यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे.
दोन राज्यातील तीन लोकसभा (जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग तसेच केरळमधील मल्लापुरम) आणि १० राज्यांमधील १२ विधानसभा (आसामातील धेमाजी, हिमाचल प्रदेशातील भोरांज, मध्य प्रदेशातील अटेर आणि बांधवगड, पश्चिम बंगालमधील कांथी दक्षिण, राजस्थानमधील धोलपूर, कर्नाटकातील नंजनगड आणि गुंडुलपेट, तामिळनाडूतील डॉ. राधाकृष्ण नगर, झारखंडमधील लिटिपारा, सिक्किममधील अपर बुर्तुक आणि दिल्लीमधील राजौरी गार्डन) या मतदारसंघात दोन टप्प्यांमधील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम (९ आणि १२ एप्रिल) निवडणुक आयोगाने जाहिर केला होता. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील तर तामिळनाडूमधील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक निवडणुक आयोगाने रद्द केली आहे. इतर मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात ९ एप्रिलला मतदान पूर्ण झाले तर उरलेल्या मतदारसंघांमध्ये १२ एप्रिलला मतदान होईल. मतमोजणी १३ एप्रिलला होईल.
श्रीनगर मतदारसंघातून २०१४ मध्ये निवडून गेलेल्या पी.डी.पीच्या खासदाराने मागच्या वर्षी बुरहान वाणी प्रकरणानंतर उसळलेल्या असंतोषादरम्यान राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुक जाहिर करण्यात आली. पण या मतदारसंघात अवघे साडेसहा टक्के मतदान झाले. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही झाला. त्यामुळे निवडणुक आयोगाने राज्यातील अनंतनाग या मतदारसंघातील पोटनिवडणुक सध्या रद्द केली आहे. या मतदारसंघातून २०१४ मध्ये पी.डी.पी च्या मेहबूबा मुफ्ती लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून जम्मू-काश्मीर विधानसभेत प्रवेश केला आणि त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
तामिळनाडूतील चेन्नई शहरातील डॉ. राधाकृष्ण नगर विधानसभा मतदारसंघातून २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललितांचा विजय झाला होता. त्यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती. ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची होती. अण्णा द्रमुकच्या शशीकला नटराजन गटाने पक्षाचे ज्येष्ठ नेते टी.टी.व्ही.दिवाकरन यांना तर ओ.पन्नीरसेल्वम गटाने ई.मधुसुदनन यांना उमेदवारी दिली होती. त्याचबरोबर जयललितांच्या भाचीने-- जे. दीपानेही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. ही पोटनिवडणुक जिंकेल त्या गटाला जयललितांचा वारसा मिळेल असे म्हटले जाईल हे नक्कीच. त्यामुळे या निवडणुका दोन्ही गटांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या निवडणुकांसाठी पैशाचा महापूर वाहिला. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांच्या घरावर आयकर विभागाचा ढापाही पडला. त्यातून निवडणुक आयोगाने ही पोटनिवडणुक रद्द केली.
दिल्लीमधील राजौरी गार्डन मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे. या मतदारसंघात २०१५ मध्ये आआपचे जरनेलसिंग निवडून गेले होते. त्यांनी दिल्ली विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पंजाबमधील लांबी मतदारसंघात प्रकाशसिंग बादल यांच्याविरूध्द निवडणुक लढवली. पण त्याच मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीही निवडणुक लढवली. प्रकाशसिंग बादल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या महारथींपुढे जरनेलसिंगची डाळ शिजली नाही आणि लांबीमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. हातात असलेली दिल्लीतील आमदारकी उगीचच त्यांनी सोडली. आता आआपने त्यांना उमेदवारी न देता हरजितसिंग या नव्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. भाजप-अकाली दल युतीतर्फे अकाली दलाचे मनजिंदरसिंग सिरसा (२०१३ मधील विजयी उमेदवार) यांना तर काँग्रेसतर्फे मिनाक्षी चंदेला यांना उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणुक महत्वाची आहे कारण हा निकाल लागल्यानंतर १० दिवसातच दिल्ली महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील वारे कोणत्या दिशेने वाहात आहेत याची कल्पना राजौरी गार्डनमधील निकालामुळे येईल. दिल्लीच्या पश्चिम भागात असलेल्या या मतदारसंघात १९४७ मध्ये पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या शीखांची (आणि त्यांच्या वंशजांची) संख्या लक्षणीय आहे. तसेच पंजाबशी या भागातील शीख मतदारांचे जवळचे संबंध आहेत. अनेकांचे नातेवाईक पंजाबमध्ये आहेत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्याचा फायदा उठवायचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. तसेच काँग्रेस नेते अजय माकन यांचा पूर्वीचा हा मतदारसंघ आहे. अजय माकन राजौरी गार्डनमधून १९९३, १९९८ आणि २००३ या ३ निवडणुकांमध्ये दिल्ली विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांचे घरही राजौरी गार्डनच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे काँग्रेस इथे चांगलाच जोर लावत आहे. या मतदारसंघात भाजपचा विशेष जोर नाही. आतापर्यंत एकदाच २०१३ मध्ये भाजप-अकाली दल युतीने ही जागा जिंकली होती. २०१५ मध्ये आआपने तर इतर सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. या मतदारसंघात पराभव झाल्यास आआपच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर नक्कीच परीणाम होईल आणि १० दिवसांनंतर असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी ते पुरेशा आत्मविश्वासाने सामोरे जाणार नाहीत हे नक्कीच. त्या दृष्टीने आआप आणि केजरीवालांसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे.
