✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तिचे हासणे चांदण्याचा चुरा...

स — सत्यजित..., Fri, 03/10/2017 - 19:30
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा... तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा! तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी... तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा! चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती... तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा! कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा... तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा! मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा... अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
6250 वाचन

💬 प्रतिसाद (22)

वाह!

पैसा
Fri, 03/10/2017 - 20:36 नवीन
अतिशय सुरेख प्रतिमा आहेत एकेक!
  • Log in or register to post comments

क्या बात है !!

शार्दुल_हातोळकर
Fri, 03/10/2017 - 20:53 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

सुरेख !

संजय क्षीरसागर
Fri, 03/10/2017 - 20:56 नवीन
असेच लिहीत राहा.
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/10/2017 - 21:16 नवीन
+१ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

शब्द अपुरे आहेत कौतुकाला

संदीप-लेले
Fri, 03/10/2017 - 21:10 नवीन
शब्द अपुरे आहेत कौतुकाला
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

इडली डोसा
Sat, 03/11/2017 - 05:11 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

किती सुंदर, लयवती!!

प्राची अश्विनी
Sat, 03/11/2017 - 07:40 नवीन
किती सुंदर, लयवती!!
  • Log in or register to post comments

फार सुंदर!

अजया
Sat, 03/11/2017 - 08:41 नवीन
फार सुंदर!
  • Log in or register to post comments

अतीव देखणी कविता! क्या बात है

एस
Sat, 03/11/2017 - 10:25 नवीन
अतीव देखणी कविता! क्या बात है!!! शेवटच्या वाक्यात एक बदल सुचवतो, 'फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा!' ऐवजी 'फिकी मेनका अन् फिक्या अप्सरा!' असं करून पहा. मेनका एकच आहे. ऊर्वशी, रंभाप्रमाणे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Sat, 03/11/2017 - 13:01 नवीन
सर्व प्रतिसादक रसिकांचे मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

क्या बात है सुंदर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/12/2017 - 13:00 नवीन
कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा... तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!
आवडल्या ओळी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

क्या बात है! सही लिहीताय राव.

लॉरी टांगटूंगकर
Sun, 03/12/2017 - 21:44 नवीन
क्या बात है! सही लिहीताय राव..
  • Log in or register to post comments

आवडल्या गेली आहे...

समाधान राऊत
Sun, 03/12/2017 - 22:06 नवीन
आवडल्या गेली आहे...
  • Log in or register to post comments

अ प्र ति म!

चांदणे संदीप
Mon, 03/13/2017 - 07:50 नवीन
कविता खूपच आवडल्या गेली आहे! Sandy
  • Log in or register to post comments

क्या बात! सुरेख गजल.

यशोधरा
Mon, 03/13/2017 - 08:52 नवीन
क्या बात! सुरेख गजल.
  • Log in or register to post comments

सुंदर !!!!!!

मितान
Mon, 03/13/2017 - 12:07 नवीन
सुंदर !!!!!! ते सापळा तेवढं समजवून सांगा ना
  • Log in or register to post comments

शेवटचा शेर...

सत्यजित...
Wed, 03/15/2017 - 01:03 नवीन
अर्थ सहज आहे तसा... तिचे धारदार नजरेने पाहणे इतके मोहक असते की कुणाचीही नजर मिळताच,सापळ्यात अडकावा तसा तो गुंतून पडतो जणू काही एखाद्या सावजाने (मृगाने) खुद्द शिकाऱ्याच्याच (केसरी-सिंहाच्या) प्रेमात पडावे! शिवाय कुठलीही गजल रसिकाला स्वतःच्या संदर्भाने (अनुभव,इच्छा,कल्पना ई.) अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य देते,ही तिची खासियत आहेच.हे अवांतर! प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

आ.दिलीप सर,मंदारजी,राउत सर

सत्यजित...
Wed, 03/15/2017 - 01:09 नवीन
आ.दिलीप सर,मंदारजी,राउत सर,संदिपजी,यशोदाजी आपणा सर्वांचे हार्दीक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Sun, 03/19/2017 - 16:30 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI
  • Log in or register to post comments

खुप सुरेख!

पद्मावति
Sun, 03/19/2017 - 16:35 नवीन
खुप सुरेख! हसण्याला चांदण्याचा चुरा ही उपमा प्रचंड आवडली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

रेवती
Mon, 03/20/2017 - 02:41 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Mon, 03/20/2017 - 09:08 नवीन
मदनबाण,पद्मावतीजी,रेवतीजी...मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा