मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो !
संदीप औलीया आहे याची साक्ष देणारी ही एक सुरेख कविता ! स्वच्छंद जगण्याची आदीम उर्मी प्रत्येकाच्या अंतरी आहे पण रोजच्या जगण्यात ती हरवून गेलीये. स्वानंद किरकिरेची शायरी रांचो नांवाच्या स्वछंदाला शोधतांना हृदयस्पर्शी होते आणि डोळ्यात पाणी तरळवून जाते....
बहती हवा सा था वो,
उड़ती पतंग सा था वो,
कहाँ गया उसे ढूँढो
हम को तो राहें ही चलती
वो खुद अपनी राह बनता
गिरता संभालता, मस्ती में चलता था वो |
हमको कलकी फिकर सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हें को खुल के जीता था वो |
कहाँ से आया था वो
छू के हमारे दिल को
कहाँ गया...उसे ढूँढो |
स्वानंद म्हणतो आम्हाला रोजचा दिनक्रमच चालवतो, पण तो स्वतःचा दिवस मांडतो. आम्ही उद्याच्या चिंतेत जगतो, तो हरेक आजचा उत्सव करतो आणि हर क्षणाला साहसानं सामोरं जातो. झेन मास्टर रिंझाई या स्वच्छंदाचं वर्णन, केवळ दोनच शब्दात करतो `लिव्ह डेंजरसली !' आणि संदीप त्याच्या स्वच्छंदाचा माहौल रंगवतांना म्हणतो :
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !
ही कविता संदीपनं स्वत: गायलीये कारण ते त्याचं स्वत:चंच वर्णन आहे. त्यानं प्रत्येक कडव्यापूर्वी कव्याचं विवरणही केलंय त्यामुळे हे रसग्रहण म्हणजे एका अर्थानं संदीपशी केलेली जुगलबंदी आहे. तो कवितेतून स्वत:ला खोलतोयं आणि मी गद्यातून स्वच्छंदाचा माहौल उभा करण्याचा यत्न करतोय. संदीप म्हणतो ही आपल्यातल्याच दोन मींची कविता आहे. मला वाटतं, हा एका स्वच्छंद गवसलेल्याचा रोजच्या जगण्याचा अंदाज़ आहे. एकदा स्वच्छंद गवसला की चौकटीत जगणारं असं कुणी राहातच नाही.
रोज तेचते जगण्याची वृत्ती, सुरक्षितचौकटीत जगण्याची सवय आणि किरकोळ गोष्टींनी व्यथित होणं संदीप किती सुरेखपणे मांडतो. सहज भिडणारी रुपकात्मकता रसिकाला संदीपच्या अनुभवाशी तत्क्षणी रिलेट करते. जुनाट दार आणि किरकिरा बंदी ही धारणात बांधली गेलेली मानसिकता आहे, जी मोकळा श्वासच घेऊ देत नाही. स्वानंद म्हणतो तसा ‘एक कहानी ख़तम तो, दुजी शुरु हो गई मामू !’ असा जगण्याचा पॅटर्न होऊन बसतो. संदीप ती स्थिती ‘बिजागरीशी जीव गंजवत बसतो’ अशी मांडतो आणि शेवटच्या ओळीत तर कहर करतो...तो लंघून चौकट पार निघाया बघतो ! ही चौकट म्हणजे भीती आहे. आणि ती भीती दुहेरी आहे. मूळात जे भय आहे ते शारीरिक म्हणजे मृत्यूचं आहे आणि मानसिक भय इज्जतीचा कधीही फालुदा होण्याचं आहे. या दोन भयांना जो पार करतो तो चौकट लंघून जातो, स्वच्छंद होतो.
मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !
मग या रोजमर्राच्या जिंदगीत वरुन कितीही हसतमुख दिसलो तरी आत कधीही भडका होईल असा संताप धगधगत असतो. इन अ वे, व्यक्तीमत्त्वाच्या जगण्याला हा उन्हाचा शाप आहे. आणि ज्याला स्वच्छंद गवसला तो याच उन्हाचे दागिने घडवतो ! तीच रिलेशनशिप्सची गुंतागुंत, त्याच आर्थिक विवंचना, तेच दैहिक प्रश्न, पण चौकट लंघून गेलेला त्यांची दाहकता सूर्यफुलात रुपांतरित करतो.
डोळ्यांत माझिया सूर्याहुनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते-
- घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!
यशस्वी झालो तरच खरा जगलो ही मानसिकता अस्तित्वाविरोधात लढा उभा करते. प्रत्येक अडचण काच होते आणि रडीचा का होईना डाव खेळून जिंकण्याची इर्ष्या निर्माण करते. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तसा ‘स्व कायम विजयी आहे’ कारण तो दुसर्याच्या विजयात स्वत:ची हार मानत नाही तर ते त्याचं कौशल्य मानतो, त्याला दाद देतो. आणि मग ती हार सुद्धा त्याला आनंद देऊन जाते कारण तो नवं काही तरी शिकलेला असतो.
मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !
आस्तिक देवावर भरोसा ठेवून असतो आणि तो सदैव आपल्याच पाठीशी उभा राहावा म्हणून नवस-सायास करतो. ‘तो’ आपल्या मनाजोगतं घडवेल या भाबड्या आशेपायी वेळातवेळ काढून भक्ती करतो. पण स्वच्छंद जगणार्याला दान काय पडेल याची फिकीर नसते, त्याचा सगळा रस खेळण्यातच असतो. या निर्वेध चित्तदशेमुळे आणि अशा बहुआयामी विश्वात, आपली व्यक्तिगत इच्छा रेटणं व्यर्थ आहे हे उमगल्यानं, तो अस्तित्वाशी कायम समरुप असतो. असं जगणं मग कृतार्थ होतं आणि अस्तित्वाचा धन्यवाद घेऊन जातं.
मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्या
अन् 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!
ज्या काव्याला अध्यात्मिक आयाम नाही ते फार सुपरफिशियल होतं. संदीप त्याचं अध्यात्मिक आकलन कवितेत आणतोच आणि त्यामुळेच तर त्याची कविती मिस्टीकल होते. चौकटीत जगणार्याला स्यूडो अध्यात्माचा मोठा आधार असतो. म्हणजे ‘तत् त्वं असी’ किंवा फारच डेरींग असेल तर ‘अहं ब्रह्मास्मी’ असे काही फंडा मनातल्या मनात रिपीट करत तो जगत असतो. शिवाय हे फंडे प्रसंगानुरुप बदलत असतात. या मानसिकतेला संदीप म्हणतो...मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार ! पण हे इतकं वरवरचं असतं की आतला चेहरा तसाच भेसूरच राहातो, कारण व्यक्तीमत्त्वातून सुटका झाल्याखेरिज तो बदलणार तरी कसा? स्वच्छंद जगणारा आकाश झालेला असतो ! त्याचं सगळं जगणं मोरपंखी झालेलं असतं. आणि या स्थितीचं वर्णन संदीप असं काही कमालीचं लोभस करतो की त्याच्या प्रतिभेचा केवळ हेवा वाटतो !...तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परि चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!
मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !
याद्या
19974
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कवितेचं सुंदर रसग्रहण..
नाइस !
सुरेख रसग्रहण,
समसमा स॑योग!!
आयुष्यावर बोलू काही मधील हे
एखादी अवघड गोष्ट सोपी केली की
In reply to आयुष्यावर बोलू काही मधील हे by पुंबा
बेलाशक..
In reply to एखादी अवघड गोष्ट सोपी केली की by संजय क्षीरसागर
ही कविता ऐका
In reply to बेलाशक.. by पुंबा
संक्षींशी बेशर्त सहमत.
