Skip to main content

ताज्या घडामोडी : भाग ४

लेखक संदीप डांगे यांनी शनिवार, 25/02/2017 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाचे ३०० प्रतिसाद झालेत म्हणून नवीन धागा... विषय ताज्या घडामोडी असल्याने मागचा दुवा देणे संयुक्तिक वाटत नाही. ------------------------------------------------ अलिबागमध्ये.... शिवसेना+भाजप्+कॉन्ग्रेस महायुती.... 1 इथे विविध पक्षांचे झेंडे घेऊन उर फुटेस्तोवर धावणार्‍या लोकांची काय अवस्था होते ते बघणे मनोरंजक ठरेल... =))

वाचने 62617
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

In reply to by गॅरी ट्रुमन

हा आरोप आत्ता बराच होत असल्याने आणि नुकतंच मतदान केलेलं असल्याने एक शंका आहे. गोव्यातल्या निवडणुकांमध्ये मागच्या वेळेप्रमाणे नुसतं मशीन नव्हतं. मत दिल्यावर मत ज्यांना दिलं, त्यांच्या नावाची स्लिप आपोआप छापून आणणारं प्रिंटिंग युनिटसुद्धा त्यासोबत होतं. आणि ती स्लिप आपल्याला दिसायची व्यवस्था होती. जर काही गडबड झाली असेल, तर त्या छापील स्लिप्स आहेत ना. आता इतक्या निवडणुकांमध्ये फक्त गोव्यात असं कसं होईल? का स्थानिक पातळी च्या निवडणुकांमध्ये अशी काही व्यवस्था नाहीये?

In reply to by पिशी अबोली

२००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर लालकृष्ण अडवाणींनी या यंत्रांमध्ये फेरफार केले गेले असायची शक्यता आहे असे म्हटले होते. त्यानंतर निवडणुक आयोगाने ऑगस्ट २००९ मध्ये या यंत्रांविषयी आक्षेप असतील तर ते सोडविण्यासाठी बैठक बोलावून ५ दिवसांचा वेळ देऊन ही यंत्रे हॅक करून दाखवा असे संबंधितांना सांगितले होते. त्यापैकी कोणीही तसे काही करू शकले नव्हते. २०१३ मध्ये सुब्रमण्यम स्वामींनी या संबंधी परत न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने मतदारांना कोणाला मत दिले हे समजावे यासाठी पेपर ट्रेल निवडणुक आयोगाने लवकरात लवकर आणावी असा आदेश दिला. माझ्या माहितीप्रमाणे काही ठिकाणी हे काम सुरू झाले आहे पण पूर्ण देशाचा आवाका पक्षात घेता २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी सगळीकडे हे पेपर ट्रेल वापरले जातील. सध्या हे पेपर ट्रेल काही ठिकाणीच वापरले जातात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीपूर्वी सुब्रमण्यम स्वामींनी पुढील ट्विट केले होते: प्रत्यक्षात एन.डी.ए ने ३२० पेक्षा जास्त जागा मिळविल्यामुळे या यंत्रांमध्ये काही फेरफार नव्हते असे म्हणायला हरकत नसावी :) मतपत्रिका वापरून निवडणुका आणि मतमोजणी करण्यात आली तर ते मला तरी अधिक आवडेल. पूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मतमोजणी चांगली ३-३ दिवस चालायची. काय बहार होती त्याकाळात. आता तर सगळे निकाल एका दिवसातच येतात त्यामुळे मतमोजणीचा खरा आनंद उपभोगताच येत नाही. २०१९ मध्ये मतपत्रिका वापरून निवडणुका आणि ३-३ दिवस मतमोजणी होणार असेल तर पूर्णवेळ मिपावर निकालांचे धावते समालोचन करायला किती मजा येईल हेच चित्र यानिमित्ताने डोळ्यासमोर उभे राहिले :)

In reply to by गॅरी ट्रुमन

पंजाबमध्ये सर्व सर्वेक्षणांनी व अनेक पत्रकारांनी आआपला प्रचंड यश मिळेल असे भाकीत वर्तविले होते असे केजरीवाल म्हणतात. परंतु भाजपने मतदान यंत्रे मॅनेज केल्याने आआपचा पराभव झाला असा त्यांनी दावा केला आहे. खरं तर भाजपने मतदान यंत्रे मॅनेज केली असे म्हणण्यापेक्षा आआपने सर्वेक्षणे व काही पत्रकार मॅनेज केले होते असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. मतपत्रिका वापरून निवडणुका आणि मतमोजणी करण्यात आली तर ते मला तरी अधिक आवडेल. नक्कीच. इव्हीएम पेक्षा हाताने मते मोजून निकाल लावण्यामध्ये खूप जास्त थ्रिल आहे. एकतर ही मतगणना अनेक तास (काही वेळा २४ तासांपेक्षा जास्त) सुरू असते व त्यामध्ये प्रचंड चढउतार असल्याने जास्त मजा येते.

दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी भाजपने एकाही विद्यमान नगरसेवकाला उमेदवारी न देण्याचे ठरविले आहे. यातून दोन गोष्टी साध्य करायचा प्रयत्न दिसत आहे. दिल्ली शहरांमधील महापालिकांचा आणि नगरसेवकांचा कारभार ढिसाळ आहे ही एका अर्थी कबुलीच दिली गेली आहे.अन्यथा कारभार चांगला असता तर अगदी एकाही नगरसेवकाला परत उमेदवारी न द्यायचे काय कारण आहे? दुसरे म्हणजे अनेकदा पक्षाविषयी लोकांचे मत तितके वाईट नसले तरी आपापल्या मतदारसंघांमधील त्या पक्षाच्या उमेदवाराविरूध्द लोक मते देऊ शकतात. जर उमेदवार बदलला तर या स्थानिक पातळीवरील 'अ‍ॅन्टी इन्कबन्सी'चा परिणाम तितका जाणवत नाही. १९९८ मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये दिग्विजयसिंगांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा काहीसा अनपेक्षित विजय झाला होता. त्यावेळी १९९३-९८ च्या विधानसभेतील अनेक आमदारांना पक्षाने परत उमेदवारी न देऊन स्थानिक 'अ‍ॅन्टी इन्कबन्सी' टाळण्यात पक्षाला यश आले होते. भाजपचा तसे करायचा हेतू दिसत आहे.

http://www.loksatta.com/maharashtra-news/osmanabad-unseasonable-rain-hu… हवामान, कृषी विभागाची कोणतीही पूर्वसूचना नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे हवामान खाते कोणाच्या अख्यारितेमध्ये येते कोणी सांगू शकेल काय?

http://www.loksatta.com/maharashtra-news/osmanabad-unseasonable-rain-hu… हवामान, कृषी विभागाची कोणतीही पूर्वसूचना नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हे हवामान खाते कोणाच्या अख्यारितेमध्ये येते कोणी सांगू शकेल काय?