१३ एप्रिलला पोटनिवडणुकांचे निकाल आल्यावर ते इथे पोस्ट करेनच.
वर्गीकरण
वाचने
59366
प्रतिक्रिया
300
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा पासपोर्ट आहे आणि त्यावर
In reply to त्यांनी दोन प्रश्न विचारले, by हतोळकरांचा प्रसाद
मुळात पासपोर्टवर मॅरेज स्टेटस
In reply to माझा पासपोर्ट आहे आणि त्यावर by पिलीयन रायडर
मी म्हणुनच "म्हणे" हा शब्द
In reply to मुळात पासपोर्टवर मॅरेज स्टेटस by हतोळकरांचा प्रसाद
ह्या बाबत पुरुषांना काय नियम
In reply to मुळात पासपोर्टवर मॅरेज स्टेटस by हतोळकरांचा प्रसाद
पूर्वी मी मिपावर जॉर्ज
In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
थत्ते, मोदींनी केलेली घोषणा
In reply to पूर्वी मी मिपावर जॉर्ज by नितिन थत्ते
अफरातफर आहे म्हणजे काय? जी
In reply to थत्ते, मोदींनी केलेली घोषणा by मोदक
अच्छा.. पेपर आणि ट्वीटवरून मत
In reply to अफरातफर आहे म्हणजे काय? जी by नितिन थत्ते
मग तुमच्या मते जो बदल झाला
In reply to अच्छा.. पेपर आणि ट्वीटवरून मत by मोदक
मी वर टाकला आहे, समजा वाचला
In reply to मग तुमच्या मते जो बदल झाला by नितिन थत्ते
मोदींनी काल केलेली घोषणा
In reply to मी वर टाकला आहे, समजा वाचला by हतोळकरांचा प्रसाद
१) मी या बदलावर कोणतेही मत
In reply to मग तुमच्या मते जो बदल झाला by नितिन थत्ते
धन्यवाद.
In reply to १) मी या बदलावर कोणतेही मत by मोदक
तिच्याकडून कन्फर्म झाले.
In reply to धन्यवाद. by नितिन थत्ते
हा विशिष्ट प्रतिसाद मोदींनी
In reply to १) मी या बदलावर कोणतेही मत by मोदक
एखादी महिला पतीचे नाव योगी
In reply to हा विशिष्ट प्रतिसाद मोदींनी by नितिन थत्ते
वरती मोदींच्या व्हिडीओची
In reply to एखादी महिला पतीचे नाव योगी by नितिन थत्ते
मला वाटते तो मुद्दा तसा
In reply to एखादी महिला पतीचे नाव योगी by नितिन थत्ते
>>सद्य परिस्थितीत पासपोर्ट
In reply to मला वाटते तो मुद्दा तसा by हतोळकरांचा प्रसाद
याची माहिती घ्यावी लागेल,
In reply to >>सद्य परिस्थितीत पासपोर्ट by नितिन थत्ते
बाकी मोदींनी त्या भाषणात अनेक
In reply to मला वाटते तो मुद्दा तसा by हतोळकरांचा प्रसाद
एक मॅटर्निटी लीव्ह बद्दल होता
In reply to बाकी मोदींनी त्या भाषणात अनेक by पिलीयन रायडर
एक मॅटर्निटी लीव्ह बद्दल होता जे कंपन्यांमध्ये लागु झाले का हे ही माहिती नाही. पण ती लीव्ह आधी ३ च महिन्यांची होती हे सत्य आहे. आता म्हणे ६ महिन्यांची झाली आहे.हे सत्य आहे. आमच्या हाफिसाने या संदर्भात केलेला इ-मेल तुला पाठवला आहे.@ पिरा,
In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
@ मोदक आणि गॅरीभाऊ
In reply to @ पिरा, by मोदक
त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे
In reply to @ मोदक आणि गॅरीभाऊ by पिलीयन रायडर
