Skip to main content

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 09/03/2017 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे. तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे. ________________________________________________________________________________________________

१) उत्तर प्रदेश

अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०) ब) टाईम्स नाऊ भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४) क) एबीपी न्यूज भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१) ई) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२) ________________________________________________________________________________________________

२) उत्तराखंड

अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (३८), काँग्रेस (३०) क) न्यूज-२४ भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२) ड) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१) ई) टुडेज चाणक्य भाजप+ (५३), काँग्रेस (१५) फ) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (३८), काँग्रेस (२६) ________________________________________________________________________________________________

३) पंजाब

अ) इंडीया टुडे-अ‍ॅक्सिस अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५) क) न्यूज-२४ अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३) ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७) ई) सीएनएन-न्यूज १८ अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१) ________________________________________________________________________________________________

४) गोवा

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४) ब) इंडिया न्यूज- एमआरसी भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८) क) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)

५) मणिपूर

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५) ब) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५) ________________________________________________________________________________________________ इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल. http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly…

वाचने 30053
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by आनन्दा

१) गोव्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांना मतदारांनी पराभूत केले आहे. २) भाजपला दुसर्‍या क्रमांकाच्या म्हणजे १३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला त्यापेक्षा अधिक म्हणजे १७ जागा आहेत. ३) काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले नसले तरी मतदारांनी अतिशय स्पष्टपणे भाजपला नाकारले आहे. भाजपने सत्ताधारी पक्ष न होता विरोधातच बसावे असा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. ४) ज्या गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळविला आहे त्याच पक्षाने 'भाजप हटाव' अशी मोहीम उघडून भाजपविरोधात निवडणुक लढविली होती. नैतिकदृष्ट्या अशा पक्षाबरोबर सरकार स्थापन करणे योग्य नाही. ५) केंद्रातील संरक्षण खात्याचे मंत्री हे अत्यंत महत्त्वाचे व मोठे पद सोडून गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परत येणे ही पर्रीकरांची पदावनती आहे. ६) फडणविसांना महाराष्ट्रातून केंद्रात आणून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री करणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. फडणविस महाराष्ट्रात उत्तम काम करीत आहेत. त्यांना हलविणे चुकीचे ठरेल. त्यांनी शिवसेनेला नेस्तनाबूत करत आणले असून मुंबई-ठाणे या दोन शहरांच्या आत शिवसेनेला बंदिस्त करून टाकले आहे. तसेच चंद्रकांत पाटील, गडकरी, दानवे, मुनगंटीवार इ. नेत्यांना शिवसेनेबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे ते उद्धव ठाकर्‍यांसमोर दबून राहतील व शिवसेनेला भाजपपेक्षा वरचढ होऊन देतील. उद्धव त्यांच्यासमोर प्रचंड माज करून दबाव आणेल. पर्रीकरांना गोव्यात आणणे ही चू़क ठरेल. तसेच फडणविसांना दिल्लीत नेणे ही देखील चूकच ठरेल. ७) मुंबईत शिवसेनेसमोर उभे राहून संघर्ष करण्याची आवश्यकता होती. जमल्यास फोडाफोडी करून आपला महापौर निवडून आणायला पाहिजे होता. परंतु भाजपने तिथे शेपूट घातली आणि गोव्यात फोडाफोड करणे अयोग्य असताना तिथे व मणिपूरमध्ये जनादेशाचा अवमान करून स्वतःचे सरकार आणण्याची निषेधार्ह धडपड सुरू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी.. शिवसेनेमुळे फडणवीस आणखी १० वर्षे कुठे जात नाहीत. काळजी करू नका. तसेच तुमचीच विधाने बघा.. ३) काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले नसले तरी मतदारांनी अतिशय स्पष्टपणे भाजपला नाकारले आहे. भाजपने सत्ताधारी पक्ष न होता विरोधातच बसावे असा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. ४) ज्या गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळविला आहे त्याच पक्षाने 'भाजप हटाव' अशी मोहीम उघडून भाजपविरोधात निवडणुक लढविली होती. नैतिकदृष्ट्या अशा पक्षाबरोबर सरकार स्थापन करणे योग्य नाही. (i) मुंबईत शिवसेनेसमोर उभे राहून संघर्ष करण्याची आवश्यकता होती. जमल्यास फोडाफोडी करून आपला महापौर निवडून आणायला पाहिजे होता. (ii) गोव्यात फोडाफोड करणे अयोग्य असताना तिथे व मणिपूरमध्ये जनादेशाचा अवमान करून स्वतःचे सरकार आणण्याची निषेधार्ह धडपड सुरू आहे. पहिली दोन आणि नंतरची दोन विधाने परस्पर विरोधी नाहीत का..? फोडाफोडी निषेधार्ह असेल तर सगळीकडेच निषेधार्ह असली पाहिजे.

In reply to by मोदक

१) गोव्यात भाजप सत्ताधारी पक्ष होता. मुंबईत भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत असला तरी भाजपची भूमिका दुय्यम होती. त्यामुळे मुंबईत मतदारांनी भाजपला नाकारले असे अंशतः म्हणता येईल. अर्थात मोठा भागीदार असलेल्या शिवसेनेबद्दल हे जास्त प्रमाणात म्हणता येईल. २) गोव्यात एकूण फक्त ४० आमदार आहेत. ४० आमदारांच्या तुलनेत भाजप व काँग्रेसमधील असलेला ४ आमदारांचा फरक बर्‍यापैकी मोठा आहे (एकूण आमदार संख्येच्या १०%). त्या तुलनेत मुंबईत २२७ नगरसेवक असून भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या एकूण संख्येत फक्त २ इतकाच फरक आहे. २२७ च्या तुलनेत २ हा फरक खूप कमी आहे. भाजप व शिवसेनेला जवळपास समान जागी विजय मिळालेला आहे व त्यांच्यातील फरक अत्यल्प आहे (एकूण नगरसेवकांच्या १% पेक्षाही कमी). त्यामुळे खरं तर मतदारांनी दोघांना जवळपास समान कौल दिला आहे. एकतर दोघांनाही नाकारले आहे किंवा दोघांनाही स्वीकारले आहे असे म्हणता येईल. गोव्यात भाजपला मतदारांनी स्पष्ट्पणे नाकारले आहे हे नक्की. ३) शिवसेनेने भाजपविरूद्ध प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली होती. शिवसेना हा सातत्याने राज्य सरकारच्या कामात अडथळे आणत आहे. अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे. गोव्यात भाजप व काँग्रेसमधील वैरभावना इतक्या टोकाला गेलेली नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

हे लॉजिक मला पटले नाही. पण असो, यावर आपले एकमत होणार नाही. अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे याला किमान दोन पिढ्या लागतील, एकवेळ १० - २० वर्षात क्रमाने उतरत जाऊन निष्प्रभ होतील पण इतक्या लवकर नेस्तनाबूत होणार नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