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मांडलेला त्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव गोवा विधानसभेत २२ विरूध्द १६ मतांनी मान्य झाला आहे. भाजपच्या १२, म.गो.पक्षाच्या ३, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या ३ , ३ अपक्ष आमदारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने ठरावाच्या बाजूने तर काँग्रेसच्या १६ आमदारांनी ठरावाच्या विरोधात मत दिले. गोवा विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे हंगामी अध्यक्ष (प्रो-टेम स्पीकर) बनतील असे वाटले होते. पण भाजपचे पणजीचे आमदार सिध्दार्थ कु़ंकळीणकर यांना ते पद मिळाले. त्यामुळे त्यांचे मत लक्षात घेता पर्रीकर सरकारला आता २३ आमदारांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचे १३ आमदार निवडून गेले होते. त्यापैकी वाळपोईचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे चिरंजीव विश्वजीत राणे यांनी पक्षादेश झुगारून मतदानात भाग घेतला नाही. मतदान झाले त्यावेळी ते जागेवर नव्हते आणि शेवटपर्यंत परतलेच नाहीत. गोवा काँग्रेसमधील संभाव्य बंडाची ही चाहूल म्हणायची का? राष्ट्रवादी काँग्रेसचे बाणावलीमधून निवडून गेलेले आमदार चर्चिल आलेमाव यांनीही सरकारला पाठिंबा दिला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची खिचडी शिजत आहे असे म्हटले जात आहे पण ते सिध्द करायला हा पुरेसा आधार नाही. बाणावलीमध्ये या मनुष्याला बर्‍यापैकी जनाधार आहे. अनेकदा तिथून निवडणुकही त्यांनी कधी काँग्रेसचे उमेदवार म्हणून तर कधी युजीडीपीचे उमेदवार म्हणून यापूर्वी जिंकली होती. १९९६ मध्ये युजीडीपीचे उमेदवार म्हणून ते दक्षिण गोवा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २०१४ मध्ये त्यांनी अचानक तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तृणमूलचे गोव्यातील उमेदवार म्हणून परत एकदा दक्षिण गोव्यातून निवडणुक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला. यावेळी ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून गेले. तेव्हा चर्चिल आलेमाव हा मनुष्य स्वयंभू आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

राणेंनी पक्ष सोडल्याची बातमी फक्त लोकमतवर दिसतेय, इतरांना अजून खात्री नसावी!

In reply to by खेडूत

मतदानावेळी लोक शोधत होते त्यांना. संडासात होते म्हणे ते मतदान झालं तेव्हा केसरी एपिसोडनंतर फुल सर्कल काँग्रेसचं =))

In reply to by खेडूत

आता विश्वजित राणे यांनी पक्ष सोडल्याची बातमी अधिकृतपणे इतर माध्यमांमध्येही आली आहे. वरील प्रतिसादात एक दुरूस्ती हवी आहे. काँग्रेसचे १७ आमदार निवडून गेले आहेत, १३ नाही.

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा शपथविधी पार पडला. त्यांच्याबरोबरच ७ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये सुखबीरसिंग बादल यांचे चुलतबंधू (आणि २०१२ मध्ये स्वतःचा पीपीपी हा पक्ष काढून अकालीविरोधी मतांमध्ये फूट पाडून अमरिंदरसिंगांची मुख्यमंत्रीपदाची संधी घालविण्याला कारणीभूत ठरलेले) मनजीतसिंग बादल आणि नवज्योतसिंग सिध्दू यांचा समावेश आहे. Amrinder

In reply to by गॅरी ट्रुमन

सिद्धूला मंत्रीपद दिले ही चांगली घटना आहे. मंत्री असल्याने तो आता आयपीएल किंवा इतर सामन्यांचा समालोचक नसेल. आचरट कोट्या, पाचकळ आणि फालतू बडबड यामुळे तो समालोचक या पदाला कलंक होता. त्याचे समालोचन ऐकणे ही शिक्षा होती. त्याच्या बरोबर विवेक राजदान असला की तो सुद्धा सिद्धूच्या तोडीस तोड समालोचन करायचा. क्रिकेट रसिकांची आता या शिक्षेपासून मुक्तता झाली आहे. अर्थात पंजाबी नागरिकांना हा विदूषक आता सहन करावा लागणार आहे. त्यांनी स्वतःहून गळ्यात झगा बांधून घेतल्याने त्यांना ही शिक्षा भोगावीच लागणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेस मध्ये गेल्यामुळे सिद्धूच्या आचरट कोट्या, पाचकळ आणि फालतू बडबड उघडकीस आल्या असाव्यात.

In reply to by विशुमित

नाही. त्याआधीपासून होत्याच. म्हणूनच भाजपने जाणूनबुजून त्याला मंत्रीपद वगैरे दिले नव्हते. त्यामुळेच तो भाजपवर खार खाऊन भाजपमधून बाहेर पडला. आधी त्याने आआपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. तिथे डाळ शिजत नाही हे लक्षात आल्यावर त्याने स्वतःचा वेगळा पक्ष काढला. त्याचाही फारसा उपयोग नाही हे लक्षात आल्यावर तो काँग्रेसमध्ये गेला.

Ignoring Pakistan's warning, India fast-tracks Kashmir hydro projects पाकिस्तानच्या विरोधाला व आक्षेपांना न जुमानता भारताने काश्मिरमधील अपूर्ण जलप्रकल्पांना गती दिलेली आहे. गेल्या अनेक दशकांपासून हे प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाले तर पाकिस्तानचे नाक दाबले जाईल. अर्थात पाकिस्तान जागतिक बँकेच्या व जागतिक न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकल्पांच्या पूर्णतेवर अडथळे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार हे नक्की. नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या दबावापुढे झुकणार नाहीत हे सुद्धा नक्की. हे प्रकल्प ही दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. प्रकल्प पूर्ण होऊन प्रत्यक्षात येण्यास अनेक वर्षे लागतील. त्यावेळी मोदी किंवा भाजप सत्तेत असेल का हे आता सांगता येणे अवघड आहे. यदाकदाचित प्रकल्प अपूर्णावस्थेत असताना काँग्रेस किंवा तिसर्‍या आघाडीचे सरकार सत्तेत असले तर ते आपल्या पाकिस्तान/मुस्लिम/दहशतवादी प्रेमामुळे हे प्रकल्प रेंगाळत ठेवतील हे नक्की.

दोईवाला विधानसभा मतदारसंघातून उत्तराखंड विधानसभेवर निवडून गेलेले भाजप नेते त्रिवेंद्रसिंग रावत हे उत्तराखंडचे पुढील मुख्यमंत्री असतील. देहरादून येथे झालेल्या नवनिर्वाचित भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. ते उद्या (१८ मार्च रोजी) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्या निवडीबरोबर रमेश पोखरीयाल यांच्यानंतर दोईवालातून निवडून गेलेला दुसरा आमदार मुख्यमंत्री बनणार आहे. तसेच केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र आणि आता उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्र असे 'इन्द्र' कारान्त नेते आहेत/ होणार आहेत. Uttarakhand

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ (महंत अवैद्यनाथ यांचे पुत्र) यांची नेमणूक भाजपने केली आहे अशा बातम्या सगळ्या मिडियामध्ये आल्या आहेत. अजूनही त्यापुढे प्रश्नचिन्ह दिसत आहे (Yogi Adityanath named CM?). म्हणजे अजून ही बातमी १००% खात्रीने मिडिया सांगताना दिसत नाही. ही बातमी खरी असेल तर ते नक्कीच धक्कादायक आहे. मोदींना २०१९ साठी 'विकासपुरूष' ही प्रतिमा उभी करायची असताना योगी आदित्यनाथ हा मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा त्याच्या अगदी पूर्णपणे विपरीत आहे. ही बातमी खरी असेल तर एकतर कट्टर हिंदुत्ववादी ताकदींपुढे मोदी हतबल आहेत किंवा त्यांनाही विकासपुरूषाचा चेहरा पुढे ठेऊन स्वतःचाच छुपा कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा दामटायचा आहे दिसते. ही बातमी खरी असेल तर ते माझ्यासाठी अतिशय निराशाजनक आहे. #Not my CM!!!

ही बातमी आता अधिकृतपणे आली आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री होतील. दिनेश शर्मा आणि केशवप्रसाद मौर्य उपमुख्यमंत्री होतील. मी मोदींचे समर्थन करत असलो तरी हा निर्णय मला अजिबात मान्य नाही. जी गोष्ट मला मान्य नाही त्या गोष्टीवर मी मिपावर (आणि इतरत्रही) आतापर्यंत प्रत्येक वेळा उगीच पोलिटिकली करेक्ट आहे की नाही याची अजिबात पर्वा न करता टिका करत आलेलो आहे. ही तशीच वेळ आहे. मोदींनी लोकांना गृहित धरू नये. मोदी विकासपुरूषाच्या मुखवट्यामागे जर असल्या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना पुढे करत असतील तर ते चालणार नाही. प्रत्येक वेळी मोदी या नावावर लोक मते देणार नाहीत हे भाजपने लक्षात घ्यायला पाहिजे. मी २०१९ मध्ये मोदींच्या नावावर अन्यथा 'बाय डिफॉल्ट' मत दिले असते. पण आता तो निर्णय स्थगित ठेवत आहे. आदित्यनाथ हे देवेंद्र फडणवीस, शिवराजसिंग चौहान यांच्यासारखे मुख्यमंत्री होणार असतील तरच २०१९ मध्ये माझे मत मोदींना अन्यथा कोणालाही नाही. २०१९ मध्ये या निर्णयाचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असे दिसते.

In reply to by गॅरी ट्रुमन

अत्यंत दु:खद अंतकरणाने पूर्ण सहमत. अत्यंत चुकीची निवड. जनतेने दिलेल्या प्रचंड बहुमताचा हा पूर्ण अनादर आहे. भाजपला या मूर्खपणाच्या निर्णयाचा भविष्यात पश्चाताप करावाच लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

ट्रुमन आणि गुरूजी.. समजा योगींनी समतोल विकासाने युपीला पुढे नेले तर..? मला तर हा मोदी-शाह राजकारणाचा धूर्त डाव वाटत आहे. युपीवर नियंत्रण अमित शहांचे असणार, योगींचा भडक चेहरा सर्वांसमोर असणार आणि सर्वांचाच विकास झाल्यामुळे "योगी असेल, चुकीचे बोलत असेल तरी भाजपवाला = विकास" हे गणित आणखी परिणामकारकतेने मांडले जाईल.

In reply to by मोदक

हा राजकारणातला धूर्त डाव असेल तर ठिक आहे. आणि मोदींची एकूण राजकीय कारकिर्द बघता असा स्वत:च्या पायावर धोंडा पाडणारा कोणताही निर्णय ते घेणार नाहीत याचीही खात्री वाटते. तेव्हा कोणीही मुख्यमंत्री झाले तरी विकासाचाच अजेंडा पुढे केला जाणार असेल तर ते चांगलेच असेल. मला भगवी वस्त्रे घालणार्‍यांविषयी घृणा वगैरे नक्कीच नाही. अयोध्या आंदोलनाच्या काळात भगवी कफनी ब्रिगेड मोठ्या प्रमाणावर पुढे आली होती. अयोध्येत मंदिर बांधावे ही मागणी समजा मान्य करता येणार्‍यातली असली तरी अयोध्येचे मंदिर सोडले तर एकूणच दीर्घकालीन अजेंड्याविषयी या कळपावर विश्वास मला तरी ठेवता येणे तितके सोपे नाही. आपल्याला मंदिरांपेक्षा नालंदा, तक्षशीलासारखी विद्येचा व्यासंग चालणारी ठिकाणे , प्रयोगशाळा इत्यादी इत्यादींची गरज जास्त आहे. तो अजेंडा भगवी कफनी ब्रिगेड राबवू शकेल असा विश्वास त्यांच्या अयोध्या आंदोलन काळातील गोष्टींवरून (रामाचा फोन येणे वगैरे) वाटत नाही. विशेषतः राममंदिर हे साधन आणि राष्ट्रमंदिर (म्हणजे सगळ्या क्षेत्रात आपला देश जगात पुढे यायला हवा) हे साध्य यापेक्षा राममंदिरातच गुरफटलेली मंडळी वाटली ही. तसे होणार नसेल तर फारच चांगले. तेव्हा योगी आदित्यनाथ पुढे काय करतात हे बघण्यासाठी सहा महिने-वर्षभर मी नक्कीच थांबू शकेन. समजा मनोहर पर्रीकरांसारखा कोणी मुख्यमंत्री झाला असता तर त्याला 'बाय डिफॉल्ट' पाठिंबा दिला असता. तसा 'बाय डिफॉल्ट' पाठिंबा आदित्यनाथांना मात्र याक्षणी देता येणार नाही. त्यांनी विकासाच्याच गोष्टी केल्या, वाचाळवीरांप्रमाणे काही वक्तव्ये केली नाहीत तर माझे मत बदलायला मी तयार असेनच.

In reply to by गॅरी ट्रुमन

आदित्यनाथांच्या काही मुलाखती बघितल्यानंतरचे माझे त्यांच्याबद्दलचे मत वेगळे बनले आहे. कट्टर हिंदुत्ववादी असणे आणि अंध हिंदुत्ववादी असणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मला वाटते. त्यांची काही उथळ विधाने सोडली तर त्यांचे विचार हे उगाच "एक्स्ट्रिमिस्ट" प्रकारात मोडणारे वाटले नाहीत, उलट "जशास तसे" अशा प्रकारातले वाटले. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या मतदारसंघात आणि प्रभावक्षेत्रात दंगली घडल्या नाहीत आणि तणावाचे प्रमाण अत्यंत कमी झाले हा त्यांचा दावा खरा असेल तर मला वाटते फक्त "योगी" असणे हे त्यांची इमेज खराब ठरवण्यास कारणीभूत ठरू नये. जाताजाता, उमा भरती यांचा कार्यकाळ चांगला होताच की! येणारी दोनेक वर्षे ठरवतील दिशा!