In reply to एखादी अवघड गोष्ट सोपी केली की by संजय क्षीरसागर
संदीप, पाडगावकर, खेबूडकर, गदिमा हे कवि म्हणून कोलटकर, आरती प्रभू, ग्रेस यांच्यापेक्षा कमी प्रतीचे म्हणे!यातला संदिप खरेचा उल्लेख अस्थानी आहे. बाकी वाक्याबद्दल "हो म्हणायचे आणि सोडून द्यायचे" समीक्षक लोकांना जग वेगळे दिसते. बोहारणीचे उदाहरण माहिती आहे ना..?नौशादसारख्या दिग्गज संगीतकारानं म्हटलंय...
In reply to संक्षींशी बेशर्त सहमत. by मोदक
नाही नाही. संदीप खरे या सार्
In reply to संक्षींशी बेशर्त सहमत. by मोदक
संदीप खरे या सार्यांइतका
In reply to नाही नाही. संदीप खरे या सार् by पुंबा
साहित्य संपादकसो...
In reply to संदीप खरे या सार्यांइतका by मोदक
तथाकथित हुच्चभ्रूंमध्ये
In reply to आयुष्यावर बोलू काही मधील हे by पुंबा
हे भारीच !
In reply to तथाकथित हुच्चभ्रूंमध्ये by राजाभाउ
कवितेबाबत तर सुबोध = सवंग अशीही जोडणी असते.म्हणून तर संदीपच्या कवितांचं रसग्रहण करतोयं. एकसोएक कविता आहेत त्याच्या.दिवस असे की..
In reply to हे भारीच ! by संजय क्षीरसागर
क्लास
स्वच्छंदाला अजून एक सुरेख आयाम आहे
In reply to क्लास by स्पा
अंतर्बाह्य आलेली पारदर्शकता
In reply to स्वच्छंदाला अजून एक सुरेख आयाम आहे by संजय क्षीरसागर
संदीप खरेंच्या कवितांपैकी हि
वा वा !!
मी दोघांसही ओळखतो.....
तुम्हाला बहुदा.....
In reply to मी दोघांसही ओळखतो..... by चौकटराजा
वाह गुरुदेव....मस्तं लिहिलयं.
मला रसग्रहणं आवडत नाहीत.
आणि हो.. तुम्ही कुठेतरी
In reply to मला रसग्रहणं आवडत नाहीत. by पिलीयन रायडर
सर्व रसिकांचे
संक्षी सर मस्त रसग्रहण
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो !
In reply to संक्षी सर मस्त रसग्रहण by राजाभाउ
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो !
In reply to संक्षी सर मस्त रसग्रहण by राजाभाउ
यातला "आताशा" हा शब्द
In reply to आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो ! by संजय क्षीरसागर
स्वच्छंद हा अवघ्या सृष्टीचा जगण्याचा अंदाज़ आहे
In reply to यातला "आताशा" हा शब्द by राजाभाउ
रसग्रहण आवडलं
सहमत आहे
In reply to रसग्रहण आवडलं by पैसा
आणखीन एक छान कविता "नास्तिक
नेहमीप्रमाणेच उत्तम रसग्रहण,
धन्यवाद !
In reply to नेहमीप्रमाणेच उत्तम रसग्रहण, by नीलमोहर
ही दोन भिन्न व्यक्तींमधील तुलनाही वाटते, आणि एकाच व्यक्तीच्या स्प्लिट पर्सनॅलिटी टाईप दोन व्यक्तिमत्वांचीही.स्वच्छंद आपल्या सर्वांचा एकच आहे. तो व्यक्तीमत्त्वातून सुटका झालेल्या प्रत्येकाचा जगण्याचा अंदाज आहे. ३ इडियटसमधे तो रांचो झालायं, एक उनाड दिवसमधे तो अशोक सराफ झालायं, या कवितेत तो संदीप खरे झालायं आणि रसग्रहणात तो संजय क्षीरसागर झालायं. स्प्लीट पर्सनॅलिटी म्हणजे अनेक व्यक्तीमत्वातून जगणारी व्यक्ती, तो सायकॉलॉजिकल प्रॉब्लम आहे आणि स्वच्छंद म्हणजे व्यक्तीमत्वातून झालेली सुटका.स्वच्छंद आपल्या सर्वांचा एकच
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
जियो संक्षी..!!!
व्वा !
In reply to स्वच्छंद आपल्या सर्वांचा एकच by मोदक
स्वच्छंद !
आणि या शेवटच्या दोन ओळी !
In reply to स्वच्छंद ! by संजय क्षीरसागर
संजयजी, आवडले जिंदादिल
संक्षी साहेब,
.
In reply to संक्षी साहेब, by अभिजीत अवलिया
....बाकी सर्व वर्कींग डेज जवळजवळ एकसारखे असतातहेच पब्लिकला मान्य नाही ... आणि तिथून सुरुवात आहे.मला मान्य आहे. सर्व वर्कींग
In reply to . by संजय क्षीरसागर
दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि ब्रॉड हींटस देतो
In reply to मला मान्य आहे. सर्व वर्कींग by अभिजीत अवलिया
प्रतिसाद अंशतः आवडला.
In reply to दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि ब्रॉड हींटस देतो by संजय क्षीरसागर
फार सोपं आहे उत्तर म्हटलं तर.
In reply to प्रतिसाद अंशतः आवडला. by अभिजीत अवलिया
.
In reply to फार सोपं आहे उत्तर म्हटलं तर. by संदीप डांगे
आहे त्या क्षणाला समरसून जगले तर स्वच्छंद म्हणजे काय याची व्याख्या पुरेशी स्पष्ट होईल..आहे तो क्षण समरसून जगायला, मनात येईल तर करीन नाही तर करणार नाही अशी चित्तदशा लागते. उदा. हा लेख मी ८ फेब्रुअरीला रात्री १.०४ ला अप लोड केला , ती बुधवारची रात्र होती हे मी आता बघितलं ! वेळ, वार, तारीख यांची मला फिकीर नसते (इथे ३१ जुलैबद्दल गोड गैरसमज करुन घेतला आहे पण तो `वार्षिक अपवाद' होता आणि मी केवळ डिस्क्लेमर दिला होता की माझ्याकडे उत्तर नाही असा गैरसमज नको, फक्त प्रतिसादाला वेळ लागू शकतो. आणि मी ३१ जुलैला सुद्धा प्रतिसाद दिले याचं सोयिस्कर विस्मरण झालं आहे. ) तर मुद्दा असा की वर्तमान हाच केवळ जगण्याचा क्षण आहे आणि लिहीन किंवा न लिहीन या विकल्पामुळे ही पोस्ट इंटरेस्टींग झाली आहे. उद्या सकाळी उठायलाच हवं असं माझ्यावर कोणतंही बंधन नाही. इन अ वे, मृत्यू केंव्हाही आला तरी मला फरक पडत नाही त्यामुळे लेखनात उत्कटता येते आणि ती वाचणार्याला भावते. कॅशीअरला खुर्ची सोडणं असंभव आहे त्यामुळे आयुष्य क्षणोक्षणी बदलत असलं तरी त्याला फोकस कामावरच ठेवावा लागतो. मी केंव्हाही काम बंद करु शकतो आणि होणारा परिणाम भोगायला तयार असतो त्यामुळे प्रत्येक बदलणार्या क्षणाला अनुरुप वागू शकतो. प्रश्न तुम्ही नोकरी करतायं की व्यावसाय हा नाही आणि उगीच कल्पना ताणणं, की अमुकएक डेडलाइन आहे, समोर क्लायंट बसलायं, आता तुम्ही सिंथ वाजवाल का ? हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न आहे. प्रश्न तुम्ही स्वतःला काम आणि पैसा यापेक्षा श्रेष्ठ समजता की कायम त्याखालीच दबलेले असता हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारण्याचा आहे. जर तुम्ही समजत असाल तर चर्चाच संपली !शिवाय या विषयावर
In reply to . by संजय क्षीरसागर
संक्षि, समोर क्लायंट बसला
In reply to . by संजय क्षीरसागर
तिथे ही हाच मुद्दा होता
In reply to संक्षि, समोर क्लायंट बसला by संदीप डांगे
दोन भाग आहेत बघा. वर अभिजीत
In reply to तिथे ही हाच मुद्दा होता by संजय क्षीरसागर
दोघांच्या बेसिक समजुतीत जमिन
In reply to दोन भाग आहेत बघा. वर अभिजीत by संदीप डांगे
वर्किंग डे एकसुरीच न होऊ देणे म्हणजे स्वछंद नव्हे का?