यात काय नैतिक आहे आणि काय अनैतिक आहे यावर भाष्य करत नाही. कारण कोणाही राजकारण्याची नैतिकतेच्या मुद्द्यावरून बाजू घेऊन वादावादी करणे म्हणजे तोंडघशी पडायची रेसिपी आहे. राजकारणात कोणी नैतिक असेल असे वाटत नाही. अगदी अटलबिहारी वाजपेयींनीही कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात राजाभय्यासारखे लोक होते त्याचे 'ते आमदार म्हणून निवडून गेले आहेत तेव्हा त्यांना मंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही' असे म्हणत एका अर्थी समर्थन केले होते. तेव्हा भाष्य राजकीय आणि कायदेशीर बाजूंवर करतो. पर्रीकरांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रण देण बेकायदेशीर नाही हे आजच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढील प्रतिसाद राजकीय बाजूंवरच करत आहे. सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेबाहेर ठेऊन इतर पक्षांनी हातमिळवणी करून सरकार स्थापन करायचे प्रकार यापूर्वीही कित्येकवेळा झाले आहेत. देवेगौडा आणि गुजराल यांची संयुक्त मोर्च्याची सरकारे हे त्याचे मोठे उदाहरण आहे. आताही उत्तर प्रदेशात जर मतदारांनी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आणली असती तर परत सपा-बसपा-काँग्रेस यांचे सरकार आलेच असते. म्हणजे त्यावेळी अस्पष्ट जनादेशाचा या पक्षांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावलाच असता. प्रत्येकवेळी इतर पक्षांनी असे करून भाजप मात्र 'रिसिव्हिंग एन्डला' का? कधीतरी काँग्रेसलाही तीच दवा खिलवायला हवी या उद्देशाने हा निर्णय घेतला असेल ही शक्यता आहेच. दुसरे म्हणजे २०१४ मध्ये लोकसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, आसाम, केरळ या राज्यांमध्ये जोरदार मार खाल्ला होता. आताही उत्तराखंडमध्ये असाच मार खाल्ला आहे. अशावेळी जर पंजाबबरोबरच गोवा आणि मणीपूर ही दोन राज्ये ताब्यात आली असती तर ते बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने काँग्रेससाठी मोठे मानसिक समाधान झाले असते. ते पण मिळवू द्यायचे नाही असे भाजपने ठरविलेले दिसत आहे. त्यातूनही या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असते तर काहीच प्रश्न नव्हता.पण यावेळी त्रिशंकू विधानसभा आली आहे आणि भाजपच्या पाठीशी बहुमत उभे राहू शकत आहे. मणीपूरमध्ये तर एन.पी.एफ हा पक्ष शेजारच्या नागालँड राज्यात भाजपचा मित्रपक्षच आहे. त्या पक्षाचे चार आमदार भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहेत. काही कारणांनी पासवानांच्या लोकजनशक्तीनेही मणीपूरमध्ये विधानसभेची एक जागा जिंकली आहे. तो पक्ष भाजपचा मित्रपक्षच आहे. तो पक्षही पाठिंबा द्यायला तयार आहे. असे करून बहुमत बनू शकत असताना काँग्रेसला तडाखा द्यायचा असे भाजपने ठरविले आहे असे दिसत आहे. याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतील? कदाचित या दोन्ही राज्यात भाजपची सरकारे अस्थिर राहतील. जर का ही सरकारे पडली तर त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकेल. पण ही राज्ये लहान असल्यामुळे तिथे काहीही झाले तरी राष्ट्रीय पातळीवर भाजपवर फार परिणाम होऊ नये. पण काँग्रेसची अवस्था सध्या इतकी वाईट आहे की ही दोन सरकारे ताब्यात असणेही मोठी दिलासादायक स्थिती असती. भरपूर पैसे राखून असलेल्याला हजार रूपये गेले तर त्याचा फार परिणाम होणार नाही पण तेच हजार रूपये फार पैसे नसलेल्याला खूप महत्वाचे असतील. काँग्रेसची अवस्था सध्या तशा फार पैसे नसलेल्यासारखी झाली आहे. त्यातूनच काँग्रेसमध्ये या प्रकारामुळे स्थानिक नेते नाराज आहेत अशा बातम्या आल्या आहेत. म्हणजे इतर राज्यांमध्ये निवडणुका होतील तेव्हा केंद्रीय नेतृत्व आपल्याकडे पाहिजे तितके लक्ष देईल की नाही हा किडा त्यातून इतर राज्यांमधील काँग्रेस नेत्यांमध्ये सोडता येऊ शकतो. त्यातून ते निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरतीलच असे नाही. हा प्रकार बॅकफायर झाला तर फार तर या दोन राज्यात काँग्रेस परत सत्तेत येऊ शकेल. पण जर का ही खेळी सफल झाली तर काँग्रेसला आणखी दणका मिळू शकेल. तेवढी राजकीय जोखीम उचलायची भाजपने ठरवलेले दिसते. आणि मोदी हा नेता अशा जोखमी घ्यायला तयार असतो हे वेळोवेळी दिसून आले आहेच. या निर्णयाचे केंद्र सरकारच्या कामावर काही प्रमाणात परिणाम नक्कीच होतील. ती पण जोखीम भाजपने घ्यायची ठरविलेले दिसते. एकूणच या निर्णयाचे राजकीय पैलू बघायला हवेत आणि ती जोखीम पक्ष घ्यायला तयार आहे असे दिसते.

In reply to by गॅरी ट्रुमन

सहमत आहे. तसेही माझ्या मते गोव्यात भाजपाला मतदारांनी नाकारले वगैरे नाहीये. हे सगळे अंतर्गत दुफळीचे परिणाम अहेत. विशेषतः वेलिंगकरांचा फत़आ भाजपाला बर्‍यापैकी बसला असे ऐकून आहे. त्यामुळे पर्रीकर जर परत येणार असतील तर गोव्याचे लोक पण त्यांचे स्वागतच करतील.