लोकहो, स्वरा भास्कर यांचं विधान : कलाकृती करण्याआधी लोक काय म्हणतील याचाच विचार करावा लागतो. लोकभावनांचा विचार करायला घेतल्याबद्दल स्वरा भास्कर यांचं अभिनंदन. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै, ती असा विचार करावा लागण्याचे समर्थन करत नाहीये किंवा असा विचार करावा असं म्हणत नाहीये.

भाजप ने एकही मुस्लिम चेहरा उमेदवार म्हणून दिला नव्हता . कट्टर धार्मिकवादावर निवडणूक जिंकली आहे त्यामुळे थोडीफार शक्यता होतीच. योगी आदित्यनाथनी आपल्या आणि बाजूच्या मतदारसंघातून १३ उमेदवार एकहाती निवडून आणले होते. उलट कट्टर धार्मिकतेचा आणि जनमताचा हा आदर आहे .

शब्दांना धार वैग्रे अली नाही का कोणाच्या आज :)) का संयत आणि संयमी प्रतिसाद . माज वैग्रे . धडा शिकवू ह्यांना . जोके वैग्रे . असे काही असतील तर स्वागत आहे . एकदम संयमी प्रतिसाद अरे देवा काय झाले हे मिपा ला ?? पप्पू ,चप्पू ,उध्दट, देशद्रोही,जातीयवादी, भावना भडकावणारे असे काही विशेषण लागू पडत आहे का ?? असेल तर हि सगळी सर्वपक्षीय विशेषण आहेत हा जे वापरतात .काही पण वापर कि आज भाजप किंवा योगींना.

२००३ मध्ये म. प्र. मध्ये उमा भारतींना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय फारसा यशस्वी ठरला नव्हता. आधी उमा भारती, नंतर बाबुलाल गौर आणि शेवटी शिवराजसिंग चौहान आणल्यानंतर म. प्र. ची परिस्थिती बदलायला लागली. माझ्या मते योगी आदित्यनाथ हे विकासाऐवजी कर्मठ हिंदुत्वावर जास्त भर देतील. उ. प्र. मध्ये प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भाजप सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. आता फक्त घसरणच होऊ शकते. आदित्यनाथची मुख्यमंत्रीपदी निवड करणे ही मोदी-शहांची पहिली चूक असावी असे दिसते. कदाचित हीच घसरणीची सुरूवात असावी. उत्तर प्रदेशला फडणवीस, शिवराजसिंग चौहान, रमणसिंग, नवीन पटनाईक अशा नेत्यांची गरज आहे. योगी आदित्यनाथ, गिरीराज सिंह अशा वाचाळ नेत्यांमुळे भाजपची अधोगतीच होणार आहे.

गॅरी ट्रुमन आणि श्रीगुरुजी, योगी आदित्यनाथांवरचे आक्षेप सविस्तर लिहावे ही विनंती. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

योआ हे सलग पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आले असले तरी ते भडक जातीयवादी भाषणे, धार्मिक ध्रुवीकरण, लव्ह जिहादला विरोध, गोरक्षा आंदोलन इ. साठीच कुप्रसिद्ध आहेत. त्यांना प्रशासकीय अनुभव देखील अजिबात नाही. अशा व्यक्तीला उ. प्र. सारख्या गुंतागुंतीच्या राज्यात मुख्यमंत्रीपदावर नेमणे योग्य नाही. मोदी जेव्हा २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच झाले होते तेव्हा त्यांनाही प्रशासकीय अनुभव अजिबात नव्हता. किंबहुना ते त्यापूर्वी एकही निवडणुक लढलेले नव्हते. परंतु त्यांच्याबद्दल इतर कोणतेही आक्षेप नव्हते कारण त्यांची पाटी कोरी होती. परंतु योआंचा मागील १९ वर्षांचा इतिहास वादग्रस्त आहे. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा जातीयवाद, ध्रुवीकरण असे अनेक आक्षेप त्यांच्याबद्दल होते. परंतु त्यांनी २०१४ च्या निवडणुक प्रचारात व त्यानंतरही अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्ववाद, जातीयवाद असे वादग्रस्त मुद्दे बहुतांशी दूर ठेऊन फक्त विकास व भ्रष्टाचारमुक्त शासन याच मुद्द्यांवर प्रचार केला होता. ते पंतप्रधान झाल्यानंतर योआ, गिरीराज सिंह, साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती इ. अनेक वादग्रस्त साधुसंन्यासी वादग्रस्त विधाने करीत असताना मोदींनी त्यांना प्रोत्साहन न देता विकासाच्या मुद्द्यांवरच लक्ष केंद्रीत केले होते. किंबहुना मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ही मंडळी चेकाळून जिंगोइझमचे प्रदर्शन करीत होती. आता यांच्यातलाच एकजण मुख्यमंत्री झाल्याने ही मंडळी अधिक उन्मादी विधाने करण्याची दाट शक्यता आहे. योआ त्यांना प्रतिबंध घालू शकतील असे वाटत नाही कारण ते त्यांच्यातूनच आलेले आहेत. उ. प्र. ला धार्मिक ध्रुवीकरणाची आवश्यकता नसून इन्फ्रस्ट्रक्चर व विकासाची आवश्यकता आहे. शिवराजसिंग चौहान, नितीशकुमार, नवीन पटनाईक इ. नी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या प्रगतीवरच लक्ष केंद्रीत केल्याने मागील काही वर्षांत त्यांच्या राज्यांची परिस्थिती सुधारत आहे. उत्तर प्रदेश अजूनही खूप मागे आहे कारण मुलायम, मायावती, भाजप, काँग्रेस यांनी आपापला धार्मिक/जातीय अजेंडा पुढे रेटला होता. लालूने बिहारमध्ये १९९० ते २००५ या कालखंडात अशाच पद्धतीने यादव-मुस्लिम राजकारण करून स्वतःचे आसन शाबूत ठेवले होते, परंतु त्यामुळे विकास हा मुद्दा पूर्ण दुर्लक्षित राहिला. तिथे फक्त जातीयवाद व गुन्हेगारीची वाढ झाली. त्यामुळेच उ. प्र. व बिहार या राज्यातून हाताला फारसे काम नसलेल्यांचे लोंढे दिल्ली, मुंबई इ. शहरात स्थलांतरीत झाले व तिथेही कायदासुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला. परप्रांतीय स्थलांतरीत तर आता महाराष्ट्राच्या अगदी छोट्या शहरातही घुसले आहेत. हे सर्व कमी करायचे असेल तर उ. प्र. मध्येच उद्योगधंदे, रोजगार इ. मध्ये वाढ होणे आवश्यक आहे. धार्मिक ध्रुवीकरणातून उन्माद वाढू शकेल परंतु त्यातून उद्योगधंदे, रोजगार इ. मध्ये वाढ होणार नाही. योआ दुर्दैवाने लालूच्याच मार्गाने जाऊन उ. प्र. ला उलट दिशेने नेतील अशी भीति वाटत आहे. भाजपला उ. प्र. मधील ३१२ आमदार व ७३ खासदार यातून योआ हेच मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात लायक उमेदवार का वाटले असावे हे अनाकलनीय आहे. राजनाथ सिंह, दिनेश शर्मा, मजोज सिन्हा, केशवप्रसाद मौर्य असे तुलनेने अनेक जास्त लायक नेते उपलब्ध असताना योआंना मुख्यमंत्री बनविण्यामागे नक्की काय धोरण आहे ते समजत नाही. मोदींच्या विकाचाच्या अजेंड्याशी योआ हे पूर्णपणे विसंगत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यवरून भाजप जिंकली आहे . विकासावरून नाही . त्यामुळे योगी आदित्यनाथ हे सर्वोत्तम ऑप्शन होते . अजून एक मोदींचा पण विकासाचा अजेन्डा वैग्रे काही नाही आहे ज्या त्या काळात जी कामे व्हायला हवी त्यावर स्वार होणे हा विकासाचा अजेंडा नसतो . काँग्रेस ची चतुराई भाजप दाखवत आहे . आम्हीच गरिबांचे तारणहार बोले कि संपलं. त्याला भावनिकतेची आणि विकासाची जोड द्यायची . जातीयवाद तर आहेच .

