Skip to main content

एवढ्यात काय खरेदी केलत - २

लेखक रेवती यांनी रविवार, 19/03/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अ‍ॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्‍याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा. धन्यवाद.

वाचने 33407
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला
याची लिंक द्याल का? मलाही घ्यायचा आहे पण क्णता घ्यावा हे ठरत नाहिये. आणि मुलीला सेफ अशी पाण्याची बाटली कोणती घेऊ एनी सजेशन्स? (प्लॅस्टीक आणि काच नको आहे)

In reply to by इडली डोसा

https://www.amazon.com/gp/product/B01KM1J38G/ref=oh_aui_detailpage_o02_… हा सेलफोन होल्डर आहे. काचेची बाटली जड होते, फुटते असे वाटत असेल तर बाहेरून रबरी आवरण असलेल्या मिळतात, अन्यथा स्टीलच्या वापराव्यात असे वाटते. अ‍ॅल्यूमिनिअम आणि स्टीलमध्ये गफलत होवू शकते म्हणून स्टीलचीच बाटली बघून घ्यावी. मी दोन घेतल्यात टारगेटमधून व भेट म्हणून तिसरी मिळाली. अडगळीत पडलेली चौथी काढली पण ती अ‍ॅल्यूमिनिअमची असल्याने लक्षात आले. प्रथमदर्शी ती बाटली स्टीलची वाटते. प्लास्टिक मलाही नको वाटते पण मुलासाठी घेतली कारण खेळताना मैदानाच्या कडेला नीट ठेवणे वगैरे मुलांच्या लक्षात रहात नाही.

In reply to by रेवती

सेलफोन होल्डर चांगला वाटला. बाटली मुलीसाठीच घ्यायचीये त्यामुळे स्टील बघतीये. पण फार फसव्या दिसतात आणि स्टील / अ‍ॅल्युमिनीअम फरक कसा ओळखायचा? मी एक स्टील म्हणुन वापरते पण ती बहुतेक अ‍ॅल्युमिनीअम आहे अशी शंका येतीये आता मला.

In reply to by इडली डोसा

याची हेल्प होतिये का बघ. Aluminum sounds duller and has less of a ring than stainless steel. Rap your knuckles on the edge of the pot or bang it with a wooden spoon. Aluminum feels slightly warmer than stainless steel at room temperature. After being washed, aluminum tends to dull slightly, while stainless steel usually stays bright. Because aluminum is softer than stainless steel, a key will scratch aluminum much more readily than stainless steel. If a magnet sticks to the side of the pot (even weakly), it is definitely stainless steel and not aluminum. (Note: If a magnet does not stick, you still can’t tell which metal it is, but you can be sure it’s stainless steel if the magnet does stick!)

In reply to by इडली डोसा

पुण्यात असाल तर रामेश्वर चौकात (शनिपार कडून शिवाजी रस्त्याकडे जाताना बाबुगेनु चौकापुढचा चौक) उत्तम क्वालिटीच्या तांब्याच्या बाटल्या मिळतात. अल्युमिनियम अजिबात नकोच. तांबे नाही मिळाले तर स्टील घ्या.

हल्लीच हा कार चार्जर अमेझॉन वरून घेतला. खूप फास्ट चार्जिंग करतो. आवडला. Tech Sense Lab Qualcomm Certified Quick Charge 2.0 Car Charger यामाहाची 'फसिनो' घेतली ३ आठवड्यापूर्वी. गाडी खूप आवडली. तांब्याची भांडी रोजच्या जीवनातून तशी हद्दपार झालेली आहेत म्हणून पाण्यासाठी एक तांब्याची बाटली घेतली तुळशीबागेतून.

In reply to by अभिजीत अवलिया

@यामाहाची 'फसिनो' घेतली ३ आठवड्यापूर्वी. गाडी खूप आवडली. ››› मीही घ्यायच्या विचारात आहे. सस्पेंशन,लाइट, ब्रेक्स कसे आहेत. १५ ते ५० कि. मी. अंतर चालवताना सीट कंफर्टेबल वाटतय का? गाडित काही उणिवा जाणवल्यात का?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात केंद्र सरकारच्या हल्लीच्या नियमाप्रमाणे गाडी चालू केली की हेडलाईट आपोआप चालू होते आणी गाडी बंद केली की हेडलाईट बंद. हेडलाईटला वेगळे चालू बंद करायचे बटन नाही. त्याची एक मुख्य समस्या म्हणजे बऱ्याच लोकांना केंद्र सरकारच्या ह्या नवीन नियमांबद्दल माहीत नसल्याने रस्त्यावरून जाताना बरेचजण हेडलाईट चालू असल्याची सूचना करतात. :) आतापर्यंत १०० किमी पण चालवलेली नाही कारण नंबर मिळाला न्हवता. कालच नंबर मिळाला त्यामुळे आज एका दिवसातले सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास १६ किमी ड्रायव्हिंग केले. तुलनेत बऱ्या रस्त्यांवरून गाडी चालविल्याने अजूनतरी सस्पेन्शन चांगलेच वाटतेय. ब्रेक्स देखील ठीक आहेत. सीट कंफर्टेबल वाटतेय. गाडीची उंची थोडी कमी आहे त्यामुळे महिलांसाठी अतिशय उत्तम आहे. उणिवा - १) पेट्रोल टाकीचे झाकण सीटच्या खाली आहे. त्यामुळे पेट्रोल भरताना सीट उचलावी लागते. २) किक मारून गाडी चालू करायची असल्यास गाडी सेन्टर स्टॅन्डला उभी करावी लागते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