In reply to दोघांच्या बेसिक समजुतीत जमिन by हतोळकरांचा प्रसाद
संक्षि, पण तुम्ही 'काम करणे'
In reply to वर्किंग डे एकसुरीच न होऊ देणे म्हणजे स्वछंद नव्हे का? by संजय क्षीरसागर
?
In reply to संक्षि, पण तुम्ही 'काम करणे' by संदीप डांगे
मीही तेच विचारतोय तर..
In reply to ? by संजय क्षीरसागर
.
In reply to मीही तेच विचारतोय तर.. by संदीप डांगे
आनंद विचाराल तर, तो तर सब्जेक्टीव आहे ?आनंद आणि स्वच्छंद या सर्वासाठी एकच गोष्टी आहेत. स्वेच्छेनं काम करणं हाच आनंद आहे.अगदी काम करण्याचाही पर्याय नसतो. ते मीच ठरवतो की कोणते काम कधी करायचे ते, कोणते टाळायचे, माझ्या इच्छेवर आहे.तुम्ही पुन्हा कामाविषयीच बोलतांय ! मी विचारलंय 'कामाला जाण्याव्यतिरिक्त आपल्याला कायकाय पर्याय उपलब्ध असतात ?'मी ९ ते ५ मध्ये स्वतःला बांधून घेतले नाही, ते जमले नाही कधीच. म्हणून नोकरी करत नाही.तुम्ही प्रश्न नीट वाचलेला दिसत नाही. मी विचारलंय ` ९ ते ५ मधे आपण काय स्वच्छंद पुरवू शकतो ?'भूक लागल्यावर जेवतो.छान ! चला एकतरी नैसर्गिक गोष्ट रुटीनला डिफीट करणारी आहे.त्यामुळे माझं प्रत्येक काम क्लायंटलाही आनंद-समाधान देतं. कारण मी माझ्या कामात जीव ओतलेलायालाच मी स्वेच्छेनं काम करणं म्हणतो ! आणि अशाच कामात आनंद मिळू शकतो. तुम्हाला मूळ मुद्दा समजलायं असं गृहित धरतो. लगे रहो !हो... रात्री-बेरात्री कधीही जागत राहत असतो. इथे तुमच्या खालोखाल वेळी-अवेळी मिपावर प्रतिसाद टायपत असतो,सहमत आहे.गेले चार वर्ष 'रोज' अशाच दणदणीत अशक्यतेवर जगत आहे. प्रचंड कर्ज आहे डोक्यावर,...इथे थोडा (आणि खरं तर बराच मोठा) फरक आहे. कायम अनिश्चिततेत जगणं यालाच `लिव डेंजरसली' म्हणतात. आयुष्यात कधीही कर्ज न घेतल्यामुळे काम आणि अर्थाजन या नेहमी दुय्यम गोष्टी आहेत. यावरनं बहुदा तुम्हाला स्वच्छंदाचा आवाका लक्षात येऊ शकेल.जीवन कसे जगायचे याचे कोणतेही दगडी नियम मला माहित नाहीत, कोणी असे नियम बनवत असेल तर मला जमत नाहीत... याला तुम्ही स्वच्छंद म्हणा की कसेही, वॉटेवर!स्वच्छंद हा दगडी नियम नाही. ते स्वेच्छेनं जगण्याचं साहस आहे.तुम्ही पुन्हा कामाविषयीच