In reply to by वरुण मोहिते

>> मोदींच्या विकाचाच्या अजेंड्याशी योआ हे पूर्णपणे विसंगत आहेत. पहिल्या तीन शब्दांवर काही लोकांचा अजूनही विश्वास आहे ही मौजेची गोष्ट आहे. भाजप ने खरं तर या सर्व लोकांना स्पष्ट संदेश दिला आहे.

In reply to by मोदक

कसं बनवल !!! टुक टुक हाच आमचा खरा अजेंडा होता. उत्तरप्रदेशसारखे मोठे राज्य आता हाती आले आहे. आता आमचा खरा अजेंडा राबवणार. विकास म्हटल्यावर तुम्ही लोक आले आमच्या मागे. चला फुटा आता.

अपेक्षेप्रमाणे श्री.रा.रा संजय राऊत आदित्यनाथांच्या मुख्यमंत्रीपदी झालेल्या निवडीविषयी बोलले आहेत. आदित्यनाथांनी 'वादग्रस्त वक्तव्ये न करता केवळ विकासाचीच भाषा बोलावी' असा उपदेश या महाशयांनी केला आहे. त्यामुळे आयरनी परत एकदा शंभर नाही तर हजार मरणे मेली असेल. या पेंग्विनसेना वाल्यांचे समजत नाही. हे लेकाचे स्वतः कधीही विकासाची भाषा बोलणार नाहीत. महापालिका निवडणुकांच्यावेळी तुमचा नक्की पॉझिटिव्ह अजेंडा काय हा प्रश्न कित्येकवेळा विचारूनही हे त्याविषयी काहीही बोलायला तयार नव्हते (बरोबर आहे कसे बोलणार--- आड्यात नाही तर पोहार्‍यात कुठून येणार). सतत पेटवापेटवीची भाषा करणारे, काल्पनिक शत्रू उभे करून त्यांची भिती लोकांना दाखवून आपणच त्या काल्पनिक शत्रूंचे तारणहार म्हणून स्वतःला पुढे आणून मते मिळवणारे हे पेंग्विनसेनेचे लोक इतरांना उपदेश करायला मात्र सगळ्यात पुढे.

मला देखील योगी आदित्यनाथ ही व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून पचनी पडत नाहीये. तसेच २-२ उपमुख्यमंत्री कशाला केलेत ते देखील समजत नाहीये. २ उपमुख्यमंत्री असताना नक्की कुणाचा अधिकार मोठा हे कसे ठरते? पर्रीकरांनी गोव्यात परत जाण्याचा घेतलेला निर्णय अजिबात आवडलेला नाही. देशहित लक्षात घेऊन त्यांनी संरक्षण मंत्री ह्या पदावर काम करत राहणे योग्य होते असे वाटते. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून 'व्यापक देशहित' ह्या नावाखाली त्यांना दिल्लीत हलवले होते तर आता 'गोवा' हाताचे जाऊ नये म्हणून देशहिताला तिलांजली दिली असे समजावे का?

In reply to by अभिजीत अवलिया

राज्यात दोन उपमुख्यमंत्री होणे हा प्रकार यापूर्वीही झाला आहे. १९९३ मध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार (अनेकांसाठी अनपेक्षितपणे) आले. त्यावेळी मुख्यमंत्री झाले दिग्विजयसिंग. त्यांच्या मंत्रीमंडळात सुरवातीला सुभाष यादव आणि प्यारेलाल कंवर हे दोन उपमुख्यमंत्री होते.
२ उपमुख्यमंत्री असताना नक्की कुणाचा अधिकार मोठा हे कसे ठरते?
घटनात्मक दृष्टीने उपमुख्यमंत्री असे कुठचे पदच नसल्यामुळे हा प्रश्न उभा राहू नये. त्यामुळे इतर सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांना समकक्ष असे हे दोन उपमुख्यमंत्री असतील.
पर्रीकरांनी गोव्यात परत जाण्याचा घेतलेला निर्णय अजिबात आवडलेला नाही. देशहित लक्षात घेऊन त्यांनी संरक्षण मंत्री ह्या पदावर काम करत राहणे योग्य होते असे वाटते. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून 'व्यापक देशहित' ह्या नावाखाली त्यांना दिल्लीत हलवले होते तर आता 'गोवा' हाताचे जाऊ नये म्हणून देशहिताला तिलांजली दिली असे समजावे का?
तो निर्णय आपल्यासारख्यांना आवडला नाही हे नक्कीच. पर्रीकरांनी अधिक वरीष्ठ पातळीवर काम केले असते तर ते चांगले झाले असते. पण ते दिल्लीत फार खूष नव्हते हे उघडच होते. तसेच मधूनमधून पर्रीकरांना गोव्यात परत जायचे अशा स्वरूपाच्या बातम्याही येत असत. जर स्वतः पर्रीकरांची इच्छा नसेल तर त्याला कसलाच आणि कोणाचाच इलाज नाही. कोणालाही कितीही पात्रता असली तरी स्वतःच्या इच्छेविरूध्द एखाद्या पदावर काम केलेच पाहिजे अशी सक्ती कशा करणार?

