ताज्या घडामोडी : भाग ५
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल.
श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली.
दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे.
१३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
प्रतिक्रिया
बघा, भाजपचे सरकार आले की
वाटतं
भाजप प्रति असलेल्या भावनेच्या
देशामध्ये गो रक्षकांनी
देशामध्ये गो रक्षकांनी अक्षरशः उछाद मांडला आहे, एका मागून एक घटना घडत असताना आज सुधा जम्मू काश्मीर मध्ये गो रक्षकांनी पशुपालन व्यवसायावर जगणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबीयावर हल्ला केला यात एका लहान मुलीला हि दुखापत केली. खर्या अर्थाने हे कुटुंबीय गाई ची पालन पोषण करणारे होते, ह्या हल्ला करणाऱ्या गो रक्षकांच्या बाप झाद्यानी कधी गाई पाळल्या च नसतील असं मला वाटत. 5 Including 9-Year-Old Girl Attacked By Cow Vigilantes In Jammu And Kashmirया बातमीविषयी जरा साशंक आहे. १) बातमी एनडीटीव्हीने दिली आहे. द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस इ. वृत्तपत्रात ही बातमी अजूनतरी छापलेली नाही. इंडिया टुडे व इतर काही वृत्तपत्रांच्या संकेतस्थळावर ही बातमी आहे, परंतु बातमीसाठी त्यांनी एनडीटीव्हीच्या बातमीचा संदर्भ दिला आहे. फक्त एनडीटीव्ही कडेच ही बातमी कशी आली याचे कुतुहल वाटत आहे. बातमी एनडीटीव्हीची असल्याने ही बातमी चिमूटभर मीठ घेऊनच वाचावी लागेल. २) ही घटना काश्मिरमधील श्रीनगर जवळील एका गावात घडल्याचे सांगितले जाते. श्रीनगरसारख्या कट्टर मुस्लिमबहुल प्रदेशात (श्रीनगरचा समावेश असलेल्या काश्मिर खोर्यात ९०% मुस्लिम आहेत) असा प्रकार घडणे अवघड वाटते. ३) दिलेल्या बातमीनुसार गायीगुरांचा कळप नेणार्या कुटुंबावर काही जणांनी हल्ला लोखंडी सळ्यांच्या सहाय्याने केला. नक्की कोणत्या कारणासाठी हल्ला केला हे बातमीत लिहिलेले नाही. परंतु तरीसुद्धा स्वयंघोषित गोरक्षकांनीच हा हल्ला केला असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हल्ला करणारे हे गोरक्षकच होते व गोरक्षण या कारणावरूनच हा हल्ला केला असे सिद्ध करणारे त्या बातमीत एकही वाक्य नाही. हल्ला करणारे गोरक्षकच होते हा कोणत्याही पुराव्याविना थेट निष्कर्ष काढलेला दिसतो. ४) ज्या कुटुंबावर हल्ला झाला त्यांनी सांगितले आहे की "हल्लेखोरांनी त्यांच्या कळपातील सर्व शेळ्या, बकर्या, गायी व कुत्रे सुद्धा पळवून नेले. त्यांच्या कुटंबातील एका ९ वर्षाच्या मुलीला अनेक जखमा झालेल्या आहेत व त्यांचा १० वर्षांचा मुलगा सुद्धा बेपत्ता आहे. हल्लेखोरांनी आमच्या कुटुंबातील सर्वांना बेदम मारले.". हा काहीतरी नवीन प्रकार दिसतो. आजवर तथाकथित गोरक्षकांनी हल्ले केल्याच्या ज्या बातम्या आल्या आहेत त्या बातम्यांमध्ये त्यांनी गोहत्येच्या संशयावरून काही जणांना मारहाण केली असे सांगण्यात येते. परंतु वरील बातमीनुसार हल्लेखोरांनी फक्त मारहाण करून न थांबता सर्व गायी, शेळ्या, मेंढ्या व कुत्रे पळवून नेणे व कुटुंबातील १० वर्षाच्या मुलाला सुद्धा पळवून नेणे हा काहीतरी वेगळाच प्रकार दिसतो. हा हल्ला गोरक्षकांनीच केला हा निष्कर्ष नक्की कोणत्या आधारावर काढला ते समजत नाही. हा प्रकार खरोखरच घडला असेल तर त्यामागे दोन कुटुंबातील वैर असावे किंवा हा लूटमारीचा प्रकार असावा असे प्रथमदर्शनी वाटत आहे. या प्रकाराची अजून जास्त सविस्तर माहिती बाहेर आल्यानंतर काहीतरी निष्कर्ष काढता येईल.देशामध्ये गो रक्षकांनी
