बँकेच्या रोजच्या कामकाजातील एखाद्या कागदपत्रावर सही करण्याचे अधिकार त्या त्या प्रतिनिधीला आणि शाखेच्या प्रमुखाला असतात.
इथे डॉक्टर खरेंची बाजू बरोबर आहेत आणि त्या महिला अधिकारी बरोबर असतील तर त्यांनी आपले म्हणणे लेखी द्यावे ही अपेक्षाही चुकीची नाहीये.
अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या नियमानुसार बँकांना खातेदारांच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि गैर व्यवहार उघडकीस आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना अथवा बँकेला दंड अथवा शिक्षा होऊ शकते.>>>> या case मध्ये जर बँक निष्काळजी दाखवत असेल तर... पण मी आपल्या प्रश्नाचे उत्तर अगोदरच दिले आहे.
पगारी कर्मचाऱ्याचे reimbursement खाते काढावे अशी कोणतेही बँक सांगत नाही. ती त्या कंपनीची जमा खर्च (नोकराला दिलेला पगार व भत्ते ज्यात मोबाईल बिल, ट्रॅव्हल etc ) दाखवण्याची पद्धत असते.
जर बॅंकयेत कोणीही खातेदार किंवा भागीदार ( shareholder ) जर काही स्वतःच्या खात्या संबंधी काही लेखी विचारात असेल तर त्याला पोच देणे गरजेचे आहे. फक्त माहिती कायदा सोडून कारण तो या व्यवसायाला लागू नाही.
मुद्दा क्रमांक ३ - जर बॅंकयेत कोणीही खातेदार किंवा भागीदार ( shareholder ) जर काही स्वतःच्या खात्या संबंधी काही लेखी विचारात असेल तर त्याला पोच देणे गरजेचे आहे. - सहमत.
याच सोबत, जर बँक प्रतिनिधी खात्यासंदर्भातच एखादा नियम / तरतूद सांगत असेल तर ते लेखी मागण्याचा खातेदारास हक्क आहे, आणि तशी तरतूद असेल तर कर्मचार्याने ते लेखी देण्यास काहीच हरकत नाही.
मुद्दा १ व २ बद्दल पास - कारण तो मी मांडलेला नाही
फक्त माहिती कायदा सोडून कारण तो या व्यवसायाला लागू नाही - यावर अवांतर होईल म्हणून पास.
कोणत्या धाग्यात विचारावे हे कळेना म्हणुन इथे विचारते..
बँकेत आधार कार्ड जोडा म्हणुन बातम्या येत आहेत. नाही तर खाते बंद होईल म्हणे. आता आज एक वाचलं की ते फक्त २०१४ नंतरच्या खात्यांना आहे.
तर नक्की काय नियम आहे कुणी सांगेल का? आणि जे भारतात नाही त्यांनी काय करायचे?
१) एंबसीला मेल पाठवून विचार, ते कागदपत्रे पाठवतील का म्हणून.
२) बँकेची अमेरिकेत शाखा आहे का..? असल्यास तेथे सबमीट कर.
३) सरळ बँकेच्या कस्टमर केअरला मेल पाठवून परिस्थिती सांग - आणि काय करू ते विचार.
मेल वर संभाषण कर - लेखी पुरावा राहतो.
आता सर्व भारतात एकच कस्टमर आइडी आणणार. कुठेही गुंतवणूक केली की तो द्यावा लागेल. सर्व प्रकारच्या बँका ,पतपेढ्या ,कंपनी डिपॅाझिट्स यासाठी आवश्यक. पॅन कार्ड नंबर बहुतेक फेल गेला. आधार संलग्न असावा. पुर्वी आधार फक्त एकाच बँक अकाउंटशी सबसिडिसाठी केलेला.
आपला भारत देशच एक बॅकांचे भंगार यार्ड आहे. कुणीही हाका अशी जनता असल्याने सर्व खाजगी व सरकारी बॅंकाना माज आलेला आहे. सर्व खाजगी व सरकारी बॅंकाना एक समाईक अशी कार्यपद्धती आपल्या देशात नाही. काही किमान समाईक नियमावली नसल्याने एका ठिकाणी एक तर दुसर्या ठिकाणी दुसरेच असा अनुभव आहे. कारकून लेव्हल व ऑफिसर लेव्हलला सरकारी बॅका तर भिकार आहेतच पण मॅनेजर खोटारडे असल्याचे माझे अनुभव आहेत. तक्रार करू गेल्यास वरचे डी जी एम व मॅनेजर यांची मिलीभगत असल्याचे चित्र आहे.
आता तर समाजवादाला भारत देशात तिलांजली मिळाल्याने याचा चार्ज त्याचा चार्ज असे सत्र सुरू झाले आहे. मी एका खाजगी कंपनीत कामाला होतो त्यातेथील १९९५ चे कामाचे नियमन आज २०१७ मधे देखील सरकारी बॅकात दिसत नाही. एफ डी आर वाला ग्राहक हा एक भिकारी माणूस असून क्लिअरिंग हे बॅकेचे सर्वात पवित्र व महत्वाचे काम आहे असे सर्व बॅकांचे धोरण दिसते.
बँक: 'महा'न बँक
शाखा: कर्वे रस्ता, पुणे ४.
ह्या शाखेत माझे आणि बाबांचे संयुक्त आहे. एकदा धनादेश पुस्तिकेची मागणी करायला ह्या शाखेत गेलो असता अचानक ह्यांना आठवण झाली कि ह्या खात्याचे केवायसी बरेच दिवसात झाले नाहीये, मला सगळी कागदपत्रे मागण्यात आली. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर पुन्हा तीच माहिती माझ्याकडून विचारून घेणार आली. (का ते माहीत नाही). त्यानंतरच धनादेश पुस्तिकेची मागणी नोंदवली गेली.