आजच्या लोकसत्तात गिरीश कुबेर यांनी काँग्रेस + डावे = भाजप हा लेख लिहिला आहे. एकंदरीत लेख गिरीश कुबेर स्टाईलच आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करत नाही. पण याच लेखात त्यांनी एक तपशीलातील मोठी चूक केली आहे. त्यांनी म्हटले आहे--"बहुजन समाज पक्षाच्या केशव प्रसाद मौर्य यांनाही भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपले म्हटले. इतकेच नाही, तर त्यांच्या हाती उत्तर प्रदेश राज्याची धुरादेखील दिली". एका आघाडीच्या दैनिकाचा संपादक अशी तपशीलातील एवढी मोठी चूक कशी करू शकतो हेच समजत नाही. केशवप्रसाद मौर्य हे बसपामधून आयात केलेले नेते नाहीत. ते पहिल्यापासून भाजपमध्येच आहेत. २०१४ मध्ये ते फूलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. लक्ष्मीकांत वाजपेयींनंतर त्यांना मागच्या वर्षी उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष बनवले गेले. तर बसपामधून भाजपमध्ये आयात झालेले 'स्वामीप्रसाद मौर्य' आहेत (केशवप्रसाद नव्हे). हे स्वामीप्रसाद मौर्य २०१२ ते २०१६ या काळात उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. कुबेरांनी या दोन मौर्यांमध्ये गोंधळ घातला आहे. डिसेंबर २०१४ मध्ये झारखंड विधानसभा निवडणुक झाल्यानंतर झारखंडमध्ये काँग्रेसचे जोगी हे नेते होते असे बिनदिक्कतपणे कुबेर यांनी सांगून टाकले होते. वास्तविकपणे हे जोगी (अजित जोगी) झारखंडमधील नव्हे तर छत्तिसगडमधील काँग्रेसचे नेते होते (आता ते काँग्रेसमध्ये नाहीत. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे). तसेच ते छत्तिसगडचे मुख्यमंत्रीसुध्दा होते. तपशीलातले इतके मोठे घोळ लोकसत्तासारख्या दैनिकाच्या संपादकांकडून नक्कीच अपेक्षित नाहीत. एकूणच गिरीश कुबेर यांच्यामुळे लोकसत्ताविषयीचे पूर्वीचे मत होते ते खराब झाले आहे. पूर्वी त्यांचे लेख बरे वाटायचे पण गेल्या चारेक वर्षांपासून अगदीच सुमार दर्जाचे लेख त्यांनी पाडले असे वाटायला लागले. विशेषतः याकूब मेमनच्या फाशीनंतरचा त्यांचा लेख आणि मदर तेरेसांवरचा लेख लिहून 'धार्मिक भावना दुखावू नयेत' म्हणून मागे घ्यायचा पळपुटा प्रकार अजिबात आवडला नव्हता.

In reply to by गॅरी ट्रुमन

मदर तेरेसांवरचा लेख लिहून 'धार्मिक भावना दुखावू नयेत' म्हणून मागे घ्यायचा पळपुटा प्रकार अजिबात आवडला नव्हता --- हा लेख मागे घेण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला होता असे ऐकिवात आले. तसे केल्याने लेखाची जास्त प्रसिद्धी झाली, खूप लोकांनी तो वाचला आणी आपला विचार कुबेरांना/लोकसत्ताला जास्त जनतेपर्यंत पोचवता आला. खरे खोटे फक्त गिरीश कुबेर आणी लोकसत्ता जाणो.

In reply to by गॅरी ट्रुमन

लोकसत्ता आणि त्याचे संपादक गिरिष कुबेर हा माणूस एक नंबरचा कॉंग्रेसी भाट आहे, परवा "‘ती’ तगायला हवी.." ह्या अग्रलेखात ह्या भाटाने भाजपाला मतदान करणार्‍या सर्व मतदारांना मोदींचे भक्त व बौद्धिक पात्रता नसलेला मतदारवर्ग असे सरसकट सर्टीफिकेट देऊन टाकले. त्या अग्रलेखात हा भाट म्हणतो-- परंतु आंधळ्या मोदीप्रेमात वाहून गेलेला मतदारांचा एक वर्ग विरोधकांच्या टीकेस भीक घालावयास तयार नाही. या आंधळ्या मतदारांच्या मते सध्या काही तरी भरीव घडवून दाखवण्याची क्षमता असलेला एकमेव नेता राजकीय रणांगणावर आहे. तो म्हणजे मोदी. अर्थात हे काही तरी भरीव म्हणजे काय हे सांगण्याची बौद्धिक पात्रता या मतदारवर्गात नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

आजच्या लोकसत्ता मध्ये लालकिल्ला आणि अन्वयार्थ या दोन सदरात परस्पर विरोधी दावे केलेत. एकात म्हटलंय मोदी-शहांना आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय दबावाखाली घेण्यास भाग पाडले गेले आणि एकात म्हटलंय की मोदी-शहांनी दबावाखाली हा निर्णय नक्कीच घेतला नाही. भंजाळलाय कुबेर आणि लोकसत्ता पण.

In reply to by प्रसाद_१९८२

'ती' अजिबात तगायला/जगायला नको. 'ती' म्हणजे भ्रष्टाचार, 'ती' म्हणजे गुन्हेगारी, 'ती' म्हणजे जातीयवाद, 'ती' म्हणजे मुस्लिमांचे लांगूलचालन, 'ती' म्हणजे देशद्रोह्यांना पाठिंंबा . . . 'ती'ने ६५ वर्षांत वाट लावली आहे. अशी 'ती' जितक्या लवकर संपेल तितके भारतासाठी चांगले होईल. निदान 'ती'च्या सध्याच्या स्वरूपात तरी 'ती' जिवंत रहायला नको. भारतात एकवेळ विरोधी पक्ष नसला तरी चालेल, परंतु 'ती' विरोधी पक्षाच्या भूमिकेत सुद्धा नको. आपण जगायचे का मरायचे हे 'ती'नेच ठरवायला हवे व त्यानुसार 'ती'ने स्वतःला बदलायला हवे. 'ती' तगेल/जगेल का याची इतरांनी काळजी करण्याची गरज नाही.

योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदावरची निवड ही मोदींची अपरिहार्यता वाटते. लोक अश्या आक्रमक हिंदुत्ववादाला भुलतील का ह्याची चाचपणी करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. लोकांना विकासाचे गाजर दाखवले तर खरे मात्र प्रत्यक्षात विकासाची फळे चाखायला अधीर झालेल्या लोकांना २०१९ साली परत त्याच जुमल्यांचा मोह पडणार नाही याची शहा-मोदींना कल्पना आहे. अर्थव्यवस्थेत मुलभूत सुधारणा, मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात नोकर्‍यांची निर्मीती, शिक्षण, शेती, आरोग्य या क्षेत्रात अमुलाग्र सुधारणा, राष्ट्रिय हित केंद्रीत परराष्ट्र धोरण आदी गोष्टींची पुर्तता झाली नाही तर लोक निराश होऊन परत काँग्रेसकडे वळतील की काय याची साधार भिती भाजप व संघाला आहेच. मात्र जर आक्रमक हिंदूत्वावर मते मिळणार असतील तर तेच धोरण म्हणून अवलंबले जाईल याची शक्यता वाटते. योगींची प्रतिमा, त्यांची अत्यंत निरर्गल विधाने, त्यांच्यावरचे गुन्हे, त्यांची प्रायव्हेट आर्मी या सगळ्यांकडे मोदी अ‍ॅसेट म्हणून बघत नसतीलच याची खात्री वाटत नाहीये. तसंही, योगींकडे २०२४ सालासाठी पंप्रपदाचा उमेदवार म्हणून बघत असल्याच्या बातम्या येतच आहेत. सध्यापुरतं योगींचं अभिनंदन, उत्तरप्रदेशमे रेहना है, तो योगी योगी केहना होगा.

