मंद मंद पहाट
मंद मंद पहाट वेडी
दवांत नाचती अजूनही थोडी
उतरता माथ्यावरूनी रात्र खुळी
उमलली गगन वेलींतूनी सूर्य कळी
निळ्या निळ्या अभ्रांच्या छतावरूनी
गेले कोमल किरणांचे कर फिरूनी
फडफड पाखरांची उभ्या झाडांवरती
उषाराणी अशी तेथूनी फिरती
ऐसे लावण्य झाकाळती धुके
असीम धरेचे रम्य गूढ बोलके
क्या बात है !!
वाहव्वा रे वाहव्वा! मजा आ
धन्यवाद
सुंदर!
खुपच सुंदर वर्णन !!!
धन्यवाद
छान
छान