Skip to main content

एवढ्यात काय खरेदी केलत - २

लेखक रेवती यांनी रविवार, 19/03/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अ‍ॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्‍याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा. धन्यवाद.

वाचने 33407
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

अजुन काही नाही, २ दिवसांनपूर्वी मोह झाला होता, पण आवरला ! विश लिस्ट मध्ये कधीचा अ‍ॅडवुन ठेवला आहे... आता ती विश पूर्ण होणार का ? हा प्रतिसाद फक्त हातभार म्हणुन हो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सतरंगी रे... :- Dil Se

दोन जुड्या मेथी घेतली. पंधराला एक, पंचवीसला दोन. बायको रागावली, खूप महाग मिळाली म्हणून. जाऊ दे म्हटलं, मेथी जितकी महाग होत जाते तितकी ती चवदार लागते, आणि जितकी स्वस्त होते तितकी बेचव! ;-) खरं आहे की नाही?

In reply to by एस

त्यापेक्षा मुविंच्या शेतावरून थेट खरेदी करावी म्हणतो. =)) सायकलने गेलात तर वृत्तांत टाका.

मी नुकताच आजीसाठी फ्लिपकार्टवरुन स्मार्टफोन मागवला होता सॕमसंग झेड-२ ४९९९/- ला मिळाला.

मी नुकतंच, QUECHUA Forclaz 200 जॅकेट खरेदी केलं. Quechua 200

नुकताच logitech x50 हा ब्लूटूथ स्पीकर घेतला! किंमत - १४००/- एकदम क्लास, माझ्या अपेक्षांपेक्षा भारी आहे... मला प्रत्यक्ष आवाज ऐकून मगच घ्यायचा होता त्यामुळे ऑनलाईन न मागवता क्रोमा मधून टेस्ट करून मग घेतला... JBL Go पेक्षा पण भारी वाटलं मला प्रत्यक्ष ऐकताना! सध्या बेस्ट ब्लूटूथ स्पीकर म्हणता येईल हा. फिलिप्स वगैरे टिकत पण नाही याच्यासमोर! दिसायला पण एक्दम छोटू आणि पोर्टेबल... speaker याशिवाय सोलर लॅम्प घेतलाय एक, एक्दम ग्रीन लँटर्न टाईप! आवडला मला, 2 महिने झाले नीट सुरु आहे. lamp

In reply to by एस

X50 स्पीकर साठी लिंक. इथे तो १३०० रुपयांना मिळेल! सोलर लॅम्प लिंक . मी २५० ला घेतलेला आता ३३३ रुपये दाखवतोय...

In reply to by शब्दबम्बाळ

अरे वा, एखादा सोलर लॅम्प घेऊन वापरायचा आहे, बाल्कनीत लावायला. मेन्टेनन्स काही करावा लागतो का ? कोणी वापरले आहे का, वापरात असल्यास कृपया लिंक द्या

मी सालीची मूगडाळ घेतली धिरडी करायला. झालंच तर चितळेंच्या फुल क्रीम दुधाची (घरी तूप बनवायला बरं पडतं) एक बॅग आणि ब्रिटानिया न्यूट्री चॉईसचा एक पुडा!! मागल्या म्हयन्यात फिनिक्समध्ये स्पीडोची स्विमिंग क्याप आणि सेल चालू होता म्हणून स्पीडोची स्विमिंग ट्रंक!!! तूर्तास इतकंच!!

In reply to by कुंदन

१ ते ४ मध्ये नका बनवु बरं का....
ब्रँड चितळ्यांचा असला तरी दूध गाईम्हशी देतात, त्यामुळे काही फरक पडेल असं वाटत नाही. =))

In reply to by प्रसन्न३००१

हल्ली आमच्या ऑफिसात देखिल सिगारेट पिणारे बार्बॉन बिस्किटे खातात त्यानंतर, हे काय नविन कॉम्बिनेशन आहे का नशेचे ? जसं गांजा पिल्यावर गोड खातात तसं.

In reply to by अभ्या..

अशात बार्बोन्चे ५/- आणि १०/- चे पुडे आले आहेत, पुर्वी मोठा पुडा असायचा २५- ३० चा. जशी डिमांड बदलते तसा बदल करतात. आताच एका कलिगशी बोललो, तो म्हणाला , बिस्किट आधी चहाबरोबर खायचं, मग सिगारेट, सिगारेट नंतर त्या बिस्किटातलं चॉकलेट तेवढं खायचं, घशात एकदम भारी वाटतंय.