In reply to by श्रीगुरुजी

मुंबईमध्ये सेना आणि भाजपला जवळपास समान संधी होती मात्र भाजपने राज्य सरकारवर संकट येऊ नये म्हणूनच शेपूट घातले. पारदर्शी पहारेकरी वगैरे बोलायच्या गोष्टी असतात. सिंचन घोटाळ्याचे ढीगभर पुरावे (सोमय्या ,फडणवीस, गिरीश महाजन यांच्या मते) असून पण अजित पवार आणि तटकरेवर कारवाई होत नाही तर मग ज्या मुंबई पालिकेमध्ये मिळून सत्ता भोगली तिथली प्रकरण कशाला भाजप बाहेर काढेल हे सेनेला माहीत आहे. फडणवीसांनी राज्य सरकार स्थिर राहावे म्हणून मुंबईच्या लढाईमधून माघार घेतली यात खरी गोची झाली ती सोमय्या, आशिष शेलार वगैरेंची!

चिक्कार उदाहरणं आहेत कि पक्ष आणि त्यासाठी त्याग करायची . पर्रीकर का अयोग्य . सरंक्षण मंत्र्याच्या हातातून राज्य जात कामा नये . केंद्रात परत येणार ते नक्की .

गोव्यात आम आदमी पक्षाचा पूर्ण बोर्‍या वाजला आहे. राणा भीमदेवी थाटात आपला पक्ष गोव्यातील ४० पैकी ३५ जागा जिंकेल असे केजरीवालांनी जाहिर केले होते. प्रत्यक्षात त्यांना अवघी ६.४% मते मिळाली आहेत. केवळ बाणावली मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. इतर सर्व मतदारसंघात आआपच्या उमेदवारांनी आपले डिपॉझिट गमावले आहे. यात कुंकोळीतून निवडणुक लढविणार्‍या आआपच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्विस गोम्स यांचाही समावेश होतो. तिथे ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होऊन तो चौथ्या क्रमांकावर फेकला जाणे ही कोणत्याही पक्षासाठी फार उत्साहवर्धक गोष्ट नाही :) दिल्लीत एकदा अभूतपूर्व यश मिळाले म्हणजे आपण जाऊ तिथे सगळीकडे तसेच यश मिळेल असा त्यांचा गैरसमज झाला होता. मग त्यातून विविध इंटर्नल सर्व्हे प्रसिध्द केले जात होते. अशाच एका सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये ११७ पैकी १०० जागा आआप जिंकणार तर गोव्यात तब्बल ४१% मते मिळणार असे इंटर्नल सर्व्हेंचे आकडे त्यांनी प्रसिध्द केले होते. या दणक्यानंतर थोडा तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा.

In reply to by गॅरी ट्रुमन

या दणक्यानंतर थोडा तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा. कुणाच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा? केजरीवालांच्या? ते तर "स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा" ! ;) वास्तवीक प्रकाश पडायलाच हवा असेल तर तमाम आपसमर्थकांच्या डोक्यात पडला पाहीजे आणि जे अगदी आपसमर्थक नसतील पण "स्वयंप्रेरीत बुद्धीवादी" असतील त्यांच्या देखील डोक्यात प्रकाश पडला पाहीजे. त्याचा अर्थ असा देखील नाही की त्यांनी मोदीसमर्थक व्हावे. पण नुसती बदनामी करून, दुसर्‍या बाजूस तुच्छ लेखून, सामान्यांना चिथावून तुम्ही टिआरपी मिळवू शकाल पण मते नाही...आता, अल्पसंख्य, जातीय वगैरेचे राज-समाजकारण खूप झाले. नौटंकी मुख्यंत्र्यांचा हवाला देणे तर अतिच झाले आहे. हे जेंव्हा समजेल तेंव्हा कुठे एक नजिकच्या काळात एखादा सशक्त विरोधीपक्ष म्हणून आणि खूप पुढच्या भविष्यात समर्थ पर्याय म्हणून उदयाला येऊ शकेल , ज्याची लोकशाहीत गरज आहे.

In reply to by विकास

हे आप'वाले 'खाईन तर तुपाशी'वाले आहेत आणि झटपट'च्या आजच्या काळात त्यांचे समर्थक आणि विरोधक पण तसच वागतात. एखाद्या नवख्या पक्षाला पंजाब मध्ये लोकसभेत ४ जागा आणि आता काही का असेना क्रमांक २ च्या जागा / विरोधी पक्ष नेतेपद हे तसे काही कमी यश नाही पण पहिल्या झटक्यात पंजाब /गोव्यात ८५-९०% जागा मिळवू वगैरे वल्गना बिनबुडाच्या असतात. पंजाबमध्ये जे मिळवले त्यावर आता सक्षम विरोधी पक्षच काम करायला हवे पण हे लोक निवडणूक एक वर्ष असताना जागे होऊन फक्त आरडा ओरडा करतात. पंजाबमध्ये आपचे ४ खासदार निवडून आले त्यातले किती बाहेर गेले / हाकलले आणि कोण पक्षात आहे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना पण माहीत नसेल.