मीही घेतलीय. अगदी आरामात चालवता येते. ४५ वर्षी बाबा शिकलेत चालवायला. तारुण्यातली राहिलेली हौस फिटवतायेत.

कुत्र्याशी संबंधित सप्लाईज अमेझॉनवर अतिशय स्वस्त पडतात असा अनुभव आहे. डॉग फूड, लीशेस, पिंजरा (जस्ट इन केस), खेळणी वगैरे पुष्कळ मागवून समाधानकारक आहे अमेझॉन (पेटशॉपपेक्षा कमी किंमत आणि वेळेत डिलीव्हरी याबाबत) पण दोन ब्लॅक स्पॉट्स असे: १. कारसीट कुत्र्याने खराब करु नये म्हणून वेगळं प्रोटेक्टिव्ह कव्हर घेतलं. ते कारमधे लावताच लगेच फाटलं (त्याचे लटकवणारे बेल्ट्स. २. प्रवासात थंडीपासून कुत्र्याच्या रक्षणासाठी पुलओव्हर गरम कोट मागवला होता. त्यात आगोदरच एका पांढर्या कुत्र्याचे केस आतून चिकटले होते. यक्क. ..परत केला. रिफंड मिळाला.

व्यू ४०" फुल एचडी टिवी विथ टाटा स्काय एचडी सेट टॉप बॉक्स घेतला. निव्वळ धमाल क्वालिटी आहे ! इतरांकडचे टिवी पुन्हा निःपक्षपतीपणे पाहिले..... व्यूच्या परफॉर्मन्सला खरंच तोड नाही .

In reply to by संजय क्षीरसागर

अरे वा! बरय. गविंनी सुचवल्याप्रमाणे लेनोवोचा सेलफोन (आवडला म्हणून) ऑर्डर केलाय. अजून आला नाहीये. वाट बघिंग.

In reply to by श्री

मीही इतक्यात गावच्या घरासाठी व्यु ४० घेतला. आजून इंस्टाल करायचा बाकी आहे. दोन मॉडेल म्हणत असाल तर १) साधा ४० इंच आहे रुपये २१,९९९/- २) स्मार्ट ४० इंच आहे रुपये २६,९९९/- मला गावाच्या घरासाठी स्मार्ट TV ची गरज नसल्या मुळे साधा घेतला. युएसबी पोर्ट १ आहे

लिहायला पेन नव्हतं म्हणून मग आज दुपारीच बाहेरून येताना दोन रुपयांचे यूज अॅण्ड थ्रो पेन घेतलं नटराजचं. आमच्या चाळीतला बोका पक्का बदमाश आहे. माझ्यावर खुन्नस असल्याने नेमकं माझ्याच टू व्हिलरच्या सीटवर ओरखडे करतो. त्यापासून बचावासाठी एक ताडपत्रीचे कव्हर काल घेतले जुन्या मार्केटला. लय घासाघीस करावी लागली. अरे हो, गावी रात्रीच्या वेळी कोंबड्या डालण्यासाठी एक मोठी पाटी (डालं?) हवी होतं आजीला. खूप शोधाशोध केली भुलेश्वरला जावून तेव्हा कुठे मिळालं.

In reply to by किसन शिंदे

मी परवा तूरडाळ आणली. भाव किलोला ७३ रुपये बघून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता! हल्ली १२०/१३० बघायची सवय झालेली ना!

In reply to by पैसा

अय्या ! कित्ती स्वस्त ! मला परवा ८० रु. किलो मिळाली. आता गोव्याला येईन ना, तेव्हा पोतं घेऊन येईन हं, तूरडाळ घ्यायला ! =))

In reply to by अनुप ढेरे

स्वस्त झाली असेल तर आनंदचे. मायला, कुकींग गॅस एकदम ५४० चा ७२० झालायं, त्यात थोडासा दिलासा !