In reply to by ५० फक्त

आमच्या ऑफिस जवळच्या टपरीवर १० चा पुडा मिळतो... बार्बोन बिस्किटांचा दर्जा घसरलाय एवढा मात्र नक्की सिगारेट नंतर चहा-बिस्कीट खायला मजा येते... तुम्ही म्हणताय तसं चहा-बिस्कीट आणि नंतर सिगारेट ट्राय करायला पाहिजेल.. बाय द वे, सिगारेट आणि मसाला छास हे सुद्धा अफाट कॉम्बिनेशन आहे...

बाजूच्या सोसायटीतल्या मनीला चव फार आवडते म्हणून काल स्ट्रॉबेरी आणायला गेलेलो...जाता जाता वरच्या मजल्यावरच्या सवीता आंटी खाली भेटल्या, त्यांना गाजर-मुळ्यांचा किस फार आवडतो म्हणाल्या...बाजूचे काका संत्री-आंबे शोधतच असतात, नाहीतर कधी कधी कलिंगडे चाचपतात

In reply to by टवाळ कार्टा

जाता जाता वरच्या मजल्यावरच्या सवीता आंटी खाली भेटल्या, त्यांना गाजर-मुळ्यांचा किस फार आवडतो म्हणाल्या...बाजूचे काका संत्री-आंबे शोधतच असतात, नाहीतर कधी कधी कलिंगडे चाचपतात
तरीच!!

कधीकधी कुत्रं लैच डाळ नासायला लागलं की त्याला आत टाकण्यासाठी कुत्रापिंजरा घेतला ४२ इंची मोठ्ठा. अमेझॉनवरुन. पॉज फॉर अ कॉज ब्रँड. अतिशय उपयोगी पडतो. B शिवाय एक टिप म्हणजे जेरहाय ग्रेव्हीज अमेझॉनवर लोकल दुकानापेक्षा फारच कमी किंमतीत मिळतात. पेडिग्री जेरहाय इतकं हाय क्वालिटी नाही असं पेटशॉपवाल्यांकडून ऐकलं. तरीही पेडिग्री उत्पादनं हवी असल्यास तीही आणखीच स्वस्त पडतात.

गूगल क्रोमकास्ट घेतले मागच्या महिन्यात. ३३०० रुपयात साधा टीवी स्मार्ट झाला. youtube वगैरे क्रोमकास्ट करू शकणारी आप्स छानच चालतात. मोबाईल वरून प्राईम विडीयो ला थोडा प्रोब्लेम येतो पण laptop वरून छान चालतो.

एक ६४ जीबी मेमरी कार्ड घ्यायचे आहे. क्लास १० वाले कार्ड हवे, यापेक्षा आणखी काय बघावे..?

ऑफिस मध्ये संगणकावर बसताना कामाच्या रगाड्यात ताठ बसले जात नाही, पोक काढून बसले जाते. ताठ बसण्यासाठी काही चेअर अटॅचमेंट्स अथवा काही टूल्स आहेत का? कोणी वापरते का, काही अनुभव ?

कोल इंडिया घेतले १५ आणि ३० गुडलक स्तील

In reply to by मी-सौरभ

इक्विटास होल्डिंग - १०० मन्नपुरम चे घ्यायचे होते , पण भाव एकदम वाढलाय म्हणुन थोडे थांबावे लागेल.....

In reply to by हेमंत८२

कुठे पर्यंत जाईल , काही कल्पना नाहि ..... मी म नी कंट्रोल वर , शेअर होल्डिंग पाहिले तर म्युच्युअल फंड यात गुंतवणुक करत असलेले दिसले. शिवाय त्यांनी तमिलनाडुत बँकही सुरु केली आहे स्प्टंबर मध्ये.

In reply to by मी-सौरभ

सध्याच्या काळात भांडवल बाजारात गुंतवणूक करताना व समभाग विकत घेताना जरा सावध रहा. मुंबई व राष्ट्रीय भांडवली बाजाराचा निर्देशांक ऐतिहासिक सर्वोच्च पातळीला पोहोचला आहे. अनेक ब्लू चिप कंपन्यांच्या समभागांची किंमत ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीला पोहोचली आहे. यात आता फारशी वाढ संभवत नाही. ही गुंतवणूक करण्याची वेळ नसून गुंतवणूक मोकळी करून नफा कमविण्याची वेळ आहे. संख्याशास्त्राच्या व बाजाराच्या नियमानुसार बाजारात करेक्शन येऊ शकते. When the whole world is buying, I sell and when the whole world is selling, I buy हे वॉरन बुफेचे जगप्रसिद्ध वाक्य आहे. सर्वोच्च पातळीला विकायचे व सर्वात कमी किंमतीच्या जवळपास विकत घ्यायचे हे बॉरन बुफेचे सूत्र आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सर्वोच्च पातळीला विकायचे व सर्वात कमी किंमतीच्या जवळपास विकत घ्यायचे हे बॉरन बुफेचे सूत्र आहे. --- हे कितीही म्हटले तरी अमलात आणणे तसे शक्य नाही. कारण सर्वोच्च पातळी व सर्वात खालची पातळी कोणती असू शकते ह्याचा अचूक किंवा जवळपासचा अंदाज येणे देखील तितकेसे शक्य नाही. खुद्द बॉरन बुफेने शेअर मार्केट मध्ये अगणित चुका करून पैसे गमावलेले देखील आहेत. मी रोज cnbc aawaj बघतो. त्यातले एक्सपर्ट सांगतात त्यांचे पण ७०% अंदाज चुकतच असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना स्टॉप लॉस ह्या तंत्राचा वापर करून करावी.