In reply to by पुंबा

परत काँग्रेसकडे वळतील की काय याची साधार भिती भाजप व संघाला आहेच. त्या आघाडीवर चिंता नसावी,लोक काँग्रेस कडे वळणार नाहीत याची खबरदारी खुद्द कुमार राहुल गांधी जातीने लक्ष घालून घेत आहेत याची नोंद घ्यावी.

In reply to by पुंबा

हे खरंच डेंजर आहे. मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे. आधीच देश लोकसंख्या, भ्रष्टाचार आणि जातीवादाच्या विळख्यात आहे. हे राममंदीर म्हणजे नवी आणि कायमची डोके दुखी होणार आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

>> मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे. फारच पॉझिटिव्ह विचार करता बुवा तुम्ही !! त्यांची निवड त्यांनी १५ वर्षांपूर्वी सिद्ध केलेल्या क्रेडेन्शिअलमुळे झाली होती.

In reply to by नितिन थत्ते

मग याच न्यायाने १९८४ सालच्या क्रेडेंशिअलमुळे १९९९ साली काँग्रेसचे सरकार सत्तेत हवे होते. =)) बाकी २०१४ चे घाव अजुन ताजे आहेत हे बघून करमणूक होत आहे. सध्याची परिस्थिती आहे तसेच राजकारण राहिले तर २०२४ पर्यंत आंतरजालीय अश्वत्थामा पदाला नक्की पोहोचाल याची खात्री आहे.. (ह घ्या.)

In reply to by मोदक

>>१९९९ साली काँग्रेसचे सरकार सत्तेत हवे होते. ८४ चे क्रेडेन्शिअलवाले ९१ मध्ये खपले म्हणतात !!! ९९ मध्ये कसं निवडून येणार?

In reply to by नितिन थत्ते

चला.. म्हणजे राजीव गांधींनी शिखांचे शिरकाण केले हे तरी मान्य केलेत..!! हे ही नसे थोडके..

In reply to by मोदक

>>२०१४ चे घाव अजुन ताजे आहेत हे बघून करमणूक होत आहे. २०१४ च्या जुमल्यांवर अजून विश्वास आहे हे बघून आमची पण करमणूक होत आहे.

In reply to by नितिन थत्ते

२०१४ च्या जुमल्यांवर अजून विश्वास आहे डोळे उघडे ठेवून वावरले की विश्वास बसतो. तुम्ही पेडगांवची एस्टी पकडली त्याला आंम्ही काय करणार. ;)

In reply to by संजय क्षीरसागर

मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे. हे कधी झाले म्हणे..?? २०१४ च्या प्रचारा दरम्यान "गुजरात मॉडेल" वगैरे कांही कानावर आले होते का तुमच्या..?

In reply to by संजय क्षीरसागर

मोदींची पंतप्रधानपदासाठी निवडच मुळी, हा एकमेव पठ्ठ्या राममंदीर बांधेल या उभारेल म्हणून झाली आहे
याला काही संदर्भ?

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही काय बोलताय हे स्पष्ट कराल का? तुमचं वरचं वाक्य, तो विडिओ आणि त्याखालाची २०१४ वाली प्रतिक्रिया यांचा एकमेकांशी काहीही संबंध दिसत नाही.

मणीपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंग यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला आहे. ६० सदस्यांच्या विधानसभेत ठरावाच्या बाजूने ३२ मते आली.

योगी आले तर ? वेळ द्या कि .. सगळ्यांना वेळ द्यायला हवा . जो लोकशाही प्रक्रियेत निवडून येतो त्या सगळ्यांना . बाकी गिरीश सर अति हुशार होण्याच्या कॅटेगरीत गेलेत किंवा अंदाज आहे टाइम्स चे जैन आणि गोयंका या विरुद्ध हि लढाई नेहमीच असते .

एक समजत नाही. मोदी आणि त्यांची टीम अनेक धाडसी , सामान्यांच्या अपेक्षेपेक्षा / आकलनापेक्षा वेगळे निर्णय धडाक्यात घेतात व ते तडीसही नेतात. आपल्याला जे जाणवते आहे - यो.आ.चे प्रॉब्लेमस वगैरे ते त्यांना कळले नसतील का? स्वता:च्या पायावर कुर्हाड मारण्यातले मोदी वाटतात का? मला तरी मोदींच्या सगळ्या चाली ह्या एका मोठ्या प्लानचा भाग असल्याचे वाटत राहते जो सामान्यांच्या आकलना बाहेर आहे. विश्वास एवढाच की तो प्लान देशाच्या फायद्याचा नक्कीच असेल. ह्याला ज्या दिवशी तडा जाईल तेंव्हां मोदींना भीरकवून देण्याची क्षमता भारताच्या जनतेत नक्कीच आहे.

ती हत्तीणीबाई, ती मुलायम पार्टी चालली इतक्या दिवस मग योगींचा पण अनुभव घेतला पाहिजे जनतेने. काही विशेष फरक पडणार नाही भारतीय राजकारणावर. सामान्य जनतेला नक्की काय हवंय याची अचूक नस मोदींना सापडली आहे. त्यामुळे अजून ७ वर्ष असेच चालेल. नंतर येणारे कदाचित मागच्या १० वर्षाला दूषणे देत बसतील आणि विरोधात बसणारे आयत्या पिटावर रेघोट्या मारत आहेत म्हणून सत्ताधाऱ्याना हिणवतील. बाकी काल शपथ विधी समारंभ पाहिला. योगीजीं खूप नर्वस वाटले. पुढील वाटचालीला त्यांना शुभेच्छा..!!

In reply to by विशुमित

योगीजीं बद्दल मीडिया प्रतिमा रंगवली जातीय तशी नसावी बहुदा. शितावरून भट कसा शिजेल ते कळेलच लवकर. http://www.loksatta.com/desh-videsh-news/yogi-adityanth-gorakhpur-const…