In reply to by संजय क्षीरसागर

काहीतरी गडबड दिसते. मागच्याच आठवड्यात ऑनलाईन ७६२.१५ रूपये भरून सिलिंडर बुक केला आणि ३-४ दिवसांनी घरी आला. सिलिंडर आल्यानंतर दुसर्‍या दिवशी खात्यात अनुदानाचे २९०.८२ रूपये जमा झाल्याचा लघुसंदेश आला. म्हणजे सिलिंडर ४७१.३३ ला मिळाला.

In reply to by संजय क्षीरसागर

झक मारली आणि भावनेच्या भारात सबसीडी सोडली, असं आता पब्लिकला वाटायला आता वेळ लागणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

राजकारण्याचे आदर्श माझे नाहीत , तुमची गल्ली चुकत आहे ! मूळ प्रश्नाला बगल छान दिलीत . बाकी पळपुटे म्हणत असाल तर म्हणा काय शष्प फरक पडत नाही , प्रत्येक धागा , प्रतिसाद मॉनिटर करत बसण्या एवढा मी रिकामटेकडा नाही. तुम्हाला खोटारडा म्हणाले होते कारण तुम्हाला पुरावे मागून तुम्ही ते दिले नव्हते , तेव्हाही बऱ्याच कोलांट्या उड्या मारल्या होत्या हवे तर जुने धागे चाळोन बघा .

In reply to by कपिलमुनी

ज्या हिरिरीने तुम्ही केजरीवालांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत असता, त्यावरून तुमचे आदर्श कोण आहेत हे अत्यंत स्पष्ट आहे. केजरीवाल छाप प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक धागा, प्रत्येक प्रतिसाद मॉनिटर करण्याची गरज नसते. समोर दिसलेला कोणताही धागा उघडायचा आणि धाग्याचा विषय कोणताही असला, धाग्याच्या विषयाचा राजकारणाशी अजिबात संबंध नसला तरी तिथे संदर्भहीन केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे हे तुमचे व्यवच्छेदक लक्षण आहे (उदा. हा धागा). तुमच्या असल्या केजरीवाल छाप प्रतिसादावर समोरच्याकडून सणसणीत उत्तर मिळाले की तिथून पलायन करायचे हे देखील याच लक्षणाचा भाग आहे (उदा. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धागा). असंख्य पुरावे देऊनसुद्धा एखाद्याला वारंवार खोटारडा म्हणणे, त्याला कावीळ झाली आहे असे म्हणणे हे केजरीवालांच्या बिनदिक्कत खोटे आरोप करण्याच्या व्यसनाशी सुसंगतच आहे. आपले केजरीवाल छाप प्रतिसाद पहायचे असतील तर जुने धागे चाळोन बघा.

In reply to by श्रीगुरुजी

असो. सदर प्रतिसादावरुन असे लक्षात येतंय की साक्षात मोदींनी आवाहन करुनही तुम्ही सबसिडी घेत आहात. विषय संपला.

In reply to by संदीप डांगे

मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे झाले तेव्हाच विषय संपला होता. तुम्ही तो परत उकरून काढलात. असो. सबसिडी सोडण्याइतके आम्ही श्रीमंत नाही. श्रीमंतांचे ट्रकचालक सुद्धा खिशात २०-२० लाख रूपये रोख घेऊन हिंडतात. आम्ही तेवढे श्रीमंत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही. आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे. फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच ! बाकी चालू द्या ! (गायब) मुनी

In reply to by कपिलमुनी

मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही. "शेवटचा प्रतिसाद माझा" टाईप लिहिणे जमत नसले तरी केजरीवाल टाईप प्रतिसाद लिहिण्यात मात्र आपण प्रचंड कौशल्य कमावले आहे याविषयी दुमत नसावे. आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे. धागा खरेदीवर आहे. "गॅसवरील सबसिडी सोडणे" हे विषयांतर तुम्ही करून धागा भरकटविण्याचा प्रयत्न केलात. मी फक्त प्रत्युत्तर दिले. अर्थात केजरीवालांच्या पित्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती. फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच ! बाकी चालू द्या ! (गायब) मुनी कोणताही विषय असला तरी केजरीवाल छाप प्रतिसाद देण्याचे आपले व्यसन बघून कायमच मौज वाटत आली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

उकरुन बिकरुन काही काढला नाही हो, इथेच याच धाग्यावर आहे जे आहे ते, तेवढेच दिसले ते बोललोय, उकरुन काढणे म्हणजे एकिकडचे दुसरीकडे उकरुन क्षुद्रपणे ज्या त्या धाग्यावर ट्रक घेऊन फिरणे, वगैरे वगैरे.... बाकी तुम्ही सबसिडी सोडण्याइतके श्रीमंत नाही म्हणून सोडली नाही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न. त्यात भोचकपणा करणे योग्य नाही. त्रास झाल्याबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. पण.... हे आधीच अनावश्यक थयथयाट न करता नीट सांगितले असते तर काहीच नसतो हो बोललो. विषयांतराबद्दल क्षमस्व.

