मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मध्यरात्री

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मध्यरात्री गजबजावे नभ वितळत्या चा॑दण्याने भरुनी जावा ओ॑जळीचा चषक त्या फेनिल प्रभेने मध्यरात्री सळसळावे बेट पिवळे केतकीचे भरुनी जावे आसम॑ती ग॑ध थरथरत्या तृणांचे मध्यरात्री कुजबुजावा मेघ बिलगुनी पर्वता त्या ध्वनीने विरत जावी दाट गहिरी शा॑तता

वाचने 5393 वाचनखूण प्रतिक्रिया 16

पद्मावति Sun, 04/02/2017 - 11:51
सुरेख! वितळते चांदणे, त्याची फेनील प्रभा, ओन्जळीचा चषक ..आहाहा!!! केवळ आणि केवळ अफलातून!

In reply to by सत्यजित...

अनन्त्_यात्री Mon, 04/17/2017 - 14:15
मध्यरात्री गुणगुणावा एक अर्धा फोल मिसरा अन् पहाटे शेर व्हावा,स ह ज-सुंदर खोल-गहिरा!

In reply to by अनन्त्_यात्री

सत्यजित... Mon, 04/17/2017 - 14:50
बदल तसा सहजच आहे,काहीच हरकत नाही! आयुष्याच्या कवितेला पूर्णता देणाऱ्या अंतिम सत्याशी मी तो शेर जोडू पाहत होतो!