In reply to by अभिजीत अवलिया

बरोबर आहे. मी त्यासाठी २-३ सूत्रे पाळतो. पहिले सूत्र म्हणजे माझी बहुतेक सर्व गुंतवणूक ब्लू चिप कंपन्यांमध्येच आहे. इतर काही कंपन्या असल्या तरी बहुतेकवेळा ब्लू चिप कंपनीतच मी गुंतवणूक करतो. दुसरं म्हणजे कोणत्याही कंपनीच्या समभागाची मागील आठवड्यातील सर्वोच्च व सर्वात कमी किंमत पहायची व जर आजचा भाव त्या भावाच्या जवळपास असेल तर समभाग विकायचे किंवा खरेदी करायचे. जर आपल्याला हव्या असलेल्या कंपनीच्या समभागांची आजची किंमत ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीच्या खूप जवळ असेल तर विकत न घेता भाव कमी होण्याची वाट पहायची व जेव्हा किंमत बर्‍यापैकी कमी होईल त्या प्रत्येक वेळी थोडे थोडे समभाग विकत घेऊन पोर्टफोलिओ वाढवत न्यायचा आणि जेव्हा किंमत पुन्हा वाढून सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचेल तेव्हा जास्त मोहात न पडता विकून टाकायचे. सध्या टाटा स्टील व स्टेट बँकेचे समभाग चांगलेच वाढले आहेत. ज्यांच्याकडे या दोन कंपन्यांचे समभाग आहेत त्यांनी ते विकून नफा खिशात घालावा. एल अ‍ॅण्ड टी सुद्धा चांगलाच वाढला आहे. गरज नसल्यास तो सुद्धा विकून टाकावा.

आतापर्यंत तीनवेळा असं झालं की अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर केल्यावर आपोआप क्यान्सल झाली. बरं, सगळ्या वस्तू नाही तर एखादीच वस्तू आपोआप क्यान्सल होते. आणि त्याचे पैसे चार्ज अर्थातच केले जात नाहीत (दुसर्‍या बाजूने असतं तर तोट्याचं होतं, मग स्वस्थ बसले नसते). एकदा विंटर कोट, मग ग्लव्हज, आणि आता लेनोवोचा सेलफोन यांच्या ऑर्डरी वेगवेगळ्या वेळांना करून आता येईल म्हणून वाट बघतिये तर क्यान्सल झालेल्या. स्टॉकमध्ये असतात तरी असे का होत असावे?

In reply to by अभ्या..

हीहीही . कशाला त्यांना अडचणीत आणतोयेस? मी पहिल्यांदाच अमेझॉन वरुन पर्स घेतली. भारतात आले होते तेंव्हापासून पर्स शोधत होते - आख्खा एफ सी रोड, दादर मार्केट फिरुन ऑफिसला जाण्याजोगी पर्स मिळेना . म्हणजे होत्या पण मला फार महाग वाटत होत्या. त्या फिरण्यात मी २ ऑफिसला जाताना काही उपयोगाच्या नाही अशा छोट्या पर्सेस घेतल्या हा त्यातला त्यात एक फायदा. पण अमेझॉन वर एक ३ पर्सेस चं छान डील होतं - एक मोठी पर्स - लॅपटॉप आणि डबा मावेल अशी - म्हणजे छोट्या मोठ्या ट्रॅव्हल साठी पण वापरता येईल. आणि त्याच डिझाईनच्या आत दोन पर्सेस - त्यातली एक क्रॉस ओव्हर आणि एक छोटी - नाणी वगैरे ठेवायला होईल अशी. मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यावरचं डिझाईन. हल्ली वेगवेगळ्या जागांचे एम्बॉसिंग केलेले डिझाईन असतात त्यातली आहे. तशीच एक मी छोटी बॅगपॅक पण भारतातुन घेतली होती - वेगवेगळे ट्रॅव्हल स्टँप्स आहेत त्यावर आणि ती स्वस्त होती. तशी पर्स अमेझॉन वर दिसल्या दिसल्या उचलली - डिलीव्हरी एका आठवड्यात आली - पॅकिंग चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे चित्रातल्या सारखीच दिसते आहे. त्याचीच जरा भीती होती पण आता धीर चेपल्याने २ टॉप्स आणि एक भारतीय शॉर्ट कुर्ता ऑर्डर केलेत लगोलग :प

