अजिबात नाही.
आम्ही आतापर्यंतच्या आमच्या बँकांच्या सेवेवर संतुष्ट आहोत. ज्या काही छोट्यामोठ्या समस्या आल्या त्या बँकेच्या स्थानिक किंवा मध्यवर्ती प्रशासनाशी बोलून सोडवल्या आहेत.
सगळ्या मोठ्या बँकांच्या संस्थळांवर हल्ली ऑनलाईन "कस्टमर केअर सेवा" आहे. तेथे तक्रार केल्यास...
(अ) ताबडतोप पोच (ऑटो रिसिट) मिळते,
(आ) ४८ तासात समस्या निर्वाण होते किंवा
(इ) तसे न झाल्यास स्वतःहून बँकेकडून दिलिगिरीचा संदेश येऊन अधिक मुदत मागितली जाते;
(ई) कस्टमर केअरच्या वरिष्ठ अधिकार्यातर्फे स्थानिक (शाखेच्या) प्रशासनावर जोर आणून, आपल्याला परत आठवण न करावी लागता समस्या सोडवली जाते...
असा स्वानुभव आहे.
मुळात...
१. नीट चौकशी करून चांगली बँक निवडा
२. त्या बँकेत असलेल्या अनेक प्रकारातील तुम्हाला योग्य प्रकारचे खाते उघडा
३. समस्या स्थानिक स्तरावर योग्य वेळेत न सुटल्यास "ऑनलाईन कस्टमर केअर" ही सेवा वापरा
४. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करा. 'मानवी सेवा' किंवा 'छापील कागद' यांचा जितका कमी आग्रह ठेवाल, तितके जास्त सुखी व्हाल !
शुभेच्छांसह !
तुमचे अनुभव हे सर्व जुन्या पद्धतींतून नवीन डिजिटल जाण्याय्रा बँकिंगचे आहेत. त्यामुळे बँकेचा व्यवहार,त्यांचे कर्मचारी आणि ग्राहक या तिघांनाही अद्ययावत होण्यातले त्रास होते.
आता नवग्राहकच म्हणतात पैसे/चार्ज घेतला तरी चालेल परंतू परस्पर व्यवहार करता येतील अशी बँक हवी. त्यामधील एक मोठा ग्राहक गट हा सतत देशात/जगात फिरणारा /राहणारा आहे. त्याला भरपूर सोयी हव्या आहेत. जुने पासबुकवाले आणि त्यातूनही ज्येष्ट नागरिक ग्राहक तीस टक्के आहेत त्यांना हा बदल पचवायला जड जाते.
नाही कंजुस काका तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे , खर तर हल्ली PPF साठी बँकेत जायची गरजही नाही ऑनलाइन पैसे टाकता येतात , नंतर कधीतरी एण्ट्री करून घ्यायची पासबुकवर
ट्याक्स रिबेट देणाय्रा सर्व गुंतवणुकीला चेकने भरणा नियम आहे पण तो आता आइटीवाले गांभिय्राने घेत नाहित हे मान्य. मेडिक्लेम प्रिमिअमही चेकनेच असतो. कॅश नाही. ओनलाइन,एनेफटी ओके.
हे चुकीचे आहे. मी गेली ११ वर्षे कॅश ने पेमेंट भरतोय पण हे कुठेही पाहण्यात आले नाही. आणि कुठल्या कायद्यात सुद्धा वाचले नाही. जर असे असेल तर कृपया तो सेकशन सांगण्यात यावा.
मीही कॅशच भरलेत गेले ३ वर्ष ppf मधे सरकारी कर्मचारी असून. असा कायदा नव्हता हो. Ppf मधे पैसे भरल्याशी कारण. आम्हाला ती पासबुक entry ची किंवा ppf ची बॅॆक स्लीप ची copy हापिसात दिल काम भागतय
हेमंतराव.. मी टॅक्स या विषयातील जाणकार नाही परंतु (१) आपण ज्या गुंतवणुकीवर करसवलत घेतो ती गुंतवणुक आपल्या करपात्र उत्पन्नातुन केली असली पाहिजे असा आयकर खात्याचा आग्रह दिसतो. (२) त्यातही PPF वा विम्याच्या हप्ता भरल्यानंतर स्वतः धारक वा धारकाचा जीवनसाथी (Spouse) वा अपत्य असे एकापेक्षा जास्त लाभार्थी असु शकतात. याकरिता अशा सवलतींचा गैरवापर होवु नये म्हणुन आयकर अधिकारी असा भरलेला हप्ता नक्की कोणी भरला आहे याची विचारणा करतो आणि अशा वेळी तो कोणी भरला ??हे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर येते जे कॅश व्यवहारात कठीण होते. म्हणुन अशी करसवलतीशी संबंधित गुंतवणुक रोखीने करणे scrutiny सारख्या प्रकरणांत अडचणीचे ठरते
साहेब राव बोलू नका.
१) पूर्णपणे सहमत... आणि ते कायद्याला धरून आहे.
२) ते कसे दाखवावे आणि कसे सिद्ध करायचे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या scrutiny वेळा सिद्ध कसे करायचे हे जाणकाराला न सांगणे योग्येच..
नव्या डिजिटल बँकेचे अनुभव
एच डी एफ सी बँकेत माझे पगाराचे खाते १९९७ पासून आहे. म्हणजे ९० % कर्मचारी वर्गाच्या पेक्षा जास्त काळ मी या बँकेत व्यवहार करीत आहे. २००९ साली मी जेंव्हा माझा व्यवसाय चालू केला तेंव्हा मी बँक्टे जाऊन विचारले कि माझा पगार आता बंद होणार आहे तेंव्हा खात्यात काही बदल करावा लागेल का? यावर तेथील व्यवस्थापकाने सांगितले कि जोवर तुमच्या खात्यात कमीत कमी रक्कम आहे तो वर काही गरज नाही. या खात्याशी संलग्न अशी चार लाखाची मुदत ठेव मी ठेवलेली आहे. कोणत्याही तातडीच्या क्षणी पैसे मिळाले पाहिजेत यासाठी.
एक महिन्यापूर्वी मी तेथे पैसे भरण्यासाठी गेलो असताना तेथील कर्मचाऱ्याने मला उद्दाम पणे सांगितले कि तुमच्या खात्यात व्यवहार खूप जास्त आहेत तर त्यासाठी तुम्हाला चालू खाते ( करंट अकाउंट) उघडणे आवश्यक आहे. मी या सद्गृहस्थाला सांगितले कि माझ्या खात्यात मी हे महिन्यात फक्त तिसऱ्यांदा पैसे भरत आहे. रोखीचे चार व्यवहार फुकट आहेत आणि त्याहून जास्त व्यवहार केले तर तुम्ही मला त्याचा आकार लावू शकता पण मला चालू खाते काढावे लागेल हे सांगणे चूक आहे. माझ्या मागच्या आर्थिक वर्षात (११ महिन्यात) मी केवळ २१ रोखीचे व्यवहार( पैसे भरणे) केले आहेत. निश्चलनीकरणामुळे मला बहुसंख्य रुग्णांनी धनादेश दिले ते सर्व मी खात्यात भरले आहेत हे रोखीचे व्यवहार नाहीत आणि त्यावर कोणताही निर्बंध नाही. हे महाशय शहाणपणा करीत होते म्हणून मी त्यांच्या व्यवस्थापिके कडे तक्रार केली तर त्या अजूनच दीड शहाण्या निघाल्या. त्यांनी सांगितले तुम्ही एवढे रोख पैसे कसे भरता. मी त्यांना म्हणालोय मला रुग्ण देतात ते पैसे मी बँकेत भरतो आणि यावर कोणताही निर्बंध नाही. पैसे बँकेत भरले याचा अर्थ हा व्यवहार काळ्या पैशाचा नाही. यावर या दीड शहाण्या व्यवस्थापिका म्हणाल्या कि तुम्ही इतके व्यवहार करू शकत नाही. मी परत समजावले कि मी व्यवहार कितीही करू शकतो चार पेक्षा अधिक व्यवहार रोखीचे केले तर तुम्ही माँ त्याचच आकार लावू शकता. यावर त्या म्हणाल्या हे पैसे कुठून आणता हे तपासण्याचा अधिकार आम्हाला आहे. मी त्यांना म्हणालो असा अधिकार तुम्हाला कोणत्या कायद्याने दिला आहे ते लिखित स्वरूपात द्या. ते देण्याची त्यांची तयारी नाही परंतु शहाणपणा चालूच होता. मी सांगितले
माझ्या स्लिपवर माझा आयकर PAN लिहिलेला आहे. ( बँकेने मला खास ग्राहक म्हणून नाव खाते क्रमांक आणि PAN छापलेले स्लिप बुक दिलेले आहे). तुम्हाला संशय येत असेल तर तुम्ही खुशाल आयकर खात्याला कळवू शकता परंतु मी हे पैसे कुठून आणतो याचा तपास करण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्याही कायद्याने दिलेला नाही. मी चालू खाते मुळीच उघडणार नाही. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते मला लिहून द्या.
