच. त्याबद्दल सैन्याकडून मर्यादा पाळण्याची अपेक्षा नको. आ.न., -गा.पै.

एक सरधोपट मार्गापेक्षा वेगळा विचार वाचला होता.तो : पाकीस्तान ची अंतरगत व्यव्स्था निकामी आहे लष्कर ,राजकारणी व नागरीक असे ३ गट आहेत ज्यांचयाशी वागायचय.प्रत्येकाचा वेगळा विचार करावा .लष्कराचा कुठेही फायदा होऊ द्यायचा नाही .व आपल्या लष्कराचे अत्याधुनीककीकरण सुरुच ठेवायचे पाकी राजनेते सध्या लष्कराचे बाहुले आहेत व.लष्कर व राजनेते यांचे मोठमोठे धंदे आहेत .व याच कमजोरी वर घाव घालयचा तोही दीर्घकाळ ..त्यांची निर्यात वीजपुरवठा .गँस हे सगऴ भारताच्या तुलनेत शुल्लक आहे . सुरुवातीला त्ांचे अवलंबित्व वाढवायचे व नंतर कलटी मारुन तोट्यात घालायचे .नागरीकांचा वेगऴा विचार असा की त्यांच्यातल्या हुशार मुलांना आपल्या सेवेत घेउन महत्वाच्या पोस्टवर ठेवावे म्हऩजे भारतातील संधी व प्रगतीची जाहीरात पाकमध्ये होइल .त्यांच्या नागरीकांना काही अटींसह प्रवेश द्यावा .असे केल्याने काश्मीरच्या अलगाव वाद्यांना व तरुनांना योग्य तो संदेश जाईल . व यासाठी आपल्या अंतरगत काही बदल करावे लागतील .

लष्कराचा दणका; ८ दहशतवाद्यांचा खातमा पाकिस्तानच्या मदतीनं जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या 'हिजबुल मुजाहिदीन' या टोळीला भारतीय लष्कराच्या बहादूर जवानांनी आज जोरदार दणका दिला. काश्मीरमधील त्राल येथे झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार अहमद ऊर्फ अबू झरार मारला गेला आहे. बुरहान वानीचा साथीदार असलेला सबजार मारला जाणं हा दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडं, रामपूर सेक्टरमधील घुसखोरीचा डाव उधळून लावत भारतीय जवानांनी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. सबजार अहमद हा बुरहान वाणी याचा अत्यंत जवळचा साथीदार होता. तो बुरहानसोबतच राहत होता. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही प्रसिद्ध झाले होते. बुरहान मारला गेल्यानंतर हिजबुलच्या कारवायांची सूत्रं सबजारनं हाती घेतली होती. भटबरोबरच त्याचा आणखी एक साथीदार ठार झाला आहे. वाह जिओ!!!!

+१ उत्तम बातमी. मानवतावाद्यांना कितीही गळे काढू देत.