गोविंदराव तळवळकर
आत्ताच कळले आणि नंतर वाचले की महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवळकर यांचे ह्युस्टन येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ज्या एका व्यक्तीमुळे आजही जालावर मराठी वृत्तपत्र पहायला गेलो की आपोआप महाराष्ट्र टाईम्सचे पान उघडले जाते अशी एक विचारवंत व्यक्ती आज काळाच्या पडद्याआड गेली.
महाराष्ट्राच्या आणि त्यातही खासकरून मुंबई-पुण्याच्या वृत्तपत्रीय जगताची स्वातंत्र्यपूर्व काळात टिळक-आगरकर, काळकर्ते परांजपे, न.चिं केळकर आदी अनेक दिग्गजांनी एक जडणघडण घातली. त्याच काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळातही सुरवातीस आचार्य अत्रे, ह.रा. महाजनी आदींनी वैचारीक जडणघडण चालूच ठेवली. त्या जडणघडणीतलेच पुढचे वळण हे सोबतकार ग.वा.बेहरे, सकाळ-लोकसत्ता आदी वृत्तपत्राचे संपादक राहीलेले माधवराव गडकरी, लोकसत्ता संपादक अरूण टिकेकर, आणि अर्थातच महाराष्ट्र टाईम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवळकर, त्याच बरोबर अनेक नामवंत पत्रकारांनी त्यात भर घातली. ८०च्या दशकावर विशेष करून तळवकर, गडकरी, बेहरे आणि इतर काही पत्रकारांचा हा विविधांगांनी प्रभाव होता. त्यात राजकारण होते, समाजकारण होते, अर्थकारण होते, तसेच इतर अनेक विषय असायचे.
शाळेत असतानाच सकाळी पेपर आल्यावर अग्रलेख वाचायची सवय ही तळवळकरांमुळे लागली. मला आठवते त्याप्रमाणे तळवळकर हे मुळचे रॉयिस्ट होते, यशवंतरावांच्या आणि कदाचीत नंतरच्या काळातील पवारांच्या देखील जवळचे होते असे देखील वाचल्याचे आठवते (यशवंतराव पण रॉयिस्ट होते). थोडक्यात डावे आणि काँग्रेसच्या विचाराला जवळ होते असे म्हणता येईल. संघाबद्दल त्यांच्या लेखनात प्रत्यक्ष टिका वाचल्याचे आठवत नसले तरी ते संघाच्या जवळ असण्याची शक्यता अजिबातच नव्हती. वास्तव असले तर ते संघाच्या विचारांच्या विरोधातले होते हेच असेल. त्यांचे एकूणच लिहीणे परखड, स्पष्ट असले तरी एकेरी, जहरीले नव्हते, पक्षिय वाटावे असे तर नक्कीच नव्हते!
कधीकाळी लहान असताना वाचले होते त्याप्रमाणे, त्यांचा आवडता ग्रंथ हा दासबोध होता. मराठी वाचनाबरोबरच त्यांचे इंग्रजी वाचन देखील खूप होते. तळवकरांच्या घरी पुस्तकांच्या भिंती आहेत असे तेंव्हा म्हणले जायचे. त्यांच्या अग्रलेखात त्यांचे वाचन संदर्भासकट दिसायचे. अग्रलेखाला अथवा नुसत्या लेखांना देखील वेधक आणि विचारी मथळे देणे हे तळवकरांमुळे कदाचीत पहील्यांदा पाहीले गेले असेल. जेंव्हा ८०च्या दशकात एक वेळ आली की "काय चालले आहे" असे वाटावे, तेंव्हा, त्यांच्या अग्रलेखाचे नाव होते, "नसे राम ते धाम सोडूनी द्यावे", (सुखा लागी आरण्य सेवीत जावे), बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे पक्षिमित्र सलीम अली जेंव्हा गेले तेंव्हा, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी...", तत्कालीन सोव्हिएटचे प्रमुख गोर्बाचेव्ह बद्दल आकर्षण असल्याने, "गोर्बाचेव्ह यांचे शांत्यस्त्र" (peace weapon) म्हणत लिहीणे असे अनेक सांगता येतील. काँग्रेसच्या जन्मशताब्दीवर लिहीलेल्या अग्रलेखात, काँग्रेस मध्ये कसे विविध वैचारीक प्रवाह होते यावर भर होताच आणि शेवटी "शताब्दी ही काँग्रेसनामक चळवळीची आहे" असे सांगितले होते. आज इतक्या वर्षांनी जर ते आठवत असले तर त्यात माझ्या स्मरणशक्तीपेक्षा त्यांच्या लेखनशैलीचा प्रभाव किती असेल असेच राहून राहून वाटते.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये अग्रलेखाच्या खाली त्यांचे एक सदर असायचे. आत्ता नाव आठवत नाही. पण त्यातून खूप चांगली माहीती मिळायची. विकी आणि गुगलच्या आधीच्या जगातली अशी अचानक मिळालेली माहिती खूप आनंद देयची की काहीतरी वेगळेच समजले!