आपल्या अशा वर्तनाबद्दल मी आपल्या विरुद्ध वर तक्रार करीत आहे. त्यावर त्यांचे उत्तर जे करायचे ते करा.
मी याबद्दल बँकेचे उपाध्यक्ष श्री पुष्पेंद्र सिंह यांच्या कडे तक्रार केली. त्यांनी याची चौकशी केली आणि मी, श्री पुष्पेंद्र सिंह आणि त्या व्यवस्थापिका यांचा कॉन्फरन्स कॉल झाला तेथेही या दीड शहाण्या बाईंनी तेच म्हणणे चालू ठेवले. यावर मी श्री पुष्पेंद्र सिंह याना स्पष्ट शब्दात बजावले आहे कि या बाई आपल्या व्यवस्थापक पदावर राहण्याच्या लायकीच्या नाहीत. श्री पुष्पेंद्र सिंह हे मला "जाऊ द्या", सोडून द्या इ रीतीने आग्रह करीत होते. परंतु मी त्यांना जर या व्यवस्थापिका आपले म्हणणे बदलणार नसतील तर मला हे प्रकरण धसास लावणार आहे असे सांगितले आहे. काही काळ गेल्यावर मी ओम्बुड्समन कडे जाण्याच्या विचारात आहे. या बद्दलची प्रक्रिया काय आहे हे कोणी समजावून सांगेल का?
काही काळ गेल्यावर मी ओम्बुड्समन कडे जाण्याच्या विचारात आहे. या बद्दलची प्रक्रिया काय आहे हे कोणी समजावून सांगेल का?
प्रत्येक बँकेचे अंतर्गत ओम्बुड्समन असतात. त्यांच्याकडे तक्रार करता येते आणि त्यातून निवारण न झाल्यास रिझर्व्ह बँकेच्या ओम्बुड्समनकडे तक्रार करणे ही पुढची पायरी. माझ्या माहितीप्रमाणे अंतर्गत ओम्बुड्समनकडे तक्रार करण्यापूर्वी बँकेच्या शाखेत तक्रार केली आणि त्याचा निवाडा झाला नाही हे दाखवून द्यावे लागते. याविषयीचा माझा अनुभव लिहितो.
मी माझे होमलोन घेतले त्याबरोबरच येणारा विमाही घेतला होता. विमा घेतला म्हणजे विम्यासाठी पैसे भरले होते. म्हणजे कर्ज चालू असताना जर कर्ज घेणारा परलोकवासी झाला तर विमा कंपनी उरलेले कर्ज फेडते अशा स्वरूपाचा हा विमा असतो. तो विमा मी घेतला होता. कर्ज घेताना प्रॉपर्टीचा विमा घ्यावा लागतो आणि त्याची कागदपत्रे माझ्या घरी आली. पण माझ्या विम्याची कागदपत्रे मात्र आली नाहीत. तेव्हा बँकेत जाऊन विचारले तेव्हा थोडीशी टोलवाटोलवीच त्यांनी केली. तरी ४-५ वेळा जाऊन त्यांच्या डोक्यावर बसल्यावर समजले की विम्याचे नुसते पैसेच घेतले गेले होते पण प्रत्यक्ष विमा दिलाच नव्हता. हा विमा कोटक किंवा टाटा या थर्ड पार्टीकडून दिला जाणार होता. माझे पैसे ताबडतोब परत द्यायची मागणी मी केली. रक्कम थोडी नव्हती. दोन ई.एम.आय इतकी रक्कम होती ती. एका पांढर्या कागदावर अर्ज लिहून दिला आणि "अर्ज मिळाला" हा शिक्का मारून त्या पांढर्या कागदाची एक कॉपी घेतली होती. १५ दिवस काहीच झाले नाही. त्यानंतर त्या बँकेच्या शाखेला २-३ ई-मेल केले. त्याचाही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबईतील विभागीय कार्यालयाला ई-मेल पाठवला. त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग कलकत्त्याला बँकेच्या ओम्बुड्समनकडे तक्रार केली. त्यावेळी बँकेच्या शाखेची "अर्ज मिळाला" ही पोचपावती आणि पाठवलेल्या सर्व ई-मेलचे प्रिंटआऊट जोडले होते. मग चक्रे हलली आणि १५ दिवसात माझे पैसे "तितकी रक्कम सेव्हिंग्ज खात्यात ठेवली असती तर मिळाले असते तितक्या व्याजासह" परत मिळाली. या प्रकारात तसे नुकसानच झाले कारण तितके पैसे माझ्याकडे तेव्हा असते तर मी थोडे कर्ज जास्त फेडले असते किंवा मार्केटमध्ये लावून अधिक परतावा घेतला असता. पण झालेले नुकसान अक्कलखाती गेले असे समजून पुढे काही केले नाही.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ओम्बुड्समनकडे जाण्यापूर्वी शाखा आणि विभागीय पातळीवर तक्रार केली, तक्रार निवारणीसाठी पुरेसा वेळ दिला पण काहीही झाले नाही हे दाखवून द्यावे हे उत्तम.
मी माझे होमलोन घेतले त्याबरोबरच येणारा विमाही घेतला होता. विमा घेतला म्हणजे विम्यासाठी पैसे भरले होते.
माझा अनुभव आणखीन भयानक होता पण थोडक्यात सुटलो ,
SBI चे मॅक्स गेन वर लोन ट्रान्स्फर केल होत , तर SBI ने त त्यांचा पर्सनल इन्सुरन्स विकायासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आणायला सुरूवात केली जो पर्यंत इन्सुरन्स घेणार नाही तो पर्यंत प्रोसेस पूर्ण करायला कर्मचारयांनी काकू करायला सुरूवात केली
शेवटी सर्व पेशन्स संपले वैतागून आवाज चढवला , आतून मॅनेजर आले , केबिन मध्ये घेऊन गेले तिथे तेच सुरू केल , त्यांना म्हणालो तुमची RBI कडे कॉम्प्लेट करून मला तुम्ही हे लेखी द्या , मग ते नरमले आणि प्रोसेस पूर्ण करायचे आदेश दिले , थोडा थोडका नव्हे दीड लाखाचा वन टाइम हप्ता असलेला इन्सुरन्स विकत होते , थोडक्यात वाचलो
हा अनुभव मलाही SBI Max Gain मध्ये लोन ट्रान्सफर करताना आला होता. मी त्यांना निक्षून सांगितले की "तुमचे काम लोन पास करणे आहे. पॉलिसी विकत घेण्याची जबरदस्ती तुम्ही करु शकत नाही", पण बँक कर्मचारी मान्य करत नव्हते. शेवटी मॅनेजरकडे तक्रार केल्यावर वाद मिटला.
कहर म्हणजे जेव्हा लोनविषयी चौकशी करतो तेव्हा, कागदपत्रे सबमिट करताना ही बाब सांगितली जात नाही. लोन जेव्हा disburse होते, त्यावेळी विम्याच्या हप्त्याची रक्कम जोडूनच disburse करतात आणि त्यावेळी अनेक कागदपत्रे भरताना विम्याचा फॉर्म भरायला लावतात.
घाईगडबडीत एखाद्याच्या लक्षात आले नाही तर हा भुर्दंड पडणारच!
cgmcsd@rbi.org.in हा आरबीआयच्या ओम्बुड्समनचा मेल आयडी.
https://www.rbi.org.in/commonman/English/scripts/againstbank.aspx इथे आणखी माहिती मिळेल.