In reply to by विशुमित

लष्करात असताना उत्तरप्रदेशात प्रत्यक्ष राहून पाहिलेली स्थिती आणि आजही असंख्य मित्र तेथे आहेत( माझे दोन्ही रूम पार्टनर उत्तरप्रदेशातीलच होते. आग्रा आणि लखनौ) त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कात असल्याने मला जे एक चित्र डोळ्यापुढे उभे राहिलेले आहे ते असे. उत्तर प्रदेशात मुस्लिम लांगुलचालन करण्यात काँग्रेस सपा आणि बसपा यांनी कोणतीही कसर कधीही सोडलेली नव्हती. यामुळे तेथील मुल्ला मौलवींना (यात गरीब सर्वसामान्य मुसलमान येत नाहीत) एक तर्हेचा माज होता कि कोणतेही सरकार येवो आम्ही "म्हणू तसे करून दाखवू" शकतो. त्यात तीन तलाक (आणि बहुपत्नीत्वालाला) उघड विरोध करण्याची श्री मोदी आणि अमित शाह यांनी हिम्मत दाखवल्यामुळे अर्धशिक्षित मुसलमान महिलांनी थोड्या प्रमाणावर का होईना भाजपाला मतदान केले आहे. तलाक पीडित महिला आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईक महिला यांनी त्यांची वाताहत जवळून पाहिल्यामुळे त्यांनी असे मतदान केले असावे. नवरा रागाच्या भरात केंव्हाही तलाक देईल या डेमोक्लीसची तलवार डोक्यावर लटकत अर्धे आयुष्य काढणाऱ्या गरीब मुसलमान स्त्रियांना हा दिलासा वाटला असण्याची शक्यता आहे. त्यातून पूर्वी मुलायम सिंहांचे आणि आता अखिलेशचे सपाचे सरकार हे निर्लज्ज पणे यादव या जातीला सरकारी नोकऱ्या किंवा खिरापती वाटणे झुकते माप देत होते. पोलीस भरती मध्ये केवळ यादव आडनाव असल्याने नियम डावलून असंख्य यादवांना भरती केले होते इतके निर्लज्ज पणे जातीयवाद करणारे लोक हे सेक्युलर म्हणून म्हणवले जातात याची शरम वाटेल. http://www.dnaindia.com/india/report-up-government-to-appointment-35000… http://www.amarujala.com/india-news/high-court-stays-on-up-police-const… http://timesofindia.indiatimes.com/india/Yadavization-of-UP-cops-behind… येन केन प्रकारें यादव लोकांना पोलिसात भरती करण्याची हि निर्लज्ज कसरत अखिलेश यादव ना महागात पडली असेच दिसत आहे शिवाय त्यांची अंतर्गत लाथाळी मुलायम वि अखिलेश लोकांना न पटणारी होती. मायावतींच्या भ्रष्टचारातुन मिळवलेल्या संपत्तीचे उघड किळसवाणे प्रदर्शनहि लोकांच्या डोळ्यात येत होते. त्यांच्या प्रसादतुल्य राजवाड्याचे प्रदर्शन आणि त्याचे दलित स्त्रीने असे वैभव मिळवले हे लोकांच्या डोळ्यात खुपते हे निर्लज्ज समर्थन हि लोकांना न पटणारे होते. अखिलेश यादव यांची तुलना लोक बाजूच्या नितीश कुमार आणि श्री मोदी यांच्याशी करत असताना अखिलेश कुमार फिके पडताना दिसत. अशा सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून आनि श्री अमित शाह यांचे "यादव सोडून इतर मागास जाती(OBC) आणि जातव सोडून अन्य मागासवर्गीय जाती(SC) याना चुचकारून आपल्याकडे वळवून घेणे या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे एवढ्या प्रचंड मताधिक्याने भाजप निवडून येणे हे आहे. अमित शाह यांचे बेरजेचे गणित कितीदा अचूक निघेल याची त्यांना स्वतःला सुद्धा कल्पना नसावी. एकही मुसलमान उमेदवाराला तिकीट न देता भाजप प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याने तेथील मुसलमान नेते आणि मुल्ला मौलवि हे सध्या बावचळलेल्या स्थतीत आहेत. जर ११ मे च्या शेवटच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक घटनाबाह्य आहेत असा निकाल दिला तर त्याची ताबडतोब अंमलबजावणी करून भाजप ला त्याचे पूर्ण श्रेय हि घेता येईल. भाजप ला इतके मोठे बहुमत मिळाल्यामुळे आणि दहा लाख मुसलमान महिलांनी तीन तलाक विरुद्ध अर्जावर सह्या केल्याने http://www.timesnow.tv/india/article/over-1-million-muslim-women-sign-p… आता मणिशंकर अय्यर सारखा हलकट माणूस सुद्धा तीन तलाक विरुद्ध उभा राहिला आहे. शाहबानो खटल्याविरुद्ध घटना दुरुस्ती करणारे हेच लोक आता मुस्लिम वैयक्तिक कायदा घटनेच्या आणि मूलभूत मानवी अधिकाराच्या विरुद्ध आहे अशी कोल्हेकुई करताना पाहून मौज वाटते. http://indianexpress.com/article/india/sc-should-come-out-with-positive… हे श्रेय घेऊन जर भाजप २०१९ च्या निवडणुकीत मुसलमान महिलांची ३० % मते जरी मिळवण्यात यशस्वी झाले तर आपल्याला रस्त्यावर यावे लागेल या भीतीने काँग्रेस सपा आणि बसपा सध्या भयभीत अवस्थेत आहेत. मायावतीना राज्यसभेत निवडून येण्यासाठी पुरेसे आमदार नसल्याने कुणाकडे तरी भीक मागावी लागणार आहे, पण उघड्याकडे नागडा गेला अशी स्थिती इतर पक्षांची असल्याने आपले काय होणार याची चिंता त्यांना आजच भेडसावते आहे. योगी आदित्यनाथ हे जरी कडवे हिंदूत्ववादी असले तरीही त्यांना तोंड गप्प ठेवायला सांगितले असून त्यांना दोन वर्षे दिली आहेत. २०१९ च्या लोकसभेत जर त्यांना उत्तर प्रदेशात बहुतेक सीट टिकवत्या आल्या तर त्यांना पुढचे दिवस सत्तेत राहता येईल असे सांगितले गेले असावे.

In reply to by सुबोध खरे

पण योगी आदित्यनाथ हा पार कपड्यांपासून भगवा आणि एकदम भडक माणूस आहे. मोदींची सुद्धा राममंदीर बांधाल्याशिवाय आपली कारकिर्द व्यर्थ ही भावना आहेच. या भानगडीत ते राममंदीर ही देशाला नवी डोके दुखी होईल.

In reply to by सुबोध खरे

त्यातून पूर्वी मुलायम सिंहांचे आणि आता अखिलेशचे सपाचे सरकार हे निर्लज्ज पणे यादव या जातीला सरकारी नोकऱ्या किंवा खिरापती वाटणे झुकते माप देत होते.>>> -- या कारणामुळेच सपा आवडत नव्हती. त्यांच्यापेक्षा योगीजीं परवडले.

In reply to by सुबोध खरे

सुबोधजी, शेवटची दोन वाक्ये सोडून बाकीचा प्रतिसाद एकदम योग्य आहे. योगींचे उपद्रवमुल्य खूप आहे हो. ते असे अमीत शहा- मोदींना घाबरणारे नाहीत. On the contrary, through his rabble rousing and militant hindu fanaticism, he weild more power. अर्थात असे झाले नाही तर आनंदच होईल.

सौरा,
ती असा विचार करावा लागण्याचे समर्थन करत नाहीये किंवा असा विचार करावा असं म्हणत नाहीये.
मीही उपरोधानेच लिहिलंय! :-) म्हणे गप्प बसणं बॉलीवूडला भोवतंय! च्यायला, दाऊदच्या पैशावर मजा मारणं कधी नाही भोवलं ते बॉलीवुडास? लोकभावना पायदळी तुडवल्या गेल्याचा प्रखर अनुभव आला की आपोआप अक्कल येते. लकडीशिवाय मकडी वळंत नाही हेच खरं. आ.न., -गा.पै.