Skip to main content

आजची मुक्ताफळे (Quote of The Day)

लेखक एकलव्य यांनी शुक्रवार, 09/01/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्या एका जीवलग मित्राने quote of the day असा मथळा देऊन एक वाक्याचा विरोप पाठविला. त्यावर झालेली चर्चा आणि देवणघेवाण येथे मांडत बसत नाही. पण झाले असे की ते वाक्य उगाचच मनात रेंगाळत राहिले. बर्‍याचदा असेच कोणाचे तरी, कोठेतरी ऐकलेले एकच वाक्य मनात घोळत राहते. कधी मन मोहरून जावे असे तर कधी विचारात पडावे असे. कधी अंगाचा भडका उडावा असे तर कधी हसून हसून गडाबडा लोळावा असे. तर कधीकधी उगाचच आवडून जावे असेही. तसेही अलिकडे आपण जगतो ते Sound Bites च्या जगात. ह्या अशा Sound Bite झळकविण्यासाठी मिपावर एखादा कोपरा असायला हवा असे वाटले. खादाडीचे चित्र असते किंवा थोरामोठ्यांची वचने दिलेली असतात तेथेच कोठेतरी ताज्या मुक्ताफळांनीही जागा असावी असे वाटले. तसे झालेच तर छानच पण नाही झाले तरी आग्रह नाही. तोवर आजची मुक्ताफळे असे हे छोटेखानी सदर प्रकाशित करावेसे वाटते आहे. प्रतिसादांमध्ये quote of the day दिसावेत अशी अपेक्षा आहे. (संक्षिप्त) एकलव्य (रंगास्टाईल बाता - मला जेव्हा काही रुचेल, आवडेल ते ते मी देईनच... पण दररोज मला शक्य नाही. मुख्य कारणे दोन - (१) आवडल्यावर लिहिणे सोपे आहे... एखाद दुसरे वाक्यच तर जोडायचे पण रोज काहीतरी आवडायला हवे ना; (२) येथे भलेभले दादा/काका/माई/दादा/काका बसलेले असताना रोज माझी टॅवटॅव हवीय कशाला?

वाचने 14884
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

Whenever i finds a key to success, somebody changes the lock.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

इराणी दूरदर्शनवरील एका समीक्षेत हॅरि पॉट्टरच्या अतिलोकप्रिय पुस्तकावर आणि चित्रपटाचे केलेले हे समीक्षण - Propaganda for purity of blood and race ... is openly portrayed and emphasized in the second Harry Potter film. हॅरि पॉट्टरच्या वाटेला आम्ही कधी गेलो नाही... तेव्हा वरील विधानातील विनोदीपणा अथवा दाहकातेची आम्हाला नेमकी कल्पना नाही हे समजून घ्यावे - एकलव्य

Put your hand on a hot stove for a minute, and it seems like an hour. Sit with a pretty girl for an hour, and it seems like a minute. THAT'S relativity. - Albert Einstein The brain is a wonderful organ. It starts working the moment you get up in the morning and does not stop until you get into the office. - Robert Frost The trouble with being punctual is that nobody's there to appreciate it. - Franklin P. Jones We must believe in luck. For how else can we explain the success of those we don't like? - Jean Cocturan It matters not whether you win or lose; what matters is whether I win or lose. - Darrin Weinberg

आपले गृहमंत्री बी. बी. सी. शी बोलतांना म्हणाले की 'तीन महिन्यांपूर्वी मुंबईवर झाला, तश्या हल्ल्याचा मुकाबला करण्यास आता भारत अधिक सज्ज आहे.'

बुडणार्‍या किंवा सरकारी अनुदानावर तरणार्‍या बँका ह्याची "न्यूज"व्हॅल्यू राहिलेली नाही. पण झाकलेली अब्रू आणि दडपलेली पापे उघड्यावर आणू शकणार्‍या ह्या एका डेव्हलपमेन्टकडे लक्ष खेचले गेले. स्विस बँकेतील छुपी खाती ही जगभरातील उद्योगपतींचे, माफियांचे आणि राजकारण्यांची भलतीच सोय मानली जाते. पण त्यांचे दिवस भरले आहेत असे (वरवर तरी) दिसते आहे... The Swiss are saying that this is the end of Swiss banking as they knew it. JACK BLUM, a specialist in offshore banking, on the decision of UBS to reveal the names of Americans who may have used the Swiss bank to avoid paying income tax http://www.nytimes.com/2009/02/19/business/worldbusiness/19ubs.html

"All my life, I've had a choice of hate and love. I chose love, and I'm here" आयुष्यभर जपून ठेवावे अशी ही प्रतिक्रिया आणि शिकवण आहे ए आर रेहमान यांची! जय हो - एकलव्य