(त्या बाईंचे म्हणणे तुमच्याकडे लेखी असल्याशिवाय तुम्ही ओम्बुड्समनकडे जाऊन फार फायदा होणार नाही.)
ओम्बुड्समनद्वारे एकाला धडा शिकवल्याची ही माझी झैरात - जागो ग्राहक जागो....
डॉक्टरसाहेब, तुम्ही याचा सोक्षमोक्ष लावाच. बॅन्क कर्मचार्यांना असला आगावूपणा करायचा अजिबात अधिकार नाहीच.
काही गोष्टी आहेत तेवढं बघा. तुमचं सॅलरी अकाउंट आहे, पर्सनल सेविंग अकाउंट नाही. त्यात सॅलरी ऐवजी रोख भरणा होत आहे. तेव्हा हे व्यवहार संशयास्पद या नावाखाली तपासले जाऊ शकतात, अर्थात असा अधिकार आयकरविभागालाच आहे. बाकी कोणालाच नाही. आपण कोठून किती कसे कमावतो वगैरे विचारण्याचा अधिकार अधिकृत संस्था सोडल्यास इतर कोणालाच नाही.
तसेच, हा सगळा प्रकार एचडीएफसी च्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या भिंतीवर जाऊन लिहा. तसेच ग्राहकतक्रारच्या संस्थळावर ही संपूर्ण माहिती द्या. बहुतेक सर्व हालचाल होण्याची शक्यता तिथूनच होईल. शेवटी बॅन्क अकाउंट बंद करण्याची धमकी द्या. सर्वात शेवटी ओम्बुड्समन कडे तक्रार करा.
मचं सॅलरी अकाउंट आहे, पर्सनल सेविंग अकाउंट नाही. त्यात सॅलरी ऐवजी रोख भरणा होत आहे. तेव्हा हे व्यवहार संशयास्पद या नावाखाली तपासले जाऊ शकतात, अर्थात असा अधिकार आयकरविभागालाच आहे.>>>> नवीन पोलिसी नुसार प्रत्येक बँकेला त्याच्या खातेदाराची कॅच बरोबर त्याचे प्रोफाईल सुद्धा चेक करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार जर काही संशयास्पद वाढले तर बँक तुम्हाला एक नोटीस पाठवून तुमचे खाते सुद्धा बंद करू शकते. उदा. बचत खात्यात व्यावसायीक ट्रांसकशन, हे सर्वे मॉडिफिकेशन डेमॉनिटिसशन नंतर आले आहेत.
हे माहित नव्हते. पण असे अधिकार बॅन्केला असतील तर सदर केसमध्ये संबंधित अधिकार्यांनी डॉक्टरसाहेबांना तसे लेखी कळवणे आवश्यक आहे.
ग्राहकाचा अपमान करण्याचा, अरेरावीचा मात्र त्यांना अजिबात अधिकार नाही.
ग्राहकाशी अरेरावी केली हे फक्त बँकेतच असे नाही कोणत्याही धंद्यात चुकीचे आहे. त्याबद्दल त्यानी माफी मागणे हे गरजेचे आहे. तुम्ही जर complaint केली तर जरूर त्यांचा माफीचा फोन येईल वरुन बॅंकचे अपोलोजि लेटर सुद्धा येईल.
बरोबर आहे लेखी कळवणे पण जर माणूस समोर आला असेल तर हि गोष्ट त्याला समजावून सांगून खूप चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. कंदाची डॉक ना भेटलेल्या बाईना हे जमले नसेल. आणि आपण हे सुद्धा बघतो कि बँकांकडून खूप काही पत्रे येत असतात काही प्रमोशनल असतात काही स्टेटमेंट असते. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टी वाचतो असे सुद्धा नाही.
नवीन पोलिसी नुसार प्रत्येक बँकेला त्याच्या खातेदाराची कॅच बरोबर त्याचे प्रोफाईल सुद्धा चेक करण्यासाठी सांगितले आहे. त्यानुसार जर काही संशयास्पद वाढले तर बँक तुम्हाला एक नोटीस पाठवून तुमचे खाते सुद्धा बंद करू शकते.
याला काही पुरावा आहे कि केवळ बँक कर्मचारी म्हणतात म्हणून. असे पत्रक असेल तर ते मला(आणि सर्वानाच) पाहायला आवडेल.
मी त्या व्यवस्थापिका बाईंना "मी भरत असलेल्या पैशाचा स्रोत तपासण्याचा आम्हाला अधिकार आहे असे लिहून द्या" असे स्पष्ट आव्हान उपाध्यक्षांसमोर दिले असताना हि त्यांनी तसे लिहून देण्यास नकार दिला. मी स्वतःच्या खात्यात मूळ शाखेत (home ब्रँच) मध्ये पैसे भरत असेन तर त्याचा स्रोत तपासण्याचे कोणतेही असे अधिकार बँकेला नाहीत असे त्या उपाध्यक्षांनी मान्य केले.
उद्या माझ्या वडिलांनी मला ५०,०००/- रुपये दिले तर ते कुठून आणले हे मी बॅंकेला का म्हणून सांगायचे? हा वैयक्तिक अधिकारावर घाला आहे.
मी दुसऱ्याच्या खात्यात किंवा दुसऱ्या शहरात पैसे भरत असेन तर गोष्ट वेगळी आहे.
सबळ कारण नसेल तर कोणतीही पूर्वसूचना न देता वाटेल तसे खाते बंद करण्याचा बँकेला कोणताही अधिकार नाही, बँक अधिकाऱ्यांची मनमानी म्हणून वाटेल ते नियमात बसेल असे नाही.
एकदा बँकेचे सभासद्/खातेदार झालात की हक्काने बोलता येते पण काय एखादी बँक खाते उघडायलाच नकार देऊ शकते? तसे लिहून न देता? आवशयक कागदपत्रांची पूर्तता करुनसुध्दा.
बचत खात्यांसाठी 'जनधन' पूर्वी असे प्रकार होत होते. पण जनधन मुळे कुणालाही खाते काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने किमान शिल्लक वगैरे गोष्टींचे अडथळे दूर झाले. त्यामुळे आता कोणी असे नकार देऊ शकत नाही. (जनधन पूर्वी अशी एखादी स्कीम असल्यास कल्पना नाही)
करंट किंवा CC असेल तर ते आपली पत आणि मॅनेजरच मूड यावर अवलंबून असते.
समजा एखाद्याने खुन्नस देऊन अकाऊंट उघडलेच तर मॅनेजर लोकं हमखास त्रास देतात. रोजच्या व्यवहारात अनेक ठिकाणी नियम वाकवणे दोघांची गरज असते. आपल्याला वाकवायला मॅनेजर लोकं नियम वाकवणे बंद करतात आणि आपण धंदा बघणार की बँकांमध्ये खेटे घालणार..?
बाकी काहीही लिहुन न देता खाते उघडण्यास नकार देत असेल तर एकदा खुर्चीचा माज उतरवा. मॅनेजर आपोआप जमिनीवर येईल.
बँक कर्मचारी म्हणून नाही.. पण RBI चे एक मास्टर circular आहे DBOD.AML.BC.No.24/14.01.001/2013-१४ यामध्ये याच उल्लेख Customer Acceptance पोलिसी मध्ये आहे. आणि कोण कस्टमर एकसेप्ट करायचे हा सर्वस्वी RBI ने बँकांवर निर्णय सोपवला आहे.
काही highlight तुमच्या माहिती साठी दिले आहेत..
Not to open an account or close an existing account where the bank is unable to apply appropriate customer due diligence measures, i.e., bank is unable to verify the identity and /or obtain documents required as per the risk categorisation due to non cooperation of the customer or non reliability of the data/information furnished to the bank. It is, however, necessary to have suitable built in safeguards to avoid harassment of the customer. For example, decision by a bank to close an account should be taken at a reasonably high level after giving due notice to the customer explaining the reasons for such a decision.