In reply to . by संजय क्षीरसागर
तुमचा स्वच्छंद
In reply to तुम्ही पुन्हा कामाविषयीच by संदीप डांगे
१. तुम्ही काम करण्याचे पैसे घेता का?अर्थात ! कामाचा मोबदला हा व्यावहार आहे.२. तुम्हाला सि-एचे काम करण्यातून आनंद मिळतो का?अर्थात. ज्या कामात आनंद नाही ते मी करतच नाही.३. आनंद मिळतो आणि तुम्हाला पैशांची गरज नाही तर मग त्या कामाचे पैसे का घेता?मला पैश्याची गरज नाही हा शोध तुम्ही कसा लावला ? आनंदाचं काम स्वेच्छेनं करुन त्यातनं पैसे मिळवणं हा माझा आनंद आहे.निदान माझ्या तरी पाहाण्यात
In reply to तुमचा स्वच्छंद by संजय क्षीरसागर
पूर्ण प्रतिसाद
In reply to फार सोपं आहे उत्तर म्हटलं तर. by संदीप डांगे
अभिजीत यांचा मूळ प्रश्न आहे
क्रमशः करून काय उपयोगे ?
In reply to अभिजीत यांचा मूळ प्रश्न आहे by संदीप डांगे
बाकी सगळे ठीक आहे.. पण
In reply to क्रमशः करून काय उपयोगे ? by संजय क्षीरसागर
लिहीलंय ते निर्विवाद आहेच !
In reply to बाकी सगळे ठीक आहे.. पण by मोदक
संक्षी योगायोगाने तुमचा
In reply to क्रमशः करून काय उपयोगे ? by संजय क्षीरसागर
नोकरदार माणुस कधीच स्वच्छंदी होणार नाही का?
In reply to संक्षी योगायोगाने तुमचा by पिलीयन रायडर
हे बघा. तुमचा मुद्दा अगदी
In reply to नोकरदार माणुस कधीच स्वच्छंदी होणार नाही का? by संजय क्षीरसागर
बाईश्री,
In reply to हे बघा. तुमचा मुद्दा अगदी by पिलीयन रायडर
सायरनच्या आवाजासरशी जेवायला जाणारा, आणि पैशासाठी नोकरी करणारा माणुसही अत्यंत आनंदी आणि समरसुन जगणारा असु शकतोच.मग चर्चा कशासाठी चाललीये ?माझ्यामते तुम्हाच्याकडे अबोव्ह अॅव्हरेज बुद्धिमत्ता आणि पैसा आहे म्हणुन तुम्हाला बहुसंख्य सामान्यांचे प्रश्न लक्षात येत नाहीत.अजिबात नाही ! स्वच्छंद जगायला साहस लागतं आणि एकदा मनसोक्त जगायला लागलं की समोर येणार्या प्रश्नाची उत्तरं लगोलग मिळतात. ते प्रश्न राहात नाहीत, तो चॅलेंज होतो. स्वतः चा बचाव करत राहाणारी व्यक्ती फक्त साहस न करण्यासाठी कायम कारणं शोधत राहाते.तुम्हीच तर ९-५ वाल्यांवर
In reply to बाईश्री, by संजय क्षीरसागर
धन्यवाद !
