तिचे हासणे चांदण्याचा चुरा...
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा...
तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा!
तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी...
तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा!
चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती...
तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा!
कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा...
तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा!
मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा...
अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा!
—सत्यजित
वाह!
क्या बात है !!
सुरेख !
+१
शब्द अपुरे आहेत कौतुकाला
सुंदर कविता
किती सुंदर, लयवती!!
फार सुंदर!
अतीव देखणी कविता! क्या बात है
धन्यवाद!
क्या बात है सुंदर.
क्या बात है! सही लिहीताय राव.
आवडल्या गेली आहे...
अ प्र ति म!
क्या बात! सुरेख गजल.
सुंदर !!!!!!
शेवटचा शेर...
आ.दिलीप सर,मंदारजी,राउत सर
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONIखुप सुरेख!
कविता आवडली.
धन्यवाद!