Banks should prepare a profile for each new customer based on risk categorisation. The customer profile may contain information relating to customer’s identity, social/financial status, nature of business activity, information about his clients’ business and their location etc. The nature and extent of due diligence will depend on the risk perceived by the bank. However, while preparing customer profile banks should take care to seek only such information from the customer, which is relevant to the risk category and is not intrusive. The customer profile is a confidential document and details contained therein should not be divulged for cross selling or any other purposes.
close an existing account where the bank is unable to apply appropriate customer due diligence measures, i.e., bank is unable to verify the identity and /or obtain documents required as per the risk categorisation due to non cooperation of the customer or non reliability of the data/information furnished to the bank
या कुठल्याही वर्गात मला त्यांना बसवता येणार नाही.
सगळे के वाय सी नॉर्म्स पूर्ण असून मी जर अगदी प्रत्येक १० रुपयाच्या व्यवहाराला सुद्धा PAN देतो आहे तर माझ्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्याचा कोणताही हक्क कोणत्याही बँकेच्या कर्मचाऱ्याला पोचत नाही हेच मला म्हणायचे आहे/ होते.
PAN देणे म्हणजे सगळे नाही. PAN / फॉर्म ६० Is mandatory only for cash deposit over and above 50000. Bank is responsible for due diligence here come the transaction nature. And you need to justify the transaction that’s ok for any bank, no query need to be asked in this case.
They should not ask you origin of money, only bank need to verify the Genuineness of the transaction and the customer profile. They might be wrong in this case but they should ask you the details as above not the origin. And if they feel mismatch they can file a STR ( suspicions transaction Report )
मी म्हंटले ना ती बाई मूर्ख आहे. HDFC किंव्हा ICICI अगदी काही नॅशनॅलिज्ड बँक मध्ये सुद्धा असे लोक भेटतील जे फक्त पोपटपंची करतात. नियम कुठे आहेत आणि काय आहेत हे माहित नसतात फक्त बोलायचे म्हणून बोलतात.
या बॅंकयेत जास्त करून TPP प्रॉडक्ट सेल करण्यावर भर दिला जातो त्यामुळे ते विचारलेलं पत्करून सांगू शकतील पण RBI काय म्हणते हे नाही सांगू शकणार. त्यामुळेच RBI आणि बँकिंग ओंबड्समन चे अश्या बँकेत visit वाढल्या आहेत.
प्रथम तुम्ही लोकल जिथे तुम्हाला प्रॉब्लेम झाला तेथे सविस्तर अर्ज करून या बद्दल तुमची तक्रार दाखल करू शकता. जर त्यांचेकडून १५ दिवसात काही उत्तर आले नाही तर किंवा आलेल्या उत्तरातून तुमचे समाधान झाले नसल्यास तुम्ही हायर ऑथॉरिटी कडे तक्रार दाखल करू शकता. ज्याची माही बँकिंग ombudman या टॅग खाली प्रत्येक बँकांच्या वेबसाईट वर किंवा त्यांच्या नोटीस बोर्ड वर असते.
"hdfc bank customer care" या बेवपेजवरचा "Grievance Redressal" हा पर्याय वापरा.
माझ्याही अनुभवाप्रमाणे एच डी एफ सीच्या स्थानिक प्रशासनाला 'बेसिक रिटेल बँकिंग' सोडून इतर काही फारसे माहीत नसते; त्यांचा कल गिर्हाईकावर सर्व जबाबदारी टाकून आपण मोकळे होण्याचा असतो आणि ते करताना उद्धटपणे वागणे हे सुद्धा खूप जणांकडून ऐकले आहे.
मात्र, त्या बँकेच्या "Grievance Redressal" बद्दल माझा अनुभव चांगला आहे. ब्रँचने दोन महिने खाल्ल्यावर, मी भारतात नसतानाही Grievance Redressal वर केलेल्या तक्रारीने एका आठवड्यात समस्येचे निवारण झाले. मुख्य म्हणजे या प्रकारात सर्व व्यवहार "डॉक्युमेंटेड" असल्याने व वरून दट्ट्या आल्याने ब्रँचमधल्या लोकांची वागणूकही ताबडतोप सुधारते !
एच डी एफ सी बँकेत माझ्या कंपनीचे २० लोकांचे पगाराचे खाते होते पण कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या उर्मट वागणुकीमुळे सर्व खाती बंद करून बँकेला ब्लॅक लिस्ट करून टाकले आहे.
अतिशय वाईट अनुभव आहे या बँकेचा.
सध्या HDFC बॅक सॅलरी अकाउंटसना PIN Change चेही चर्जेस लावते असे वाचले. याशिवाय Personal Banker वा अशाच काहीश्या नावाने पुरविलेल्या सेवेकरिताही ते दर सहामाही एक रक्कम खर्ची टाकतात असेही आढळुन आले आहे. याच विषयाला अनुसरुन श्री,किरिट सोमैया यांनी परवा संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे.
बाकी बॅंकानी विम्याच्या पॉलिसीज विकणे याबाबतच्या कथा न संपणार्या आहेत.....त्याविषयी न बोलणेच बरे
सध्या HDFC बॅक सॅलरी अकाउंटसना PIN Change चेही चर्जेस लावते असे वाचले.
हो?? मी पिन चेंज केलेला नाही इतक्यात पण असंही असु शकतं हे माहिती नव्हतं.
गेल्या काही महिन्यात अति नियम बदलले आहेत.. आणि सगळं मला जाचकच वाटतंय.. म्हणजे ऑनलाइन व्हवहार व्हावेत हे ठिक पण प्रत्येक गोष्टीला चार्जेस का लावत आहेत?
बँकांचे काहीकाही नियम बुचकळ्यात टाकणारे असतात. मी एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून होमलोन घेतले आहे. मी कर्जासाठी अर्ज केला होता त्याचवेळी सेव्हिंग अकाऊंटही उघडला होता. हे घडले मी पूर्वी भाड्याच्या घरात असताना त्यामुळे मी तिथला वास्तव्याचा पुरावा दिला होता.त्यानंतर घर विकत घेतल्यानंतर नियमाप्रमाणे मुळातले सेल डिड बँकेकडे जमा केले होते.मला वाटले होते की याच बँकेने मला कर्ज दिले आहे आणि मुळातले ओरिजिनल सेल डिड बँकेकडे जमा केले आहे त्यामुळे सेव्हिंग्ज अकाऊंटवरील पत्ता बदलायला आणखी काही कागदपत्रे द्यायची गरज लागणार नाही. पण कुठचे काय. सेव्हिंग्ज अकाऊंटवरचा पत्ता बदलायला त्याच सेल डिडची एक कॉपी बँकेला द्यायला लागली होती. आणि ती कॉपी आणि एका पांढर्या कागदावर अर्ज लिहून दिल्यानंतर त्या मनुष्याने माझ्यासमोरच कॉम्प्युटरवर पत्ता बदलला. ते सेल डिड उघडून बघायचीही तसदी त्याने घेतली नाही. म्हणजे सेल डिडच्या नावाखाली दुसरेच काही दिले असते तरी त्याला ते कळले असते आणि तरीही तसाच पत्ता त्याने बदलला असता का ही पण शंकाच आली.
दुसरे म्हणजे इतर सर्व बँका ऑनलाईन बँकिंगद्वारे चेकबुक ऑर्डर करायची सुविधा देतात आणि ते चेकबुक कुरिअरद्वारे घरपोच येते. पण या बँकेत मात्र तशी सोय उपलब्ध नाही. बँकेच्या शाखेत जाऊन लिखित अर्ज करायचा आणि मग ८-१५ दिवसांनी आपले नाव लिहिलेले चेकबुक त्या बँकेच्या शाखेत येणार आणि आपण ते तिथे घ्यायला जायचे!! अन्यथा पूर्वीच्या काळी आपले नाव नसलेले एक लांबलचक चेकबुक मिळायचे आणि त्यावर आपला खाते क्रमांक स्टँपने लिहिलेला असायचा तसे चेकबुक बँकेत ताबडतोब मिळेल असे सांगण्यात आले. एकतर हल्ली एन.ई.एफ.टी चाच वापर होत असल्यामुळे चेकबुक वापरायची वेळ फार येतच नाही.त्यामुळे ते चेकबुक घेण्यात फार काही स्वारस्य दाखवले नाही.
हा हा हा.. सेम सेम.