In reply to by संदीप डांगे

त्याचं असं आहे डांगेराव, मुनीवर्यांनी धाग्याच्या विषयाशी अजिबात संबंध नसलेला विषय या धाग्यावर आणून त्या निमित्ताने माझ्यावर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाईलाजाने मला त्यावर उत्तर द्यावे लागले. त्यानंतर मुनीवर्य ६ दिवस गायब असल्याने तो विषय तिथल्या तिथे संपला असे मी समजत होतो. तुम्ही विनाकारणच धाग्याशी संबंधित नसलेला तो विषय पुन्हा उकरून काढला. नाईलाजाने मला पुन्हा एकदा उत्तर द्यावे लागले. जर दुसरीकडचा ट्रक इथे घेऊन येणे म्हणजे क्षुद्रपणे दुसर्‍या धाग्यावरचा मुद्दा इथे उकरणे असेल, तर त्याच न्यायाने ,माझ्या मोदीसमर्थनाचा, या धाग्याच्या विषयाशी अजिबात संबंध नसलेल्या सबसिडीशी संबंध जोडणे, हेसुद्धा क्षुद्रपणे दुसर्‍या धाग्यावरचा मुद्दा इथे उकरणेच आहे. असो. जर यापुढे या धाग्यावर माझ्याबद्द्ल नवीन व्यक्तिगत टिप्पणी येणार नसेल, तर हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सबसिडी सोडण्याइतके आम्ही श्रीमंत नाही >> माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे. धन्यवाद!

In reply to by पैसा

स्वस्तंय की मग.. =)) जास्तीचं सामान घेतलं की त्यावरही दोन-तीन रूपये डिस्काऊंट मिळून जातं आमच्याकडे डिमार्टला. =))

खरेदी केलं रुपये २१५ एक पाकीट . १५ दिवसांपूर्वी कामानिमित्त सिंगापूर ला गेलो असताना

आर एम डि पण दुबई वैग्रे वरून एक्स्पोर्ट केलेला माल असतो . ऑस्ट्रेलिया ला ३०० च्या आसपास .. काहीतरी कर लेका आपल्या गायछाप साठी ,, मेक इन इंडिया

Fujitsu Lifebook A555 लॅपटॉप घेतला. ८जीबी रॅम,१टीबी साटा हार्डडिस्क , मेड इन जर्मनी @२२४४० रुपये.

In reply to by संजय क्षीरसागर

एकदम मस्त आहे लॅपटॉप. या २-४ दिवसात उबुन्टु १६.०४ आणि लायनक्स मिंट १८.०१ इंस्तॉल करुन पाहिल्या. दोन्ही ओएस १५ मिनीटात लोड झाल्या. बॅटरी बेकॅप चांगला आहे.

In reply to by मराठी कथालेखक

Brand :FUJITSU Model :-A555 Processor :-CORE I3 5TH GEN (Intel® Core™ i3-5005U processor, 3 MB, 2 GHz) Processor Speed :-2.00 GHz Graphics Processing Type:- Intel HD Graphics Memory (RAM):-8 GB , 16 GB, 2 Memory slot(s) SO DIMM (DDR3, 1600 MHz)Dual channel support DDR3L – 1,600 MHz Hard Drive:-1 TB Color :-BLACK Optical Drive:- 8X SUPER MULTI DRIVE Operating System:-DOS

@ गवि, तुम्हाला पुर्वि बोललो होतो, एक डॉबरमॅन घेण्याचा विचार आहे, अजुन घरुन पुर्ण परवानगी मिळालेली नाही, या महिनाअखेर पर्यंत मिळेल. बाकी, जेसिबि चे सेफ्टी शुज घेतले, जड आहेत पण १००% कडक आहेत, इतर शुज पेक्षा. ऑफिससाठी टोलेक्सो वरुन बरंच काही काही घेतलं जात दर महिन्याला, टुल्स वगैरे, चांगली आहे सर्विस.

दुचाकी चालवताना वापरण्या साठी एक जाकीट घ्यावयाचे आहे. कोणी सजेस्ट करू शकेल काय? ऑनलाईन पेक्षा स्वतः पाहून खरेदी करण्याचा विचार आहे..पुणे किंव्हा औरंगाबाद किंवा कोल्हापूर मध्ये एखादा शॉप असल्या सांगा.