In reply to तुम्हीच तर ९-५ वाल्यांवर by पिलीयन रायडर
हप्र म्हणत आहेत की नोकरी
In reply to धन्यवाद ! by संजय क्षीरसागर
तुम्ही एकदा खफवर आणि एकदा इकडे
In reply to हप्र म्हणत आहेत की नोकरी by पिलीयन रायडर
स्वच्छंदीपणाच्या मुळात अशा व्याख्या असणं हेच किती बोरिंग आहे...स्वेच्छेनं काम करणं ही कल्पना तुम्हाला बोरींग वाटते ना ? तद्वत ९ ते ५ मधे माणूस स्वेच्छेनं जगतो ही कल्पना मला हास्यास्पद वाटते.अहो, त्याची काही आखीव रेखीव
In reply to तुम्ही एकदा खफवर आणि एकदा इकडे by संजय क्षीरसागर
आता इतकं समजुन घेतलं दुसर्
In reply to अहो, त्याची काही आखीव रेखीव by संदीप डांगे
स्वेच्छेनं काम करणं ही कल्पना
In reply to तुम्ही एकदा खफवर आणि एकदा इकडे by संजय क्षीरसागर
९ ते ५ मधे स्वेच्छेनं जगता येतं का नाही याची चर्चा आहे
In reply to स्वेच्छेनं काम करणं ही कल्पना by पिलीयन रायडर
पण मी काय म्हणतो, ह्या एवढ्या
In reply to ९ ते ५ मधे स्वेच्छेनं जगता येतं का नाही याची चर्चा आहे by संजय क्षीरसागर
स्वच्छंद म्हणजे स्वेच्छेनं केलेलं काम
In reply to पण मी काय म्हणतो, ह्या एवढ्या by हतोळकरांचा प्रसाद
एग्झॅक्टली! मी ह्याच
In reply to संक्षी योगायोगाने तुमचा by पिलीयन रायडर
?
In reply to एग्झॅक्टली! मी ह्याच by संदीप डांगे
पण मेजॉरिटीला देण्यासारखे उत्तर पर्सनल अनुभवांवरुन देता येत नसते?साहस हे सर्वांसाठी एकच आहे. तुम्ही नोकरीत करता की धंद्यात यानं त्यात फरक पडत नाही. पण साहसाशिवाय स्वच्छंद नाही हे तितकंच नक्की.त्यामुळे कामच मिळत नाही, उपाशी राहायची पाळी आली, सी-ए होऊन फायदा नाही झाला असे होत नसावे. असे काही असते काय?उपाशी राहाण्याचा नाही, कामाच्या स्टाईलचा प्रश्न आहे. माझे सर्वच्या सर्व मित्र अजूनही स्वतःच्या ऑफिसमधे नोकरी केल्यासारखं काम करतात. कारण त्यांना स्टाफसमोर कामसू इमेज राखायची असते. शिवाय क्लायंटचा दट्ट्या असतोच, म्हणजे कामच्या वेळेत हा पिक्चरला गेला तरी ट्रिब्यूनला जातोयं असंच सांगातो. शिवाय सगळा व्यावसाय हा सरकारची मनमानी आणि क्लायंटची टॅक्स भरण्याविषयी नाराजी यातला खेळ आहे, जो इतर कोणत्याही व्यावसायात नाही. थोडक्यात क्वालिफीकेशन आणि स्वच्छंद जगणं यांचा डायरेक्ट संबंध नाही. झाडू मारणारा सुद्धा मनसोक्त जगू शकतो आणि मोस्ट क्वालिइफाइड सुद्धा , बाहेर पडून काही करता येणार नाही म्हणून कॉलेजात छपरी विषय आयुष्यभर शिकवू शकतो.झाडू मारणारा सुद्धा मनसोक्त
In reply to ? by संजय क्षीरसागर
मी तरी अजून वेगळे काय म्हणतोय ?