त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे पण एकंदरित भाजपाचेही पाय मातीचेच आहेत आणि करायचं ते राजकारण ते ही करतात असे माझे मत आहे.याला माझीही (बेशर्त !) सहमती आहे. म्हणून माझ्याकडून गेल्या महिन्याभरात मिपावरच "भाजपाला पर्याय हवा" या अर्थाचे प्रतिसाद दिले गेले आहेत. ..पण याचा असा अर्थ मुळीच नाही की मी भाजपद्वेष्टा आहे किंवा मला मोदींची अॅलर्जी आहे. चेक्स आणि बॅलन्सेसच्या खेळात भाजपावरही वचक राहिलाच पाहिजे इतकी साधी अपेक्षा आहे. राहिला प्रश्न विरोधकांचा - त्यांनी विरोध करताना किमान डोके लावावे आणि आपल्यासमोर थोडी बुद्धीमत्ता बाळगून असणारा श्रोतावर्ग बसला आहे याची जाणीव ठेवली तरी विरोधकांच्या विरोधाला थोडा बेस तयार होईल. उगाच काहीही झाले की असहिष्णुता आणि फॅसीझमचा बागुलबुवा उभा करायचे दिवस संपले आता. लोकं भरपूर शहाणी झाली आहेत आणि विरोधकांचे बुरखे टराटरा फाडायला कोणी मागेपुढे बघत नाही. मला इतकेच सांगायचे आहे की.. समजा मोदी ८०% चांगले काम करत आहेत तर ते ८०% पूर्वीच्या १० / १५% पेक्षा उठून दिसणारच आणि भाजपा ते १०००% आहे असे भासवणारच, मग आपण २०% कडे बघून प्रतिकूल मत बनवण्यापेक्षा २०% संदर्भात सरळ पंतप्रधानांना मेल पाठवून माहिती / जाब नक्की विचारू शकतो. २०% कडे लोकांचे लक्ष आहे इतके कळाले तरी बास झाले. (ही माहिती मागवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.)+११११ - याबाबतीत माझी मतां
In reply to त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे by मोदक
प्रचंड सहमत
In reply to त्यांचे मंत्रीमंडळ उत्तम आहे by मोदक
हतोळकर साहेब, ट्रुमन.. (आणि
In reply to प्रचंड सहमत by गॅरी ट्रुमन
२०१८ चे बजेट हे अतिशय
In reply to हतोळकर साहेब, ट्रुमन.. (आणि by मोदक
पाच लाखाचे उत्पन्न करमुक्त
In reply to २०१८ चे बजेट हे अतिशय by अभिजीत अवलिया
हो, सहमत. भाजपला आता
In reply to २०१८ चे बजेट हे अतिशय by अभिजीत अवलिया
तीन गट
In reply to हतोळकर साहेब, ट्रुमन.. (आणि by मोदक
>>मध्याच्या उजवीकडे भाजपला
In reply to तीन गट by गॅरी ट्रुमन
सॉरी इंटिग्रल ह्यूमॅनिझम असे
In reply to >>मध्याच्या उजवीकडे भाजपला by नितिन थत्ते
कितीही झालं तरी
In reply to तीन गट by गॅरी ट्रुमन
चिमूटभर मीठासह...
In reply to आज मोदींनी सांगितले की by पिलीयन रायडर
सहमत.
In reply to चिमूटभर मीठासह... by गॅरी ट्रुमन
नारायण राणे भाजपचे दरवाजे
राणेसारखा झगा स्वतःहून गळ्यात
In reply to नारायण राणे भाजपचे दरवाजे by अभिजीत अवलिया
तरी पण घेतील पक्षात असा माझा
In reply to राणेसारखा झगा स्वतःहून गळ्यात by श्रीगुरुजी
फायदे दिसत असतील तरी पक्षात
In reply to तरी पण घेतील पक्षात असा माझा by अभिजीत अवलिया
बरोबर. राणे भाजपसाठी भस्मासुर
In reply to फायदे दिसत असतील तरी पक्षात by मोदक
मला तर राणेंना कुठल्याच
In reply to फायदे दिसत असतील तरी पक्षात by मोदक
+१११
In reply to तरी पण घेतील पक्षात असा माझा by अभिजीत अवलिया
शरद पवार यांच्या संसदीय
कृपया त्यांनी विदा उघडू नये
In reply to शरद पवार यांच्या संसदीय by विशुमित
दुवा ( = लिंक) हेच म्हणायचं
In reply to कृपया त्यांनी विदा उघडू नये by अनुप ढेरे
>>> ५० वर्ष संसदीय कारकीर्द
In reply to शरद पवार यांच्या संसदीय by विशुमित
आता हसण्यासारखं काय होते या
In reply to >>> ५० वर्ष संसदीय कारकीर्द by श्रीगुरुजी
अविरत गाजवल्याबद्दल हे शब्द
In reply to आता हसण्यासारखं काय होते या by विशुमित
अविरत गाजवल्याबद्दलहे शब्द खूपच हसवून गेले.+१००
In reply to शरद पवार यांच्या संसदीय by विशुमित
केंद्र सरकारने १९८८ सालच्या
माझी एक विनंती आहे.
