Skip to main content

मंद मंद पहाट

लेखक चांदणशेला यांनी शुक्रवार, 17/02/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंद मंद पहाट वेडी दवांत नाचती अजूनही थोडी उतरता माथ्यावरूनी रात्र खुळी उमलली गगन वेलींतूनी सूर्य कळी निळ्या निळ्या अभ्रांच्या छतावरूनी गेले कोमल किरणांचे कर फिरूनी फडफड पाखरांची उभ्या झाडांवरती उषाराणी अशी तेथूनी फिरती ऐसे लावण्य झाकाळती धुके असीम धरेचे रम्य गूढ बोलके
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1522
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

उत्कृष्ट वर्णन !! कविता आवडली !!

छान

छान