मला ज्या कागदपत्रांवर कर्ज दिले त्याच कागदपत्रांच्या आधारे पत्ता बदलायला नकार दिला. (इन्सफिशियंट डॉक्युमेंट्स असा शेरा दिला.) मी बर्रं म्हणालो, बाहेर पडलो आणि दुसर्या शाखेत तीच कागदपत्रे दिली व पत्ता बदलून घेतला. :D
चेकबुकची पण सेम कथा. युनायटेड वेस्टर्न मधून आयडीबीआय मध्ये आलेली कांही खोडं पै पै वाचवायचा प्रयत्न करतात. मला चेकबूक घरच्या पत्त्यावर हवे असताना यांचे म्हणणे बँकेतून घेऊन जावा. (घर आणि होम ब्रँच अंतर ३०० किमी फक्त.) बँकेला कुरीयरचा खर्च येतो म्हणून कुरकुर....
मग ते चेकबुक पोस्टाने पाठवतो, रजिस्टर करतो वगैरे सांगू लागले, मी इतकेच म्हणालो की "तुमचा माणूस ३०० किमी प्रवास करून घरी आणून देऊदे.. मी एक पैसा बेअर करणार नाही" मग ते गप बसले.
ही बँक पासबुक देत नाही. तिचा पेपरलेसचा आग्रह. ती दर तीन महीन्यांनी स्टेटमेंट पाठवते. म्हणजे पेपर आलाच आणि ते पाठवण्यासाठी पोस्टेजचा खर्चही आला. त्यांना पासबुकची विचारणा केली असता ते म्हणतात. तर मग आम्ही तुम्हाला स्टेटमेंट देणे बंद करू आणि पासबुक म्हणून सगळी स्टेटमेंट एकत्र स्टेपल करून देऊ. वास्तविक स्टेटमेंटचे चिठोरे सांभाळण्यापेक्षा पासबुक सांभाळणे कितीतरी सोपे.
एरवी स्मार्टपणा दाखवणारी ही चकाचक बँक पासबुकबाबतीत स्मार्टपणा का दाखवत नाही अनाकलनीय आहे.
या बॅंकेकडे बहुतेक ई-स्टेटमेंटची सुविधा असेल. ती असल्यास तुम्ही कागदी स्टेटमेंट बंद करून मासिक स्टेटमेंट ईमेलने पाठवावे असे बॅंकेला सांगू शकता.
+१००
ही सोय नेटबँकिंगने २-३ मिनिटात होते... तिथले खालील पर्यायही फार उपयोगी आहेत :
१. महिन्याचे स्टेटमेंट ईमेलने मिळणे
२. खात्यातील रकमेचा प्रत्येक बदल एसएमएस ने कळवणे (योग्य खाते निवड केल्यास ही सेवा चकट्फू असते)
३. हवे त्या कालखंडाचे अकाउंट स्टेटमेंट स्वतःचे स्वतःला काढता येते... ही सेवा आर्थिक बाबींसाठी, पत्याचा पुरावा म्हणून, आयकर विवरणासाठी (संपूर्ण आर्थिक वर्षाचे स्टेटमेंट), इत्यादी अनेक कारणांसाठी २४ X७ वापरता येते.
मी गेल्या पंधरा वर्षांत एकही पासबूक वापरलेले नाही... त्याने काहीही अडत नाही ! आपला मोबाईल/लॅपटॉप कित्ती कित्ती गुणी आहे हे सांगत फिरणार्यांना आणि त्यावर व्हीडीओ डाऊनलोड, चॅट, इ करणार्या लोकांना नेटबँकिंग 'बाये हाथका खेल' आहे.
सतिश जी,
माझी बँक मला मेलवर इ स्टेटमेंट पाठवते. तसेच प्रत्येक ट्रांजेक्षनचा एसएमएस आणि मेल सुद्धा येतात. तसेच मागची ट्रांजेक्षनसुद्धा पाहता येतात. त्याची काळजी नाही. त्या सुविधा मी गेली कित्येक वर्षे वापरतो आहे.
आजकाल काँप्युटरमुळे आतले बदलले असेल. बाह्य गोष्टी (Input, Output) बदलण्याचे कारण नाही. अनेक बँकाची सॉफ्टवेयर्स आज पासबुक प्रिंटींगला सपोर्ट करतात.
दरवेळी मागची ट्रांजेक्शन पाहण्यासाठी कंप्यूटर चालू करावा लागत नाही. वीजही वाचते.
बाकी सर्व बँका या सुविधा देतात. पण ICICI मात्र देऊ शकत नाही.
ICICI बद्दल इतरांचे अनुभव काय आहेत माहीत नाही. पण उत्तम सेवा. कित्येक वर्षे वापरत आहे. बँकेत कधी जावेच लागत नाही. सर्व कामे वेबसाइटवरून होतात. कधी बँकेत गेले तरी सर्व कामे अत्यंत कार्यक्षमतेने केली जातात.
CITI आणि HDFC चे ग्राहक मात्र अनेकदा कुरकुर करताना आढळतात.
आम्च्या आय्डीबाय ब्यांकेचे मोब्ल्यात एम-पासबुक आहे.
त्यात जमाखर्च सांभाळणे/लिहिणे यासाठी सोय आहे. तसेच कोणते ट्रँजॅक्शन नक्की कसले आहे (उदा. जोशींना मेडिक्लेम इन्शूरन्स रिन्युवलसाठी दिलेला चेक) असे टॅग लावायचीही सोय आहे.
चांगली सोय आहे. नेटबँकिंंगने सोय आहेच, पण सिक्युरिटीचीही काळजी असतेच.
बँकांच्या ब्रँचमध्ये कामे करणार्यांना टारगेट दिली जातात. आणि या टारगेट्समध्ये सेव्हिंग्ज अकाऊंट्स, एफ्.डी याबरोबरच क्रॉस-सेलचीही टारगेट असतात. म्हणजे किती युलिप विकायची वगैरे वगैरे. ही टारगेट पूर्ण करायला बँकेतले लोक ज्या पध्दतीने गळ्यात पडतात त्याला काही तोडच नाही.
माझ्या आईला अशी अनेक युलिप आय.सी.आय.सी.आय च्या लोकांनी अशी विकली आहेत. समोरच्या माणसाचा आपण काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास बसेल अशी माणसे हेरून त्यांच्या गळ्यात वाटेल ते मारण्यात या लोकांचा अगदी हातखंडा असतो. जर अशी गोष्ट नक्की काय आहे, त्यात कोणते चार्जेस आहेत इत्यादी कळत नसेल तर असले काहीतरी विकत घ्यायच्या भानगडीत पडू नकोस हे माझ्या आईला मी निक्षून सांगितले आणि बँकवाल्यांचे फोन आल्यास त्यांना काहीही विकत घ्यायचे कबूल न करता मला फोन करायला सांग असे सांगितले. मला त्या बँकवाल्यांचे फोन कधी आले नाहीत. पण सतत "तुमचा मुलगा कधी येणार आहे" अशी भूणभूण मात्र आईच्या डोक्याला त्या बँकवाल्यांनी लागली. एकदा मी घरी जाणार होतो ते त्या बँकवाल्यांना कळले. बस सकाळी साडेसहा-पावणेसातच्या सुमारास तिथे पोहोचते. पण लेट होऊन त्या दिवशी घरी पोहोचायला साडेआठ झाले. घरी पोहोचल्यावर चहा-बिस्किटे घेऊन होत आहेत तोवर बँकेची मंडळी घरी हजरही झाली-- नवे इन्व्हेस्टमेन्ट प्रॉडक्ट विकायला!!
मागच्या वर्षी एकदा काही कारणाने पैसे हवे होते तेव्हा बरेच शेअर विकले. पैसे बँकेत २-३ दिवसात जमा झाले. तो एस.एम.एस आला सकाळी अकराच्या सुमारास. दुपारी तीनच्या सुमारास त्या बँकेच्या 'रिलेशनशीप मॅनेजरचा' फोन आला. वास्तविक ते बँकेचे खाते मी केवळ डी-मॅट अकाऊंटशी संलग्न ठेवले आहे आणि इतर कोणतेही व्यवहार मी त्यावरून करत नाही. तेव्हा तिथला रिलेशनशीप मॅनेजर असायचे काही कारणही नव्हते. मी यांची दुनिया जवळून बघितलेली असल्यामुळे त्याने फोन नक्की का केला हे पण लगेच कळले. तो तथाकथित रिलेशनशीप मॅनेजर दुसर्या दिवशी ऑफिसमध्ये मला भेटायलाही आला-- नवे इन्व्हेस्टमेन्ट प्रॉडक्ट विकायला!!