त्यांचे विचार आणि लिहीणे हे स्वतःला योग्य वाटेल ते सांगाणारेच असायचे... याची दोन उदाहरणे आत्ता आठवतात त्याप्रमाणे, बेळगावच्या बाबतीत तो प्रश्न चिघळत ठेवू नये, महाराष्ट्राने आपल्या हट्टाने महाजन अहवाल झाला होता, आता मुकाट्याने माना असे त्यांचे म्हणणे होते. एम एफ हुसैन एकदा अणवाणी एका उच्चभ्रू क्लब मधे गेले आणि त्यांना पायात काही घातले नव्हते म्हणून क्लबच्या नियमांमप्रमाणे नाही म्हणून परत पाठवले. त्यावरून तमाम वार्तापत्रांनी टिका केली. मात्र तळवळकरांचे म्हणणे स्पष्ट होते की नियम न पाळण्याचे लाड कसले करायचे?
शाळेत असताना गंगाधर गाडगिळांचे दुर्दम्य वाचून टिळक पहील्यांदा समजले तर नंतर कॉलेजात असताना त्याच सुमारास प्रसद्ध झालेल्या तळवळकरांच्या "बाळ गंगधर टिळक" या पुस्तकामुळे मला टिळकांबद्दल विश्लेषणात्मक लेखन कसे असते ते समजले. ते वाचल्यावर टिळकांच्या लेखनाचा आणि लेखनशैलीचा देखील तळवळकरांवर प्रभाव असेल असे वाटले आणि तसा तो होता देखील. फक्त त्यात लेनिनच्या काही जनसंपर्क करण्याच्या पद्धतींची आणि त्यामुळे त्याची लोकमान्यांशी केलेली तुलना कुठेतरी खटकली, पण तितकेच...
तितकेच अशासाठी म्हणायचे, कारण तळवळकर आणि तसेच वर दिलेल्या इतर संपादकांचे लेख, अग्रलेख वाचत असताना काहीतरी विचार करायला शिकलो, इतकाच अनुभव आला, असे इतक्या वर्षांनी आणि ते देखील तळवळकरांच्या निधनाची बातमी वाचल्यामुळे वाटते. हे काय स्युडो, डावे, ते काय उजवे, असे काही कुणाबद्दल मला वाटते ९०च्या दशकापर्यंत वाटले नसेल. याचा अर्थ असा देखील नसेल की ह्या सगळेच पटू शकणारे विचार असत असे... पण मुद्दा वेगळा आहे. पत्रकारीता हा पेशा होता नुसता व्यवसाय नव्हता. वृत्तपत्रांचा खप वाढायला चांगले वैचारीक लिहीणे, "आपणासी जे जे ठावे, ते ते दुसर्यांसी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकलजन" असा कळत अथवा नकळत उद्देश असलेल्या प्रत्रकार असलेला तो आता वाटते शेवटचाच काळ होता. टिआरपी हा शब्द अस्तित्वात येयचा होता. ब्रेकिंग न्यूज हा शब्द दूरदर्शनवर, "आत्ताच हाती आलेल्या ताज्या बातमी नुसार" अथवा, "अभि अभि प्राप्त हुए समाचार के अनुसार" इतक्याशीच मर्यादीत होता....
तळवळकरांसारख्या, वर म्हणल्याप्रमाणे डावे, रॉयिस्ट असलेल्या संपादकाचे आणि तत्सम आदी अनेक विचारवंतांचे लेखन वाचूनही मी कधी डावा जाउंदेतच पण पब्लीकला उजवा वाटण्याइतका वेगळा कसा काय झालो असा डोक्यात प्रश्न आला. वास्तवीक त्याचे उत्तर इतकेच आहे की नशिबाने ज्या विचारवंतांचे लहानपणी वाचले (त्यात डावे-उजवे दोन्ही आले) त्यांनी त्यांच्या लेखनातून ब्रेनवॉशिंग करण्याऐवजी कुठेतरी विचार करायला शिकवले. माझ्यापुरते व्यक्तीगत बोलायचेच झाले तर हे ह्या विचारवंतांचे बलस्थान होते, मर्यादा नाही. आता माध्यम आणि संपादक यांना मध्यम दर्जाचे म्हणणे पण जड जावे अशी अवस्था आली आहे.
म्हणूनच आज "संपादकमाळेतील मणी शेवटला" एकाएकी नसेल, पण काळाच्या ओघात ओघळल्यामुळे गतकाळातील या वेगळ्याच स्मृती जागा झाल्या आणि जे काही आठवत गेले ते टंकत गेलो. तळवळकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्रध्दांजली
गोविंदराव तळवलकरांना
श्रद्धांजली
+१
+१०००
अगदी...!
तळवलकरांसारखे लोक अस्तंगत होत
केला का?
टिव्ही चॅनल
थोर माणूस.महाराष्ट्र टाईम्स
वाचता वाचता
बहुतेक
गोविंदराव तळवलकरांना
ज्या एका व्यक्तीमुळे आजही
तळवळकरांच्या स्मृतीस विनम्र
आज प्रचंड वाईट
गोविंदराव तळवलकरांना श्रध्दांजली.
मी त्यांचे लेख वाचायचो॥
श्रध्दांजली
तळवलकरांचे लेखन ....
आणीबाणी त गोविंदरावांची मनस्थिती बर्यापैकी
मारवाजी, कुठे मिळू शकतील हे
खरे आहे...
थोर पत्रकाराला विनम्र श्रध्दांजली
आदरांजली
Maayboli
धन्यवाद
__/\__
गोविंदराव तळवळकर यांना श्रद्धांजली !
अभिवादन
गोविंदराव तळवलकरांना विनम्र अभिवादन आणि श्रध्दांजली.
आदराण्जली
काँग्रेस मित्र
श्रद्धांजली