In reply to झाडू मारणारा सुद्धा मनसोक्त by संदीप डांगे
मला वाटते संक्षिंनी जो नोकरदारांचा सॅम्पल जमवला आहे ज्यावरुन ते आपले निरिक्षण मांडत आहेत, ते संक्षिंकडे फार करवादत असावेत... सगळं आलबेल असतांना उगाच करवादणे हाही काहींचा गुण असतो. त्यातून संक्षिंना आपले व्यवसायिक असल्याने मुक्त असणे खूप भावले असावे.आणि आता मूळ विषय सोडून उगीच असाआपण कोण आहोत कोणाला जज करणारे? नाही का?सेंटी मारतायं. मी कुणालाही जज कलेलं नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आणि सीए व्यावसायाची गोष्ट काढलीये म्हणून सांगतो. ऐकून भल्याभल्यानां फेफरं येईल. व्यावसायिक सिएला ऑलमोस्ट सगळ्या क्लायंटसचं काम वर्षभर करायला लागतं आणि पैसे वर्षातून फक्त एकदाच, म्हणजे रिटर्न भरल्यावर मिळतात. त्यामुळे तुम्ही उगीच मी म्हणतोयं तेच म्हणतायंत वगैरे गैरसमज करुन घेऊ नका.मी काहीही सेन्टी मारलं नाहीहो
In reply to मी तरी अजून वेगळे काय म्हणतोय ? by संजय क्षीरसागर
तुम्ही एकदा सहमत मग पुन्हा असहमत असा खेळ करतायं !
In reply to मी काहीही सेन्टी मारलं नाहीहो by संदीप डांगे
तिथेही आप्ण कर्ज असेल तर माणूस स्वच्छंदी (म्हणजे तुमच्यासारखा) जगूच शकत नाही हेच सांगत होतात ना?तिथे तुम्ही या विचाराशी सहमत होतात, हे पाहा :इएमआय ही काँस्टंट लाईनीत ठेवणारी गोष्ट आहे.>> अगदी सहमत. माझे तर मत असे आहे की इएमआय ही आधुनिक व्हाईटकॉलर वेठबिगारी आहे. असो. हे माझे वैयक्तिक मत आहे.आता मात्र झाडूवाला, प्रोफेसर अशी जेनेरिक उदाहरणे देऊन स्वच्छंदीपणाला कोणतीही अट नसते हे सांगत आहात.संदर्भ नीट वाचलात तर गोंधळ उडणार नाही. ते मी स्वच्छंद आणि क्वालिफिकेशन या तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय. त्यावर मी ठाम आहेच.म्हणजे? वर्षातून एकदाच मिळतात म्हणजे? त्यात फेफरं येण्यासारखं नक्की काय आहे ते समजलं नाही. जरा विस्तार कराल काय...नोकरदाराला जसा महिन्याला पगार मिळतो किंवा इतर व्यावसायात जसं सतत काम आणि पैसे हे चक्र चालू असतं तसं व्यावसायिक सीएच्या प्रोफेशनमधे नसतं. वर्षभर क्लायंट सपोर्ट द्यावा लागतो आणि त्याचं बिलींग इन्कमटॅक्स रिटर्न भरल्यावर म्हणजे वर्षातून एकदाच होतं . तुम्ही तुमच्या सीएला वर्षातून किती वेळा पैसे देता?माझे आजही हेच मत आहे की इएमआय
In reply to तुम्ही एकदा सहमत मग पुन्हा असहमत असा खेळ करतायं ! by संजय क्षीरसागर
ज्योक करतायं काय ?
In reply to माझे आजही हेच मत आहे की इएमआय by संदीप डांगे
किंवा वार्षिक मिळाले काय त्यात फेफरं येण्यासारखं काय आहे ते समजत नाही. वर्षातून एकदा इन्कम ह्या रेगुरॅलिटीच्या अवतीभवतीच आयुष्य गुंफलं असेल ना सीएंचे?यात अनिश्चितता नाही ? वर्षातून एकदा पैसे अशी सायकल कोणत्या प्रोफेशनमधे आहे सांगाल काय? का उगीच प्रतिसाद ठोकायचा म्हणून चाललंय ?अनिश्चितता नाहीच आहे. आम्हाला
In reply to ज्योक करतायं काय ? by संजय क्षीरसागर