याच डिमॅट अकाऊंटवरून एक गोष्ट आठवली. मी तो अकाऊंट चालू केला त्यावेळी पॅन कार्ड आणि इतर डॉक्युमेन्टची कॉपी घ्यायला एक मनुष्य ऑफिसात आला होता. मी त्याला सगळे कागद दिले. त्यानंतर संध्याकाळी दुसर्या एकाचा फोन मला आला--- "अहो तुम्ही माझे क्लाएंट आहात. तुम्ही त्याला कागदपत्रे कशी दिलीत" असा जाब विचारत. त्याने मला परत कागदपत्रे द्यायला सांगितली. त्याचा फोन संपतोय ना संपतोय तोच तिसर्या एकाचा परत असाच जाब विचारायला फोन आला. या फोनच्या वेळी मात्र मी सांगितले की मी कागदपत्रे राजेश नावाच्या व्यक्तीला आधीच दिली आहेत. जर मी तुमचा क्लाएंट असेन तर तुम्ही त्या राजेशकडून ती कागदपत्रे परस्पर घ्या मी परत काही नवी कागदपत्रे देणार नाही. बहुदा हा प्रकार त्यांच्या मॅनेजरला कळला असावा. त्याचा दुसर्या दिवशी सकाळी मला फोन आला आणि त्याने सांगितले की या लोकांना सगळ्यांना अमुक इतके डी-मॅट अकाऊंट उघडायचे ही टारगेट दिलेली असतात. त्यामुळे अनेक जण "तुम्ही माझेच क्लाएंट" असे म्हणत पुढे येतात. अशी मजा असते टारगेट्सची!!
डॉक्युमेन्टची कॉपी घ्यायला एक मनुष्य ऑफिसात आला होता
तुमच्या या वाक्यावरून मला रामदास यांच्या 'पिसि .जेसि .आणि आउट' या कथेची आठवण झाली. आपण कागदपत्रे अशा माणसांजवळ देतो परंतु त्याची त्यावरील माहिती गुप्त राहील याची खात्री काय? हि अशी माणसे त्याच्यावरती वेगळा लेखच होईल बहुतेक.
हो हा धोका असतोच पण त्याला अजून तरी रामबाण उपाय सापडलेला नाही. बँकेत जाऊन कागदपत्रे दिली तरी त्याचा असा दुरूपयोग होऊच शकतो. आधार कार्डाबरोबर सगळे काही संलग्न करून अंगठ्याचे ठसे मॅप करून सगळी कुंडली परस्पर घ्यायची व्यवस्था झाली तरी त्या डेटाबेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत आहेच :(
ATM व नेट बँकिंग वर टीका अनाठायी वाटली ..
गेल्या दहा वर्षात मी फक्त दोनदा बँकेत गेलो आहे. एकदा मोबाईल नंबर बदलण्यासाठी आणि एकदा जुन्या नोटा भरण्यासाठी .
सर्व व्यवहार ATM व नेट बँकिंग वर सुरळीत चालु आहेत .
तेंव्हा बँकांनी ह्या सुविधा देण्यात गैर काहीच नाही
एका ब्यांकेत बचत खाते काढले तर लॉकर मिळेल असे बायकोला त्या ब्यांकेत सांगितले. प्रत्यक्षात मी जेव्हा आवश्यक कागदपत्रे घेऊन गेलो तेव्हा "वर्षाला पन्नास हजार असे दहा वर्षे भरायचे" पॉलिसी घेतली तरच लॉकर मिळेल असा नवाच मुद्दा पुढे केला त्यांनी. मी नाही म्हणताच त्यांनी बार्गेनिंग सुरु केले. पॉलिसीचा वार्षिक हप्ता कमी करत त्यांनी २५ हजारावर आणला. तरीही मी नकार देताच त्यांनीही लॉकर मिळणार नाही असे सांगितले.
बचत खात्यावर सहा टक्के व्याज असल्याने आणि ब्यांकेची शाखा घरापासून चालत दहा मिनिटांवर असल्याने मी तिथे बचत खाते मात्र उघडले.
वरील सर्व अनुभव आतापर्यंतच्या ब्यांक-जीवनात आलेले आहेत.
महान ब्यांकेचा दिव्य अनुभव तर रोजच येत असतो. गरज नसलेले माजोरी लोक ! का आमच्या एम्प्लॉयरला महान ब्यांकेत सॅलरी अकौंटस काढायची दुर्बुद्धी झाली महादेव जाणे !
यापुढे पोस्ट ऑफीसकडेही बँकींगचे व्यवहार देणार आहेत. त्यावेळी तर काय काय अनुभव घ्यावे लागतील हे सांगणे कल्पनेच्या पलिकडचे आहे.
नुकताचं अनुभव घेतला. चिंचवड स्टेशनच्या पोस्ट ऑफिसमधे काही एन.एस.सी. कॅश आउट करायच्या होत्या तर चेकने पैसे देणं बंद केलयं असं उत्तर मिळालं. इथेचं खातं उघडावं लागेल असं उत्तर मिळालं. पोस्टमास्टरकडे वडिल गेले तेव्हाही उडवाउडवीची उत्तरं मिळाली. वडिलांनी चेकने पैसे देत नाही असं लेखी मागीतलं तर तो पोस्टमास्टर वडलांच्या अंगावर धावुन आला आणि धमकावलं. युनियन च्या जीवावर माजलेत भोसडीचे. नंतर मी जाउन शिव्या देउन आलो. उपयोग शुन्यं. रखडवायचं ते बरोबर रखडवलं त्यानी. सरकारी कर्मचारी मरत असेल तर त्याला पाणीही पाजु नये, तडफडुन मरु द्यावं ह्या निष्कर्षापर्यंत मी आलेलो आहे. ह्यापुढे कानाला खडा. पोस्टाशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करणार नाही. नॅशनल ग्रिव्हन्स फोरमवर तक्रार केलेली आहे. पाहु काय होतं ते. त्याला धडा शिकवल्याशिवाय मी गप्पं बसणार नाही एवढं खरं.
आमच्या ओळखीचे एक काका पोस्टात होते. चिंचवड, चिंचवड स्टेशन आणि हिंजवडी ह्या ठिकाणी काम केलंय त्यांनी. हिंजवडीला म्हणे इतकं काम होतं की त्यांचा मुलगा जाऊन मदत करायचा. शेवटचं वर्ष होतं आणि काहीतरी कारणानी युनियनची भीती. कसंबसं शेवटचं वर्ष काढलं.
चिंचवडचं पोस्ट अतिभिकार आहे. प्रचंड स्लो... आई तर काही काम असेल तर एक आक्खा दिवसच काढुन जाते. ते काम न होण्याची शक्यताच जास्त असते इतकं करुन..
अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या नियमानुसार बँकांना खातेदारांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि गैर व्यवहार उघडकीस आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना अथवा बँकेला दंड अथवा शिक्षा होऊ शकते.
व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी चालू खाते उघडावे हा त्या कर्मचाऱ्यांचा आग्रह अगदी कायद्याला धरून आहे. एव्हडेच काय, आज काल तर पगारी कर्मचाऱ्यांना देखील रेईम्बुरसेमेन्ट साठी चालू खाते उघडावे लागते.
बँकेच्या रोजच्या कामकाजातील एखाद्या कागदपत्रावर सही करण्याचे अधिकार त्या त्या प्रतिनिधीला आणि शाखेच्या प्रमुखाला असतात.
इथे डॉक्टर खरेंची बाजू बरोबर आहेत आणि त्या महिला अधिकारी बरोबर असतील तर त्यांनी आपले म्हणणे लेखी द्यावे ही अपेक्षाही चुकीची नाहीये.
अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या नियमानुसार बँकांना खातेदारांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि गैर व्यवहार उघडकीस आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना अथवा बँकेला दंड अथवा शिक्षा होऊ शकते.>>>> या case मध्ये जर बँक निष्काळजी दाखवत असेल तर... पण मी आपल्या प्रश्नाचे उत्तर अगोदरच दिले आहे.
पगारी कर्मचाऱ्याचे reimbursement खाते काढावे अशी कोणतेही बँक सांगत नाही. ती त्या कंपनीची जमा खर्च (नोकराला दिलेला पगार व भत्ते ज्यात मोबाईल बिल, ट्रॅव्हल etc ) दाखवण्याची पद्धत असते.
जर बॅंकयेत कोणीही खातेदार किंवा भागीदार ( shareholder ) जर काही स्वतःच्या खात्या संबंधी काही लेखी विचारात असेल तर त्याला पोच देणे गरजेचे आहे. फक्त माहिती कायदा सोडून कारण तो या व्यवसायाला लागू नाही.
मुद्दा क्रमांक ३ - जर बॅंकयेत कोणीही खातेदार किंवा भागीदार ( shareholder ) जर काही स्वतःच्या खात्या संबंधी काही लेखी विचारात असेल तर त्याला पोच देणे गरजेचे आहे. - सहमत.
याच सोबत, जर बँक प्रतिनिधी खात्यासंदर्भातच एखादा नियम / तरतूद सांगत असेल तर ते लेखी मागण्याचा खातेदारास हक्क आहे, आणि तशी तरतूद असेल तर कर्मचार्याने ते लेखी देण्यास काहीच हरकत नाही.
मुद्दा १ व २ बद्दल पास - कारण तो मी मांडलेला नाही
फक्त माहिती कायदा सोडून कारण तो या व्यवसायाला लागू नाही - यावर अवांतर होईल म्हणून पास.
कोणत्या धाग्यात विचारावे हे कळेना म्हणुन इथे विचारते..
बँकेत आधार कार्ड जोडा म्हणुन बातम्या येत आहेत. नाही तर खाते बंद होईल म्हणे. आता आज एक वाचलं की ते फक्त २०१४ नंतरच्या खात्यांना आहे.
तर नक्की काय नियम आहे कुणी सांगेल का? आणि जे भारतात नाही त्यांनी काय करायचे?
१) एंबसीला मेल पाठवून विचार, ते कागदपत्रे पाठवतील का म्हणून.
२) बँकेची अमेरिकेत शाखा आहे का..? असल्यास तेथे सबमीट कर.
३) सरळ बँकेच्या कस्टमर केअरला मेल पाठवून परिस्थिती सांग - आणि काय करू ते विचार.
मेल वर संभाषण कर - लेखी पुरावा राहतो.
सेंट्र बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या प्रत्रकाप्रमाणे एनआरआयना आयकर विवरण भरताना आधार कार्ड असणे आवश्यक नाही असे कळते...
http://nricafe.com/aadhaar-card-not-needed-for-nris-says-india-govt/
तरीही प्रत्येकाने आपल्या सीएकडे चौकशी करून खात्री करून घेणे केव्हाही चांगले.
आता सर्व भारतात एकच कस्टमर आइडी आणणार. कुठेही गुंतवणूक केली की तो द्यावा लागेल. सर्व प्रकारच्या बँका ,पतपेढ्या ,कंपनी डिपॅाझिट्स यासाठी आवश्यक. पॅन कार्ड नंबर बहुतेक फेल गेला. आधार संलग्न असावा. पुर्वी आधार फक्त एकाच बँक अकाउंटशी सबसिडिसाठी केलेला.
आपला भारत देशच एक बॅकांचे भंगार यार्ड आहे. कुणीही हाका अशी जनता असल्याने सर्व खाजगी व सरकारी बॅंकाना माज आलेला आहे. सर्व खाजगी व सरकारी बॅंकाना एक समाईक अशी कार्यपद्धती आपल्या देशात नाही. काही किमान समाईक नियमावली नसल्याने एका ठिकाणी एक तर दुसर्या ठिकाणी दुसरेच असा अनुभव आहे. कारकून लेव्हल व ऑफिसर लेव्हलला सरकारी बॅका तर भिकार आहेतच पण मॅनेजर खोटारडे असल्याचे माझे अनुभव आहेत. तक्रार करू गेल्यास वरचे डी जी एम व मॅनेजर यांची मिलीभगत असल्याचे चित्र आहे.
आता तर समाजवादाला भारत देशात तिलांजली मिळाल्याने याचा चार्ज त्याचा चार्ज असे सत्र सुरू झाले आहे. मी एका खाजगी कंपनीत कामाला होतो त्यातेथील १९९५ चे कामाचे नियमन आज २०१७ मधे देखील सरकारी बॅकात दिसत नाही. एफ डी आर वाला ग्राहक हा एक भिकारी माणूस असून क्लिअरिंग हे बॅकेचे सर्वात पवित्र व महत्वाचे काम आहे असे सर्व बॅकांचे धोरण दिसते.
बँक: 'महा'न बँक
शाखा: कर्वे रस्ता, पुणे ४.
ह्या शाखेत माझे आणि बाबांचे संयुक्त आहे. एकदा धनादेश पुस्तिकेची मागणी करायला ह्या शाखेत गेलो असता अचानक ह्यांना आठवण झाली कि ह्या खात्याचे केवायसी बरेच दिवसात झाले नाहीये, मला सगळी कागदपत्रे मागण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर पुन्हा तीच माहिती माझ्याकडून विचारून घेणार आली. (का ते माहीत नाही). त्यानंतरच धनादेश पुस्तिकेची मागणी नोंदवली गेली.
नवी धनादेश पुस्तिका आल्यावर मी हादरलोच. पहिले नाव वडिलांचे, दुसरे नाव माझे आणि पुन्हा एकदा वडिलांचे नाव. संयुक्त खात्यावर केवळ दोनच नावे असताना धनादेश पुस्तिकेवर ३ नावे त्यातही एकाचे नाव २ वेळा.
ह्याबाबत पुन्हा शाखेत जाऊन विचारले असता, एकदाच सही केली तरी चालेल दोनदा नाव आहे म्हणून दोनदा नका करू असे सांगितले.
अहो, एकाच माणसाचे दोनदा नाव लिहिलंयत, हे सांगितल्यावर, 'बरं ते नाव कमी करतो' असं सांगून त्या हुशार माणसाने माझेच नाव खात्यावरून कमी केले.
खात्यावर नाव पुन्हा जोडण्यासाठी फॉर्म भरा, केवायसी करा, मूळ खातेदाराच्या सह्या आणा वैगेरे वैगेरे.
पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच शाखा.
माझ्या खात्यातून अचानक ११३ रु. कापून घेतले. पासबुकवर लिहून मिळालं कि खात्यावर किमान शिल्लक नसल्याने हे पैसे घेणार आलेले आहेत.
माझ्या खात्यावर किमान शिल्लक नियमापेक्षा जास्त रक्कम असताना देखील हे असं का विचारल्यावर तिथल्या हुशार माणसाने उत्तर दिले कि, 'हे पैसे तुमच्या डेबिट कार्डची वार्षिक फी आहे.'
आहो मग डेबिट कार्ड फी म्हणून लिहा ना, असे सांगितल्यावर, 'ती सर्वरची चूक आहे. आम्ही काही करू शकत नाही.'
मग मी विचारलं कि, शाळा सोडल्याच्या दाखल्याची स्टेशनरी संपली म्हणून मृत्यू दाखल्यावर नाव लिहून दिल चालेल का?
प्रतिक्रिया
चांगले आहेत.
सतत रांगेने अश्या अनेक दिव्य
_/|\_
In reply to सतत रांगेने अश्या अनेक दिव्य by डॉ सुहास म्हात्रे
...
In reply to सतत रांगेने अश्या अनेक दिव्य by डॉ सुहास म्हात्रे
बँकेचे नाव देणे का टाळले
In reply to ... by आशु जोग
अजिबात नाही.
In reply to ... by आशु जोग
प्रतिसाद आवडला! धन्यवाद..!
In reply to अजिबात नाही. by डॉ सुहास म्हात्रे
हाहा!
In reply to सतत रांगेने अश्या अनेक दिव्य by डॉ सुहास म्हात्रे
कसब
In reply to सतत रांगेने अश्या अनेक दिव्य by डॉ सुहास म्हात्रे
माझा अनुभव
तुमचे अनुभव हे सर्व जुन्या
...
In reply to तुमचे अनुभव हे सर्व जुन्या by कंजूस
शेवटची नोंद -पिपिएफचे
...
In reply to शेवटची नोंद -पिपिएफचे by कंजूस
नाही कंजुस काका तुम्हाला
In reply to शेवटची नोंद -पिपिएफचे by कंजूस
ट्याक्स रिबेट देणाय्रा सर्व
In reply to नाही कंजुस काका तुम्हाला by माझीही शॅम्पेन
हे चुकीचे आहे. मी गेली ११
In reply to ट्याक्स रिबेट देणाय्रा सर्व by कंजूस
मीही कॅशच भरलेत गेले ३ वर्ष
In reply to हे चुकीचे आहे. मी गेली ११ by हेमंत८२
आता रूल्स बदललेले दिसताहेत.
In reply to मीही कॅशच भरलेत गेले ३ वर्ष by प्रीत-मोहर
...
In reply to आता रूल्स बदललेले दिसताहेत. by कंजूस
हेमंतराव.. मी टॅक्स या
In reply to हे चुकीचे आहे. मी गेली ११ by हेमंत८२
साहेब राव बोलू नका.
In reply to हेमंतराव.. मी टॅक्स या by प्रसाद भागवत
साहेब राव बोलू नका.
In reply to हेमंतराव.. मी टॅक्स या by प्रसाद भागवत
नव्या डिजिटल बँकेचे अनुभव
ओम्बुड्समन
In reply to नव्या डिजिटल बँकेचे अनुभव by सुबोध खरे
मी माझे होमलोन घेतले
In reply to ओम्बुड्समन by गॅरी ट्रुमन
हा अनुभव मलाही SBI Max Gain
In reply to मी माझे होमलोन घेतले by माझीही शॅम्पेन
घाईगडबडीत एखाद्याच्या लक्षात
In reply to हा अनुभव मलाही SBI Max Gain by परिंदा
cgmcsd@rbi.org.in हा
In reply to नव्या डिजिटल बँकेचे अनुभव by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, तुम्ही याचा
In reply to नव्या डिजिटल बँकेचे अनुभव by सुबोध खरे
मचं सॅलरी अकाउंट आहे, पर्सनल
In reply to डॉक्टरसाहेब, तुम्ही याचा by संदीप डांगे
हे माहित नव्हते. पण असे
In reply to मचं सॅलरी अकाउंट आहे, पर्सनल by हेमंत८२
ग्राहकाशी अरेरावी केली हे
In reply to हे माहित नव्हते. पण असे by संदीप डांगे
नवीन पोलिसी नुसार प्रत्येक
In reply to मचं सॅलरी अकाउंट आहे, पर्सनल by हेमंत८२
+११
In reply to नवीन पोलिसी नुसार प्रत्येक by सुबोध खरे
एकदा बँकेचे सभासद्/खातेदार
In reply to +११ by मोदक
बचत खात्यांसाठी 'जनधन' पूर्वी
In reply to एकदा बँकेचे सभासद्/खातेदार by अभ्या..
बँक कर्मचारी म्हणून नाही.. पण
In reply to नवीन पोलिसी नुसार प्रत्येक by सुबोध खरे
close an existing account
In reply to बँक कर्मचारी म्हणून नाही.. पण by हेमंत८२
PAN देणे म्हणजे सगळे नाही.
In reply to close an existing account by सुबोध खरे
मी म्हंटले ना ती बाई मूर्ख
In reply to नवीन पोलिसी नुसार प्रत्येक by सुबोध खरे
प्रथम तुम्ही लोकल जिथे
In reply to नव्या डिजिटल बँकेचे अनुभव by सुबोध खरे
"hdfc bank customer care" या
In reply to नव्या डिजिटल बँकेचे अनुभव by सुबोध खरे
एच डी एफ सी बँक
In reply to नव्या डिजिटल बँकेचे अनुभव by सुबोध खरे
सध्या HDFC बॅक सॅलरी
In reply to नव्या डिजिटल बँकेचे अनुभव by सुबोध खरे
सध्या HDFC बॅक सॅलरी
In reply to सध्या HDFC बॅक सॅलरी by प्रसाद भागवत
जर तुम्ही physical पिन साठी
In reply to सध्या HDFC बॅक सॅलरी by पिलीयन रायडर
बँकांचा हलकटपणा
राष्ट्रीयीकृत बँकेतील अनुभव
हा हा हा.. सेम सेम.
In reply to राष्ट्रीयीकृत बँकेतील अनुभव by गॅरी ट्रुमन
ही बँक पासबुक देत नाही. तिचा
+१००
In reply to ही बँक पासबुक देत नाही. तिचा by सतिश गावडे
...
In reply to ही बँक पासबुक देत नाही. तिचा by सतिश गावडे
पण ICICI मात्र देऊ शकत नाही.
In reply to ... by आशु जोग
...
In reply to पण ICICI मात्र देऊ शकत नाही. by कुंदन
आम्च्या आय्डीबाय ब्यांकेचे
In reply to ही बँक पासबुक देत नाही. तिचा by सतिश गावडे
टारगेट्स
कागदपत्रे घ्यायला येणारी माणसे
In reply to टारगेट्स by गॅरी ट्रुमन
उपाय?
In reply to कागदपत्रे घ्यायला येणारी माणसे by अमित खोजे
ATM व नेट बँकिंग वर टीका
बय्राचदा काउंटरवरच्या स्टाफला
एका ब्यांकेत बचत खाते काढले
वरील सर्व अनुभव आतापर्यंतच्या
दुसर्या बॅन्केत खाते काढून
In reply to वरील सर्व अनुभव आतापर्यंतच्या by सस्नेह
...
In reply to वरील सर्व अनुभव आतापर्यंतच्या by सस्नेह
यापुढे पोस्ट ऑफीसकडेही
आणि हो. चेकने पैसे देणार नाही
In reply to यापुढे पोस्ट ऑफीसकडेही by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो असंच असावं.. कारण माझ्या
In reply to आणि हो. चेकने पैसे देणार नाही by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमच्या ओळखीचे एक काका पोस्टात
In reply to यापुढे पोस्ट ऑफीसकडेही by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या महिला अधिकारी कौतुकास पात्र आहेत
जर त्या महिला अधिकारी कौतुकास
In reply to त्या महिला अधिकारी कौतुकास पात्र आहेत by सर टोबी
जर त्या महिला अधिकारी कौतुकास
In reply to जर त्या महिला अधिकारी कौतुकास by मोदक
बँकेच्या रोजच्या कामकाजातील
In reply to जर त्या महिला अधिकारी कौतुकास by सर टोबी
अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या
In reply to बँकेच्या रोजच्या कामकाजातील by मोदक
मुद्दा क्रमांक ३ - जर बॅंकयेत
In reply to अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या by हेमंत८२
मी कुठे नाही म्हणतो त्यालातर
In reply to मुद्दा क्रमांक ३ - जर बॅंकयेत by मोदक
काय पोच द्यावी हे
In reply to अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या by हेमंत८२
पगारी कर्मचाऱ्याचे reimbursement खाते काढावे
In reply to अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या by हेमंत८२
कोणत्या धाग्यात विचारावे हे
१) एंबसीला मेल पाठवून विचार,
In reply to कोणत्या धाग्यात विचारावे हे by पिलीयन रायडर
सेंट्र बोर्ड ऑफ डायरेक्ट
In reply to कोणत्या धाग्यात विचारावे हे by पिलीयन रायडर
अजून हे clear झाले नाही
लोन घेतलं की तेवढ्या रकमेचा
आता सर्व भारतात एकच कस्टमर
भंगार बँकिंगचे आगर भारत देश
बँकेने सूचना केली की करंट
बँक: 'महा'न बँक
पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच
शाळा सोडल्याच्या दाखल्याची
In reply to पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच by अनिकेत वैद्य
जबरी उत्तर
In reply to पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच by अनिकेत वैद्य