In reply to केंद्र सरकारने १९८८ सालच्या by अभिजीत अवलिया
हा. बरोबर आहे तुमचे म्हणणे.
In reply to माझी एक विनंती आहे. by मोदक
अरे लिंक गायब झाली की :)
In reply to हा. बरोबर आहे तुमचे म्हणणे. by अभिजीत अवलिया
धन्यवाद हो..!! __/\__
In reply to अरे लिंक गायब झाली की :) by अभिजीत अवलिया
दिवस असतात प्रचाराचे
In reply to धन्यवाद हो..!! __/\__ by मोदक
काही कळले नाही, वरच्या बिलाचा
In reply to दिवस असतात प्रचाराचे by वरुण मोहिते
मग चांगले आहे की तुमच्यासाठी.
In reply to दिवस असतात प्रचाराचे by वरुण मोहिते
खिक्क
In reply to मग चांगले आहे की तुमच्यासाठी. by मोदक
बरं मग..?
In reply to खिक्क by वरुण मोहिते
राणे भाजपमध्ये गेल्यावर
सुदूर टेकड्यामध्ये लपलेल्या
In reply to राणे भाजपमध्ये गेल्यावर by कंजूस
राणे भाजपमध्ये गेल्यावर
In reply to राणे भाजपमध्ये गेल्यावर by कंजूस
राणे भाजपमध्ये गेल्यावर कोकणात भाजपच निवडून आली तर ? पक्ष बदल्ल्यावर निष्ठा त्या नेत्यांना राणे देत आले आहेत तसे आताही करतील. नवा मोठा गडकरींचा पुतळाही रातोरात बसवण्याची आणि त्याचे समर्थन करण्याचीही क्षमता राखून आहेत. जैतापुरचे धोरण कॅान्ग्रेसचे होते त्याला पाठींबा दिलेला. पत वगैरेला कोण विचारतो? मतदाराचा फायदा झाला तर राणे वाइट का? सुदूर टेकड्यामध्ये लपलेल्या कोकणातल्या घरात भाजप पोहोचेल अशी आशा वाटली तर ~~~राणेंची राजकीय ताकद म्हणजे एक हात लाकूड आणि चार हात ढलपी अशी माध्यमांनी फुगविलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राणेंच्या कोकणात स्वतःच्याच मतदारसंघात पराभव झाला. त्यापूर्वी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे हे सुद्धा कोकणातूनच लोकसभा निवडणूक हरले. नंतर राणे मुंबईतून विधानसभेची पोटनिवडणूक हरले. राणे राज्यपातळीवरचे सुद्धा नेते नाहीत. त्यांचा कोकणात सिंधुदुर्गमध्ये थोडासा प्रभाव आहे. सिंधुदुर्गच्या बाहेर त्यांना फारसे कोणी विचारत नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हापरीषद निवडणुकीत रत्नागिरीत शिवसेनेने जोरदार विजय मिळविला होता. तसेही कोकणात संपूर्ण कोकणावर प्रभाव असलेले नेते नाहीत. जे आहेत ते आपापल्या मतदारसंघात प्रभाव राखून आहेत. राणे हे राज्याचे नेते आहेत असे त्यांचे चिरंजीव कितीही मोठ्या तोंडाने म्हणत असले तरी सिंधुदुर्गच्या बाहेर त्यांना फारसे स्थान नाही. राणेंना पक्षात घेऊन भाजपला फारतर सिंधुदुर्गमध्ये थोडासा फायदा होऊ शकेल. परंतु त्यासाठी राणे व त्यांच्या दोन सुपुत्रांचे राजकीय ओझे सहन करावे लागेल. त्याव्यतिरिक्त स्वतः राणे व विशेषतः नितेश राणे जो उपद्रव देतील तो भाजपला अत्यंत त्रासदायक ठरेल. भाजपला थोडीफार समज असेल तर राणे कुटुंबियांना अजिबात पक्षात घेऊ नये. ते काँग्रेसमध्येच राहून काँग्रेसला उपद्रव देत बसतील जे भाजपला फायदेशीर ठरेल.सिंधुदुर्गच्या बाहेर त्यांना
In reply to राणे भाजपमध्ये गेल्यावर by श्रीगुरुजी
आले नारायण राणे
राणेंना भाजप मधे पवित्र करुन
राष्ट्रपतीपदासाठी विरोधी
प्रतिभा पाटील
In reply to राष्ट्रपतीपदासाठी विरोधी by श्रीगुरुजी
EVM विरुद्ध जुनी पद्धत