✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कथाकथी

प
पुंबा यांनी
गुरुवार, 03/23/2017 - 19:30  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर, आजच अस्मादिकांना मिपागावाचे रहीवासी झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. इतके दिवस धागा लिहिण्याला धीर होत नव्हता पण आज आदूबाळ म्हटले धागा काढा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, हा धागा काढून मिपावाढदिवस साजरा करत आहे. आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाच्या वाचनाची सुरूवात कथांपासूनच झाली असेल. याला कारण म्हणजे, मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पुस्तकांतील धडे. या धड्यांमध्ये मातब्बर लेखकांच्या छोट्या कथा असत/असतात. पुस्तक घरी आलं की सगळ्यात आधी पुस्तकाचा वास घ्यायचा आणि वेष्टणं पण घालायच्या आधी सगळे धडे वाचून टाकायचे असं केल्याचे कित्येकांना आठवत असेल. आपल्यापैकी कित्येकांची प्रेमचंद, दि. बा. मोकाशी, पु. ल, श्री. दा. पानवलकर, व्यंकटेश माडगूळकर, आणाभाऊ साठे, कमलेश्वर, ओ हेन्री, चेकोव्ह अश्या एकापेक्षा एक महान लेखकांची पहिली ओळख पाठ्यपुस्तकांतूनच झाली. जीव छोटा असला तरी आशयसमृद्ध, वाचकाला गुंतवून ठेवणारी कथा ही माझ्यामते सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार आहे. तुमच्या आवडत्या कथांविषयी सांगा ना. मराठीतील सर्वश्रेष्ठ कथांविषयी गूगल सर्च केला तर ना यादी मिळते ना कोणत्या साईटवर कथा मिळतात. याउलट हिंदी कथांकरीता हिंदी समय ही अप्रतिम साईट आहे. तर इंग्रजी अभिजात कथावाङ्मय या अप्रतीम साईटवर साठवले आहे. मराठीसाठी मात्र असला काही प्रकार नाही. तेव्हा मराठीतील तुमच्या आवडत्या, तुमच्यामते सर्वश्रेष्ठ कथांविषयी चर्चा झाली तर चांगलंच आहे. सर्वांनाच चांगल्या कथांशी परिचय होईल. प्रेमचंद, मंटो, इस्मत चुगताई, ओ हेन्री, चेकोव्ह, मोम्पासा, वूडहाऊस, जी ए, शंकर पाटील, श्री दा पानवलकर, दि बा मोकाशी, द मा, जयवंत दळवी, श्री ना, माळगावकर, आर के नारायणन या महारथींची तर चर्चा करूच त्याबरोबर तुलनेने अप्रसिद्ध अश्या लेखक लेखिकांच्या कथांवर देखील प्रकाश पडला तर भारी होईल. मराठी आंजावरील सर्वश्रेष्ठ कथांची पुन्हा उजळणी झाली तरी चांगलंच आहे. एखादी खूप आधी वाचलेली कथा आठवत नसेल तर त्याची पण उकल होऊ शकेल इथे. --(कथा वाचताना सगळ्या व्यथा विसरणारा) सौरा सर्वप्रथम माझ्या आवडत्या कथांची(सगळ्यात जास्त) यादी देतो आठवतील तश्या आणखी नावांची भर प्रतिसादांत घालत राहीलच. विश्वनाथ एक शिंपी- वि वा शिरवाडकर नागिण- चारूता सागर विदूषक, प्रदक्षिणा- जि ए किडके जग- गंगाधर गाडगीळ आता आमोद सुनासी आले- दि. बा. मोकाशी सूर्य- श्री दा पानवलकर स्मशानातील सोनं- आण्णाभाऊ साठे द लास्ट लिफ- ओ हेन्री द लास्ट लेसन- Alphonse Daudet द बेट- चेकोव्ह चला लिहा मग तुम्हीही तुमच्या आवडत्या कथांविषयी..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
शिफारस

प्रतिक्रिया द्या
7308 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

खुप आहेत

रामपुरी
गुरुवार, 03/23/2017 - 19:54 नवीन
पण सगळ्यात पहिल्यांदा हेच नाव डोळ्यासमोर आलं How Much Land does a Man Need?
  • Log in or register to post comments

अप्रतिम आहे ही कथा..