गुरुजीं प्रमाणे मी पण काश्मीर
पण गो रक्षकांचा पवित्रा
काय काय राव किती मोठा
साहेबांचि भेट घेण्याच मला 3
अमितदादा,
दिल्ली महापालिका निवडणुका-- आआप सरकारवरील सार्वमत इति सिसोदिया
समजा दिल्लीतील ३ पैकी किमान २
प्लिज नवीन धागा सुरू करा,
हे मतदान दिल्लीतील अरविंद
हे मतदान दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या आआप सरकारच्या कारभारावरील सार्वमत असेल असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे.सिसोदिया केजरीवालांइतकेच धूर्त आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांनी मुद्दामच हे विधान केले आहे. जर निवडणुकीत आआपला बहुमत मिळाले तर आमच्या चांगल्या कामामुळेच महापालिकेत आम्हाला बहुमत मिळाले हे सांगायला ते मोकळे. जर आआपचा निवडणुकीत पराभव झाला तर आआपच्या मूर्खपणाला मतदारांनी मतपेटीतून थप्पड दिली आहे असे माध्यमे सांगायला सुरूवात करणार कारण सिसोदियांनीच तसे सांगितले आहे आणि जर केजरीवालांनी राजीनामा द्यावा ही जोरदार मागणी सुरू होऊन केजरीवाल पायउतार झाले तर त्यांच्याजागी सिसोदियांची वर्णी लागेल. दिल्लीत आआपचा पराभव होणार याची चाहूल सिसोदियांना लागलेली दिसते. म्हणून मुद्दामच केजरीवालांची अडचण करण्यासाठी हे मतदान दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या आआप सरकारच्या कारभारावरील सार्वमत असेल असे त्यांनी आधीच बोलून ठेवले आहे. केजरीवाल जितके अडचणीत येतील तितकी सिसोदिया मुख्यमंत्री बनण्याची संधी वाढत जाईल.सिसोदिया केजरीवालांइतकेच धूर्त आहेत
दिल्ली महापालिका निवडणुका एक्झिट पोल्स
एक्झिट पोलसाठी ई.व्ही.एम लागत
+1
नवा धागा
>>> अपेक्षेप्रमाणे
एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर
एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर विविध चॅनेलवरील चर्चेत आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी त्या निकालांसाठीही ई.व्ही.एम ला जबाबदार ठरवले आहे--- केजरीवाल आणि कंपनीच्या ह्या दाव्यावर केंद्रिय गृहराज्यमंत्री किरण रिजजू ह्यांनी खालील ट्विट केले आहे. --नाचता येईना *गण वाकडं
Reports from all over Delhi
दिल्लीचे मंत्री गोपाल राय उवाच
छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक
छत्तीसगडमध्य़े 300 हून अधिक नक्षलवाद्यांचा हल्ला, CRPF चे 26 जवान शहीद
--- --- http://abpmajha.abplive.in/india/naxal-attack-on-crpf-soldiers-in-sukma-latest-update-397257प्रज्ञा सिंह ठाकूरला
ओह्ह ... खूपच धक्कादायक आहे
न्यायालय फारसे काही करू शकत
हो मग बरोबर आहे तुमचं..!!
हे एका ठिकाणी वाचायला मिळाले
विनोद खन्नांचे निधन
अलविदा दयावान
के.पी.एस.गिल यांचे निधन
गॅरी भाऊ तुमचीच आठवण काढत
तीन महापालिका निवडणुकांचे निकाल
http://indianexpress.com
केवळ गर्हणिय.. परंतु, दाऊदी
१-२ वर्षांपूर्वी एका बोहरा
खरे आहे. शनीमंदीर, शबरीमाला,
प्रणॉय रॉयच्या घरांवर धाडी
'भ्रष्ट असूनसुद्धा
हा उघडउघड माध्यमस्वातंत्र्य व
या धाडींचा निषेध
लष्करप्रमुखांची तुलना जनरल डायरशी
उडदामाजी काळेगोरे ....
अडानींचा ऑस्ट्रेलियातील कोळसा प्रकल्प मार्गी
ट्रुमन, एक बँकर म्हणून खाजगी
खासगी बँकादेखील
हे पण वाचा.
दोन लेख
Pagination