कथाकथी
नमस्कार मिपाकर, आजच अस्मादिकांना मिपागावाचे रहीवासी झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. इतके दिवस धागा लिहिण्याला धीर होत नव्हता पण आज आदूबाळ म्हटले धागा काढा. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, हा धागा काढून मिपावाढदिवस साजरा करत आहे.
आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाच्या वाचनाची सुरूवात कथांपासूनच झाली असेल. याला कारण म्हणजे, मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पुस्तकांतील धडे. या धड्यांमध्ये मातब्बर लेखकांच्या छोट्या कथा असत/असतात. पुस्तक घरी आलं की सगळ्यात आधी पुस्तकाचा वास घ्यायचा आणि वेष्टणं पण घालायच्या आधी सगळे धडे वाचून टाकायचे असं केल्याचे कित्येकांना आठवत असेल. आपल्यापैकी कित्येकांची प्रेमचंद, दि. बा. मोकाशी, पु. ल, श्री. दा. पानवलकर, व्यंकटेश माडगूळकर, आणाभाऊ साठे, कमलेश्वर, ओ हेन्री, चेकोव्ह अश्या एकापेक्षा एक महान लेखकांची पहिली ओळख पाठ्यपुस्तकांतूनच झाली. जीव छोटा असला तरी आशयसमृद्ध, वाचकाला गुंतवून ठेवणारी कथा ही माझ्यामते सर्वश्रेष्ठ साहित्यप्रकार आहे.
तुमच्या आवडत्या कथांविषयी सांगा ना. मराठीतील सर्वश्रेष्ठ कथांविषयी गूगल सर्च केला तर ना यादी मिळते ना कोणत्या साईटवर कथा मिळतात. याउलट हिंदी कथांकरीता हिंदी समय ही अप्रतिम साईट आहे. तर इंग्रजी अभिजात कथावाङ्मय या अप्रतीम साईटवर साठवले आहे. मराठीसाठी मात्र असला काही प्रकार नाही. तेव्हा मराठीतील तुमच्या आवडत्या, तुमच्यामते सर्वश्रेष्ठ कथांविषयी चर्चा झाली तर चांगलंच आहे. सर्वांनाच चांगल्या कथांशी परिचय होईल. प्रेमचंद, मंटो, इस्मत चुगताई, ओ हेन्री, चेकोव्ह, मोम्पासा, वूडहाऊस, जी ए, शंकर पाटील, श्री दा पानवलकर, दि बा मोकाशी, द मा, जयवंत दळवी, श्री ना, माळगावकर, आर के नारायणन या महारथींची तर चर्चा करूच त्याबरोबर तुलनेने अप्रसिद्ध अश्या लेखक लेखिकांच्या कथांवर देखील प्रकाश पडला तर भारी होईल. मराठी आंजावरील सर्वश्रेष्ठ कथांची पुन्हा उजळणी झाली तरी चांगलंच आहे. एखादी खूप आधी वाचलेली कथा आठवत नसेल तर त्याची पण उकल होऊ शकेल इथे.
--(कथा वाचताना सगळ्या व्यथा विसरणारा) सौरा
सर्वप्रथम माझ्या आवडत्या कथांची(सगळ्यात जास्त) यादी देतो आठवतील तश्या आणखी नावांची भर प्रतिसादांत घालत राहीलच.
विश्वनाथ एक शिंपी- वि वा शिरवाडकर
नागिण- चारूता सागर
विदूषक, प्रदक्षिणा- जि ए
किडके जग- गंगाधर गाडगीळ
आता आमोद सुनासी आले- दि. बा. मोकाशी
सूर्य- श्री दा पानवलकर
स्मशानातील सोनं- आण्णाभाऊ साठे
द लास्ट लिफ- ओ हेन्री
द लास्ट लेसन- Alphonse Daudet
द बेट- चेकोव्ह
चला लिहा मग तुम्हीही तुमच्या आवडत्या कथांविषयी..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खुप आहेत
अप्रतिम आहे ही कथा..
द लिटल मॅच गर्ल ही हान्स
+1
आत्ताच वाचली. खरोखर तरल.
दमडी
फार कथा नाही वाचलेल्या, पण
'क्रोनिकल्स ऑफ अ डेथ
उत्तम धागा
भेट तुझी माझी स्मरते
ओह हां, 'स्मशानातील सोनं'
'माझ्या बापाची पेंड' द .मा.
आफ्टर ट्वेंटी इयर्स (After
खुप आवडली. ओ हेन्रीच्या
शंकर पाटलांंच्या बऱ्याच
'पारधी' कुठल्या कथासंग्रहात
पारधी (हिरवे रावे) - जी. ए.
मस्त आहे ती लिंक! ही कथा
अरेच्चा! मला वाटलं इथे फक्त
:))
माझ्याकडे दोन्ही आहेत .
नाही. ही अजून वाचायचीय.
मस्त धागा, लिहिते थोड्या
धन्यवाद
पार्सन्स प्लेजर -- रोआल्ड
धारप व मतकरी