पुंबा
Mon, 04/03/2017 - 11:48 नवीन
अप्रतिम आहे ही कथा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

द लिटल मॅच गर्ल ही हान्स

एस
गुरुवार, 03/23/2017 - 22:58 नवीन
द लिटल मॅच गर्ल ही हान्स अँडरसन याची कथा चटकन आठवली. कारुण्यमय आणि तरल.
  • Log in or register to post comments

+1

प्राची अश्विनी
Fri, 03/24/2017 - 07:26 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आत्ताच वाचली. खरोखर तरल.

पुंबा
Mon, 04/03/2017 - 10:56 नवीन
आत्ताच वाचली. खरोखर तरल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

दमडी

किसन शिंदे
गुरुवार, 03/23/2017 - 23:07 नवीन
दमडी
  • Log in or register to post comments

फार कथा नाही वाचलेल्या, पण

आषाढ_दर्द_गाणे
गुरुवार, 03/23/2017 - 23:27 नवीन
फार कथा नाही वाचलेल्या, पण तरी पटकन आठवणाऱ्या - जेम्स जॉईसच्या डब्लिनर्स मधली 'काऊंटरपार्ट्स' आणि मार्केझची 'क्रोनिकल्स ऑफ अ डेथ फोर्टोल्ड'* *हिला खरे तर लघुकादंबरी म्हणावे लागेल. पण नव्वदेक पानात अक्खी कादंबरी वाचल्याचे समाधान मिळते!
  • Log in or register to post comments

'क्रोनिकल्स ऑफ अ डेथ

पुंबा
Mon, 04/03/2017 - 10:53 नवीन
'क्रोनिकल्स ऑफ अ डेथ फोर्टोल्ड' वाचली. फार फार सुंदर आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

उत्तम धागा

आनंदयात्री
गुरुवार, 03/23/2017 - 23:32 नवीन
उत्तम धागा. हिंदी समयच्या लिंकसाठी विशेष धन्यवाद.
  • Log in or register to post comments

भेट तुझी माझी स्मरते

शेवटचा डाव
गुरुवार, 03/23/2017 - 23:46 नवीन
भेट तुझी माझी स्मरते शापीत समय क कायद्याचा
  • Log in or register to post comments

ओह हां, 'स्मशानातील सोनं'

आषाढ_दर्द_गाणे
Fri, 03/24/2017 - 00:33 नवीन
ओह हां, 'स्मशानातील सोनं' नक्कीच आवडलेली!
  • Log in or register to post comments

'माझ्या बापाची पेंड' द .मा.

सस्नेह
Fri, 03/24/2017 - 11:46 नवीन
'माझ्या बापाची पेंड' द .मा.
  • Log in or register to post comments

आफ्टर ट्वेंटी इयर्स (After

केडी
Fri, 03/24/2017 - 12:06 नवीन
आफ्टर ट्वेंटी इयर्स (After Twenty Years), ओ, हेन्री, हि कथा शाळेत होती, आज का कोणास ठाऊक तीच डोक्यात आली पटकन.
  • Log in or register to post comments

खुप आवडली. ओ हेन्रीच्या

पुंबा
Mon, 04/03/2017 - 10:49 नवीन
खुप आवडली. ओ हेन्रीच्या सगळ्या प्रसिद्ध कथा वाचल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केडी

शंकर पाटलांंच्या बऱ्याच

जव्हेरगंज
Fri, 03/24/2017 - 13:37 नवीन
शंकर पाटलांंच्या बऱ्याच वाचल्यात. विशेष आवडल्या. जिएंची 'पारधी' मस्त आहे!
  • Log in or register to post comments

'पारधी' कुठल्या कथासंग्रहात

पुंबा
Mon, 04/03/2017 - 10:58 नवीन
'पारधी' कुठल्या कथासंग्रहात आहे? शंकर पाटलांचा 'पाटलाची चंची' हा खुप जबरदस्त संग्रह आहे. एक से एक कहर कथा आहेत यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

पारधी (हिरवे रावे) - जी. ए.