नवी धनादेश पुस्तिका आल्यावर मी हादरलोच. पहिले नाव वडिलांचे, दुसरे नाव माझे आणि पुन्हा एकदा वडिलांचे नाव. संयुक्त खात्यावर केवळ दोनच नावे असताना धनादेश पुस्तिकेवर ३ नावे त्यातही एकाचे नाव २ वेळा.
ह्याबाबत पुन्हा शाखेत जाऊन विचारले असता, एकदाच सही केली तरी चालेल दोनदा नाव आहे म्हणून दोनदा नका करू असे सांगितले.
अहो, एकाच माणसाचे दोनदा नाव लिहिलंयत, हे सांगितल्यावर, 'बरं ते नाव कमी करतो' असं सांगून त्या हुशार माणसाने माझेच नाव खात्यावरून कमी केले.
खात्यावर नाव पुन्हा जोडण्यासाठी फॉर्म भरा, केवायसी करा, मूळ खातेदाराच्या सह्या आणा वैगेरे वैगेरे.
पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच शाखा.
माझ्या खात्यातून अचानक ११३ रु. कापून घेतले. पासबुकवर लिहून मिळालं कि खात्यावर किमान शिल्लक नसल्याने हे पैसे घेणार आलेले आहेत.
माझ्या खात्यावर किमान शिल्लक नियमापेक्षा जास्त रक्कम असताना देखील हे असं का विचारल्यावर तिथल्या हुशार माणसाने उत्तर दिले कि, 'हे पैसे तुमच्या डेबिट कार्डची वार्षिक फी आहे.'
आहो मग डेबिट कार्ड फी म्हणून लिहा ना, असे सांगितल्यावर, 'ती सर्वरची चूक आहे. आम्ही काही करू शकत नाही.'
मग मी विचारलं कि, शाळा सोडल्याच्या दाखल्याची स्टेशनरी संपली म्हणून मृत्यू दाखल्यावर नाव लिहून दिल चालेल का?
अगदी बॅकेचा नाहे पण आयशी आयशी आय मुच्युअल फंडच्या कार्यालयात दोनदा चकरा मारून (गुगल सर्च केल्यावर ओपन असं दाखवल्यावर) कुलुप बघून आल्यावर काल कष्टमर केअरला फोन केला. फक्त ते आता उघडं आहे का ते विचारयचं होतं. "सगळी बिज्जी हायेत दोन मिनिटं थांबा" असा रेकॉर्डेड मेसेज येत होता. त्यात म्युझिक आहे आणि एक बाई मध्येच हॅलो असं म्हणते, त्यामुळे चुकून फोन उचलला म्हणून मी बोलायला सुरवात केली होती. हा मेसेज तब्बल २० मिनिटे चालला. उचलल्यावर, "बाकिचं सोडा, दोन मिनिटं म्हणून वीस मिनिटं का लागली? हा बग आहे. माझी आधी ही तक्रार नोंदवा म्हणालो." १० मिनिटं डो़कफोड कऊन काहिही उपयोग झाला नाही. त्या कार्यालयाचा लँडलाईन नंबरसुद्धा "आमाला पावर नाय" म्हणून तो बाप्या देइना. शेवटी शिविगाळ करून फोन बंद केला.
ग्रामीण भागात “टपाल सेवक’ व शहरांमध्ये “पोस्टमन’ यांचाच समावेश आहे; त्यांच्याद्वारे व्यक्तींना व दुकानदारांना घरपोच कागदविहीन बॅंकिंग सेवा पुरवली जाणार आहे. आणि ही सेवा कमीत कमी वेळेत पुरवण्यावरही भर असेल
प्रतिक्रिया
जर त्या महिला अधिकारी कौतुकास
In reply to त्या महिला अधिकारी कौतुकास पात्र आहेत by सर टोबी
जर त्या महिला अधिकारी कौतुकास
In reply to जर त्या महिला अधिकारी कौतुकास by मोदक
बँकेच्या रोजच्या कामकाजातील
In reply to जर त्या महिला अधिकारी कौतुकास by सर टोबी
अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या
In reply to बँकेच्या रोजच्या कामकाजातील by मोदक
मुद्दा क्रमांक ३ - जर बॅंकयेत
In reply to अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या by हेमंत८२
मी कुठे नाही म्हणतो त्यालातर
In reply to मुद्दा क्रमांक ३ - जर बॅंकयेत by मोदक
काय पोच द्यावी हे
In reply to अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या by हेमंत८२
पगारी कर्मचाऱ्याचे reimbursement खाते काढावे
In reply to अँटी मनी लौंडेरिंग च्या नव्या by हेमंत८२
कोणत्या धाग्यात विचारावे हे
१) एंबसीला मेल पाठवून विचार,
In reply to कोणत्या धाग्यात विचारावे हे by पिलीयन रायडर
सेंट्र बोर्ड ऑफ डायरेक्ट
In reply to कोणत्या धाग्यात विचारावे हे by पिलीयन रायडर
अजून हे clear झाले नाही
लोन घेतलं की तेवढ्या रकमेचा
आता सर्व भारतात एकच कस्टमर
भंगार बँकिंगचे आगर भारत देश
बँकेने सूचना केली की करंट
बँक: 'महा'न बँक
पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच
शाळा सोडल्याच्या दाखल्याची
In reply to पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच by अनिकेत वैद्य
जबरी उत्तर
In reply to पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच by अनिकेत वैद्य
पुढे काय झालं? तुमचं समाधान
In reply to पुन्हा एकदा तीच बँक आणि तीच by अनिकेत वैद्य
वेळेची किम्मत
मला माझ्या युको ने 500 रु
. . .
...