In reply to by सही रे सई

ह्या काही आवडलेल्या पर्सेसः पहिली - ६ पीस ची दुसरी - हि तू म्हणत्येस ती असावी स्रुजा तिसरी - छान आहे पण पांढरी आहे त्यामुळे मळायची भीती अजुन कुठल्या वेगळ्या छानश्या पर्स तुम्हाला आवडल्या तर इथे सांगा.

In reply to by सही रे सई

हो हो हीच (म्हणजे दुसरी तुझ्या लिंक मधली) मला पण पहिली खुप आवडली होती पण दुसरी जास्त आवडली आणि दोन्ही न घेण्याचा संयम ठेवला ;)

In reply to by सही रे सई

सगळ्या पर्सा पाहिल्या. पहिली व तिसती आवडली. दुसरीही आवडली असती पण तुळशीबागेत अशा खूप होत्या. ते पाहूनच पुरेसं झालं. पांढरी पर्स मळणार नाही फारशी. लेदर आहे ना.

In reply to by रेवती

स्टॉकमध्ये असतात तरी असे का होत असावे?
माझं पण असं एकदा झालं आहे. मला वाटतं या विक्रेत्यांचे फिझिकल स्टोर्स असतील आणि ऑनलाइन ऑर्डर देतानाच तीच गोष्ट कोणीतरी त्यांच्या दुकानातून विकत घेतली असेल (आणि म्हणून स्टॉक संपला असेल). किंवा काही वेळेस विक्रेते किंमत वाढवून तोच आयटम ठेवतात (आधीची ऑर्डर कॅन्सल करून)l

कालच अमेझॉन वर सेल चालू होते म्हणून ऑर्डर केला आहे एक्सपेक्टड डिलिव्हरी ३०-६ एप्रिल आहे बघू आल्यानंतर review टाकीन.

In reply to by rain6100

आज मोबाईल आला. चांगला आहे एवढेच.. कॅमेरा Quality :-- ओके इंटर्नल मेमरी :- ८.५०गब शिल्लक./१६ गब ओरिजिनल..( किंडल/ फबी/फ्लिपकार्ट इंस्टॉलेड सिम:- १+१/मेमरी कार्ड इअरफोन यात येत नाहीत.

नोटबंधीच्या काळात लोक्स महागडे शोपिंग कर्ताना पाहुन डोले पानावले हो

Go Noise या वेबसाईट वरून, मोटो झेड प्ले आणि मोटो एक्स प्ले या २ फोनसाठी बॅकपॅनल कव्हर्स घेतले. २ दिवसात डिलिव्हरी मिळाली, उत्तम पॅकिंग...

आमच्या एका लोकल ऑनलाइन शॉप मधून एक कुर्ती घेतली चिकन वर्क्स केलेली. आणि फॅब इंडिया(ऑनलाइन) मधून दोन सूती सलवार कमीज, दोन इयररिंग्स आणि एक नोज पीन. सगळ्याची क्वालिटी आणि फिटिंग उत्तम. मुख्य म्हणजे डेलिवरी अगदी जलद. इयरिंग्स दिसायला खूप हेवी दिसतात पण कानाला झेपतील असे आहेत त्यामुळे आवडले. मागच्या वेळी मी आमच्या इथल्या दुकानातून घेतले होते त्यानी कान तुटतो का काय अशी भीती वाटू लागली होती.

In reply to by पद्मावति

हाईला, फॅब इंडिया चं ऑनलाईन स्टोअर भारताबाहेर डिलीव्हर करतं? बघायला हवं ( मिनिमलिझमच्या इराद्यांना सुरुंग लावतो हा धागा) सई, ही लिंक - तुझा प्रतिसाद वर गेलाय बराच पण इथे बघ - उजवीकडुन दुसरीवाली मी ऑर्डर केली: https://www.amazon.ca/gp/product/B01CZE62C8/ref=oh_aui_detailpage_o02_s…

In reply to by यशोधरा

होय. तेच माझ्या वरील प्रतिसादात म्हटले आहे. तुळशीबाग ब्रँडच्या आहेत पण त्या. स्रुजाने ऑर्डर केलेली साधी नाहीये पण पुण्यात या पर्सा दिसतात.