च्या विश्लेषणाच्या प्रतीक्षेत . समजतच नाही काही >>> आकडेवारी च्या अपेक्षेत

का हरतेय काही राज्यात ) सहज म्हणून विश्लेषण कोण करेल का ?? आकडेवारी वैग्रे

In reply to by वरुण मोहिते

भाजपने गोवा आणि पंजाबात सत्ता गमावली आहे. त्यापैकी पंजाबात भाजप तसाही युतीतीलछोटा भाऊ आहे (२०१२ मध्ये सत्तेत असताना सुद्धा भाजपचे १२ आमदार होते. त्यांनी २३ मतदारसंघात निवडणूक लढवली होती. २०१७ मध्ये १२ चे ३ झाले) मुळातच भाजप पंजाबात छोटा पक्ष आहे. गेली १० वर्षे सातत्याने सत्तेत असल्यामुळे मतदारांची नाराजी त्यांना भोवली, आणि नाराजी ओढवून घेण्यात अकाली दलाने (मोठा पक्ष म्हणून) मोठाच हातभार लावला. भाजपने अकाली दलाच्या छायेतून बाहेर पडावे हेच उत्तम. गोवा: गोव्यात भाजपने ८ जागा गमावल्या (आधी २१ आमदार होते आता १३, विधानसभेच्या एकूण जागा ४०) . लक्ष्मीकांत पार्सेकर काही लोकप्रिय नव्हते. शिवाय अंतर्गत लाथाळ्यांचा, मगोप ने साथ सोडल्याचा त्यांना फटका बसला. उ. प्र आणि उत्तराखंड मध्ये तर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मणिपूर मध्ये त्यांची गेल्या निवडणुकीत एक पण जागा नव्हती, आता २१ जागा मिळवून तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. आणि इतर काही पक्षांच्या मदतीने भाजपने तिथे बहुमताचा दावा केलाय. भाजपला गोव्यात पण इतर पक्षांनी साथ दिली आहे. तर निवडणूक झालेल्या ५ पैकी ४ राज्यात भाजप सत्ता स्थापन करणार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपचा आधी काही जोर नव्हता. (तसाच तो दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पण नाहीय). पण आता अरुणाचल प्रदेश , आसाम , नागालँड , सिक्कीम, आणि आता मणिपूर या ५ राज्यांमध्ये एकतर भाजपचा मुख्यमंत्री आहे किंवा भाजप सत्तेत भागीदार आहे.

दिल्ली महापालिकेची निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे न वापरता जुन्या पद्धतीने मतपत्रिका वापरून घेतली जावी अशी मागणी २१ व्या शतकातल्या अवतारी महापुरूषांनी केली आहे. नाचता येईना *गण वाकडं!

संरक्षणमंत्री पदासाठी फडणवीस आणि शिवराज यांची नावे चर्चेत आहेत. फडणवीस आता कुठे जम बसवत आहेत त्यांना काढू नये आणि काढलेच तर मग गडकरींनाच राज्यात पाठवावे. चंद्रकांत पाटील हे बाकी सगळे ठीक असले तरी लोकांतून निवडून आले नाहीत आणि राज्यभर त्यांना कुणी ओळखत नाही. खडसे संकटात नसते तर ते चालले असते बाकी प्रदेश भाजपमध्ये तावडे, पंकजा हे सगळे मुख्यमंत्रीपदासाठी अननुभवी लोक आहेत. तावडे, दानवे तर बोलबच्चन आहेत. बाकी जर शिवराज केंद्रात गेले तर मध्य प्रदेशची पण हालत गोव्यासारखी होऊ शकते ! भाजपकडे काय लायक लोक कमी आहेत काय कि मोदींना बरेच लोक चालत नाहीत? सुरुवातीला पण संरक्षण खात्याला ५-६ महिने पूर्ण वेळ मंत्री नव्हता आता पण राज्यातले लोक घ्यायला पाहत आहेत.