जव्हेरगंज
Mon, 04/03/2017 - 11:24 नवीन
पारधी (हिरवे रावे) - जी. ए. कथा, एक आकलन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

मस्त आहे ती लिंक! ही कथा

एमी
गुरुवार, 04/06/2017 - 08:11 नवीन
मस्त आहे ती लिंक! ही कथा ऑनलाइन कुठे वाचता येइल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

अरेच्चा! मला वाटलं इथे फक्त

एमी
Sun, 03/26/2017 - 06:01 नवीन
अरेच्चा! मला वाटलं इथे फक्त मराठी लघुकथांबद्दल बोलत असतील. म्हणून मी धागा उघडलाच नव्हता. माझं मराठी वाचन शुन्य आहे. आय मिन दहावीपर्यंत जे काय धडेबिडे वाचले होते ते सगळे म्हातारपणामुळे विसरुन गेलेय :-D एनीवे मी वाचलेल्या इंग्रजी लघुकथांपैकी बेस्ट: * गेट अ लोड ऑफ धिस - जेम्स हैडली चेस आणि * नो कमबैक्स - फ्रेडरीक फोरसिथ बाकी वुडहाऊस वाइल्ड ख्रिस्ती डॉयल वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच.
  • Log in or register to post comments

:))

पुंबा
Mon, 04/03/2017 - 10:52 नवीन
:)) नो कमबॅक्स आहे माझ्याकडे. ते आणी फोर्सिथचंच डे ऑफ जॅकल वाचायचं आहे. अ‍ॅगाथा ख्रिस्तीची 'द विटनेस ऑफ द प्रॉसिक्युशन' वाचलियेत का? खुप भारी कथा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

माझ्याकडे दोन्ही आहेत .

वरुण मोहिते
Mon, 04/03/2017 - 11:31 नवीन
फ्रेडरिक फोर्सिथ विशेषतः लघुकथांना हात घालत नाहीत . सगळ्या नाही पण काही कथा चांगल्या जमल्या आहेत नो कमबॅकस मधील . डे ऑफ जॅकल वाचा चांगलं आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

नाही. ही अजून वाचायचीय.

एमी
Tue, 04/04/2017 - 07:58 नवीन
नाही. ही अजून वाचायचीय. ख्रिस्टीचा आकडा ५८/८९ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

मस्त धागा, लिहिते थोड्या

यशोधरा
Mon, 04/03/2017 - 11:08 नवीन
मस्त धागा, लिहिते थोड्या वेळाने.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विचित्रा
Tue, 04/04/2017 - 09:57 नवीन
कथा हा वाङ्मयप्रकार अतिशय आवडतो. इथे खुप छान संदर्भ मिळाले. आभार
  • Log in or register to post comments

पार्सन्स प्लेजर -- रोआल्ड

अनुप ढेरे
गुरुवार, 04/06/2017 - 10:01 नवीन
पार्सन्स प्लेजर -- रोआल्ड दाह्ल
  • Log in or register to post comments

धारप व मतकरी

स्वधर्म
गुरुवार, 04/06/2017 - 11:05 नवीन
धन्यवाद सौरा. भयकथा विशेष अावडतात. खासकरून धारपांच्या कथा खूप भावतात. अतिशय संयमित अाणि काही ना काही तर्क, विचार असलेली, पण गूढ कथा लिहीण्यात ते माहिर होते. त्यांची चंद्राची सावली ही दीर्घ कथा/ लघु कादंबरी अजून अाठवते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा